Thursday, 12 October 2017

राज्यातील ४ पोटनिवडणुकांचा निकाल ; नांदेड वाघाळा महानगरपालिका निकाल 2017 विजयी उमेदवार ;पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय

राज्यातील ४ पोटनिवडणुकांचा निकाल


मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूरात भाजप विजयी, भांडूपमध्ये शिवसेनेला धक्का

राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल जाहीर झाले आहे. मुंबई महानगरपालिका क्रमांक ११६ ची पोटनविडणूक प्रमिला पाटील यांच्या मृत्यूमुळे ही निवडणूक घेतली गेली. तर पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मधल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेतली गेली. तत्कालीन उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. नागपूर महापालिकेच्या प्रभाग ३५ अ मधील भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या  अकाली निधनामुळे, पोटनिवडणूक घेतली गेली. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यानं, या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागले होते. आणि कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक 11 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. ताराराणी आघाडीचे नगरसेवक निलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे, ही पोटनिवडणूक झाली. 
मुंबई महापालिका, पुणे महापालिका, नागपूर आणि कोल्हापूर महापालिकेत झालेल्या एका-एका पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबईत भाजपच्या जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला. तर पुण्यातील कोरेगाव पार्कच्या पोटनिवडणुकीत भाजप-रिपाइंच्या हिमानी कांबळे विजयी झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी विजय मिळवला आहे. नागपूरातही भाजप विजयी झाला आहे.

Political Research & Analysis Bureau (PRAB)

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ 

भांडुप पोटनिवडणूकः भाजपची सेनेवर मात

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ मध्ये, म्हणजेच भांडुपच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील  यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या मीनाक्षी पाटील यांचा ४७९२ मतांनी पराभव केला. त्यामुळे मुंबई पालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या एकाने वाढली असून ते सेनेच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे भांडुपची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी बुधवारी पोटनिवडणूक झाली. शिवसेना आणि भाजपने ती प्रतिष्ठेची केली होती. भाजपने प्रमिला पाटील यांच्या सुनेला - जागृती पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं, तर शिवसेनेनं आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे, सहानुभूती म्हणून जनता जागृती पाटलांना कौल देते, की पोटनिवडणुका जिंकण्यात माहीर असलेली शिवसेनाच बाजी मारते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण, भाजपनं ही पोटनिवडणूक आरामात जिंकली.सहाव्या फेरीअखेर जागृती पाटील यांना ११,१२९ मतं मिळाली, तर मीनाक्षी पाटील यांच्या पारड्यात ६,३३७ मतं पडली. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत न सोडता जागृती पाटील यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?
2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे. भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या भाजपचे निवडून आलेले 82 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.दरम्यान भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना अपक्षांसह – 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2

Political Research & Analysis Bureau (PRAB)

===============================================

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत

भाजप-आरपीआयच्या हिमाली कांबळेंचा 4583 मतांनी विजय

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर 4 हजार 583 मतांनी मात केली.हिमाली कांबळे यांना 7 हजार 899 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांना 3 हजार 316 मतं मिळाली. हिमाली कांबळे यांनी 4 हजार 583 मतांनी विजय मिळवला.दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. या प्रभाग क्रमांक 21 अ च्या पोटनिवडणुकीसाठी काल (बुधवार) मतदान झालं.या निवडणुकीत केवळ 20.78% मतदान झाल्याने हिमाली कांबळे, की राष्ट्रवादीचे धनंजय गायकवाड विजयी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच हिमाली कांबळे आघाडीवर होत्या. काही तासातच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सांगताना हिमाली कांबळे यांना गहिवरुन आलं.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल:

भाजप-आरपीआय – 94
राष्ट्रवादी काँग्रेस – 40
शिवसेना – 10
काँग्रेस – 11
मनसे – 2
इतर – 1
एकूण – 160

Political Research & Analysis Bureau (PRAB)

===============================================

कोल्हापूर पोट निवडणुकीत माधुरी नकाते विजयी

अंत्यत चुरशीने झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११)  पोटनिवडणुकीत रत्नेश शिरोळकर (1,399) यांनी बाजी मारली. त्यांनी राजू लाटकर (1,199) यांचा 200 मतांनी पराभव केला. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगर प्रभागातील चुरशीच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद करीत अपक्ष उमेदवार महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६२ संभाजीनगर प्रभागातील चुरशीच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद करीत अपक्ष उमेदवार माधुरी किरण नकाते यांनी रविवारी झालेल्या मतमोजणीत विजय प्राप्त केला. नकाते यांना १६०९ इतकी मते पडली. निकटचे प्रतिस्पर्धी स्वाती सासने यांचा त्यांनी २८६ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे प्रभागाच्या दिवंगत नगरसेविका बराले यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनसुराज्यशक्ती पक्षाकडून लढणाऱ्या त्यांच्या सासू शशिकला बराले या बाजी मारणार अशी शक्यता वर्तवली जात असताना नकाते यांनी विजयाची नोंद केली आहे.महापालिकेच्या माजी शिक्षण मंडळ सभापती आशा बराले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेसाठी हे मतदान घेण्यात आले होते. येत्या सव्वा वर्षांसाठी हे नगरसेवकपद राहणार आहे. या प्रभागातून एकूण चार उमेदवार निवडणूक िरगणात उतरले होते. यामध्ये जनसुराज्यकडून शशिकला यशवंत बराले, शिवसेनेकडून संस्कृती तुषार देसाई, तर अपक्ष म्हणून स्वाती अजित सासने व माधुरी किरण नकाते िरगणात उतरल्या होत्या. या प्रभागासाठी चुरशीने ६६.३८ टक्के मतदान झाले होते. यामध्ये माधुरी नकाते यांना १६०९, स्वाती सासने यांना १३२३, शशिकला बराले यांना ७६१, संस्कृती देसाई यांना १६० मते मिळाली आहेत. तर एकूण मतदानापकी २३    मते ‘नोटा’ ला मिळाली  आहेत. यंदाची पोटनिवडणूक ही आगामी निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत खरी लढत शशिकला बराले आणि संकृती देसाई यांच्यात असल्याचे बोलले जात होते. तसेच शिवसेना, भाजप यांचे वातावरण असल्याने या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संस्कृती देसाई यांनी विजयावर दावा सांगितला होता. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला केवळ १६० मतांवरच समाधान मानावे लागले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

Political Research & Analysis Bureau (PRAB)

===============================================

नागपूर महापालिका निवडणूक 2017

नागपूर पोटनिवडणूक : भाजपचे संदीप गवई ४६३ मतांनी विजयी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील मनीषनगर-नरेंद्रनगर प्रभाग क्र. ३५ (अ)मध्ये भाजपचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि माजी नगररसेवक संदीप गवई विजयी ठरले आहे. त्यांनी एकूण ५७११ मते प्राप्त करून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पंकज थोरात यांना ४६३ मतांनी मागे टाकत हा विजय मिळवला. काँग्रेसच्या पंकज थोरात यांना एकूण ५२४८ मते मिळाली. तर बसपाच्या उमेदवार नंदा झोडापे याना १६७५ मतांवर समाधान मानावे लागले. या प्रभागात चारपैकी तीन नगरसेवक भाजपचेच आहेत. हा प्रभाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येतो. येथून भाजपने माजी नगरसेवक संदीप गवई यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने पंकज थोरात यांना मैदानात उतरविले होते. बसपातर्फे नंदा झोडापे, तर रिपाइंतर्फे वंदना जीवने यांना उमेदवारी देण्यात आली होती. याशिवाय, शशिकांत नारनवरे, मनोज इंगळे, सुनील कवाडे आणि गौतम कांबळे आदी अमेदवारानीही या निवडणुकीत भाग्य आजमावले गवई हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक मानले जातात. भाजपला महापालिकेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक पक्ष गांभीर्याने घेणार नाही, असे सुरुवातीचे चित्र होते. मात्र एकीकडे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ व दुसरीकडे गडकरी समर्थक यामुळे भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

Political Research & Analysis Bureau (PRAB)

==================================================================

नांदेडा वाघाळा महापालिका निकाल - विजयी उमेदवारांची यादी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निकाल 2017 विजयी उमेदवार

