Friday 6 October 2017

पुणे जिल्ह्यात सरपंचपदासाठी होणार बहुरंगी लढती; मोठी चुरस

पुणे जिल्ह्यात सरपंचपदासाठी होणार बहुरंगी लढती; मोठी चुरस


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले.पुणे जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला निवडणुका होत असून गुरुवारी (दि. ५) अर्ज माघारीचा शेवटचा दिवशी बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

आंबेगाव तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही
आंबेगाव तालुक्यात २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून सरपंचपदासाठी ५६ उमेदवार उभे आहेत. तर २०८ सदस्यापदांपैकी ६८ बिनवीरोध झाले आहेत व १४० जागेंसाठी २७२ उमेदवार उभे आहेत.सरपंचपदामध्ये आहुपे, नागापूर, नारोडी या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे बिनविरोध झाली. आहुपे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रमेश लोहकरे, नागापूरच्या सरपंचपदी वैशाली संजय पोहकर, नारोडीच्या सरपंच कैलास तुकाराम काळे हे बिनवीरोध झाले. तर फलौंदे ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज न आल्याने हि जागा रिक्त राहिली.घोडेगाव, धामणी, चांडोली बुद्रूक, मेंगडेवाडी येथील ग्रामपंचायतींमध्ये एकही उमेदवार बिनविरोध निवडला गेला नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. तर डिंभे खुर्द, नारोडी, रांजणी, चिंचोडी, निघोटवाडी येथील ग्रामपंचायतींवर एक किंवा दोन सदस्य बिनविरोध झाल्याने यादेखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. फलौंदे व तळेघर ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी देखील कुठणीही अर्ज भरला नाही. त्यामुळे या दोन ग्रामपंचायती रिक्त राहिल्या.

वेल्ह्यात २८ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध
वेल्हे तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आले असून २८ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.२८ ग्रामपंचायतीमधून एकूण ७५ अर्ज आले होते. त्यापैकी २५ उमेदवारांनी माघार घेतली तर ११ गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर आंबेगाव खुर्द व गिवशी ग्रामपंचायतीमधून सरपंच पदासाठी अर्जच आले नाहीत.वेल्हे खुर्द, दापोडे, आंबेगाव खुर्द, बोरावळे, चिरमोडी, लव्ही बुद्रुक, वाजेघर बुद्रुक, कोलंबी, मोसे बुद्रुक, सोंडे कार्ला रा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर तालुक्यातील शिरकोली, हारपूड, बालवड, टेकपोळे, शेनवड, गिवशी, कोशिमघर, कोंडगाव, गोंडेखल, वडघर, गुंजवणे, सोंडे, हिरोजी, सोंडे सरपाले, सोंडे माथना, जाधववाडी, धानेप, पाल बुद्रुक, केळद, आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत.

सरपंचपदाच्या ९ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात
 हवेली तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये गुरूवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी असलेल्या ९ जागांसाठी ४४ तर सदस्यपदाच्या १०५ जागांसाठी २६९ उमेदवार निवडणूक रिंगणांत उभे असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकारी सुनील शेळके यांनी दिली.यांमधील पेरणे गावातील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. फुरसुंगी गावात सरपंचपदासाठी तब्बल १६ जण उभे असल्यामुळे व बहुतांश ठिकाणी दोनपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया हवेली तालुक्यांतील कदमवाकवस्ती, फुरसुंगी, आव्हाळवाडी, पेरणे, बुर्केगाव, अहिरे, नांदोशी, पिंपरी-सांडस व गोगलवाडी या नऊ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रामुख्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद आजमविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारांचे पॅनल तयार केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढत होत असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्याही कमालीची वाढली आहे. तालुक्यांतील ९ ग्रामपंचायतींतील १०५ सदस्य व ९ सरपंच अशा एकूण १२४ जागांसाठी येत्या १६ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ४६६ उमेदवारांनी, तर सरपंचपदासाठी ७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.जेथे जास्त बंडाळी झाली आहे. अशा नाराज बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वेळेपर्यंत करण्यात आले. काही जणांनी अर्ज माघारी घेतले. परंतु काहींनी बंडाचे निशाण आणखीन जोमात फडकावणार असल्याचे घोषित केले.

