Wednesday 6 September 2017

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान ; पुणे महापालिकेच्या एका रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर; 11 ऑक्टोबरला मतदान

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदानबृहन्मुंबई, नागपूर, कोल्हापूर व पुण्यातील 5 रिक्तपदांसाठीदेखील मतदान


 नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच बृहन्मुंबई, पुणे व नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 96 हजार 580 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 41 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे. या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नांदेड- वाघाळा महानगरपालिका आणि पोट निवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल

निवडणूक कार्यक्रम

·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे-  16 ते 23 सप्टेंबर 2017
·         नामनिर्देशपत्रांची छाननी-      25 सप्टेंबर 2017
·         उमेदवारी मागे घेणे-                 27 सप्टेंबर 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप-            28 सप्टेंबर 2017
·         मतदान-                                  11 ऑक्टोबर 2017
·         मतमोजणी-                             12 ऑक्टोबर 2017
·         निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 आक्टोबर 2017

Political Research and Analysis Bureau (PRAB)


पुणे महापालिकेच्या एका रिक्त जागेसाठी निवडणूक जाहीर; 11 ऑक्टोबरला मतदान
पुणे महापालिकेच्या एका रिक्त  प्रभाग क्र. ‘21अ’ जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यासाठी
11 ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. नवनाथ कांबळे यांच्या निधनाने हि जागा रिक्त झाली होती. मुळचे रिपाइंचे असलेले कांबळे हे नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली होती. 
दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून कांबळे यांची कन्या हिमाली यांच्या नावाचा आग्रह आरपीआय(आठवले गट) पक्षात आहे.कांबळे हे प्रभाग क्रमांक 21 मधून निवडून आले होते. या प्रभागाचे त्यांनी यापूर्वी दोनवेळा प्रतिनिधीत्व केले होते. कांबळे यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिल्यास अन्य पक्षाचे उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील याची शक्‍यता नाही. तसेही रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांचे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याशी जवळचे संबंध असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीच्या चर्चेस्थानी असलेल्या हिमाली कांबळे या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहेत. उच्चशिक्षीत असल्याने त्यांनाच उमेदवारीची संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी आहे.



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.