नांदेड वाघाळा महापालिकेत, काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करुन, भाजपचा सूपडासाफ केला. काँग्रेने 81 पैकी तब्बल 73 जागा पटकावून, मोठा विजय मिळवला. नगरसेवकांची फोडाफोडी करून भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, फोडाफोडीचे राजकारण करून भाजपने मांडलेली मतांची गणिते चुकली आणि पक्षाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे पूर्वी १० जागा असलेल्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. १४ जागा असलेली शिवसेना ३ जागा घेत औषधापुरतीच उरली. पूर्वी ११ जागा असलेल्या एमआयएमचे तर यंदा अस्तित्वच राहिले नाही.या निवडणुकीत भाजपने काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडून चांगलाच जोर लावला होता. मागील वेळी केवळ दोन जागा जिंकणाऱ्या भाजपमध्ये काँग्रेससह जवळपास १५ विद्यमान नगरसेवकांनी प्रवेश केल्याने त्यांना भाजपने तिकीट देवून निवडणुकीत उतरवले होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा मुलगा नवल पोकर्णा, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुतणे संदीप चिखलीकर, माजी महापौर सुधाकर पांढरे यांची मुलगी, दिलीप कंदकुर्ते यांचा मुलगा, माजी विरोधी पक्षनेते बाळू खोमणे यांचा समावेश आहे.शिवसेना काँग्रेसची बी टीम आहे. त्यांचे उमेदवार विजयासाठी नाहीत तर भाजपच्या पराभवासाठी उभे आहेत, असा आरोप खुद्द मुख्यमंत्र्यांनी केल्याने सेनेत चांगलीच खळबळ माजली. फडणवीसांच्या या आरोपामुळे शिवसेना-भाजपात चांगलीच जुंपली. त्याचा परिणाम काँग्रेसविरोधी मतामध्ये विभाजन होण्यात झाला. परिणामी सेना व भाजप दोघेही गारद झाले. काँग्रेसला मुस्लीमेतर प्रभागातही विजय मिळविणे सोपे झाले.एमआयएमने 2012 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत तब्बल 12 टक्के मते घेतली होती. तसेच त्यांचे त्यावेळी 12 नगरसेवक निवडून आले होते. यंदा मात्र, तेथील मुस्लिम मतदारांनी एमआएमलाही साफ नाकारल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत औवेसी बंधूंनी चार दिवस नांदेडमध्ये तळ ठोकला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा त्यांच्या पक्षाला झालेला दिसत नाही.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नांदेड महापालिकेत खातेही खोलता आलेले नाही. त्यामुळे नांदेडकरांनी सेना- राष्ट्रवादीचे पानीपत केल्याचे चित्र आहे.गेल्या वर्षभरात नांदेड जिल्ह्य़ात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांनी एकहाती यश मिळविले. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अमर राजूरकर यांना विजय मिळविला. काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर झालेल्या ११ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आठ नगरपालिकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीत ८१ पैकी ७० जागाजिंकून अशोकरावांनी निर्विवाद यश मिळविले.अशोक चव्हाण यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान उभे केले होते. भाजपने साम-दाम साऱ्यांचा वापर केला. पण अशोक चव्हाण भाजपला पुरून उरले. २० ते २५ जागाजिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट होते. पण दुहेरी आकडाही गाठता आला नाही.शिवसेनेचे आमदार प्रताप चिखलीकर-पाटील यांच्याकडे भाजपने सारी सूत्रे सोपविली होती. अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक असलेल्या चिखलीकर यांनी स्वपक्ष शिवसेनेला दूर करून भाजपला जवळ केले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत चिखलीकर यांचा मतदारसंघ आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता. अशोकरावांनी हा मतदारसंघ मुद्दामहून सोडल्याची चिखलीकर यांची भावना झाली होती. तेव्हापासून चिखलीकर हे अशोकरावांना अडचणीत आणण्याची संधी सोडत नाहीत. महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पार धुव्वा उडाल्याने भाजपकडून महत्त्व दिले जाण्याची शक्यता नाही. यामुळेच पुढील निवडणुकीत भाजपची सहजासहजी उमेदवारी मिळणे सोपे जाणार नाही.
नांदेडमध्ये अल्पसंख्याक मतदार काँग्रेसच्या पाठीशी
पाच वर्षांपूर्वी नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत ११ जागा जिंकून एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रात आपली चुणूक दाखविली तसेच नंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये यश मिळविले. त्याच नांदेडमध्ये यंदा एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही. अलीकडेच झालेल्या भिवंडी, मालेगाव, परभणी, लातूरपाठोपाठ नांदेडमध्ये मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिली असून, एमआयएमला दूर ठेवले आहे.२०१२ मध्ये झालेल्या नांदेडच्या निवडणुकीत ११ जागा जिंकून हैदराबादस्थित एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस-ई-इथेहादुल मुस्लिमन) साऱ्यांनाच चकित केले होते. विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. औरंगाबाद महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आले. मराठवाडय़ात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमला चांगले यश मिळाले होते. मुस्लीमबहुल विभागांमध्ये एमआयएमच्या मतांचे प्रमाण वाढल्याने त्याचा काँग्रेसला फटका बसला होता. कारण एमआयएमचा जेवढा प्रभाव वाढेल तेवढे काँग्रेसचे नुकसान होणार होते. एमआयएमला मत म्हणजे भाजपचा फायदा, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला. २०११च्या जनगणनेनुसार, राज्यात मुस्लीम लोकसंख्या ही ११.५४ टक्के असून, हा समाज काँग्रेसची हक्काची मतपेढी आहे. ही मते अन्यत्र गेल्याने काँग्रेसचे नुकसान झाले होते.नांदेडमध्ये गेल्या वेळी ११ जण निवडून आले असले तरी त्यातील आठ जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी नव्हती. त्याचा एमआयएमला फटका बसला.गेल्या सहा महिन्यांत झालेल्या विविध महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये एमआयएमला पाठिंबा मिळालेला नाही. भिवंडी-निजामपुरा व मालेगाव या मुस्लीमबहुल शहरांमध्ये एमआयएमचा प्रभाव पडला नाही. मराठवाडय़ातील लातूर, परभणीपाठोपाठ नांदेडमध्येही मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुस्लीमबहुल शहरे किंवा लक्षणीय मतदारांची संख्या असलेल्या प्रभागांमध्ये एमआयएमला मतदारांनी साथ दिलेली नाही. मुस्लीम मतदारांमधील हा बदल केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे झाल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले. गोरक्षक, अल्पसंख्याक समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना त्यातून अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या मागे उभा राहू लागला आहे.

नांदेड वाघाळा महापालिका अंतिम निकाल 

      काँग्रेस – 73
      भाजप – 06
      एमआयएम – 00
      शिवसेना – 01
      अपक्ष/इतर – 01