मुळशीत सात ग्रामपंचायती बिनविरोध
ग्रामपंचायत व सरपंच पदाच्या निवडणुकीच्या दुसºयाा टप्याच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत मुळशी तालुक्यातील ११ ग्रामपंचायती पैकी ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.
११ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी एकूण ८० अर्ज आले होते. त्यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने एकूण ७८ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते तर सरपंच पदासाठी २८ आले होते त्यापैकी सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले होते. पाथरशेत, तव, कोंढूर, लवार्डे, मोसे खुर्द, वांजळे व दासवे या दोन ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात स्थानिक ग्रामस्थ व नेते मंडळीना यश आले. अन्य आसदे, आडमाळ, भोडे व माळेगाव चार ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या १६ नोव्हेंबर रोजी होईल. भोडे ग्रामपंचायतीत एकही सदस्य बिनविरोध झाला नाही या ठिकाणी सर्व जागांसाठी निवडणूक होईल. आसदे व भोडे या ठिकाणी सरपंच पदासाठी प्रत्येकी ५ उमेदवार रिंगणात असतील. माळेगाव येथे सरपंच पदासाठी ४ उमेदवार, आडमाळ येथे एका वार्डाातील एका सदस्य पदासाठी २ उमेदवार तर सरपंच पदासाठी २ उमेदवार असतील.

कोंडूर ग्रामपंचायत
बिनविरोध करून पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कोंढरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी व पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे यांनी वेगळा आदर्श निर्माण करून दिला. भोडे व आसदे येथील सरपंचपदाची निवडणूक सर्वाधिक अटीतटीची होणार आहे.

बारामतीत सरपंचपदासाठी ३८, तर सदस्यपदासाठी २६३ उमेदवार रिंगणात
बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सरपंचपदासाठी ५२ तर सदस्य पदासाठी २१८ नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आली आहेत. सरपंचपदासाठी ३८ तर सदस्य पदासाठी २६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ४ ग्रामपंचायतींचे एकूण २५ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, अशी माहिती तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली. लोणी भापकर, काºहाटी, सोनकसवाडी, वाणेवाडी, कुरणेवाडी, मासाळवाडी, मुरूम, मोरगाव, पळशी, गडदरवाडी, पणदरे, सोरटेवाडी, वाघळवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.त्यापैकी बिनविरोध सदस्यपदी निवडून आलेले गाव व उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे - काºहाटी - २, सोनकसवाडी - ६, वाणेवाडी - ७, मुरुम - १० अशी एकूण २५ उमेदवार निवडून आलेले आहेत.बिनविरोध सरपंचपदी एकही उमेदवार आला नसल्याचे सांगितले.

भोरमधील १८ ग्रामपंचायती बिनविरोध
तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. भोर तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५८ उमेदवारी अर्ज, तर ५४ ग्रामपंचायतींच्या ३६२ सदस्यपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४५४ जणांनी अर्ज दाखल केले. ५४ पैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून वाढाणे व सोनवडी या दोन ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. ५ आॅक्टोबर रोजी माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.नोव्हेबर व डिसेंबर २०१७मध्ये मुदत संपणाºया तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला होत आहेत. सरपंचपदाची २०२०पर्यंतची आरक्षणाची सोडत २०१५मध्येच काढण्यात आली आहे. तालुक्यातील १५५ पैकी ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी सर्व कागदपत्रे गोळा करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द, शिरवलीतर्फे भोर, आपटी, हरिश्चंद्री, कोळवाडी, सांगवी खुर्द, करंदी बुद्रुक, आंबेघर दुर्गाडी, गुढे मळे, भुतोंडे, कोर्ले, बसरापूर, करंदी खुर्द, वाढाणे सोनवडी या १८ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने तालुक्यातील अनेक नेत्यांच्या गावांचा समावेश असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वेळी संपूर्ण गावाने मतदान करायचे असल्याने ही निवडणूक सर्वासाठी अत्यंत चुरशीची ठरणार असून अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भोर तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय नेते आपली ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

