Thursday 28 September 2017

पियुषा दगडे-पाटील ठरल्या जनतेतून थेट निवडलेल्या पहिल्या महिला सरपंच

पियुषा दगडे-पाटील ठरल्या जनतेतून थेट निवडलेल्या पहिल्या महिला सरपंच


 भाजपच्या पीयुषा किरण दगडे-पाटील यांचा मुळशी तालुक्यातील बावधन बुद्रुक गावच्या ग्रामपंचायतीत थेट जनतेतून सरपंच पदी विजयी झाल्या आहेत. जिल्हयात प्रथमच जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाली. पियूषा यांना पहिली महिला सरपंच होण्याचा मान मिळाला आहे. त्या पुण्यातील भुसारी-बावधन परिसरातील भाजपचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहे. येथील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. सरपंच पदासाठी तीन उमेदवार रंगणात होते.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

या निवडणुकीत पक्षीय पद्धत किंवा पक्षाचे चिन्ह नसले तरी पॅनेलचे नेतृत्व पक्षाचे पदाधिकारी करीत होते. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारामध्ये थेट लढत होते. पालिकेचे नगरसेवक किरण दगडे-पाटील, सरपंच बबनराव दगडे-पाटील, पोलिस पाटील बबनराव दगडे-पाटील, माजी सरपंच राहुल दुधाळे, बापुसाहेब दगडे-पाटील, सुनिल दगडे-पाटील यांनी पॅनल तयार करून सरपंच पदासाठी त्यांची पत्नी पियुषा यांना उमेदवारी दिली होती. भाजपा, शिवसेना व रिपई पुरस्कृत ग्रामदैवत श्री बापुजीबुवा परीवर्तन पॅनल होता.पियुषा यांना 2300 आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिक्षा दगडे यांना 2260 मते मिळाली. थेट सरपंच निवड  प्रक्रियेतुन जिल्ह्यातील पहिल्या सरपंच होण्याचा मान मुळशीतील बावधन  गावच्या पियुषा किरण दगडे  यांना मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक किरण दगडे यांच्या त्या पत्नी आहेत.

दुसऱ्या बाजूला प्रतीक्षा दगडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या. त्यांना जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप दगडे, माजी सरपंच सुदाम दगडे, माजी सरपंच सुदाम भुडे, माजी उपसरपंच तानाजी दगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोरख दगडे यांचा पॅनल होता. त्यांचा सरपंचपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी एकूण सदस्यांपैकी 17 पैकी 10 जागांवर म्हणजे सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर पहिल्या पॅनेलचे सहा व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

बावधन ग्रामपंचायत शहरालगत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्यामुळे ही ग्रामपंचायत प्रसिद्धीच्या झोतात होती. दरम्यान, मुळशी तालुक्यातील तालुक्याच्या प्रवेशद्वारावर बावधन गाव आहे. येथील सरपंच पद मिळवून भाजपने आता तालुक्यात थेट प्रवेश केला आहे. अशी ही चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. नगरसेवक किरण दगडे यांनी पालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला, असा आरोप आणि प्रचार सुरू होता. परंतु, प्रत्यक्षात आम्ही सत्तेत आल्यावर महापालिका कडून मुबलक पाणी पुरवठा करण्यास प्राधान्य देऊ असा प्रचार करीत होतो. विरोधकांनी त्या वाक्याचा विपर्यास करून चुकीचा प्रचार केला. परंतु, मतदारांनी मात्र योग्य उमेदवाराला म्हणजे आम्हला साथ दिली, असे किरण दगडे यांनी सांगितले.

सर्वांगीण सुविधा देणार-पीयुषा दगडे
आता आम्ही गावाला पाणी पुरवठ्यासह गावाचा सर्वांगीण विविध सुविधा देण्यास आम्ही कटीबध्द राहून प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

विजयी उमेदवार : प्रभाग १. सूर्यकांत भुंडे, अमोल दगडे, वृषाली भुंडे, प्रभाग २. दीपक दगडे, तुषार दगडे, रंजना दगडे, प्रभाग ३. सचिन दगडे, वैशाली दगडे, कल्पना घुले (बिनविरोध), प्रभाग ४. रेश्मा दगडे, आझाद दगडे, शीतल दगडे, प्रभाग ५. मयूर कांबळे, सुनीता कांबळे, रेश्मा खिलारे, प्रभाग ६. आशा भुंडे, बापूसाहेब दगडे.


Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.