Monday, 25 June 2018

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी १ ऑगस्टला मतदान

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी १ ऑगस्टला मतदान


सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ ऑगस्ट २०१८ रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे केली आहे.
     सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ असून मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.
      जळगाव महानगरपालिकेची मुदत १९ सप्टेंबर २०१८ रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या ४ लाख ६० हजार २२८ असून मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४ , तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत.
      वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ९७ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील १ ऑगस्ट २०१८ रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी दि. ४ जुलै २०१८ पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. १ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी दि. ३ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल,

निवडणूक कार्यक्रम  

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : ४ ते ११ जुलै २०१८नामनिर्देशनपत्रांची छाननी : १२ जुलै २०१८उमेदवारी मागे घेणे : १७ जुलै २०१८ पर्यंतनिवडणूक चिन्ह वाटप : १८ जुलै २०१८मतदान : १ ऑगस्ट २०१८मतमोजणी : ३ ऑगस्ट २०१८निकालाची राजपत्रात प्रसिध्दी : ६ ऑगस्ट २०१८ पर्यंत


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर

नव्या प्रभाग रचनेत विद्यमान सदस्यांचे प्रभाग गायब


सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले. चार सदस्यीय रचनेमुळे प्रभागांचे आकार वाढले असून विद्यमान बहुतांशी प्रभागांची मोठी मोडतोड करून नवे 20 प्रभाग अस्तित्वात आले आहेत. आज पार पडलेल्या प्रक्रियेवर येत्या 23 एप्रिलपर्यंत हरकती घेता येतील. नव्या रचनेत विद्यमान आणि दोन माजी उपमहापौरांचे प्रभागच गायब झाले आहेत. मिरजेतील गावठाण परिसर आणि सांगलीतील खणभाग परिसरात मात्तबरांच्या प्रभागांचे एकत्रिकरण झाले असून तेथे बंडखोरी पक्षांतरांचे वारे आजपासूनच वाहू लागले आहे. पुढील सभागृहात एकूण 20 प्रभागातून 78 नगरसेवक असतील. सांगलीवाडी व मिरजेतील अशा दोन प्रभागात प्रत्येकी तीन सदस्य असतील. उर्वरित अठरा प्रभाग चार सदस्यांचे असतील. प्रभागातील सदस्य संख्याच बदलल्याने प्रभाग रचना बदलणे अटळ होते मात्र झालेले बदल हे अमुलाग्र स्वरुपाचे असल्याने जवळपास 95 टक्के विद्यमान नगरसेवक माझा संपुर्ण प्रभाग कायम राहिला आहे असे म्हणून शकत नाहीत. त्याबरोबरच सांगलीवाडी, खणभाग, गावभाग, मिरज ब्राह्मणपुरी गावठाण भागांचे एकत्रिकरण झाल्याचे चित्र आहे. यापुर्वी गणपती मंदिर परिसरातून प्रभाग एकचा प्रारंभ होत असे. यावेळी प्रथमच कुपवाडमधून प्रभाग एकची सुरवात झाली आहे. तिथून मिरजेच्या मिशन परिसरापर्यंत आणि तिथून सांगली शहराच्या दिशेने प्रभाग क्रमांक बदलत पुन्हा वीस क्रमांकाचा शेवटचा प्रभाग मिरजेतच कृष्णाघाट परिसराचा समावेश असलेला असा आहे. ही रचना घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग आणि त्यांच्या राजकीय प्रभाव क्षेत्राच्या दृष्टीने या प्रभाग रचनेवर नजर टाकली असता प्रशांत पाटील-मजलेकर, प्रशांत पायगोंडा पाटील आणि विजय घाडगे या तीन माजी आजी उपमहापौरांचे प्रभागांचे तीन तेरा वाजले आहेत. त्यांचे प्रभाव क्षेत्र असलेले भाग चार चार प्रभागात विभागले आहेत. माजी महापौर कांचन कांबळे यांचा प्रभाग आणि आरक्षण कायम राहिले असल्याने त्यांना पुन्हा मैदानात उतरण्याची संधी असेल. हाय व्होल्टेज प्रभाग असलेला खणभाग हा सांगलीच्या गावठाणाचा भाग असलेला परिसर आता प्रभाग 16 असेल. येथे कॉंग्रेसमधील मात्तबर एकाच प्रभागात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस असेल. मिरजेत माजी महापौर आणि विद्यमान गटनेते किशोर जामदार यांचा प्रभाग कायम असून त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी असेल. मिरजेतील मात्तबर मैन्नुदीन बागवान आणि इद्रीस नायकवडी या दोन माजी महापौरांचे प्रभाव क्षेत्र एकाच म्हणजे प्रभाग सहा मध्ये समाविष्ठ झाले आहे. महापालिका संघर्ष समितीच्या झेंड्याखाली मिरजेतील प्रस्थापित कारभारी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या रचनेमुळे त्यांच्या प्रयत्नांना खो बसू शकेल.