जुन्नर ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम
नव्यानेच सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने सरपंच पदासाठी गावागावांतून मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी होत असताना जुन्नर तालुक्यातील काले गावाने मात्र आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत ग्रामस्थांच्या एकविचारातून बिनविरोध सरपंच व सदस्यांची निवड करण्यात आली आहे.राजकारण व निवडणुकांमुळे गावात गट तट निर्माण होऊन गावाच्या विकासाला खीळ बसते. त्यामुळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ व तरुणांनी एकविचाराने गावाच्या विकासासाठी बिनविरोध निवडणुकीचा निर्णय घेऊन इतरांना आदर्श घालून दिला आहे.काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मालिता मारुती नायकोडी यांची गावाने सरपंच पदी बिनविरोध निवड केली. तर सदस्यपदी जनार्धन पानसरे, अनिता मिननाथ पानसरे, योगिता अमित कर्पे, सविता लक्ष्मण चतुर, रावजी शंकर काळे, साईनाथ विठ्ठल भालेकर यांची निवड करण्यात आली.जुन्नर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून अर्ज माघारीच्या आजचा शेवटचा दिवस होता. काले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला तर सदस्य पदासाठी सात जागांसाठी सहा अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या उपस्थितीमध्ये गावबैठक घेण्यात आली. या बैठकीस काले गावठाण, गोळेवाडी व बाळोबाची वाडी आदीमधील जवळपास दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गावात एकोप्याचे वातावरण अबाधित ठेवून काम करण्यासाठी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले. या आवाहनास उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले.त्यानुसार गावाने सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली व त्यास सर्व उपस्थितांनी अनुमोदन दिले. काले ग्रामपंचायतींच्या स्थापनेपासून आजपर्यंत गावामध्ये ग्रामपंचायत अथवा विकास सोसायटी यांची निवडणूक झाली नाही. हीच परंपरा यावेळेसही टिकून राहिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये माजी सरपंच रवींद्र पानसरे, सरपंच शालिनी पानसरे, उपसरपंच संजय कुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पानसरे, विलास पानसरे, लक्ष्मण पानसरे, मिननाथ पानसरे, जगन चतुर, अशोक नायकोडी, मनोहर पानसरे, बबन पानसरे, सुनील पानसरे, अशोक चतुर, मनोहर घोगरे, शिवाजी कर्पे, कुलदीप नायकोडी, अविनाश पानसरे, शशिकांत पानसरे, विशाल पानसरे , कोंडाजी भालेकर, दिनकर नायकोडी, तान्हाजी पानसरे, नवनाथ पानसरे , सुनील सोनवणे यांसह ग्रामस्थानी प्रयत्न केले.

कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार रिंगणात
पूर्व हवेलीतील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारात काट्याची लढत होणार असल्याची चिन्हे आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष व विद्यमान सरपंच नंदकुमार काळभोर यांच्या पत्नी मनिषा तर भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या गौरी गायकवाड सरपंचपदासाठी एकमेकासमोर उभ्या ठाकल्या आहेत.तर वरील दोन्ही नेत्यांच्या विरोधात कदमवाकवस्तीचे माजी उपसरपंच देवीदास काळभोर यांनी आपली पत्नी सुनंदा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर या तिघांच्यासह सुजाता रायगोंडा गायकवाड यांनीही आपली उमेदवारी ठेवली आहे.सतरा जागांच्यासाठी नंदु काळभोर यांनी लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातून सतरा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. चित्तरंजन गायकवाड यांनी परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सतरा जागी उमेदवार उभे केले आहेत. माजी उपसरपंच देविदास काळभोर यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसाचे वाटप झाल्याची कवित्व अजून चर्चिले जात असतानाच, एेन दिवाळीत निवडणूक होणार असल्याने मतदार राजा कसा प्रतिसाद देतो यावर विजयाची गणिते ठरणार आहेत. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत सतरा सदस्य असून, सध्या नंदू काळभोर यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे. यंदा प्रथमच सरपंचपदासाठी थेट मतदान होणार आहे. नंदू काळभोर यांनी ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात पुन्हा ठेवण्यासाठी कंबर कसली आहे.सरपंचपदासाठी मनिषा काळभोर यांना रिंगणात उतरवले आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतीची सत्ता खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मागिल सहा महिन्यांपासून फिल्डींग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडकीत गौरी गायकवाड यांना अपयश आले असले तरी, गैरी गायकवाड यांनी सरपंच पद डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना भेटण्याचा सपाटा लावला होता.
सतरा जागांच्या एकूण उमेदवार 44 निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे (कंसात पॅनेलचे नाव) 
प्रभाग क्रमांक 1 : आरती सुशील काळभोर, अर्चना हेमंत टिळेकर, राकेश आगतराव लोंढे (लोकसेवा पॅनेल), वैजंता अनिल कदम, सविता नवनाथ साळुंके, सचिन भागवत दाभाडे, (परीवर्तन पॅनेल)
प्रभाग क्रमांक 2 : अमित अविनाश काळभोर, राजश्री उदय काळभोर (परीवर्तन पॅनेवल), बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, वर्षा प्रसाद काळभोर (लोकसेवा पॅनेल), स्मिता निलेश काळभोर, नुतन वसंत काळभोर.
प्रभाग क्रमांक 3 : ऋषिकेश विद्याधर काळभोर, रमेश हरिभाऊ कोतवाल, नासिरखान मुनुलाखन पठाण (परीवर्तण प्रनेल), अनिल शिवाजी काळभोर, पांडुरंग ज्ञानेश्वर काळभोर, विक्रांत संजय ठोंबरे (लोकसेवा प्रनेल), गणेश संभाजी कुंजीर, सचिन राजन पिल्ले.
प्रभाग क्रमांक 4 : मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, अशोक कृष्णा शिंदे, नलिमा कलंदर पठाण (परीवर्तण पॅनेल), शरीफ मिरवाज खान, छाया नागसेन ओव्हाळ, वंदना सचिन काळभोर (लोकसेवा पॅनेल), अभिजित रामदास बडदे,
प्रभाग क्रमांक 5 : नितेश अंबादास लोखंडे, राणी विजय बडदे, अमृता मयूर कदम (परीवर्तण पॅनेल) नागेश सोपान जेटीथोर, सारिका मोहन भोसले, आशा संजय खैरे (लोकसेवा पॅनेल), विद्याधर श्रीमंत बहुरंगी, रामगोंडा यलप्पा गायकवाड,
प्रभाग क्रमांक 6 : माधुरी चंद्रकांत काळभोर, रुपाली अविनाश कोरे, बाळसाहेब सोपान कदम (परीवर्तण पॅनेल),  सुमन अरुण चौघुले, द्वारकाबाई गंगाराम शिरवाळे,  दिपक बाबुराव काळभोर (लोकसेवा) सुरेखा गिरीष खोपडे. रणधीर विनायक घोरपडे, लक्ष्मी दिपक मोरे.

========
कोल्हापूर जिल्ह्यात सरपंचपदासाठी 1249 उमेदवार रिंगणात
कोल्हापूर जिल्ह्यातील 472 ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काही ठिकाणी सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या. प्रथमच थेट जनतेतून निवड होत असल्याने बहुतांशी सर्वच ठिकाणी सरपंचपदासाठी मात्र चुरशीच्या लढती होणार आहेत. सरपंचपदासाठी 1249 उमेदवार तर सदस्यांसाठी 8628 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. सोमवार दि. 16 रोजी मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज माघारीची गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती. माघारीसाठी सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात गर्दी होती. गेल्या दोन दिवसांपासून माघारीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. माघार घेण्यासाठी अनेकांची अखेरपर्यंत मनधरणी सुरू होती.
विविध आश्‍वासने दिली जात होती, शब्द दिले जात होते. शपथा घेतल्या जात होत्या, वचनही दिले जात होते. माघार घेणार्‍या उमेदवारांची खास बडदास्तही ठेवण्यात येत होती. गावातून निवडणूक कार्यालयापर्यंत ने-आण करण्याचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. निवडणुकीसाठी डमी अर्ज सादर केलेल्यांचीही उमेदवारी मागे घेण्यासाठी धांदल उडाली होती. दुपारी दोननंतर तर कार्यालयातील सर्वांचीच लगबग वाढली होती. माघार घेणार्‍यांना अर्ज भरण्यापासून ते कार्यालयापर्यंत नेण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अनेकांचे जीव भांड्यात पडत होते, त्यानंतर जल्लोषही होत होता. दुपारी तीन वाजता मुदत संपल्यानंतर अंतिम उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. दरम्यान, एका गावात सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. काही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाल्या. मात्र, त्याचा नेमका आकडा रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही.

गावागावांत चिन्हासह प्रचाराला प्रारंभ
जिल्ह्यात सरपंचपदासाठी 2 हजार 833 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. सदस्यपदासाठी 15 हजार 876 अर्ज शिल्लक राहिले होते. आज सरपंचपदाचे 1584 तर सदस्यपदाचे 7248 अर्ज मागे घेण्यात आले. जिल्ह्यात सरपंचपदासाठी 1249 इतके उमेदवार तर सदस्यपदासाठी 8628 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. उमेदवारी माघारीची प्रक्रिया संपताच गावागावांत सायंकाळपासून चिन्हासह प्रचार सुरू झाला.

सातारा जिल्ह्यात सरपंचपदासाठी बहुसंख्य उमेदवार रिंगणात
सातारा जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राप्‍त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. त्यानंतर वैध ठरलेल्या 7 हजार 773 उमेदवारी अर्जांसाठी माघार प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात सरपंचदासाठी बहुसंख्या उमेदवारांनी अर्ज ठेवले. बर्‍याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी सर्व वॉर्ड बिनविरोध तर सरपंचदासाठी संघर्ष दिसून आला. सातारा तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे धुमशान जोरात सुरु झाले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी अनेक घटनाघडामोडी घडल्या. अर्ज काढून घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरु होती. तर अर्ज काढून घ्यायला लागू नये यासाठी बरेचजण गूल झाले. त्यामुळे पॅनेलप्रमुखांची चांगलीच दमछाक झाली. आपण बिनविरोध निवडून येवू या अनेकांच्या अपेक्षेवर विरजण पडले.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये नाट्यमयी घडमोडी घडल्या. तालुक्याच्या ठिकाणी सकाळपासूनच उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. सायंकाळी उशिरपर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सरपंचपदाचे 11 तर सदस्यपदाचे 111 असे सर्वमिळून 122 उमेदवारी अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या उर्वरित 7 हजार 773 उमेदवारी अर्जासाठी गुरुवारी माघार प्रक्रिया पार पडली. सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींच्या  सदस्यपदासाठी  717 अर्ज तर सरपंचपदासाठी 152 अर्ज कायम होते. गुरुवारी  अर्ज मागे घेण्याच्या दिवशी  9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.  काही ग्रामपंचायतीमध्ये सर्व वॉर्ड बिनविरोध झाले तर, सरपंच पदासाठीच निवडणूक लागल्याचे चित्र पहायला मिळाले.  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सातारा शहरताील भूविकास बँक परिसरात विविध गावच्या  उमेदवारांसह नागरिकांनी सकाळपासूनच  गर्दी केली होती. ठिकठिकाणी उमेदवारांस अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पदाधिकारी विनवणी, मनधरणी करताना दिसत होते. त्यामुळे दिवसभर या परिसरात राजकीय चर्चा व आश्‍वासनांचा पाऊस पडत होता. या तालुक्यातील करंजे तर्फ परळी, न्हाळेवाडी, धोंडेवाडी, गोगावलेवाडी, माळ्याची वाडी, खावली, भरतगाववाडी, रेणावळे, मत्यापुर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात  आले. कोंढवली, आसगाव ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासह, एका वॉर्डसाठी निवडणूक लागली. बेंडवाडी व केळवली ग्रामंपचायतींच्या सरपंचपदासाठी निवडणूक लागली असून या ग्रामपंचायतींचे सर्व वॉर्ड बिनविरोध झाले आहेतसातारा जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतीचे धूमशान सुरू झाले असून उमेदवारी  अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिला. यंदा प्रथमच थेट सरपंच होणार असून जिल्ह्यात या पदासाठी तब्बल 1 हजार 369 अर्ज तर सदस्यपदासाठी  6 हजार 488 अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वत्रच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल  करण्यात आल्याने सध्या गावपातळीवरील राजकीय वातावरण चांगलेच तापले झाले आहे.
जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. यावर्षी थेट जनतेतून सरपंचांची निवड  केली जाणार असल्याने अनेकांनी सरपंच पदासाठी अर्ज भरले आहेत त्यामुळे या निवडणुकीला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. सरपंचपदाच्या उमेदवाराला गावातील सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेताना चांगलाच कस लागणार आहे.
सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 152 तर सदस्यपदासाठी 718 अर्ज दाखल झाले आहेत. जावली तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 46 तर सदस्यपदासाठी 168अर्ज दाखल झाले आहेत. कोरेगाव तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 222 तर सदस्यपदासाठी 971 अर्ज दाखल झाले आहेत.  वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 40 तर सदस्यपदासाठी 213 अर्ज दाखल झाले आहेत.खंडाळा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 23 तर सदस्यपदासाठी 188 अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 11 तर सदस्यपदासाठी 53 अर्ज दाखल झाले आहेत. कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 154 तर सदस्यपदासाठी 1 हजार 58 अर्ज दाखल झाले आहेत. पाटण तालुक्यातील 86 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी सर्वाधिक 356 तर सदस्यपदासाठी 1 हजार 438 अर्ज दाखल झाले आहेत. माण  तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 155 तर सदस्यपदासाठी 634 अर्ज दाखल झाले आहेत.खटाव तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 76 तर सदस्यपदासाठी 265 अर्ज दाखल झाले आहेत. फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीच्या  सरपंचपदासाठी 134 तर सदस्यपदासाठी 782 अर्ज दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील 318 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 1 हजार 369 तर सदस्यपदासाठी 6 हजार 488 अर्ज दाखल झाले  आहेत. मंगळवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 3 यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सांगली जिल्ह्यात १० हजार २३६ जण रिंगणात
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी (गुरुवारी) अंदाजे सात हजारजणांनी माघार घेतली. सरपंच व  सदस्यपदासाठी दहा तालुक्यात सुमारे 10 हजार 236 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. काही गावे बिनविरोध झाली आहेत. चिन्हे वाटपही झाल्यामुळे उद्यापासून (शुक्रवार) प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. कडेगाव तालुक्यात निवडणूक प्रक्रियेचा मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्‍त केली.

शिराळा तालुक्यात 11 बिनविरोध
शिराळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील साठ ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. काँग्रेस पाच, राष्ट्रवादी तीन तर भाजपला दोन ग्रामपंचायती मिळाल्या. काँग्रेसला मिळालेल्या ग्रामपंचायती : कोकरुड, चिंचोली, शेडगेवाडी, माळेवाडी, वाकुर्डे खुर्द. राष्ट्रवादीला मिळालेल्या ग्रामपंचायती : चिखली, गवळेवाडी व पावलेवाडी आणि भाजपला मिळालेल्या
ग्रामपंचायती : गिरजवडे व खुंदलापूर. उपवळे व धामवडेमध्ये फक्‍त सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
तालुक्यात 1023 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंचपदाच्या 152 जणांनी माघार घेतल्याने 134 जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्य पदाच्या 648 अर्ज  माघारी घेतले गेल्याने 889 जण रिंगणात आहेत.
वाळवा तालुक्यात 2237 उमेदवार
वाळवा तालुक्यात 2237 उमेदवार  रिंगणात राहिले आहेत. सरपंच पदासाठी 231 जणांनी माघार घेतल्याने 240 अर्ज शिल्लक राहिले.  सदस्य पदाच्या  1262 उमेदवारांनी माघार घेतल्याने 1997  जण निवडणूक लढविणार आहेत. भरतवाडी, जुनेखेड, फार्णेवाडी (बोरगाव) कोळे, मरळनाथपूर ही गावे बिनविरोध झाली. 32 सदस्य बिनविरोध झाले आहेत. तसेच चिकुर्डे, धोतरेवाडी, ढवळी येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. डोंगरवाडी, बिचूद, फार्णेवाडी येथील सरपंच पद रिक्त राहणार आहे. तासगाव तालुक्यात 598 उमेदवार रिंगणात तालुक्यात 26 ग्रामपंचायतीसाठी  598 उमेदवार  रिंगणात राहिले आहेत. त्यापैकी सरपंचपदासाठी 62 तर सदस्य पदासाठी 536 उमेदवार नशीब अजमावणार आहेत. जवळपास सर्वच गावात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशाच लढती होणार आहेत.
तालुक्यात 26 गावातील सरपंच आणि सदस्य पदासाठीचे उमेदवार : अंजनी  2 (24), आरवडे 2 (22), बलगवडे  2 (18), बस्तवडे 3 (22), बेंद्री 2 (18), भैरववाडी 1 (12), चिंचणी 3 (34), कचरेवाडी 2(11), खुजगाव 3 (20), कुमठे 3 (30), लिंब 2 (14),  मणेराजुरी 2 (35), मतकुणकी 3(25), नागाव 2(18), नागेवाडी 2 (13), नेहरुनगर 2 (18),  निमणी 3 (16), पानमळेवाडी 3 (12), पुणदी 2 (18), सावर्डे 3 (26), शिरगाव 2 (18), उपळावी 3 (22), वंजारवाडी 3 (24), वासुंबे 2 (26), वायफळे 2 (26),योगेवाडी 3 (14).
पलूस तालुक्यात 645 उमेदवार रिंगणात
पलूस तालुक्यात सरपंचपदासाठी दाखल अर्जांपैकी 80 जणांनी माघार घेतली. रिंगणात 38 जण राहिले आहेत.  सदस्य पदाच्या 436 जणांनी अर्ज परत घेतल्याने 415 जण निवडणूक लढविणार आहेत. पुणदीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सावंतपूर येथे 1 व सुखवाडी येथे दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.
कडेगाव  तालुक्यात 903  उमेदवार रिंगणात
तालुक्यात 903 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 102  व सदस्य पदाचे 801 जण  रिंगणार आहेत.
मिरज तालुक्यात 1212 उमेदवार रिंगणात
मिरज तालुक्यात 1212 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 118 जणांनी माघार घेतल्याने 110 जणांचे अर्ज राहिले आहेत. सदस्य पदाच्या 642  जणांनी माघार   घेतल्याने 1002  जण  रिंगणात आहेत.  23 सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. रसूलवाडीचे सरपंचपद बिनविरोध झाले.
कवठेमहांकाळ तालुक्यात 645 उमेदवार रिंगणात
कवठेमहांकाळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींपैकी केरेवाडी आणि लांडगेवाडी 2 गावे बिनविरोध झाली. अलकुड एस 2, बोरगाव 1, जायगव्हाण 1, खरशिंग 1, कोंगनोळी 6, मळणगाव 2, नागज 1, शेळकेवाडी 1, शिरढोण 1 अशा  सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या.  247 जागांसाठी 567 जण तर 27 सरपंच पदाच्या जागेसाठी 78 जण रिंगणात राहिले आहेत.
खानापूर तालुक्यात 888 उमेदवार रिंगणात
तालुक्यात 888 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 112 जणांनी माघार घेतल्याने 122 जणांचे अर्ज राहिले आहेत. तर सदस्य पदाच्या 361 जणांनी माघार घेतल्याने 766  जण  रिंगणार आहेत. 30 सदस्य बिनविरोध झाले.
आटपाडी  तालुक्यात 291  उमेदवार रिंगणात
तालुक्यात 291 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.  सरपंच पदाच्या 55 व सदस्य पदाचे 236 जण  रिंगणार आहेत.
जत  तालुक्यात 1923 उमेदवार रिंगणात
जत तालुक्यात सरपंच पदाच्या रिंगणातील 371 जणांनी माघार घेतल्याने 133  जणांचे अर्ज राहिले आहेत.  सदस्य पदाच्या 477 जणांनी माघार घेतल्याने 1923 जण  रिंगणात आहेत. कडेगाव तालुक्याच्या प्रक्रियेत गोंधळ झाला होता. रात्री उशिरापर्यंत छाननी व चिन्हे वाटप सुरु होते.

सांगली शिराळ्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध
शिराळा तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील साठ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस पाच राष्ट्रवादी तीन तर भाजपाला दोन ग्रामपंचायती मिळाल्या. बिनविरोध निवडून झालेल्या काँग्रेसच्या ग्रामपंचायती याप्रमाणे कोकरुड, चिचोंली, शेडगेवाडी, माळेवाडी, वाकुर्डे खुर्द तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या ग्रामपंचायती या प्रमाणे चिखली, गवळेवाडी व पावलेवाडी तर भारतीय जनता पक्षाकडे गिरजवडे व खुदंलापूर या दोन ग्रामपंचायतील आल्या आहेत.उपवळे व धामवडे या दोन ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत असून या ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी सात सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख, युवा नेते सत्यजित देशमुख तर राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक, विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सरपंचपदासाठी ११०; सदस्यासाठी ५३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.27) माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सरपंच पदासाठी 55, तर सदस्य पदासाठी 140 उमेदवारांची माघार घेतल्याने सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 110, तर सदस्य पदाच्या 313 जागांसाठी 530 उमेदवार रिंगणात आहेत.
तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या 35 जागांसाठी 165 सदस्य पदाच्या 313 जागांसाठी 699 अर्ज अखेरच्या मुदतीपर्यंत प्राप्त झाले होते. प्राप्‍त अर्जांच्या छाननीत सरपंचपदासाठीचे सर्व 165 अर्ज वैध ठरले, तर सदस्य पदासाठीचे 29 अर्ज बाद ठरविण्यात आले होते. बुधवारी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत सरपंचपदासाठी 55, तर सदस्यपदासाठी 140 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता सरपंचपदाच्या 35 जागांसाठी 110, तर सदस्यपदाच्या 313 जागांसाठी 530 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक, सहाय्यक अधिकारी रुपेश सुराणा यांनी दिली. 
सरपंच पदासाठीचे उमेदवार:
दुगाव 3, शिंगवे 4, शेलू 2, काजीसांगवी 5, तळेगावरोही 3, देवरगाव 6, दहेगाव म. 3, डोणगाव 3, वाद 4, नारायणगाव 2, मालसाणे 3, दुधखेड 5, वडाळीभोई 3, विटावे 2, पाटे 2, साळसाणे 2, खेलदरी 2, आडगाव 1, खडकओझर 1, रेडगाव 4, चिखलआंबे 2, निंबाळे 7, भुत्याणे 4, भाटगाव 1, पुरी 6, दरेगाव 1, बोराळे 2, कुंदलगाव 3, गणूर 6, निमोण 3, चिंचोले 2, कोकणखेडे 2, मेसनखेडे 6, सोनीसांगवी 2, तळवाडे याप्रमाणे एकूण 110 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सदस्य पदासाठीचे उमेदवार:
दुगाव 22, शिंगवे 16, शेलू 9, काजीसांगवी 24, तळेगावरोही 20,  देवरगाव 27,  दहेगाव 17, डोणगाव 14,  वाद 15, नारायणगाव 14, मालसाणे 9,  दुधखेड 11, वडाळीभोई 34, विटावे 17, पाटे 18, साळसाणे 11, खेलदरी 15, आडगाव 9, खडकओझर 11, रेडगाव 10, चिखलआंबे 8, निंबाळे 15, भुत्याणे 10,  भाटगाव 9, पुरी 19, दरेगाव 9,  बोराळे 14,  कुंदलगाव 23, गणूर 19, निमोण 23,  चिंचोले 6, कोकणखेडे 9, मेसनखेडे 23, सोनीसांगवी 14, तळवाडे याप्रमाणे एकूण 530 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.


कणकवली : सरपंचपदासाठी ५३ तर सदस्यपदासाठी २२२ अर्ज
कणकवली ग्रा. पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत तालुक्यातून सरपंचपदासाठी 53 तर सदस्य पदासाठी 222 अर्ज दाखल झाले. तालुक्यात एकूण सरपंचपदासाठी 138 तर सदस्य पदासाठी 557 अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील हळवल व पियाळी ग्रा. पं. ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
कणकवली तालुक्यातील 58 ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातून शुक्रवारी सरपंचपदासाठी भरणी-1, नागवे-6, पिसेकामते-1, बिडवाडी-1, वरवडे-10, हरकुळ बुद्रुक-2, तरंदळे-2, कलमठ-6, वाघेरी-1, हुंबरठ-1, असलदे-1, आयनल-1, सावडाव-1, नांदगाव-3, कोळोशी-1, साकेडी-2, सातरल-2, हळवल-1, दारिस्ते-2, वागदे-2, शेर्पे-4, कोळोशी-2 असे 53 अर्ज दाखल झाले. तर सदस्य पदासाठी भरणी-13, आशिये-3, नागवे-17, पिसेकामते-7, बिडवाडी-12, वरवडे-17, हरकुळ बुदुक-13, तरंदळे- 13, कलमठ-34, वाघेरी-3, हुंबरठ-3, माईण-2, असलदे-4, आयनल-5, सावडाव-7, नांदगाव-5, कोळोशी-7, साकेडी-5, पियाळी-1, सातरल-5, हळवल-9, शिरवल-6, दारिस्ते-9, वागदे-8, शेर्पे-4, कोळोशी-7, साळिस्ते-3 असे 222 अर्ज दाखल झाले. सायंकाळी 6.30 वाजता तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात पोचलेल्या उमेदवारांचे अर्ज उशिरापर्यंत दाखल करणे सुरू होते.
हळवलमध्ये पक्षविरहीत गाव पॅनल
हळवल ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या नविन उमेदवारांना संधी देत निवडणूक बिनविरोध केली. सरपंचपदासाठी दिपक गुरव तर सदस्य पदासाठीच्या 9 जागांसाठी संदेश राणे, ऋतुजा तावडे, सुजाता परब, अरूण राऊळ, उर्मिला मडवळ, उत्तम जाधव, उर्मिला ठाकूर, शुभांगी राणे, प्रकाश जोगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच व सदस्यांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
पियाळी समर्थ  पॅनल बिनविरोध
पियाळी ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये केवळ समर्थ पॅनलचे उमेदवार दाखल झाले. पियाळी सरपंच पदासाठी पवित्रा गुरव तर सदस्यपदासाठी बाळकृष्ण सावंत, मंगेश तेली, सुनील कदम, वैष्णवी राणे, सोनाली बंदरकर, दर्शना नारकर, प्राजक्ता पावसकर यांनी अर्ज दाखल केले.

Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.