नांदेड-वाघाळा महापालिका निवडणूक निकाल 2017 विजयी उमेवारांची यादी

प्रभाग 1
अ. दीपक (बाळू ) राऊत नरहरी -काँग्रेस
ब. सुनंदा सुभाष पाटील – काँग्रेस
क.ज्योती किसन कल्याणकर – काँग्रेस
ड. – कल्याणकर बालाजी
– शिवसेना.
प्रभाग 2 सर्व काँग्रेस
अ. ज्योती कदम
ब. संगीता तुपेकर
क. कविता मुळे
ड. सतीश देशमुख
प्रभाग क्रमांक 3 सांगवी
अ -उमेश पवळे – काँग्रेस 4501
ब – कौशल्या पुरी-काँग्रेस 4798
क कोकाटे करुणा- काँग्रेस 3886
ड संदीपसिंघ गाडीवाले, अपक्ष 3034
(काँग्रेसचे बालाजी जाधव 3 मतांनी पराभूत)
प्रभाग क्रमांक 4
अ- दयानंद वाघमारे – काँग्रेस
ब – सरिता बिरकले – काँग्रेस
क- शैलजा स्वामी – काँग्रेस
ड- आनंद चव्हाण- काँग्रेस
प्रभाग 5 – सर्व काँग्रेस
अ: पिंपळे महेंद्र 5537 –
ब: पावडे जयश्री 6177
क: अपर्णा नेरलकर 4959
ड: खान फारुख अली 4881
प्रभाग 6 – गणेशनगर
अ शिला भवरे 4613 काँग्रेस
ब राजेश यन्नम 4426 काँग्रेस
क वैशाली देशमुख 4537
-भाजप
ड महेश कनकदंडे काँग्रेस 4540
प्रभाग 7 – सर्व काँग्रेस
अ- ज्योती रायबोले – काँग्रेस
ब – उमेशसिंह चव्हाण – काँग्रेस
क – संगिता पाटील – काँग्रेस
ड- अब्दुल अलिम खान – काँग्रेस
प्रभाग 8 – सर्व काँग्रेस
अ – दुष्यंत सोनाळे -काँग्रेस
ब -मोहिनी येवनकर विजयी – काँग्रेस
क- सलिमा बेगम खान – काँग्रेस
ड- नागनाथ दत्तात्रय गडम – काँग्रेस
प्रभाग 9 – सर्व विजयी काँग्रेस
अ- पूजा पवळे 7050
ब- किशोर स्वामी 7772
क- मनमित कौर 7989
ड- प्रशांत तिडके 8147
प्रभाग क्रमांक 10 – दत्तनगर – सर्व विजयी काँग्रेस
अ बापूराव गजभारे काँग्रेस 7207
ब अलका शहाणेकाँग्रेस 6285
क जयश्री पवार काँग्रेस 5809
ड विरेंद्रसिंघ गाडीवाले काँग्रेस 6984
प्रभाग क्रमांक 11 – सर्व विजयी काँग्रेस
अ-सय्यद शेर आली
ब-आसिया बेगम अब्दुल हबीब
क- रझिया बेगम
ड- मसूद अहेमद ख़ान
प्रभाग 12 उमर कॉलनी – सर्व काँग्रेस
अ सत्तार अ गफूर- काँग्रेस
ब शमीम बेगम शेख जावेद काँग्रेस
क अरशिया कौसर काँग्रेस
ड अ.रशीद गनी – काँग्रेस
प्रभाग 13 – सर्व विजयी काँग्रेस
अ – गंगाबाई सोनकांबळे
ब – रिहाना बेगम कुरेशी
क – अब्दुल शमीम
ड- मोहम्मद साबेर चाऊस
प्रभाग 14 – होळी (काँग्रेस विजयी)
अ: अब्दुल लतीफ 5435
ब: शबाना नासेर बेगम 4589
क: फरहत सुलताना 5170
ड नागेश कोकुलवार 4835
प्रभाग 15 – सर्व विजयी काँग्रेस
अ – गीतांजली हाटकर
ब-अ.हफिज करीम
क – आयेशा बेगम शेख
ड- फारुख हुसैन बदवेल
प्रभाग 16 –
अ दीपकसिंग रावत – भाजप
ब. सोडी गुरप्रीत कौर – भाजप
क. प्रकाशकौर खालसा – काँग्रेस
ड-भानूसिंग रावत – काँग्रेस
प्रभाग 17 सर्व विजयी काँग्रेस
अ. अमितसिंह तेहरा – काँग्रेस
ब. कांताबाई मुठा – काँग्रेस
क. प्रभाबाई यादव – काँग्रेस
ड डिंपल नवाब गुरमीतसिंह बरियाम सिंह – काँग्रेस विजयी
प्रभाग 18 खडकपुरा सर्व विजयी काँग्रेस
अ) धबाले दीक्षा काँग्रेस 8231
ब) हुसेन शोएब काँग्रेस 7158
क) गोडबोले जोसना काँग्रेस 8226
ड) अ. फईम काँग्रेस 7773
प्रभाग 19 वसरणी
अ. चित्रा गायकवाड – काँग्रेस
ब. दीपाली मोरे – काँग्रेस
क. शांता संभाजी गोरे- भाजप
ड. राजू गोविंद काळे – काँग्रेस
प्रभाग 20
अ. बेबी जनार्दन गुपीले – भाजप
ब. श्रीनिवास नारायणराव जाधव – काँग्रेस
क. मंगला देशमुख – काँग्रेस
ड. इंदुबाई घोगरे – भाजप
इ. विनय गिरडे पाटील – काँग्रेस
Political Research & Analysis Bureau (PRAB)
==========================================

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
काँग्रेस – 81 ( आघाडी नाही )
राष्ट्रवादी- 57 ( आघाडी नाही )
भाजप- 80 + 1 ( पुरस्कृत ) ( युती नाही )
शिवसेना- 73 + 3 ( पुरस्कृत ) ( युती नाही )
एमआयएम- 32 ( बीएसपी सोबत युती)
समाजवादी – 24
बीएसपी – 17 ( एमआयएम सोबत युती )
अपक्ष – 155

——————-

एकूण मतदार – 3 लाख 96 हजार 872
स्त्री मतदार – 1 लाख 90 हजार 408
पुरुष मतदार – 2 लाख 6 हजार 421
इतर – 43
————————
एकूण मतदान केंद्र – 550
संवेदनशील मतदान केंद्र – 130

नांदेड महापालिकेसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे 61% मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी 578 उमेदवार रिंगणात होते. 550 मतदान केंद्रांवर राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण तीन हजार 361 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. यासोबतच 189 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रांसाठी एकूण दोन हजार 500 बॅलेट युनिट 800 कंट्रोल युनिटचा वापर करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे 423 तर अपक्ष 155 अशा एकूण 578 उमेदवार आपले नशिब आजमावत होते.
—————————————————-

नांदेड महापालिका: मागील 4 वेळेच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

वर्ष1997  2002  20072012
एकूण जागा6573 7381
काँग्रेस28213740
राष्ट्रवादी00071010
शिवसेना14210915
भाजप07060302
जनतादल07000000
एमआयएम00000013
इतर09181401
===============================================

Political Research & Analysis Bureau (PRAB)







Friday, 6 October 2017

पुणे जिल्ह्यात सरपंचपदासाठी होणार बहुरंगी लढती; मोठी चुरस

पुणे जिल्ह्यात सरपंचपदासाठी होणार बहुरंगी लढती; मोठी चुरस


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले.पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

आंबेगाव तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
आंबेगाव तालुक्यात २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून सरपंचपदासाठी ५६ उमेदवार उभे आहेत. तर २०८ सदस्यापदांपैकी ६८ बिनवीरोध झाले आहेत व १४० जागेंसाठी २७२ उमेदवार उभे आहेत.सरपंचपदामध्ये आहुपे, नागापूर, नारोडी या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे बिनविरोध झाली. आहुपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेश लोहकरे, नागापूरच्या सरपंचपदी वैशाली संजय पोहकर, नारोडीच्या सरपंच कैलास तुकाराम काळे हे बिनवीरोध झाले. तर फलौंदे ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने हि जागा रिक्त राहिली.घोडेगाव, धामणी, चांडोली बुद्रूक, मेंगडेवाडी येथील ग्रामपंचायतींमध्ये एकही उमेदवार बिनविरोध निवडला गेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. तर डिंभे खुर्द, नारोडी, रांजणी, चिंचोडी, निघोटवाडी येथील ग्रामपंचायतींवर एक किंवा दोन सदस्य बिनविरोध झाल्याने यादेखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. फलौंदे व तळेघर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी देखील कुठणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायती रिक्त राहिल्या.

वेल्ह्यात २८ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
वेल्हे तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आले असून २८ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.२८ ग्रामपंचायतीमधून एकूण ७५ अर्ज आले होते. त्यापैकी २५ उमेदवारांनी माघार घेतली तर ११ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर आंबेगाव खुर्द व गिवशी ग्रामपंचायतीमधून सरपंच पदासाठी अर्जच आले नाहीत.वेल्हे खुर्द, दापोडे, आंबेगाव खुर्द, बोरावळे, चिरमोडी, लव्ही बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, कोलंबी, मोसे बुद्रुक, सोंडे कार्ला रा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर तालुक्यातील शिरकोली, हारपूड, बालवड, टेकपोळे, शेनवड, गिवशी, कोशिमघर, कोंडगाव, गोंडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे, हिरोजी, सोंडे सरपाले, सोंडे माथना, जाधववाडी, धानेप, पाल बुद्रुक, केळद, आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.

सरपंचपदाच्या ९ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात
 हवेली तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये गुरूवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी असलेल्या ९ जागांसाठी ४४ तर सदस्यपदाच्या १०५ जागांसाठी २६९ उमेदवार निवडणूक रिंगणांत उभे असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी सुनील शेळके यांनी दिली.यांमधील पेरणे गावातील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. फुरसुंगी गावात सरपंचपदासाठी तब्बल १६ जण उभे असल्यामुळे व बहुतांश ठिकाणी दोनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया हवेली तालुक्यांतील कदमवाकवस्ती, फुरसुंगी, आव्हाळवाडी, पेरणे, बुर्केगाव, अहिरे, नांदोशी, पिंपरी-सांडस व गोगलवाडी या नऊ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे. तालुक्यांतील ९ ग्रामपंचायतींतील १०५ सदस्य व ९ सरपंच अशा एकूण १२४ जागांसाठी येत्या १६ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ४६६ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.जेथे जास्त बंडाळी झाली आहे. अशा नाराज बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत करण्यात आले. काही जणांनी अर्ज माघारी घेतले. परंतु काहींनी बंडाचे निशाण आणखीन जोमात फडकावणार असल्याचे घोषित केले.

मुळशीत सात ग्रामपंचायती बिनविरोध
ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दुसºयाा टप्याच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मुळशी तालुक्यातील ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
११ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी एकूण ८० अर्ज आले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने एकूण ७८ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते तर सरपंच पदासाठी २८ आले होते त्यापैकी सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले होते. पाथरशेत, तव, कोंढूर, लवार्डे, मोसे खुर्द, वांजळे व दासवे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक ग्रामस्थ व नेते मंडळीना यश आले. अन्य आसदे, आडमाळ, भोडे व माळेगाव चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १६ नोव्हेंबर रोजी होईल. भोडे ग्रामपंचायतीत एकही सदस्य बिनविरोध झाला नाही या ठिकाणी सर्व जागांसाठी निवडणूक होईल. आसदे व भोडे या ठिकाणी सरपंच पदासाठी प्रत्येकी ५ उमेदवार रिंगणात असतील. माळेगाव येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार, आडमाळ येथे एका वार्डाातील एका सदस्य पदासाठी २ उमेदवार तर सरपंच पदासाठी २ उमेदवार असतील.

