Thursday 28 June 2018

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा,पोतनीस विजयी ; मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा, विलास पोतनीस विजयी;मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी 


विधान परिषद निवडणुकीच्या चारही जागांचे निकाल जाहीर

विधान परिषदेच्या चारही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा 2988 मतांनी पराभव केला. 
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. मुंबई पदवीधर मतदार संघात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे विलास पोतनीस मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार अ‍ॅड. अमित मेहता यांचा पराभव केला. तर मुंबई शिक्षक मतदार संघात शिक्षक भारतीच्या कपिल पाटील यांनी तिसर्‍यांदा विजय मिळवित हॅट्ट्रिक साधली.कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले त्‍यांनी शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभ केला तर, नाशिक शिक्षक मतदार संघातही शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 25 जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. मुंबईत पदवीधर मतदार संघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय संपादन केला. भाजपने अ‍ॅड. अमित मेहता यांना उमेदवारी देत आपली ताकद निवडणुकीत झोकून दिली होती. मात्र, शिवसेनेने या मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. दुसर्‍या फेरीअखेर विलास पोतनीस यांना 19 हजार 354, तर अमित मेहता यांना 7  हजार 792 मते मिळाली होती.
मुंबई शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी हॅट्ट्रिक साधली. विजयासाठी पहिल्या पसंतीची 3 हजार 951 मते हवी होती. मात्र, कपिल पाटील यांना 3 हजार 751 मते मिळाली. मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पसंतीक्रमाची मते मोजण्यात आली. त्यामध्ये कपिल पाटील यांचा विजय झाला. या विजयामुळे कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. कोकण पदवीधर मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. 
सुमारे 1 लाख 4 हजार मतदारांपैकी 77 हजार मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. तिसर्‍या फेरीत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी 21 हजार 528 मते घेत शिवसेनेच्या संजय मोरे यांच्यावर विजयी आघाडी घेतली. मोरे यांना 18 हजार 540 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनीही 10 हजार 381 मते घेतली होती. नाशिक शिक्षक मतदार संघातही शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असलेले संदीप बेडसे दुसर्‍या स्थानी होते.

मुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते १९३५४) 
मुंबई शिक्षक –विजयी उमेदवार – कपिल पाटील (मिळालेली मते 4050) 
कोकण पदवीधर –विजयी उमेदवार – निरंजन डावखरे (मिळालेली मते ३२८३१)  
दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे 
मुंबई पदवीधर – अमितकुमार मेहता (मिळालेली मते ७७९२)
मुंबई शिक्षक – शिवाजी शेंडगे (मिळालेली मते १७५४ )
कोकण पदवीधर – संजय मोरे (मिळालेली मते २४७०४ )
तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार व त्यांची मते खालीलप्रमाणे
मुंबई पदवीधर – जालिंदर सरोदे (मिळालेली मते २४१४ )
मुंबई शिक्षक – अनिल देशमुख (मिळालेली मते ११४७)
कोकण पदवीधर – नजीब मुल्ला (मिळालेली मते १४८२१)

मुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी 72.35 आहे.या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात, यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात. मुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपिल पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली. यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना विजयी घोषित केले.

निवडणूक प्रक्रिया-

मुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते  त्याची टक्केवारी 72.35 आहे.या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो. तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो, अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात. यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात.मुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपिल पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली.कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली.तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली.यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.