प्रभाग क्रमांक निहाय आरक्षण असे
सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018 प्रभाग आरक्षण


भाग क्रमांक व प्रभागाचे नांवलोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार)प्रभागातील प्रमुख स्थळेसध्याचे आरक्षण
प्रभाग क्र. 1 
कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट
एकूण : 28056
अ.जा. : 4091 
अ.ज. : 172
कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट, भारत सुत गिरणी अहिल्यानगर, विजयनगर, वसंतनगर, यशवंतनगर, आ
1 अ:- अनुसुचित जाती 1 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 1 क:- सर्वसाधारण महिला 1 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2 
कुपवाड गावठाण व मिरज व वानलेसवाडी रोड विस्तारीत भाग
एकूण : 25279
अ.जा. : 4802 
अ.ज. : 140
कुपवाड गावठाण, शांती कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, म
2 अ:- अनुसुचित जाती महिला 2 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 2 क:- सर्वसाधारण 2 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 3 
मिशन हॉस्पिटल, संजयनगर वसाहत
एकूण : 27985
अ.जा. : 5567 
अ.ज. : 146
मिशन हॉस्पिटल, अल्फोन्सा स्कुल, मिरज औद्योगिक वसाहत, संजयनगर वसाहत, तासगाव वेस वसाहत, लक्ष्मीनगर,
3 अ:- अनुसुचित जाती महिला 3 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 3 क:- सर्वसाधारण महिला 3 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 4 
ब्राह्मणपूरी, मालगांव रोड
एकूण : 26879
अ.जा. : 2508 
अ.ज. : 77
डॉ. पाठक हॉस्पिटल, टांकसाळ मारुती, दत्त चौक, दिंडीवेस, मालगांव रोड, पाटील हौद, मुळके प्लॉट, दत्त कॉल
4 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 4 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 4 क:- सर्वसाधारण महिला 4 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5 
मिरज किल्ला भाग, म्हैसाळ वेस
एकूण : 25883
अ.जा. : 2942 
अ.ज. : 273
मिरज हायस्कुल परिसर, मिरज किल्ला भाग, वखारभाग, पंचशिल चौक, मेंढे-बरगाले वसाहत, जवाहर हायस्कुल, वेताळ
5 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 5 ब:- सर्वसाधारण महिला 5 क:- सर्वसाधारण महिला 5 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 6 
मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा
एकूण : 24287
अ.जा. : 1336 
अ.ज. : 28
मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, जातकर वसाहत, कनवाडकर हौद, हंगड गल्ली, बोक
6 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 6 ब:- सर्वसाधारण महिला 6 क:- सर्वसाधारण महिला 6 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 
मिरज मळा, शासकीय दुध डेअरी
एकूण : 24105
अ.जा. : 4604 
अ.ज. : 188
मिरज मळा, शासकीय दुध डेअरी, हिंदु धर्मशाळा, चर्च, पॉवर हाऊस, शिवशंकर टॉकीज, मार्केट यार्ड, सांगली वे
7 अ:- अनुसुचित जाती 7 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 7 क:- सर्वसाधारण महिला 7 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 8 
वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम
एकूण : 24201
अ.जा. : 4116 
अ.ज. : 260
वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम , सैनिक नगर, विकास कॉलनी, विलिंग्डन कॉलेज, चिंतामण कॉलेज, वानलेस चे
8 अ:- अनुसुचित जाती महिला 8 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 8 क:- सर्वसाधारण 8 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 9 
सह्याद्रीनगर
एकूण : 28238
अ.जा. : 2714 
अ.ज. : 240
मार्केट यार्ड वसंत कॉलनी, गेस्ट हाऊस, सरस्वती कॉलनी, पोलीस मुख्यालय, सह्याद्रीनगर, मनिषा स्टेट बँक क
9 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 9 ब:- सर्वसाधारण महिला 9 क:- सर्वसाधारण महिला 9 ड:-सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 10 
सांगली टिंबर एरिया
एकूण : 24984
अ.जा. : 5942 
अ.ज. : 79
सांगली टिंबर एरिया, शिवाजी स्टेडीयम, उत्तर शिवाजीनगर, आमराई, सर्कीट हाऊस, मिरा हौसिंग सोसायटी, रतनशी