कोंडूर ग्रामपंचायत
बिनविरोध करून पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी व पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे यांनी वेगळा आदर्श निर्माण करून दिला. भोडे व आसदे येथील सरपंचपदाची निवडणूक सर्वाधिक अटीतटीची होणार आहे.

बारामतीत सरपंचपदासाठी ३८, तर सदस्यपदासाठी २६३ उमेदवार रिंगणात
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी ५२ तर सदस्य पदासाठी २१८ नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आली आहेत. सरपंचपदासाठी ३८ तर सदस्य पदासाठी २६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ४ ग्रामपंचायतींचे एकूण २५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, अशी माहिती तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली. लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरूम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.त्यापैकी बिनविरोध सदस्यपदी निवडून आलेले गाव व उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे - काºहाटी - २, सोनकसवाडी - ६, वाणेवाडी - ७, मुरुम - १० अशी एकूण २५ उमेदवार निवडून आलेले आहेत.बिनविरोध सरपंचपदी एकही उमेदवार आला नसल्याचे सांगितले.

भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध
तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. भोर तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. ५४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून वाढाणे व सोनवडी या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ५ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.नोव्हेबर व डिसेंबर २०१७मध्ये मुदत संपणाºया तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला होत आहेत. सरपंचपदाची २०२०पर्यंतची आरक्षणाची सोडत २०१५मध्येच काढण्यात आली आहे. तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी सर्व कागदपत्रे गोळा करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, शिरवलीतर्फे भोर, आपटी, हरिश्चंद्री, कोळवाडी, सांगवी खुर्द, करंदी बुद्रुक, आंबेघर दुर्गाडी, गुढे मळे, भुतोंडे, कोर्ले, बसरापूर, करंदी खुर्द, वाढाणे सोनवडी या १८ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने तालुक्यातील अनेक नेत्यांच्या गावांचा समावेश असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करायचे असल्याने ही निवडणूक सर्वासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय नेते आपली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

जुन्नर ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम
नव्यानेच सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने सरपंच पदासाठी गावागावांतून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी होत असताना जुन्नर तालुक्यातील काले गावाने मात्र आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत ग्रामस्थांच्या एकविचारातून बिनविरोध सरपंच व सदस्यांची निवड करण्यात आली आहे.राजकारण व निवडणुकांमुळे गावात गट तट निर्माण होऊन गावाच्या विकासाला खीळ बसते. त्यामुळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व तरुणांनी एकविचाराने गावाच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेऊन इतरांना आदर्श घालून दिला आहे.काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मालिता मारुती नायकोडी यांची गावाने सरपंच पदी बिनविरोध निवड केली. तर सदस्यपदी जनार्धन पानसरे, अनिता मिननाथ पानसरे, योगिता अमित कर्पे, सविता लक्ष्मण चतुर, रावजी शंकर काळे, साईनाथ विठ्ठल भालेकर यांची निवड करण्यात आली.जुन्नर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून अर्ज माघारीच्या आजचा शेवटचा दिवस होता. काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला तर सदस्य पदासाठी सात जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या उपस्थितीमध्ये गावबैठक घेण्यात आली. या बैठकीस काले गावठाण, गोळेवाडी व बाळोबाची वाडी आदीमधील जवळपास दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गावात एकोप्याचे वातावरण अबाधित ठेवून काम करण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले. या आवाहनास उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले.त्यानुसार गावाने सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली व त्यास सर्व उपस्थितांनी अनुमोदन दिले. काले ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून आजपर्यंत गावामध्ये ग्रामपंचायत अथवा विकास सोसायटी यांची निवडणूक झाली नाही. हीच परंपरा यावेळेसही टिकून राहिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये माजी सरपंच रवींद्र पानसरे, सरपंच शालिनी पानसरे, उपसरपंच संजय कुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पानसरे, विलास पानसरे, लक्ष्मण पानसरे, मिननाथ पानसरे, जगन चतुर, अशोक नायकोडी, मनोहर पानसरे, बबन पानसरे, सुनील पानसरे, अशोक चतुर, मनोहर घोगरे, शिवाजी कर्पे, कुलदीप नायकोडी, अविनाश पानसरे, शशिकांत पानसरे, विशाल पानसरे , कोंडाजी भालेकर, दिनकर नायकोडी, तान्हाजी पानसरे, नवनाथ पानसरे , सुनील सोनवणे यांसह ग्रामस्थानी प्रयत्न केले.

कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात
पूर्व हवेलीतील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारात काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष व विद्यमान सरपंच नंदकुमार काळभोर यांच्या पत्नी मनिषा तर भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड सरपंचपदासाठी एकमेकासमोर उभ्या ठाकल्या आहेत.तर वरील दोन्ही नेत्यांच्या विरोधात कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देवीदास काळभोर यांनी आपली पत्नी सुनंदा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर या तिघांच्यासह सुजाता रायगोंडा गायकवाड यांनीही आपली उमेदवारी ठेवली आहे.सतरा जागांच्यासाठी नंदु काळभोर यांनी लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातून सतरा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. चित्तरंजन गायकवाड यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सतरा जागी उमेदवार उभे केले आहेत. माजी उपसरपंच देविदास काळभोर यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसाचे वाटप झाल्याची कवित्व अजून चर्चिले जात असतानाच, एेन दिवाळीत निवडणूक होणार असल्याने मतदार राजा कसा प्रतिसाद देतो यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत सतरा सदस्य असून, सध्या नंदू काळभोर यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे. यंदा प्रथमच सरपंचपदासाठी थेट मतदान होणार आहे. नंदू काळभोर यांनी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात पुन्हा ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.सरपंचपदासाठी मनिषा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीची सत्ता खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मागिल सहा महिन्यांपासून फिल्डींग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडकीत गौरी गायकवाड यांना अपयश आले असले तरी, गैरी गायकवाड यांनी सरपंच पद डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना भेटण्याचा सपाटा लावला होता.
सतरा जागांच्या एकूण उमेदवार 44 निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात पॅनेलचे नाव) 
प्रभाग क्रमांक 1 : आरती सुशील काळभोर, अर्चना हेमंत टिळेकर, राकेश आगतराव लोंढे (लोकसेवा पॅनेल), वैजंता अनिल कदम, सविता नवनाथ साळुंके, सचिन भागवत दाभाडे, (परीवर्तन पॅनेल)
प्रभाग क्रमांक 2 : अमित अविनाश काळभोर, राजश्री उदय काळभोर (परीवर्तन पॅनेवल), बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, वर्षा प्रसाद काळभोर (लोकसेवा पॅनेल), स्मिता निलेश काळभोर, नुतन वसंत काळभोर.
प्रभाग क्रमांक 3 : ऋषिकेश विद्याधर काळभोर, रमेश हरिभाऊ कोतवाल, नासिरखान मुनुलाखन पठाण (परीवर्तण प्रनेल), अनिल शिवाजी काळभोर, पांडुरंग ज्ञानेश्वर काळभोर, विक्रांत संजय ठोंबरे (लोकसेवा प्रनेल), गणेश संभाजी कुंजीर, सचिन राजन पिल्ले.
प्रभाग क्रमांक 4 : मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, अशोक कृष्णा शिंदे, नलिमा कलंदर पठाण (परीवर्तण पॅनेल), शरीफ मिरवाज खान, छाया नागसेन ओव्हाळ, वंदना सचिन काळभोर (लोकसेवा पॅनेल), अभिजित रामदास बडदे,
प्रभाग क्रमांक 5 : नितेश अंबादास लोखंडे, राणी विजय बडदे, अमृता मयूर कदम (परीवर्तण पॅनेल) नागेश सोपान जेटीथोर, सारिका मोहन भोसले, आशा संजय खैरे (लोकसेवा पॅनेल), विद्याधर श्रीमंत बहुरंगी, रामगोंडा यलप्पा गायकवाड,
प्रभाग क्रमांक 6 : माधुरी चंद्रकांत काळभोर, रुपाली अविनाश कोरे, बाळसाहेब सोपान कदम (परीवर्तण पॅनेल),  सुमन अरुण चौघुले, द्वारकाबाई गंगाराम शिरवाळे,  दिपक बाबुराव काळभोर (लोकसेवा) सुरेखा गिरीष खोपडे. रणधीर विनायक घोरपडे, लक्ष्मी दिपक मोरे.

========
कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी 1249 उमेदवार रिंगणात
कोल्हापूर जिल्ह्यातील 472 ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काही ठिकाणी सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या. प्रथमच थेट जनतेतून निवड होत असल्याने बहुतांशी सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी मात्र चुरशीच्या लढती होणार आहेत. सरपंचपदासाठी 1249 उमेदवार तर सदस्यांसाठी 8628 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सोमवार दि. 16 रोजी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज माघारीची गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. माघारीसाठी सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात गर्दी होती. गेल्या दोन दिवसांपासून माघारीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. माघार घेण्यासाठी अनेकांची अखेरपर्यंत मनधरणी सुरू होती.
विविध आश्‍वासने दिली जात होती, शब्द दिले जात होते. शपथा घेतल्या जात होत्या, वचनही दिले जात होते. माघार घेणार्‍या उमेदवारांची खास बडदास्तही ठेवण्यात येत होती. गावातून निवडणूक कार्यालयापर्यंत ने-आण करण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीसाठी डमी अर्ज सादर केलेल्यांचीही उमेदवारी मागे घेण्यासाठी धांदल उडाली होती. दुपारी दोननंतर तर कार्यालयातील सर्वांचीच लगबग वाढली होती. माघार घेणार्‍यांना अर्ज भरण्यापासून ते कार्यालयापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनेकांचे जीव भांड्यात पडत होते, त्यानंतर जल्लोषही होत होता. दुपारी तीन वाजता मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान, एका गावात सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. काही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या. मात्र, त्याचा नेमका आकडा रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

गावागावांत चिन्हासह प्रचाराला प्रारंभ
जिल्ह्यात सरपंचपदासाठी 2 हजार 833 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. सदस्यपदासाठी 15 हजार 876 अर्ज शिल्लक राहिले होते. आज सरपंचपदाचे 1584 तर सदस्यपदाचे 7248 अर्ज मागे घेण्यात आले. जिल्ह्यात सरपंचपदासाठी 1249 इतके उमेदवार तर सदस्यपदासाठी 8628 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. उमेदवारी माघारीची प्रक्रिया संपताच गावागावांत सायंकाळपासून चिन्हासह प्रचार सुरू झाला.

सातारा जिल्ह्यात सरपंचपदासाठी बहुसंख्य उमेदवार रिंगणात
सातारा जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राप्‍त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यानंतर वैध ठरलेल्या 7 हजार 773 उमेदवारी अर्जांसाठी माघार प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात सरपंचदासाठी बहुसंख्या उमेदवारांनी अर्ज ठेवले. बर्‍याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी सर्व वॉर्ड बिनविरोध तर सरपंचदासाठी संघर्ष दिसून आला. सातारा तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान जोरात सुरु झाले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अनेक घटनाघडामोडी घडल्या. अर्ज काढून घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरु होती. तर अर्ज काढून घ्यायला लागू नये यासाठी बरेचजण गूल झाले. त्यामुळे पॅनेलप्रमुखांची चांगलीच दमछाक झाली. आपण बिनविरोध निवडून येवू या अनेकांच्या अपेक्षेवर विरजण पडले.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये नाट्यमयी घडमोडी घडल्या. तालुक्याच्या ठिकाणी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. सायंकाळी उशिरपर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सरपंचपदाचे 11 तर सदस्यपदाचे 111 असे सर्वमिळून 122 उमेदवारी अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उर्वरित 7 हजार 773 उमेदवारी अर्जासाठी गुरुवारी माघार प्रक्रिया पार पडली. सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींच्या  सदस्यपदासाठी  717 अर्ज तर सरपंचपदासाठी 152 अर्ज कायम होते. गुरुवारी  अर्ज मागे घेण्याच्या दिवशी  9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  काही ग्रामपंचायतीमध्ये सर्व वॉर्ड बिनविरोध झाले तर, सरपंच पदासाठीच निवडणूक लागल्याचे चित्र पहायला मिळाले.  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सातारा शहरताील भूविकास बँक परिसरात विविध गावच्या  उमेदवारांसह नागरिकांनी सकाळपासूनच  गर्दी केली होती. ठिकठिकाणी उमेदवारांस अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पदाधिकारी विनवणी, मनधरणी करताना दिसत होते. त्यामुळे दिवसभर या परिसरात राजकीय चर्चा व आश्‍वासनांचा पाऊस पडत होता. या तालुक्यातील करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, धोंडेवाडी, गोगावलेवाडी, माळ्याची वाडी, खावली, भरतगाववाडी, रेणावळे, मत्यापुर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात  आले. कोंढवली, आसगाव ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासह, एका वॉर्डसाठी निवडणूक लागली. बेंडवाडी व केळवली ग्रामंपचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणूक लागली असून या ग्रामपंचायतींचे सर्व वॉर्ड बिनविरोध झाले आहेतसातारा जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतीचे धूमशान सुरू झाले असून उमेदवारी  अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिला. यंदा प्रथमच थेट सरपंच होणार असून जिल्ह्यात या पदासाठी तब्बल 1 हजार 369 अर्ज तर सदस्यपदासाठी  6 हजार 488 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वत्रच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल  करण्यात आल्याने सध्या गावपातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच तापले झाले आहे.
जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. यावर्षी थेट जनतेतून सरपंचांची निवड  केली जाणार असल्याने अनेकांनी सरपंच पदासाठी अर्ज भरले आहेत त्यामुळे या निवडणुकीला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला गावातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेताना चांगलाच कस लागणार आहे.
सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 152 तर सदस्यपदासाठी 718 अर्ज दाखल झाले आहेत. जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 46 तर सदस्यपदासाठी 168अर्ज दाखल झाले आहेत. कोरेगाव तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 222 तर सदस्यपदासाठी 971 अर्ज दाखल झाले आहेत.  वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 40 तर सदस्यपदासाठी 213 अर्ज दाखल झाले आहेत.खंडाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 23 तर सदस्यपदासाठी 188 अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी 53 अर्ज दाखल झाले आहेत. कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 154 तर सदस्यपदासाठी 1 हजार 58 अर्ज दाखल झाले आहेत. पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक 356 तर सदस्यपदासाठी 1 हजार 438 अर्ज दाखल झाले आहेत. माण  तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 155 तर सदस्यपदासाठी 634 अर्ज दाखल झाले आहेत.खटाव तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 76 तर सदस्यपदासाठी 265 अर्ज दाखल झाले आहेत. फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 134 तर सदस्यपदासाठी 782 अर्ज दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 1 हजार 369 तर सदस्यपदासाठी 6 हजार 488 अर्ज दाखल झाले  आहेत. मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 3 यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सांगली जिल्ह्यात १० हजार २३६ जण रिंगणात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी (गुरुवारी) अंदाजे सात हजारजणांनी माघार घेतली. सरपंच व  सदस्यपदासाठी दहा तालुक्यात सुमारे 10 हजार 236 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काही गावे बिनविरोध झाली आहेत. चिन्हे वाटपही झाल्यामुळे उद्यापासून (शुक्रवार) प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. कडेगाव तालुक्यात निवडणूक प्रक्रियेचा मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्‍त केली.

शिराळा तालुक्यात 11 बिनविरोध
शिराळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील साठ ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काँग्रेस पाच, राष्ट्रवादी तीन तर भाजपला दोन ग्रामपंचायती मिळाल्या. काँग्रेसला मिळालेल्या ग्रामपंचायती : कोकरुड, चिंचोली, शेडगेवाडी, माळेवाडी, वाकुर्डे खुर्द. राष्ट्रवादीला मिळालेल्या ग्रामपंचायती : चिखली, गवळेवाडी व पावलेवाडी आणि भाजपला मिळालेल्या
ग्रामपंचायती : गिरजवडे व खुंदलापूर. उपवळे व धामवडेमध्ये फक्‍त सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तालुक्यात 1023 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंचपदाच्या 152 जणांनी माघार घेतल्याने 134 जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्य पदाच्या 648 अर्ज  माघारी घेतले गेल्याने 889 जण रिंगणात आहेत.
वाळवा तालुक्यात 2237 उमेदवार
वाळवा तालुक्यात 2237 उमेदवार  रिंगणात राहिले आहेत. सरपंच पदासाठी 231 जणांनी माघार घेतल्याने 240 अर्ज शिल्लक राहिले.  सदस्य पदाच्या  1262 उमेदवारांनी माघार घेतल्याने 1997  जण निवडणूक लढविणार आहेत. भरतवाडी, जुनेखेड, फार्णेवाडी (बोरगाव) कोळे, मरळनाथपूर ही गावे बिनविरोध झाली. 32 सदस्य बिनविरोध झाले आहेत. तसेच चिकुर्डे, धोतरेवाडी, ढवळी येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. डोंगरवाडी, बिचूद, फार्णेवाडी येथील सरपंच पद रिक्त राहणार आहे. तासगाव तालुक्यात 598 उमेदवार रिंगणात तालुक्यात 26 ग्रामपंचायतीसाठी  598 उमेदवार  रिंगणात राहिले आहेत. त्यापैकी सरपंचपदासाठी 62 तर सदस्य पदासाठी 536 उमेदवार नशीब अजमावणार आहेत. जवळपास सर्वच गावात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशाच लढती होणार आहेत.
तालुक्यात 26 गावातील सरपंच आणि सदस्य पदासाठीचे उमेदवार : अंजनी  2 (24), आरवडे 2 (22), बलगवडे  2 (18), बस्तवडे 3 (22), बेंद्री 2 (18), भैरववाडी 1 (12), चिंचणी 3 (34), कचरेवाडी 2(11), खुजगाव 3 (20), कुमठे 3 (30), लिंब 2 (14),  मणेराजुरी 2 (35), मतकुणकी 3(25), नागाव 2(18), नागेवाडी 2 (13), नेहरुनगर 2 (18),  निमणी 3 (16), पानमळेवाडी 3 (12), पुणदी 2 (18), सावर्डे 3 (26), शिरगाव 2 (18), उपळावी 3 (22), वंजारवाडी 3 (24), वासुंबे 2 (26), वायफळे 2 (26),योगेवाडी 3 (14).
पलूस तालुक्यात 645 उमेदवार रिंगणात
पलूस तालुक्यात सरपंचपदासाठी दाखल अर्जांपैकी 80 जणांनी माघार घेतली. रिंगणात 38 जण राहिले आहेत.  सदस्य पदाच्या 436 जणांनी अर्ज परत घेतल्याने 415 जण निवडणूक लढविणार आहेत. पुणदीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सावंतपूर येथे 1 व सुखवाडी येथे दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
कडेगाव  तालुक्यात 903  उमेदवार रिंगणात
तालुक्यात 903 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 102  व सदस्य पदाचे 801 जण  रिंगणार आहेत.
मिरज तालुक्यात 1212 उमेदवार रिंगणात
मिरज तालुक्यात 1212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 118 जणांनी माघार घेतल्याने 110 जणांचे अर्ज राहिले आहेत. सदस्य पदाच्या 642  जणांनी माघार   घेतल्याने 1002  जण  रिंगणात आहेत.  23 सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. रसूलवाडीचे सरपंचपद बिनविरोध झाले.
कवठेमहांकाळ तालुक्यात 645 उमेदवार रिंगणात
कवठेमहांकाळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींपैकी केरेवाडी आणि लांडगेवाडी 2 गावे बिनविरोध झाली. अलकुड एस 2, बोरगाव 1, जायगव्हाण 1, खरशिंग 1, कोंगनोळी 6, मळणगाव 2, नागज 1, शेळकेवाडी 1, शिरढोण 1 अशा  सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या.  247 जागांसाठी 567 जण तर 27 सरपंच पदाच्या जागेसाठी 78 जण रिंगणात राहिले आहेत.
खानापूर तालुक्यात 888 उमेदवार रिंगणात
तालुक्यात 888 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 112 जणांनी माघार घेतल्याने 122 जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्य पदाच्या 361 जणांनी माघार घेतल्याने 766  जण  रिंगणार आहेत. 30 सदस्य बिनविरोध झाले.
आटपाडी  तालुक्यात 291  उमेदवार रिंगणात
तालुक्यात 291 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 55 व सदस्य पदाचे 236 जण  रिंगणार आहेत.
जत  तालुक्यात 1923 उमेदवार रिंगणात
जत तालुक्यात सरपंच पदाच्या रिंगणातील 371 जणांनी माघार घेतल्याने 133  जणांचे अर्ज राहिले आहेत.  सदस्य पदाच्या 477 जणांनी माघार घेतल्याने 1923 जण  रिंगणात आहेत. कडेगाव तालुक्याच्या प्रक्रियेत गोंधळ झाला होता. रात्री उशिरापर्यंत छाननी व चिन्हे वाटप सुरु होते.

सांगली शिराळ्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध
शिराळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील साठ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस पाच राष्ट्रवादी तीन तर भाजपाला दोन ग्रामपंचायती मिळाल्या. बिनविरोध निवडून झालेल्या काँग्रेसच्या ग्रामपंचायती याप्रमाणे कोकरुड, चिचोंली, शेडगेवाडी, माळेवाडी, वाकुर्डे खुर्द तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या ग्रामपंचायती या प्रमाणे चिखली, गवळेवाडी व पावलेवाडी तर भारतीय जनता पक्षाकडे गिरजवडे व खुदंलापूर या दोन ग्रामपंचायतील आल्या आहेत.उपवळे व धामवडे या दोन ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत असून या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी सात सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख, युवा नेते सत्यजित देशमुख तर राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सरपंचपदासाठी ११०; सदस्यासाठी ५३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.27) माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सरपंच पदासाठी 55, तर सदस्य पदासाठी 140 उमेदवारांची माघार घेतल्याने सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 110, तर सदस्य पदाच्या 313 जागांसाठी 530 उमेदवार रिंगणात आहेत.
तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या 35 जागांसाठी 165 सदस्य पदाच्या 313 जागांसाठी 699 अर्ज अखेरच्या मुदतीपर्यंत प्राप्त झाले होते. प्राप्‍त अर्जांच्या छाननीत सरपंचपदासाठीचे सर्व 165 अर्ज वैध ठरले, तर सदस्य पदासाठीचे 29 अर्ज बाद ठरविण्यात आले होते. बुधवारी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत सरपंचपदासाठी 55, तर सदस्यपदासाठी 140 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 110, तर सदस्यपदाच्या 313 जागांसाठी 530 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक, सहाय्यक अधिकारी रुपेश सुराणा यांनी दिली. 
सरपंच पदासाठीचे उमेदवार:
दुगाव 3, शिंगवे 4, शेलू 2, काजीसांगवी 5, तळेगावरोही 3, देवरगाव 6, दहेगाव म. 3, डोणगाव 3, वाद 4, नारायणगाव 2, मालसाणे 3, दुधखेड 5, वडाळीभोई 3, विटावे 2, पाटे 2, साळसाणे 2, खेलदरी 2, आडगाव 1, खडकओझर 1, रेडगाव 4, चिखलआंबे 2, निंबाळे 7, भुत्याणे 4, भाटगाव 1, पुरी 6, दरेगाव 1, बोराळे 2, कुंदलगाव 3, गणूर 6, निमोण 3, चिंचोले 2, कोकणखेडे 2, मेसनखेडे 6, सोनीसांगवी 2, तळवाडे याप्रमाणे एकूण 110 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सदस्य पदासाठीचे उमेदवार:
दुगाव 22, शिंगवे 16, शेलू 9, काजीसांगवी 24, तळेगावरोही 20,  देवरगाव 27,  दहेगाव 17, डोणगाव 14,  वाद 15, नारायणगाव 14, मालसाणे 9,  दुधखेड 11, वडाळीभोई 34, विटावे 17, पाटे 18, साळसाणे 11, खेलदरी 15, आडगाव 9, खडकओझर 11, रेडगाव 10, चिखलआंबे 8, निंबाळे 15, भुत्याणे 10,  भाटगाव 9, पुरी 19, दरेगाव 9,  बोराळे 14,  कुंदलगाव 23, गणूर 19, निमोण 23,  चिंचोले 6, कोकणखेडे 9, मेसनखेडे 23, सोनीसांगवी 14, तळवाडे याप्रमाणे एकूण 530 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


कणकवली : सरपंचपदासाठी ५३ तर सदस्यपदासाठी २२२ अर्ज
कणकवली ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत तालुक्यातून सरपंचपदासाठी 53 तर सदस्य पदासाठी 222 अर्ज दाखल झाले. तालुक्यात एकूण सरपंचपदासाठी 138 तर सदस्य पदासाठी 557 अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील हळवल व पियाळी ग्रा. पं. ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
कणकवली तालुक्यातील 58 ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातून शुक्रवारी सरपंचपदासाठी भरणी-1, नागवे-6, पिसेकामते-1, बिडवाडी-1, वरवडे-10, हरकुळ बुद्रुक-2, तरंदळे-2, कलमठ-6, वाघेरी-1, हुंबरठ-1, असलदे-1, आयनल-1, सावडाव-1, नांदगाव-3, कोळोशी-1, साकेडी-2, सातरल-2, हळवल-1, दारिस्ते-2, वागदे-2, शेर्पे-4, कोळोशी-2 असे 53 अर्ज दाखल झाले. तर सदस्य पदासाठी भरणी-13, आशिये-3, नागवे-17, पिसेकामते-7, बिडवाडी-12, वरवडे-17, हरकुळ बुदुक-13, तरंदळे- 13, कलमठ-34, वाघेरी-3, हुंबरठ-3, माईण-2, असलदे-4, आयनल-5, सावडाव-7, नांदगाव-5, कोळोशी-7, साकेडी-5, पियाळी-1, सातरल-5, हळवल-9, शिरवल-6, दारिस्ते-9, वागदे-8, शेर्पे-4, कोळोशी-7, साळिस्ते-3 असे 222 अर्ज दाखल झाले. सायंकाळी 6.30 वाजता तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात पोचलेल्या उमेदवारांचे अर्ज उशिरापर्यंत दाखल करणे सुरू होते.
हळवलमध्ये पक्षविरहीत गाव पॅनल
हळवल ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या नविन उमेदवारांना संधी देत निवडणूक बिनविरोध केली. सरपंचपदासाठी दिपक गुरव तर सदस्य पदासाठीच्या 9 जागांसाठी संदेश राणे, ऋतुजा तावडे, सुजाता परब, अरूण राऊळ, उर्मिला मडवळ, उत्तम जाधव, उर्मिला ठाकूर, शुभांगी राणे, प्रकाश जोगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच व सदस्यांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
पियाळी समर्थ  पॅनल बिनविरोध
पियाळी ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये केवळ समर्थ पॅनलचे उमेदवार दाखल झाले. पियाळी सरपंच पदासाठी पवित्रा गुरव तर सदस्यपदासाठी बाळकृष्ण सावंत, मंगेश तेली, सुनील कदम, वैष्णवी राणे, सोनाली बंदरकर, दर्शना नारकर, प्राजक्ता पावसकर यांनी अर्ज दाखल केले.

Political Research and Analysis Bureau (PRAB)

पुणे महापालिकेत ११ गावांचा समावेश, अधिसूचना जारी ; पालिकेची हद्द 81 चौरस किमीने वाढली

पुणे महापालिकेत ११ गावांचा समावेश, अधिसूचना जारी
पालिकेची हद्द 81 चौरस किमीने वाढली

गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिका हद्दीत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या ११ गावांचा महापालिकेत समावेश झाल्याची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. त्यामुळे ३४ गावांपैकी उरुळी देवाची, फुरसुंगी ही गावे पूर्णपणे आणि लोहगाव, साडेसतरा नळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव बुद्रक, आंबेगाव खुर्द, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही अंशतः महापालिका हद्दीत आली आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

यापूर्वी १९९७ साली महापालिका हद्दीत तब्बल २३ गावे घेण्यात आली होती. त्यावेळी अंशतः घेण्यात आलेल्या गावांचा उर्वरित भाग आणि इतर गावांचा समावेश करून घेण्याची मागणी सतत करण्यात येत होती. याबाबत राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पहिल्या टप्प्यात हद्दीलगतच्या ११ गावांचा समावेश करण्यात येणार होता. त्यासाठी राज्य सरकारने डिसेंबरपर्यंची मुदत मागितली होती. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या आधीच फुरसुंगी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी हवेली तालुका नागरी कृती समितीने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान दोन आठवड्यांत गावांच्या समावेशाची अधिसूचना काढा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी करत ११ गावांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
हद्दीलगतची 11 गावे महापालिका हद्दीत घेण्याची अधिसूचना राज्यशासनाने अखेर जाहीर केली. या नवीन 11 गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ 81 चौरस किलोमीटरने वाढून ते आता 331.64 चौरस किलोमीटर होणार आहे. तर या 11 गावांच्या विकासाठी महापालिकेस तब्बल 2 हजार 229 कोटींच्या निधीची आवश्‍यकता असणार आहे. तर या हद्दवाढीमुळे 5 पंचायत समिती सदस्यांची पदे संपुष्टात आली असल्याचेही राज्यशासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
राज्यशासनाने 29 मे 2014 मध्ये 34 गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना काढली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यावर हरकती आणि सूचनाही मागविल्या होत्या. त्यानुसार, महापालिका प्रशासनानेही आपला अभिप्राय राज्यशासनास पाठविला होता. मात्र, त्या नंतर ही अधिसूचना शासनाकडून रद्द करण्यात आली. त्यामुळे ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी हवेली नागरिक कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत राज्यशासनाकडून ही गावे घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, त्याबाबत निर्णय घेतला जात नव्हता. त्यावर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. या नंतर खडबडून जागे झालेल्या राज्यशासनाने 11 गावे डिसेंबर 2017 पूर्वी तर उर्वरीत 23 गावे पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने पालिका हद्दीत घेण्याचे न्यायालयात सांगितले होते. असे असतानाच, शासनाकडून त्याबाबत अधिसूचना न काढण्यात आल्याने निवडणूक आयोगाने य गावांमधील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी हवेली तालुका नागरी कृती समितीने न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली होती. त्यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यानच दोन आठवड्यांत गावांच्या समावेशाची अधिसूचना काढा, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले होते. या आदेशाचा मान राखत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रक्रिया सरकारने अखेर गुरूवारी पूर्ण केली असून त्याबाबत अध्यादेश गुरूवारी जाहीर केला आहे .

ही गावे महापालिकेत द्यायची असल्यास पालिकेस सुमारे 2 हजार 229 कोटींचा खर्च येणार असल्याचा अभिप्राय महापालिकेने राज्यशासनास कळविला होता. मात्र, या दोन्ही बाबींना फाटा देत राज्यशासनाने केवळ ही गावे घेण्याचा आदेश काढत त्यांच्या खर्चाबाबत अथवा नियोजनाबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे या गावांचा सर्व खर्चाचा पालिकेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या 11 गावांची लोकसंख्या सुमारे 2 लाख 78 हजार आहे. तर या गावांमुळे महापालिकेची हद्द बदलणार असून सुधारीत हद्द आता 331.64 चौरस किलोमीटर असणार आहे. या सर्व गावांमध्ये लोहगाव वगळता इतर गावांमध्ये तब्बल 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नागरिकरण झालेले आहे. तर 10 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत शेती क्षेत्र शिल्लक आहे. या शिवाय 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे या गावांचा विकास आराखडा करताना महापालिकेस मोठी कसरत करावी लागणार आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

अशी असेल महापालिकेची सुधारीत हद्द
उत्तर-पूर्व : कळस, धानोरी व लोहगाव या गावांची महसुली हद्द
पूर्वेस : मुंढवा ( केशवनगर), हडपसर, (साडेसतरा नळी), हडपसर, फुरसुंगी या गावाची महसुली हद्द
दक्षिण-पूर्व : उरूळी देवाची, हडपसर, महंमदवाडी, उंड्री या महसुली गावांची हद्द
दक्षीणेस : येवलेवाडी, कात्रज या महसूली गावांची हद्द
दक्षिण- पश्‍चिमेस : धायरी, वडगाव बुद्रुक, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या महसुली गावांची हद्द
पश्‍चिमेस : शिवणे, बावधन खुर्द, वडगाव खुर्द या महसुली गावांची हद्द
पश्‍चिम-उत्तर : बाणेर, बालेवाडी या महसुली गावची हद्द व पुणे महापालिकेची जुनी हद्द

पाच पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द
राज्यशासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार, या गावांमधील लोहगाव, केशवनगर, शिवणे, फुरसुंगी तसेच उरूळी देवाची या गावांमधील पाच पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. पंचायत समितीच्या हवेली गटातून लोहगावमधून सुजाता ओव्हाळ, केशवनगर मधून जितेंद्र भंडारी, शिवणेमधून उषा नाणेकर, फुरसुंगीमधून रोहिणी राऊत तर उरूळी देवाचीमधील राजीव भाडळे या सदस्यांची पदे रद्द झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत हे सदस्य निवडून आलेले होते. शासनाच्या या निर्णयामुळे या सदस्यांची पदे रद्द झालेली आहेत.

 पुणे महापालिका हद्दीत 34 पैकी 11 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे तब्बल 20 वर्षानंतर पालिकेच्या हद्दीची वाढ झाली आहे. या गावामुळे पालिकेच्या क्षेत्रफळात 80 चौरस किलोमीटरची वाढ झाली असून 250 चौरस किलोमीटरवरून ते 331 चौरस किलोमीटर झाले आहे. शहराच्या लोकसंख्येत 2 लाख 78 हजार 465 भर पडली आहे. या गावात विकास कामासाठी सुमारे 2 हजार 229 कोटीचा निधी लागणार आहे.पालिकेच्या हद्दीत 38 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने घेतला होता. पण यातील 15 गावे वगळण्यासाठी राष्ट्रवादीने पुढकार घेतला होता. 1997 साली 23 गावाचा पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 34 गावाच्या समावेशाचा निर्णय घेतला. त्यात पूर्वी वगळलेल्या 15 व उर्वरित नवीन गावांचा समावेश केला होता. याबाबतची अधिसूचना 11 ऑक्टोबर 2012 रोजी राज्यसरकारने काढली होती. त्यात मांजूरी, फुरसुंगी, उरुळी, गुजरवाडी, मांगडेवाडी, नांदोशी, किरकिटवाडी, मांगडेवाडी, गुजरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, खडकवासला, नांदेड, आंबेगाव खुर्द, धायरी, न-हे आदी गावांचा समावेश होता. या गावाच्या समावेशावर हरकती आणि सूचना मागवल्यानंतर 2014 च्या सुरुवातीलाच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गावांचा समावेश करण्यासंदर्भात एकमत नसल्यामुळे आघाडी सरकारच्या काळात गावांचा समावेश महापालिकेत झाला नाही. राज्यात शिवसेना भाजपचे सरकार आले. त्यानंतरही या गावाच्या समावेशाबाबत कोणताही निर्णय होत नसल्यामुळे अखेर हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर गेली वर्षभर युक्तिवाद होत गेले. त्यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून 11 गावे पालिका हद्दीत घेतल्याचे जाहीर केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर या 11 गावाच्या समावेशाची अधिसूचना राज्य सरकारने आज प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेवर उपसचिव सं.श गोखले यांची सही आहे. त्यामुळे फुरसुंगी ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली आहे. पुणे महापालिकेमध्ये नव्याने समावेश झालेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी परिसरात कचरा डेपोच्या बफर झोनमध्ये मोठया प्रमाणात बांधकामे आहेत. या शिवाय आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, धायरी, लोहगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. या गावांना जिल्हा प्रशासन आणि नंतर पीएमआरडीएने नोटीस बजावून कारवाई केलेली आहे. त्यामुळे आता ही गावे पालिकेत आल्यानंतर या अनधिकृत बांधकामांचे काय होणार हा खरा प्रश्न आहे.

पुणे महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये समाविष्ट होणा-या गावासाठी निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. जीएसटीमुळे पालिकेची आर्थिक स्वायत्ता धोक्यता आली आहे. जीएसटीचे अनुदान देतानाही पुण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून ११ गावात नागरी सुविधा देण्यासाठी राज्यसरकारने पालिकेला दोन हजार कोटीचे अनुदान द्यावे अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. तसेच फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांत पालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोच्या विरोधात सातत्याने आंदोलने केली जातात. त्यामुळे ही गावे पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आता कचरा डेपोच्या आंदोलनाला ब्रेक लागणार आहे. पालिकेत ११ गावाचा समावेश झाल्यानंतर आता खरा प्रश्न आहे तो उर्वरित २३ गावांचा. पालिकेत ही २३ गावे येत्या तीन वर्षात टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जाणार आहे. त्याने या गावामध्ये ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि पीएमआरडीए विकास कामे करणार नाही. त्यामुळे ख-या अर्थाने ही २३ गावे लटकली असून तेथे विकास कामांचाही खेळखंडोबा होणार आहे. पालिका हद्दीत ११ गावे समाविष्ट झाल्यामुळे आयुक्त कुणाल कुमार यांनी उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये या गावांमध्ये लागणा-या सोईसुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, घनकचरा, रस्त्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याची सूचना सर्व खातेप्रमुखांना देण्यात आली आहे. महापालिकेत ११ गावांचा समावेश झाल्यामुळे पुण्याच्या हद्दीत बदल झाला आहे. शहराची सुधारित हद्द जाहीर करण्यात आली आहे. शहराच्या उत्तरेस कळस, धानोरी, लोहगाव या महसुली गावाची हद्द, उत्तर पूर्वेस लोहगाव, खराडी, दक्षिण-पूर्वच्या बाजूस उरुळी देवाची, हडपसर, महमंदवाडी, उंड्री, दक्षिणेस येवलेवाडी, कात्रज, दक्षिण-पश्चिमेस धायरी, वडगाव बुद्रक, आंबेगाव बुद्रक, आंबेगाव खुर्द या महसुली गावाची हद्द, पश्चिमेस शिवणे, बावधन खुर्द, वडगाव खुर्द तर पश्चिम-उत्तर बाणेर, बालेवाडी या महसुली गावाची हद्द आणि पुणे पालिकेची जुनी हद्द राहणार आहे. उरुळी-देवाची, फुरसुंगी ही दोन गावे पूर्णत: आणि यापूर्वी पालिकेत अंशत: असलेली लोहगाव, साडे सतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव बुद्रक, आंबेगाव खुर्द, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही गावे आता पूर्णपणे पालिका हद्दीत आली आहेत.

Political Research and Analysis Bureau (PRAB)





Wednesday, 4 October 2017

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक जागा (यश) कोणत्या पक्षाला मिळतील ? लिंकवर https://strawpoll.com/kysyphde मत नोंदवा पहा- View Results

लिंकवर 

https://strawpoll.com/kysyphde

मत नोंदवा

पहा-

View Results

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये सर्वाधिक जागा (यश) कोणत्या पक्षाला मिळतील ? Political Research & Analysis Bureau (PRAB)

Choose one answer:
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
View Results


Political Research and Analysis Bureau (PRAB)

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा (यश) कोणत्या पक्षाला मिळेल? मत नोंदवा

लिंकवर https://strawpoll.com/67cwaa3c

मत नोंदवा

पहा-

View Results

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा (यश) कोणत्या पक्षाला मिळेल? Political Research & Analysis Bureau (PRAB)

Choose one or more answers:
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
View Results


Political Research and Analysis Bureau (PRAB)

मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम ; मतदार यादीत नाव नोंदविणे, दुरुस्ती करणे, स्थलांतरित करणे अथवा मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (दुरुस्ती) कार्यक्रम जाहीर

मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम

3 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत मोहीम

मतदार यादीत नाव नोंदविणे, दुरुस्ती करणे, स्थलांतरित करणे अथवा मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (दुरुस्ती) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 3 ऑक्‍टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे.
निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित ही मोहीम राबविण्यात येणार आहे.येत्या मंगळवारी (ता. 3) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या मतदार यादीतील नावांसंदर्भात हरकत असेल तर 3 ऑक्‍टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 7 ते 13 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत मतदार यादीतील संबंधित भागाच्या ग्रामसभा; तसेच स्थानिक संस्था येथे वाचन करून नावांची खातरजमा करण्यात येणार आहे; तर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 8 आणि 22 ऑक्‍टोबरला विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
मतदार यादीतील नावांवरील हरकतींवर सुनावणी घेऊन त्या 5 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 20 डिसेंबर 2017 पर्यंत मतदार याद्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. 5 जानेवारी 2018 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, महापालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यालये; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे संपर्क साधावा
विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच सुविधा
या मोहिमेदरम्यान मतदार यादीत नाव असल्याची खात्री करता येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना; तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना नाव नोंदविण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे; तसेच पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे या मोहिमेत वगळता येणार आहेत. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांना अर्ज नमुना 6 त्यांच्या महाविद्यालयातच भरून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



Political Research and Analysis Bureau (PRAB)

मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी

मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेही मतमोजणी


नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाणार आहे.
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण 20 पैकी चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्र. 2 ची व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रभागाच्या सर्व 37 मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होणाऱ्या चिठ्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2013 मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याच धर्तीवर नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; त्यानुसार कंपनीने 400 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते; परंतु तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती
कंपनीच्या विनंतीचा सखोल विचार करुन नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एका प्रभागात हे व्हीव्हीपॅट प्रायोगिक तत्वावर वापरण्यास कंपनीला परवानगी देण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्यानुसार कंपनीने 70 व्हीव्हीपॅट 20 सप्टेंबर 2017 रोजी नांदेड महानगरपालिकेकडे पाठविले. व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली. या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबतचे सर्व तांत्रिक प्रशिक्षण व त्यांची देखरेख कंपनीचे अधिकारी महानगरपालिका आयुक्तांशी सल्लामसलत करुन करणार आहेत. मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीची मतमोजणी प्रक्रियेवर बारकाईने नजर असेल. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर हे सर्व व्हीव्हीपॅट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया परत घेऊन जाणार आहे
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेत एकूण 20 प्रभाग आणि 81 जागा आहेत. 19 प्रभाग चार सदस्यांचे आहेत. एक प्रभाग 5 सदस्यांचा आहे. एकूण 3 लाख 96 हजार 872 मतदार असून त्यांच्यासाठी 550 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र.2 वगळता अन्य सर्व प्रभागांतील एका मतदान केंद्रावर सरासरी 734 मतदार असतील. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्र.2 मध्ये मतदारांची एकूण संख्या 20 हजार 307 इतकी आहे. त्यांच्यासाठी 37 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. या प्रभागात एका मतदान केंद्रावर सरासरी 550 मतदार असतील, असे ते म्हणाले.
81 जागांसाठी 578 उमेदवार एकूण 81 जागांसाठी 891 उमेदवारांनी वैध नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यातील 313 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता 578 उमेदवार आहेत. व्हीव्हीपॅटचा वापर होत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 26 उमेदवार आहेत. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल