Tuesday 12 June 2018

उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस विजयी ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांना धक्का!

लातूर-बीडमधून भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी, जगदाळे पराभूत


उस्मानाबाद बीड लातूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस विजयी तर राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे पराभूत झाले. भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी झाले. त्यामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसला व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंना धक्का बसला.
    विधान परिषदेच्या उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव करत प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी मारली. सुरेश धस यांना 527 मते तर अशोक जगदाळे यांना 451 मते मिळाली. सांकेतिक आकडे लिहल्याने तब्बल 25 मते बाद ठरविण्यात आली आहेत. दरम्यान, अशोक जगदाळेंच्या पराभवासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. या विजयामुळे पंकजा मुंडे यांनी मनोबल वाढणार असून, पक्षातही त्यांचे वजन वाढणार हे स्पष्ट आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडे उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 1005 पैकी 527 मते असूनही अशोक जगदाळे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. उस्मानाबाद- बीड- लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मात्र, याबाबत निकालाचे कोणतेही अपडेट दिले जात नव्हते. केवळ 1005 मतदार असल्याने एकूण पाच टेबलावर मतमोजणी प्रत्येकी 200 अशी मतमोजणी झाली. उस्मानाबादेत मतमोजणीदरम्यान उमेदवार अशोक जगदाळे आणि सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाद मतावरून दोघांमध्ये वाद झाला.मतदानानंतर 21 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज विधान परिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. बीडमधील 10 अपात्र नगरसेवकांसह सर्वच मतदारांची मते एकत्रित करून मोजणी करावी, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला व न्या. सुनील कोतवाल यांनी सोमवारी दिले होते. खंडपीठाने निवडणूक विभागास मतमोजणी तत्काळ घेण्यास सांगितले, त्यावर निवडणूक आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी आज मतमोजणीचा निर्णय घेतला. 21 मे रोजी झालेल्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस व राष्ट्रवादी पुरस्कृत अशोक जगदाळे यांच्यातच चुरस होती. मात्र, सुरेश धस यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेश खंडपीठाने दिले होते.

अंतिम निकाल-

सुरेश धस - 527
अशोक जगदाळे- 451
नोटा- 1
बाद मते- 25
एकूण- 1003 मतदान.
भाजपचे सुरेश धस 76 मतांनी विजयी.



निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे

- मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई
- रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की
- राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मिळाला मतदानाचा अधिकार
- काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका
- बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपला साथ


बाप बाप होता है: सुरेश धस 

उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक प्राधिकारी संस्था विधान परिषद मतदारसंघात 78 मतांनी विजय मिळवल्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांचे नाव न घेता त्यांनी "बाप बाप होता है' असे म्हटले आहे.


हा विजय ऐतिहासिक-पंकजा मुंडें

बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालाने मला खूप आनंद झालाय, असं म्हणत आपला आनंद व्यक्त करताना 'हा ऐतिहासिक विजय आहे', असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे. विरोधकांमध्ये सुरुवातीपासून सुसूत्रता नव्हती याचा फटका त्यांना बसला. राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा त्यांच्याकडून गाठली गेली. आमच्या रमेश अप्पा कराड यांना राष्ट्रवादीने फोडून नेलं पण ऐन वेळीस राष्ट्रवादीतून त्यांच्यावर जो दबाव आणला त्यामुळे त्यांनी माघार घेतली. परभणीचे विद्यमान आमदार सोडून दुराणी यांना डावलल्याने विरोधकांचा पराभव झाला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.


कुठे चूक झाली ते पाहू-धनंजय मुंडें

या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असे धनंजय मुंडे यांनी सांगत, कुठे चूक झाली हे पाहू असे म्हटले आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.