10 अ:- अनुसुचित जाती 10 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 10 क:- सर्वसाधारण महिला 10 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11 
चिंतामणीनगर, सांगली औद्योगिक वसाहत
एकूण : 23375
अ.जा. : 4290 
अ.ज. : 103
चिंतामणीनगर, राजनगर, रामरहिम कॉलनी, शिवछत्रपती कॉलनी, संजयनगर, साठेनगर, आदगोंडा पाटीलनगर, आयोध्यानगर
11 अ:- अनुसुचित जाती महिला 11 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 11 क:- सर्वसाधारण महिला 11 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 
कर्नाळ रोड, दत्तनगर, रामनगर
एकूण : 25598
अ.जा. : 3246 
अ.ज. : 99
मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, शिवनगर, योगीराजनगर, साईनाथनगर, रामनगर, वाल्मिकी आवास योजना, शिंदे मळा, शांती
12 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 12 ब:- सर्वसाधारण महिला 12 क:- सर्वसाधारण महिला 12 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13 
सांगलीवाडी
एकूण : 16953
अ.जा. : 1987 
अ.ज. : 143
कदमवाडी रस्ता, इस्लामपूर रोड, विठ्ठल मंदिर, मंगोबा मंदिर, बाळुमामा मंदिर, राणा प्रताप चौक, समडोळी रस
13 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 13 ब:- सर्वसाधारण महिला 13 क:- सर्वसाधारण 13 ड:-
प्रभाग क्र. 14 
गावभाग
एकूण : 27649
अ.जा. : 3823 
अ.ज. : 204
गणपती मंदिर, गणपती पेठ, गवळी गल्ली, हरभट रोड, सांगली बस स्थानक, मारुती रोड, गावभाग, सिद्धार्थ परिसर,
14 अ:- अनुसुचित जाती 14 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 14 क:- सर्वसाधारण महिला 14 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 15 
गणेशनगर
एकूण : 25816
अ.जा. : 3545 
अ.ज. : 71
आंबेडकरनगर, गणेशनगर, रमामातानगर, मिथीलानगरी, शास्त्रीनगर, अरिहंत कॉलनी, दत्त कॉलनी,
15 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 15 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 15 क:- सर्वसाधारण महिला 15 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16 
खणभाग, नळभाग
एकूण : 25959
अ.जा. : 1654 
अ.ज. : 109
खणभाग, नळभाग, हिराबाग वॉटर वर्क्स, राजवाडा परिसर, डॉ. आंबेडकर स्टेडीयम, संजोग कॉलनी, बदाम चौक, हिंदू
16 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग 16 ब:- सर्वसाधारण महिला 16 क:- सर्वसाधारण महिला 16 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 17 
महावीर उद्यान, माळी चित्रमंदिर
एकूण : 25765
अ.जा. : 1781 
अ.ज. : 199
ओव्हरसियर कॉलनी, रामचंद्रे प्लॉट, रेव्हीन्यू कॉलनी, मंगलमुर्ती कॉलनी, उदय कॉलनी, नेमिनाथनगर, वसंतदाद
17 अ:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 17 ब:- सर्वसाधारण महिला 17 क:- सर्वसाधारण 17 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 18 
शामरावनगर रोड, कोल्हापूर रोड
एकूण : 27136
अ.जा. : 5332 
अ.ज. : 391
शामरावनगर, आकाशवाणी, महसुल कॉलनी, गोविंदनगर, रुक्मिणीनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी,
18 अ:- अनुसुचित जाती महिला 18 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 18 क:- सर्वसाधारण 18 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 19 
गव्हर्मेंट कॉलनी, वालनेसवाडी दक्षिण
एकूण : 24724
अ.जा. : 4160 
अ.ज. : 258
एस. टी. कॉलनी, MSEB कॉलनी, खरे क्लब हाऊस, वालचंद कॉलेज, स्वप्ननगरी, सहयोग नगर, वृंदावन व्हिलाज, विधा
19 अ:- अनुसुचित जाती महिला 19 ब:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 19 क:- सर्वसाधारण 19 ड:-सर्वसाधारण
प्रभाग क्र. 20 
उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, कृष्णाघाट वसाहत
एकूण : 19921
अ.जा. : 4592 
अ.ज. : 316
उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, हैदरखान वसाहत, पंढरपूर चाळ, कृष्णाघाट रोड रेल्वे लाईन वसाहत, कृष्णा घाट
20 अ:- अनुसुचित जाती 20 ब:- अनुसुचित जमाती महिला 20 क:- सर्वसाधारण महिला 20 ड:

