Saturday 28 October 2017

वाल्हे ते निरा या दरम्यान रस्तारुंदीकरण होणार ; रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण ; वाल्हे गावातील मोजणी प्रक्रिया पूर्ण

वाल्हे ते निरा या दरम्यान रस्तारुंदीकरण होणार ; रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण 

आळंदी ते पंढरपूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केल्याने भूसंपादन प्रक्रियेला वेग




====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


=====================================================================

वाल्हे गावातील मोजणी प्रक्रिया पूर्ण

आळंदी ते पंढरपूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केल्याने भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून भूसंपादनासाठी मोजणी, प्रत्यक्ष ताबा, संबंधिताना संपादन नोटीसा पाठविण्यात येत आहेत. यामार्गावर वाल्हे ते निरा या दरम्यानही एकेरी रस्ता आहे. या मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. रस्त्यालगतच्या शेतकरी व व्यापारी यांना भूसंपादन नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोजणीचे कामही सुरु असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. भूसंपादन मोजणीचे काम उप अधिक्षक भूमि अभिलेख पुरंदर यांच्याकडून केले जात आहे. भूकरमापक समर्थ बाजारी आणि श्रीकांत चिमटे हे मोजणीचे काम करीत आहेत. तर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक २२ पुणे हे भूसंपादन प्रक्रिया राबवित आहेत. दरम्यान रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण होत असून त्यासाठी ही भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. 

वाल्हे गावातील ज्या गटातील भूसंपादन करण्यात येणार आहेत ते गट क्रमांक खालीलप्रमाणे-

181,921,923,924,925,928,950,955,956,998,999,1112,1118,1120,1121,1123,1161,1426,2588,2589,2590,2591,2592/1,2595,2597,2598,2599,2607,2631,2632,2634,2637,2641,2642,2643,2644,2673,2674,2675,2680,2684,2685,2686,2687,2688,2690,2691,5718,5777,5782,5784,5785,5786,5789,5790,5791,5793,5794,5795,5801,5803,5804,5806,5818,5820,6110,6183,6184,6185,6211,6212,6251 असे असून रेल्वेमार्गासाठी आणखीन इतर गट क्रमांक आहेत.



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

आळंदी ते पंढरपूर या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाला अखेर राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली होती. त्यामुळे निधीअभावी धीम्यागतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे.आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग तसेच, देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये केली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचा प्रस्ताव ‘एनएचएआय’कडे सादर करण्यात आला. त्यानुसार ‘एनएचएआय’ने या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केले. आळंदी ते पंढरपूर हा रस्ता पुण्याच्या दिशेला नाशिक महामार्गाला आणि पंढरपूरच्या दिशेने पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्याचे प्रस्तावित आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या मार्गासाठी ३, ७०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.सद्य परिस्थितीत या मार्गावर हडपसरकडून जेजुरीकडे जाताना दिवेघाट ते जेजुरी दरम्यानच्या रस्त्याचा अपवाद वगळता चौपदरी करण्यात आला आहे. जेजुरी एमआयडीसीपर्यंत चौपदरी रस्ता करण्यात आला आहे. मात्र, चौपदरीकरण झाले असले तरीही दुभाजक नाही, साइड पट्ट्या नाहीत, आदी अनेक कामे अपूर्ण आहेत. दिवेघाट ते फुरसुंगी दरम्यानचा रस्ता अद्याप एकेरी आहे. जेजुरीतून पुढे वाल्हे, निरा या दरम्यानही एकेरी रस्ता आहे. तसेच, लोणंद ते फटलण चौपदरी रस्ता आहे. या मार्गावर सासवड येथे कऱ्हा नदी व फुरसंगी येथे रेल्वे उड्डाणपुलावर एकेरी रस्ता आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर नेहमी वाहतूक कोंडी होते. हडपसर ते जेजुरी दरम्यान भूसंपादन करताना योग्य नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे येथील काही काम रखडले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनासाठी स्वतंत्र कायदा असल्याने त्यामधील तरतुदीमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भूसंपादनाचा विषय मार्गी लागणे अपेक्षित आहे.




Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.