* एकूण जागा -78, कंसात महिला

* एससी (अनुसुचित जाती) -11 (6)

* अनुसूचित जमाती-1 (1)

* नागरिकांचा मागास प्रवर्ग-21 (11)

* खुल्या-45 (21)


अधिक माहितीसाठी - 
http://www.smkcelection.com/pdf/tajya_ghadyamodi/Parshist2_Final_20.03.2018.pdf

http://smkc.gov.in

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Saturday, 23 June 2018

डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेतील अनेक जाचक अटी रद्द; बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही पुरेसे

मानीव अभिहस्तांतरण  (डीम्ड कन्व्हेअन्स) आता झाले सोपे ; पूर्तता करणाऱ्या कागदपत्रांच्या यादीत कपात


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेतील अनेक जाचक अटी रद्द; बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही पुरेसे


आता या सर्व जाचक अटी रद्द करण्यात येणार असून केवळ बांधकाम सुरू झाल्याचा व पूर्णत्वाचा दाखला (सीसी) बाळगणाऱ्या इमारतींनाही सहजपणे डीम्ड कन्व्हेअन्स प्राप्त करता येणार आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी राज्य सरकारने मान्य केल्या असून त्याचा राज्यातील हजारो गृहनिर्माण संस्थांना फायदा होणार आहे. मुंबईसह ठाणे, पुणे व नागपूर यांसारख्या शहरांत जमिनीच्या मालकीवरून सोसायटी आणि विकासकांमध्ये वाद असल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. आघाडी सरकारच्या काळात डीम्ड कन्व्हेअन्सची मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि डीम्ड कन्व्हेअन्सची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचे आदेश प्रशासनास दिले. त्यानुसार ही प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी गृहनिर्माण, सहकार, महसूल, नगरविकास विभागाच्या सचिवांची एक समिती स्थापन करण्यात आली होती.या समितीने सहकार आयुक्तांनी केलेल्या सर्व शिफारसींना मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय दि.२२ जून २०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मानीव अभिहस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती-
सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभागाने मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) बाबत नवा दुरुस्तीसह शासन निर्णय दि.२२ जून २०१८ रोजी जारी केला आहे. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

मानीव अभिहस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती 


सोबत शासन निर्णय पहा- 






















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर ; 16 जुलैला निवडणूक

रामराजे नाईक निंबाळकर आणि माणिकराव ठाकरे यांचे सभापती, उपसभापती पद अडचणीत 


महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडील विधानपरिषदेतली सभापती पदावर गंडांतर येण्याची चिन्हं आहेत. दुसरीकडे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर त्यांचे उपसभापतीपदही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. भाजपचे भाई गिरकर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, रासपचे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. 


या निवडणुकीत निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचे 7 सदस्य निवृत्त होत असताना संख्याबळ पहाता दोघांचे मिळून तीनच सदस्य निवडून जाणार आहेत. त्यातच शेकापचे जयंत पाटीलही काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडेच उमेदवारी मागू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. राष्ट्रीवादीतून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची स्पष्ट शक्यता असल्याने जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत यांचा पत्ता कट होणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमध्येही विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांची वर्णी निश्‍चित आहे. शरद रणपिसे, संजय दत्त यांचा पत्ता कापला जाणार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. तसेच शिवसेनेचा आणखी एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो. भाजपचे चार ते पाच सदस्य विधानपरिषदेवर पोहचू शकतात. भाजपला महादेव जानकर यांना तिकीट द्यावे लागणार आहे. उर्वरित जागांसाठी भाजपमध्ये स्पर्धा रंगणार आहे. सध्या विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, तर त्या खालोखाल काँग्रेसचं संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजपा विधानपरिषदेत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र 16 जुलैच्या निवडणुकीनंतर भाजपा विधानपरिषदेतील सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार असल्यानं काँग्रेस सभापतीपदावर दावा सांगण्याची शक्यता आहे. सध्या विधानपरिषदेतील कमी संख्याबळामुळे सत्ताधारी भाजपाला अनेकदा विरोधकांच्या आक्रमकपणाला तोंड द्यावं लागतं. पण हे चित्र बदलण्याची संधी 16 जुलैच्या या निवडणुकीमुळे भाजपाला मिळणार आहे.


या सदस्यांचा कार्यकाळ संपणार

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.


राजकीय पक्षाप्रमाणे निवृत्त संख्या-

राष्ट्रवादी - 3
काँग्रेस - 4
भाजप - 2 (रासप -1)
शिवसेना - 1
शेकाप - 1


संख्याबळा नुसार राजकीय पक्षाप्रमाणे निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या - 

(निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता) 
राष्ट्रवादी + काँग्रेस - 3
भाजप - 5 (रासप -1)
शिवसेना - 2
शेकाप - 1 (राष्ट्रवादी+काँग्रेस व इतरांनी पाठींबा दिला तर)


विधानपरिषद सध्याचे संख्याबळ-

राष्ट्रवादी काँग्रेस - 21
काँग्रेस - 19
भाजप - 18
शिवसेना - 9
जेडीयू - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
पीपल्स रिपब्लिकन पक्ष - 1


विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम-

28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून, 6 जुलैला छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत.

28 जूनला नॉटिफिकेशन
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : 5 जुलै
अर्जाची पडताळणी : 6 जुलै
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 जुलै
मतदान : 16 जुलै (स. 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
मतमोजणी : 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेनंतर)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



Tuesday, 19 June 2018

Pune: A brief history of the two pagadis

Pune: A brief history of the two pagadis



Tuesday, June 19, 2018




Historically, the Puneri pagadi, which is associated with the erstwhile Peshwas, has been identified with the “elite and educated classes”.

NCP chief Sharad Pawar’s decision to replace the Puneri pagadi with the Phule pagadi during felicitation functions of the party has once again brought in sharp focus the deep emotions both the headgears evoke.
Historically, the Puneri pagadi, which is associated with the erstwhile Peshwas, has been identified with the “elite and educated classes”. The pagadi, which has got a GI tag, was also worn by crucial figures in the history of India’s freedom struggle, such as Gopal Krishna Gokhale, Lokmanya Balgangadhar Tilak and Justice Mahadev Govind Ranade, among others. The Phule pagadi was considered the traditional headgear for the masses and was worn by the family members of Mahatma Jyotiba Phule, said historian Hari Narke. “Some years ago, Jayantrao Tilak, a descendant of the Lokmanya, had written an article about the differences in the pagadis worn by Tilak, Justice Ranade and others,” he said.
Narke pointed out how Pawar, in the past, had “gracefully accepted” the Puneri pagadi. He also questioned the response by certain sections, which had called Pawar’s directive “an insult to Pune”. “The question is, why use the adjective Puneri only for a certain class of pagadi? Was Phule not from Pune, and did he not play an important role in shaping the city,” he asked.
It is the second time Pawar has been accused of indulging in caste politics. Earlier, he had commented on the nomination of Sambhaji Raje, a descendant of Chhatrapati Shivaji, to Rajya Sabha. Pawar had said in the past, Chhatrapati Shivaji used to appoint Peshwas (Brahmin premiers), while now it was the other way round.
Political analyst Chandrakant Bhujbal said Pawar’s decision to use the Phule pagadi over the Puneri pagadi has set the ball rolling for the 2019 polls. “They have already been raising the issue of the BJP government’s unfulfilled promises… this is another signal about the way they plan to attack the Devendra Fadnavis-led government,” he said.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


कांग्रेस 11 राज्यांमध्ये 21 प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार

काँग्रेस प्रथमच फक्त 250 जागा लढवणार !

काँग्रेसकडून स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभेच्या सर्वात कमी जागा (250) लढवल्या जाण्याची शक्यता आहे. महाआघाडीच्या माध्यमातून मोदींना रोखण्यासाठी असे केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने ब्लू प्रिंट तयार केली आहे. त्यावर स्थानिक पातळीवरील रिपोर्ट आल्यानंतर अँटनी कमिटी आणि काँग्रेस अध्यक्षांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कांग्रेसच्या रणनितीनुसार गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 44 जागा ते कोणालाही देणार नाहीत. इतर जागांवर ते आघाडी करतील. पण ज्या 224 जागांवर काँग्रेस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, त्या जागा लढवण्यासाठी जोर लावतील. त्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात सारख्या राज्यांचा समावेश आहे. याठिकाणी भाजपविरोधात काँग्रेसच मोठा पक्ष आहे. जर आघाडीत अडचणी आल्या तर प्रादेशिक पक्षांना विधानसभेत मोठा वाटा देऊन लोकसभा 2019 साठीचा करार ठरू शकतो. काँग्रेस याच महिन्यात राज्यांमध्ये समित्या स्थापन करून प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडीच्या चर्चा करणार आहे. 11 अशी राज्ये आहेत, ज्याठिकाणी काँग्रेस लहान मोठ्या 21 प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार आहे.ज्याठिकाणी प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत आणि राज्यात प्रमुख आहेत, त्याठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय घेण्यासाठी एके अँटनी कमिटी आहे. राज्यातील स्थितीनुसार मजबूत पर्याय कसा तयार होईल याचा विचार करून निर्णय घेतला जाईल.

विविध राज्यांमधील युती/आघाडीची स्थिती-

* पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. तृणमूल तर साथ देइलच. पण 27.59% मते असणाऱ्या डाव्यांनीही साथ दिली तर अडचण होईल. 
*  कर्नाटकात सध्या काँग्रेस-जेडीएस बरोबर आहेत. बसपही त्यांच्यासोबत आहे. 
*  आंध्र-तेलंगणामध्ये टीडीपी सध्या भाजपतून बाहेर आहे. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसची मते महाआघाडीत समाविष्ट केली आहेत. 
*  आसममध्ये काँग्रेसने एआईयूडीएफशी आघाडी केली तरच टिकाव लागू शकेल. 
*  महाराष्ट्रात भाजप-शिवसेना वेगळे झाले तरच महाआघाडीची शक्यता निर्माण होऊ शकते. 
*  तमिळनाडूमध्ये भाजप-अण्णा द्रमुकबरोबर असल्याचे दिसते पण अण्णा द्रमुक मध्येच फूट पडलेली आहे. त्यामुळे डीएमके आणि इतर पक्षांना फायदा होऊ शकतो. 
*  जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, एनसी, बीएसपीची आघाडीही भाजप-पीडीपीला आव्हान देऊ शकेल असे वाटत नाही. 
*  ओडिशात सत्ताधारी बीजू जनता दल कोणाच्याही बाजुने नाही. भाजप त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इथे फायदा होऊ शकतो. सध्या चित्र स्पष्ट नाही.

11 प्रमुख राज्यांतील 374 जागांचे ‘गणित’

राज्यजागाएनडीएमहाआघाडीआघाडी कोणाला
उत्तर प्रदेश8042.65%50.51%महाआघाडी
प. बंगाल4217.02%49.37%महाआघाडी
कर्नाटक2843.37%53.08%महाआघाडी
आंध्र-तेलंगणा428.52%56.57%*महाआघाडी
अासाम1442.94%44.88%महाआघाडी
बिहार4051.52%32.41%एनडीए
झारखंड1444.48%37.91%एनडीए
महाराष्ट्र4848.38%38.65%एनडीए
तमिळनाडू3950.48%33.47%एनडीए
जम्मू-कश्मीर653.37%42.14%एनडीए
ओडिशा2121.88%27.41%स्पष्ट नाही

(एनडीए आणि महाआघाडीच्या मतांची टक्केवारी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीनुसार आहे.)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 


Saturday, 16 June 2018

पुणे जिल्हयातील भोर नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतींचे १५ जुलैला मतदान

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 15 जुलै रोजी मतदान




पुणे जिल्हयातील भोर या नगरपरिषदेची मुदत संपल्याने तर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा आणि  मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायतीसाठी तसेच विविध ११ नगरपरिषदा, नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या १५ जुलै  रोजी मतदान होणार आहे.१९ ते २५ जून ,नामनिर्देशनपत्रांची छाननी- २६ जून  ,अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- २ जुलै , मतदानाचा दिनांक- १५ जुलै ,मतमोजणी १६ जुलै रोजी करण्यात येईल.
         

 निवडणूक जाहीर झालेल्यांमध्ये भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच विविध 11 नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 15 जुलै 2018 रोजी मतदान; तर 16 जुलै 2018 रोजी मतमोजणी होणार आहे.  भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- 6ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10ब, वाई (जि. सातारा)- 5अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2, मोहाडी (जि. भंडारा)- 12 आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.

निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·        नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 19 ते 25 जून 2018
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 26 जून 2018
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 जुलै 2018
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- निकालाच्या तिसऱ्या                      दिवसापर्यंत
·        मतदानाचा दिनांक- 15 जुलै 2018
·        मतमोजणीचा दिनांक- 16 जुलै 2018


भोर नगरपालिका इच्छुकांची मोर्चेबांधणी

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप शिवसेना अशी चौरंगी लढत होणार असून काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी, तर राष्ट्रवादी व भाजपा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.सन २००३मध्ये प्रभाग पद्धत सुरू झाली. त्या वेळी भोरमध्ये १७ प्रभाग होते. तर, २००८ व २०१३मध्ये ४ जागांचा एक असे ३ प्रभाग व ५ जागांचा एक असे एकूण ४ प्रभाग होते. या वेळी या रचनेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. २ जागांचा एक असे ७ प्रभाग, तर ३ जागांचा एक असे एकूण ८ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभागरचना व आरक्षण जाहीर झाले आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. एकूण ९ महिला व नगराध्यक्ष अशा १० महिला निवडून येणार आहेत. काँग्रेसकडे नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ७२ जणांनी अर्ज घेऊन गेले आहेत. तर, इतर पक्षांनीही आपापल्या उमेदवार निवडीची चाचपणी सुरू केली आहे. अनेकांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच गाठीभेटी तसेच थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भोर नगरपालिकेत १९७४मध्ये दिवंगत माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ, तर २००३ मध्ये चंद्रकांत सागळे हे थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आले होते. भोर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने काँग्रेसकडून माजी उपनगराध्यक्ष पै. रामचंद्र आवारे यांच्या पत्नी निर्मला आवारे, नगरसेवक संजय जगताप यांच्या पत्नी नूतन जगताप, माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. जयश्री शिंदे, नगरसेविका डॉ. विजयालक्ष्मी पाठक यांच्यात रस्सीखेच आहे. राष्ट्रवादीकडून नगरसेवक यशवंत डाळ यांच्या पत्नी शारदा डाळ यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. तर, भाजपात नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगराध्यक्षा दीपाली सतीश शेटे यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेच्या वतीने स्वप्ना देशपांडे इच्छुक आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. मागील पाच वर्षांत भोर शहरात आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून शहरातील काँक्रीट रस्ते, गटारे, पाईपलाईन, पूल, अग्निशमन यंत्रणा, नगरपालिका इमारत, स्मशानभूमी, घंटागाड्या, घनकचरा व्यवस्थापन यासारखी आदी कामे झाली. यामुळे शहरातील काँग्रेस जोरात आहे. तर, बाकीचे आपले अस्तित्व वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सन १९५५ ते १९६७ या कालावधीत लाल निशान पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७०मध्ये काँगेसकडे सत्ता आली. तर, १९७४ ते १९९० पर्यंत दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती. तालुक्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सत्ता होती. १९९०नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे गेली होती. २०१३च्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १४ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना-भाजपाला एकही जागा मिळाली नाही. या वेळी भाजपा-सेना सत्तेत असून त्या माध्यमातून वातावरण तयार करून काही प्रमाणात जागा मिळविण्याबरोबरच नगराध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न करतील अशी राजकीय सद्यस्थिती आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने बॅनर, पोस्टर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून भोर शहरात निवडणूकमय वातावरण तयार झाले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Tuesday, 12 June 2018

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस विजयी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांना धक्का!

लातूर-बीडमधून भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी, जगदाळे पराभूत


उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी तर राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे पराभूत झाले. भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी झाले. त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसला व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना धक्का बसला.
    विधान परिषदेच्या उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली. सुरेश धस यांना 527 मते तर अशोक जगदाळे यांना 451 मते मिळाली. सांकेतिक आकडे लिहल्याने तब्बल 25 मते बाद ठरविण्यात आली आहेत. दरम्यान, अशोक जगदाळेंच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडे यांनी मनोबल वाढणार असून, पक्षातही त्यांचे वजन वाढणार हे स्पष्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडे उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 1005 पैकी 527 मते असूनही अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मात्र, याबाबत निकालाचे कोणतेही अपडेट दिले जात नव्हते. केवळ 1005 मतदार असल्याने एकूण पाच टेबलावर मतमोजणी प्रत्येकी 200 अशी मतमोजणी झाली. उस्मानाबादेत मतमोजणीदरम्यान उमेदवार अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाद मतावरून दोघांमध्ये वाद झाला.मतदानानंतर 21 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. बीडमधील 10 अपात्र नगरसेवकांसह सर्वच मतदारांची मते एकत्रित करून मोजणी करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी सोमवारी दिले होते. खंडपीठाने निवडणूक विभागास मतमोजणी तत्काळ घेण्यास सांगितले, त्यावर निवडणूक आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज मतमोजणीचा निर्णय घेतला. 21 मे रोजी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस व राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यातच चुरस होती. मात्र, सुरेश धस यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेश खंडपीठाने दिले होते.

अंतिम निकाल-

सुरेश धस - 527
अशोक जगदाळे- 451
नोटा- 1
बाद मते- 25
एकूण- 1003 मतदान.
भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी.



निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

- मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई
- रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की
- राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मिळाला मतदानाचा अधिकार
- काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका
- बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपला साथ


बाप बाप होता है: सुरेश धस 

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक प्राधिकारी संस्था विधान परिषद मतदारसंघात 78 मतांनी विजय मिळवल्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांचे नाव न घेता त्यांनी "बाप बाप होता है' असे म्हटले आहे.


हा विजय ऐतिहासिक-पंकजा मुंडें

बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाने मला खूप आनंद झालाय, असं म्हणत आपला आनंद व्यक्त करताना 'हा ऐतिहासिक विजय आहे', असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. विरोधकांमध्ये सुरुवातीपासून सुसूत्रता नव्हती याचा फटका त्यांना बसला. राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा त्यांच्याकडून गाठली गेली. आमच्या रमेश अप्पा कराड यांना राष्ट्रवादीने फोडून नेलं पण ऐन वेळीस राष्ट्रवादीतून त्यांच्यावर जो दबाव आणला त्यामुळे त्यांनी माघार घेतली. परभणीचे विद्यमान आमदार सोडून दुराणी यांना डावलल्याने विरोधकांचा पराभव झाला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


कुठे चूक झाली ते पाहू-धनंजय मुंडें

या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असे धनंजय मुंडे यांनी सांगत, कुठे चूक झाली हे पाहू असे म्हटले आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे