Tuesday, 1 October 2019

भाजप-शिवसेना महायुतीत जागावाटपात बेबनाव;3 विद्यमान मंत्री व 3 माजी मंत्र्यांसह 17 विद्यमान आमदारांची भाजपने उमेदवारी रोखली

3 विद्यमान मंत्री व 3 माजी मंत्र्यांसह 17 विद्यमान आमदारांची भाजपने उमेदवारी रोखली; पहिल्या यादीत स्थान नाही

क्र.
स.क्र
मतदारसंघ
विद्यमान भाजप आमदार
तपशील
1
२०
मुक्ताईनगर
 एकनाथ खडसे
जेष्ठ नेते व माजी मंत्री असूनही जाहीर नाही
2
४१
मेळघाट
 प्रभूदास भिलावेकर
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
3
४८
काटोल
 डॉ.आशीष देशमुख
राजीनामा देऊन पुन्हा पक्षांतर कॉंग्रेसमध्ये
4
५८
कामठी
 चंद्रशेखर बावणकुळे
मंत्री असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
5
५९
रामटेक
 व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
6
६०
तुमसर
 चरण वाघमारे
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
7
६१
भंडारा
 रामचंद्र अवसारे
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
8
६२
साकोली
 बाळा काशिवार
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
9
६९
अहेरी
 अंबरिश अत्राम
माजी मंत्री असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
10
८२
उमरखेड
 राजेंद्र नजरधने
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
11
१२३
नाशिक पूर्व
 बाळासाहेब सानम
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
12
१५२
बोरिवली
 विनोद तावडे
मंत्री असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
13
१६४
वर्सोवा
भारती लवेकर
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
14
१७०
घाटकोपर पूर्व
 प्रकाश मोहता
माजी मंत्री असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
15
१८७
कुलाबा
 राज पुरोहित
माजी शहर मुबई अध्यक्ष
16
२०४
मावळ
 बाळा भेगडे
मंत्री असूनही पहिल्या यादीत स्थान नाही
17
२३२
केज
 संगिता ठोंबरे
नमिता मुंदडा पक्ष प्रवेश
18
२३७
उदगीर
 सुधाकर भालेराव
विद्यमान आमदार असूनही पहिल्या यादीत स्थान नाही

या 39 मतदारसंघातील काही जागांवरील बंडखोरीमुळे गुपचूप उमेदवारी देणार तर काही नंतर जाहीर करणार

क्र.
संघ क्र.
मतदारसंघ
1
साक्री
2
शिरपूर
3
२०
मुक्ताईनगर
4
३६
धामणगांव रेल्वे
5
४१
मेळघाट
6
४८
काटोल
7
५८
कामठी
8
५९
रामटेक
9
६०
तुमसर
10
६१
भंडारा
11
६२
साकोली
12
६५
गोंदिया
13
६९
अहेरी
14
८१
पुसद
15
८२
उमरखेड
16
८३
किनवट
17
८९
नायगाव
18
९५
जिंतूर
19
९८
पाथरी
20
११४
मालेगाव मध्य
21
११६
बागलाण
22
१२३
नाशिक पूर्व
23
१४१
उल्हासनगर
24
१५२
बोरिवली
25
१६२
मालाड पश्चिम
26
१६४
वर्सोवा
27
१७०
घाटकोपर पूर्व
28
१८७
कुलाबा
29
१९९
दौंड
30
२०१
बारामती
31
२०४
मावळ
32
२३२
केज
33
२३५
लातूर शहर
34
२३७
उदगीर
35
२५०
अक्कलकोट
36
२५२
पंढरपूर
37
२५४
माळशिरस
38
२५५
फलटण
39
२६८
कणकवली
भाजप-शिवसेना महायुतीत जागावाटपात बेबनाव दिसून येत आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. इचलकरंजी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा दोघांनीही केला उमेदवार जाहीर केली असून यामध्ये शिवसेनेकडून सुजित मिनचेकर आणि भाजपाकडून सुरेश हाळवणकर यांचा समावेश आहे. यावरून युतीत जागावाटपाचा घोळ समोर आलेला आहे. मात्र ही प्रिंटींग दोष असल्याचे सांगितले जात आहे. सुजित मिनचेकर यांचा हातकनंगले मतदारसंघ आहे. सदर मुद्रणदोष असण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या या यादीसोबतच शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना 124 जागांवर लढणार आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर भाजपने आपल्या 125 जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर 3 विद्यमान मंत्री व 3 माजी मंत्र्यांसह 17 विद्यमान आमदारांची भाजपने उमेदवारी रोखली; पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा समावेश नाही. तसंच नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या गणेश नाईक यांना उमेदवारी न देता, बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. पहिल्या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व विद्यमान मंत्री विनोद तावडे यांचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचं नावही पहिल्या यादीतून वगळण्यात आले आहे. तर, अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली. पण, यात पक्षाचे दिग्दज नेते एकनाथ खडसेंचे नाव यादीत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाव न आल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. खडसे म्हणाले की यादीत नाव असो की नसो, याबाबत चिंता नाही. पुढील यादीत माझे नाव असेलही, मी पक्षासाठी 42 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले व यापुढेही पक्षात राहून काम करीत राहणार. पहिल्या यादीत माझे नाव नाही, यात माझा काय गुन्हा? माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे. यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा प्रश्न विचारला. दरम्यान, खडसे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात एक भाजपतर्फे तर एक अपक्ष अर्ज होता. खडसेंचे विरोधक भाजपच्या शक्तिप्रदर्शनात एकीकडे खडेसंनी उमेदवारी यादीत नाव नसतानाही एकट्याने जाऊन अर्ज दाखल केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर काही वेळात शिवसेनेने देखील पहिली उमेदवारी जाहीर केली. 70 जणांच्या यादीमध्ये पक्षांतर करून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार आणि जयदत्त क्षीरसागर यांनाही तिकीट देण्यात आले आहे. यात आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच नांदेड दक्षिण मधून राजश्री पाटील आणि औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैस्वाल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तिन्ही तिन्ही विधानसभेची उमेदवारी भाजप शिवसेना कडून जाहीर करण्यात आली आहे. परंतु, मावळच्या जागेवर नाराजी टाळण्यासाठी अजुनही सस्पेंस आहे. विद्यमान आमदार चिंचवडमधून लक्ष्मण जगताप, भोसरीतून महेश लांडगे तर शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांना पिंपरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मावळची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. स्वतः राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यात चढाओढ सुरू असल्यामुळे बाळा भेगडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही असे सांगितले जात आहे. कसबा मतदारसंघातून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन यापूर्वी नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. त्याचबरोबर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच अपेक्षेप्रमाणे साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसेल यांना, तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्याचं जाहीर केल्यानंतर शिवेसना-भाजपाचा युतीचा फॉर्म्यूलाही अखेर जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून आज अधिकृतपणे १२५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी आपण कोणत्या जागांवर लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. नव्या फॉर्म्युलानुसार, शिवसेना १२४ जागांवर लढणार आहे. तर दोन जागा त्यांना विधान परिषदेवर अधिकच्या दिल्या जातील. तर दुसरीकडे भाजपा आणि मित्रपक्ष १६४ जागांवर लढणार असल्याचं नक्की झाले आहे. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघ भाजपाने आपल्याकडे राखले आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला एकही मतदारसंघ आलेला नाही त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुण्यात आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे दिसत आहे. भाजपाने कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट, कसबा, वडगाव शेरी, पर्वती, हडपसर, खडकवासला या आठही मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पुण्यातील एकाही जागेसाठी शिवसेना नेतृत्वाकडून फारसा आग्रह केला गेला नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी दिसत आहे. सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ असलेल्या कोथरूडमधून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमधुन पाटील यांच्या उमेदवारीला काहीसा विरोध दिसत आहे. बाहेरचा उमेदवार नको अशी चर्चा सुरू आहे. तर भाजपाचा पारंपारिक मतदारसंघ कसबा येथून विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आलेली आहे. या मतदारसंघातून या अगोदर नुकतेच खासदार झालेले गिरीश बापट पाच वेळा निवडून आले आहेत. तर कॅन्टोंमेंट मतदारसंघातून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना वगळून त्यांचे बंधु सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हडपसरचे विद्यमान आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर येथून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्दार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडगाव शेरी हा मतदासंघ देखील भाजपाने स्वतःकडे राखला असून या ठिकाणी जगदीश मुळीक, तर खडकवासला येथून भिमराव तापकीर  व पर्वतीतून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
शिवसेनेच्या वाट्याला आलेले मतदारसंघ –
अक्कलकुवा (अज), धुळे शहर, चोपडा (अज), जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, बुलढाणा, सिंदखेडराजा, मेहकर (अजा), बाळापूर, रिसोड, बडनेरा, तिवसा, अचलपूर, देवळी, ब्रह्मपूरी, वरोरा, दिग्रस, हदगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, देगलूर (अजा), वसमत, कळमनुरी, परभणी, गंगाखेड, घनसावंगी, जालना, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम (अजा), पैठण, वैजापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, कळवण (अज), येवला, सिन्नर, निफाड, दिंडोरी (अज), देवळाली (अजा), इगतपूरी (अज), पालघर (अज), बोईसर (अज), नालासोपारा, वसई, भिंवडी ग्रामीण (अज), शहापूर (अज), भिंवडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ (अजा), कल्याण ग्रामीण, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, मुंब्रा-कळवा, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चांदिवली, मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्ती नगर, चेंबूर, कुर्ला (अजा), कलीना, वांद्रे पूर्व, धारावी (अजा), माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, कर्जत, उरण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, पुरंदर, भोर, पिंपरी (अजा), संगमनेर, श्रीरामपूर (अजा), पारनेर, अहमदनगर शहर, बीड, लातूर ग्रामीण, उमरगा (अजा), उस्मानाबाद, परांडा, करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ (अजा), सोलापूर शहर मध्य, सांगोले, कोरेगाव, कराड उत्तर, पाटण, दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, सावंतवाडी, चंदगड, राधानगरी, कागल, करवीर, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले (अजा), शिरोळ, इस्लामपूर, पळूस-कडेगाव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ हे मतदारसंघ शिवसेनेकडे आले आहे. 

भाजपची (125 जागांची) उमेदवार यादी - 

Sl.
No.
Name of Assembly
Name of Candidate
1.
52
Nagpur South West
Sri Devendra Fadanvis
2.
210
Kothrud
Sri Chandrakant Dada Patil
3.
2
Shahada (ST)
Sri Rajesh Udesingh Padvi
4.
3
Nandurbar (ST)
Dr. Vijaykumar Gavit
5.
4
Nawapur (ST)
Sri Bharat Manikrao Gavit
6.
6
Dhule Rural
Smt. Dnyanjyoti Manohar Badane Patil
7.
8
Sindkheda
Sri Jaykumar Rawal
8.
11
Raver
Sri Haribhau Jawale
9.
12
Bhusawal (SC)
Sri Sanjay Sawkare
10.
13
Jalgaon City
Sri Suresh (Rajumama) Bhole
11.
15
Amalner
Sri Shirish Chaudhari
12.
17
Chalisgaon
Sri Mangesh Ramesh Chavhan
13.
19
Jamner
Sri Girish Mahajan
14.
21
Malkapur
Sri Chainsukh Sancheti
15.
23
Chikhli
Smt. Shweta Mahale
16.
26
Khamgaon
Sri Aakash Phundkar
17.
27
Jalgaon (Jamod)
Dr Sanjay Kute
18.
28
Akot
Sri Prakash Bharsakale
19.
30
Akola West
Sri Goverdhan Sharma
20.
31
Akola East
Sri Randhir Sawarkar
21.
32
Murtijapur (SC)
Sri Harish Pimple
22.
34
Washim (SC)
Sri Lakhan Malik
23.
35
Karanja
Dr. Rajendra Patni
24.
38
Amravati
Dr. Sunil Deshmukh
25.
40
Daryapur (SC)
Sri Ramesh Bundile
26.
43
Morshi
Dr. Anil Bonde
27.
44
Arvi
Sri Dadarao Keche
28.
46
Hinganghat
Sri Samir Kunawar
29.
47
Wardha
Dr. Pankaj Bhoyar
30.
49
Savner
Dr. Rajiv Potdar
31.
50
Hingna
Sri Samir Meghe
32.
51
Umred (SC)
Sri Sudhir Parwe
33.
53
Nagpur South
Sri Mohan Mate
34.
54
Nagpur East
Sri Krushna Khopde
35.
55
Nagpur Central
Sri Vikas Shankarrao Kumbhare
36.
56
Nagpur West
Sri Sudhakar Deshmukh
37.
57
Nagpur North (SC)
Dr. Milind Mane
38.
63
Arjuni-Morgaon (SC)
Sri Rajkumar Badole
39.
64
Tirora
Sri Vijay Rahangadale
40.
66
Amgaon (ST)
Sri Sanjay Puram
41.
67
Armori (ST)
Sri Krushna D. Gajbhe
42.
68
Gadchiroli (ST)
Dr. Devrao Holi
43.
70
Rajura
Sri Sanjay Dhote
44.
71
Chandrapur (SC)
Sri Nana Shyamkule
45.
72
Ballarpur
Sri Sudhir Mungantiwar
46.
74
Chimur
Sri Kirtikumar (Bunty)  Bhangdiya
47.
76
Wani
Sri Sanjiv Reddy Bodkurwar
48.
77
Ralegaon
Sri Ashok Ramji Uikey
49.
78
Yavatmal
Sri Madan Madhukar Yerawar
50.
80
Arni (ST)
Dr. Sandip Prabhakar Dhurve
51.
85
Bhokar
Sri Bapusaheb Gorthekar
52.
91
Mukhed
Dr. Tushar Rathod
53.
94
Hingoli
Sri Tanaji Mutkule
54.
99
Partur
Sri Babanrao Dattatray Lonikar
55.
102
Badnapur (SC)
Sri Narayan Kuche
56.
103
Bhokardan
Sri Santosh Raosaheb Patil Danve
57.
106
Phulambri
Sri Haribhau Bagde
58.
109
Aurangabad East
Sri Atul Sawe
59.
111
Gangapur
Sri Prashant Bam
60.
118
Chandvad
Dr. Rahul Aher
61.
124
Nashik Central
Sau Devyani Farande
62.
125
Nashik West
Sau Seema Hire
63.
128
Dahanu (ST)
Sri Paskal Dhanare
64.
129
Vikramgad (ST)
Dr. Hemant Sawara
65.
136
Bhiwandi West
Sri Mahesh Chaugule
66.
139
Murbad
Sri Kisan Kathore
67.
142
Kalyan East
Sri Ganpat Kalu Gayakwad
68.
143
Dombivali
Sri Ravindra Chavhan
69.
145
Mira Bhayandar
Sri Narendra Mehata
70.
148
Thane
Sri Sanjay Kelkar
71.
150
Airoli
Sri Sandip Naik
72.
151
Belapur
Smt. Manda Mhatre
73.
153
Dahisar
Smt. Manisha Chaudhari
74.
155
Mulund
Sri Mihir Kotecha
75.
160
Kandivali East
Sri Atul Bhatkhalkar
76.
161
Charkop
Sri Yogesh Sagar
77.
163
Goregaon
Smt. Vidya Thakur
78.
165
Andheri West
Sri Amit Satam
79.
167
Vile Parle
Adv. Parag Alavani
80.
169
Ghatkopar West
Sri Ram Kadam
81.
177
Vandre West
Adv. Ashish Shelar
82.
179
Sion Koliwada
Capt. Tamil Selwan
83.
180
Wadala
Sri Kalidas Kolambkar
84.
185
Malabar Hill
Sri Mangalprabhat Lodha
85.
188
Panvel
Sri Prashant Thakur
86.
191
Pen
Sri Ravisheth Patil
87.
198
Shirur
Sri Baburao Kashinath Pacharne
88.
200
Indapur
Sri Harshwardhan Patil
89.
205
Chinchwad
Sri Laxman Jagtap
90.
207
Bhosari
Sri Mahesh (Dada) Kisan Landge
91.
208
Vadgaol Sheri
Sri Jagdish Mulik
92.
209
Shivajinagar
Sri Sidharth Padmakar Shirole
93.
211
Khadakwasala
Sri Bhimarao Tapkir
94.
212
Parvati
Smt. Madhuri Misal
95.
213
Hadapsar
Sri Yogesh Tilekar
96.
214
Pune Cantonment (SC)
Sri Sunil Kamble
97.
215
Kasba Peth
Sau Mukta Tilak
98.
216
Akole (ST)
Sri Vaibhav Pichad
99.
218
Shirdi
Sri Radhakrushna Vikhe Patil
100.
219
Kopargaon
Smt. Snehalata  Kolhe
101.
221
Nevasa
Sri Balasaheb Murkute
102.
222
Shevgaon
Smt. Monika Rajale
103.
223
Rahuri
Sri Shivajirao Kardile
104.
226
Shrigonda
Sri Babanrao Pachpute
105.
227
Karjat Jamkhed
Prof. Ram Shinde
106.
228
Georai
Adv Laxman Pawar
107.
229
Majalgaon
Sri Ramesh Adaskar
108.
231
Ashti
Sri Bhimrao Dhonde
109.
233
Parli
Sau Pankaja Gopinathrao Munde - Palwe
110.
236
Ahmadpur
Sri Vinayak Kisan Jadhav Patil
111.
238
Nilanga
Sri Sambhaji Patil Nilangekar
112.
239
Ausa
Sri Abhimanyu Pawar
113.
241
Tuljapur
Sri Rana Jagjitsingh Pa.
114.
248
Solapur City North
Sri Vijayrao Deshmukh
115.
251
Solapur South
Sri Subhash Deshmukh
116.
256
Wai
Sri Madan Prataprao Bhosale
117.
258
Man
Sri Jaykumar Gore
118.
260
Karad South
Sri Atul Suresh Bhosale
119.
262
Satara
Sri Shivendrasinh Abhaysingraje Bhosale
120.
274
Kolhapur South
Sri Amal Mahadeek
121.
279
Ichalkaranji
Sri Suresh Halwankar
122.
281
Miraj (SC)
Sri Suresh Khade
123.
282
Sangli
Sri Sudhir Gadgil
124.
284
Shirala
Sri Shivajirao Naik
125.
288
Jat
Sri Vilasrao Jagtap

1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस

2. कोथरुड  - चंद्रकांत पाटील
3. शहादा  - राजेश पडवी
4. नंदूरबार  - विजयकुमार गावित
5. नवापूर - भारत गावित
6. धुळे ग्रामीण - ज्ञानज्योती मनोहर भदाने पाटील
7. सिंदखेडा - जयकुमार रावल
8. रावेर - हरिभाऊ जावळे
9. भुसावळ - संजय सावकारे
10. जळगाव शहर - सुरेश भोळे
11. अंमळनेर -  शिरीष चौधरी
12. चाळीसगाव  मंगेश रमेश चव्हाण
13. जामनेर - गिरीश महाजन
14. मलकापूर - चैनसुख संचेती
15. चिखली - श्वेता महाले
16. खामगाव  - आकाश फुंडकर
17. जळगाव जामोद - डॉ. संजय कुटे
18. अकोट - प्रकाश भारसाकळे
19. अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा
20. अकोला पूर्व - रणधीर सावरकर
21. मूर्तिजापूर - हरिश पिंपळे
22. वाशिम - लखन मलिक
23. कारंजा - राजेंद्र पटनी
24. अमरावती - सुनील देशमुख
25. दर्यापूर - रमेश बुंदिले
26. मोर्शी - डॉ. अनिल बोंडे
27. आर्वी - दादाराव केचे
28. हिंगणघाट -  समीर कुणावार
29. वर्धा - डॉ. पंकज भोयर
30. सावनेर - डॉ. राजीव पोतदार
31. हिंगणा  - समीर मेघे
32. उमरेड - सुधीर पारवे
33. नागपूर दक्षिण - मोहन मते
34. नागपूर पूर्व -  कृष्णा खोपडे
35. नागपूर मध्य -  विकास कुंभारे
36. नागपूर पश्चिम - सुधाकर देशमुख
37. नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने
38. अर्जुनी मोरगाव  - राजकुमार बडोले
39. तिरोरा - विजय रहांगदळे
40. आमगाव - संजय पुरम
41. आरमोरी - कृष्णा गजभे
42. गडचिरोली - डॉ. देवराव होळी
43. राजुरा - संजय धोटे
44. चंद्रपूर - नाना श्यामकुळे
45. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
46. चिमूर - किर्तीकुमार भांगडिया
47. वणी - संजीव रेड्डी बोदकुरवार
48. राळेगाव - अशोक उईके
49. यवतमाळ - मदन येरावार
50. आर्णी - डॉ. संदीप धुर्वे
51. भोकर - बापूसाहेब गोरठेकर
52. मुखेड - डॉ. तुषार राठोड
53. हिंगोली - तानाजी मुटकुळे
54. परतूर - बबनराव लोणीकर
55. बदनापूर - नारायण कुचे
56. भोकरदन - संतोष दानवे
57.फुलंब्री - हरिभाऊ बागडे
58. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
59. गंगापूर - प्रशांत बंब
60. चांदवड - डॉ. राहुल आहेर
61. नाशिक मध्य - देवयानी फरांदे
62. नाशिक पश्चिम - सीमा हिरे
63. डहाणू - प्रकाश धनारे
64. विक्रमगड - हेमंत सावरा
65. भिवंडी पश्चिम - महेश चौगुले
66. मुरबाड - किसन कथोरे
67. कल्याण पूर्व - गणपत गायकवाड
68. डोंबिवली - रवींद्र चव्हाण
69. मिरा भाईंदर - नरेंद्र मेहता
70. ठाणे - संजय केळकर
71. ऐरोली - संदीप नाईक
72. बेलापूर - मंदा म्हात्रे
73. दहिसर - मनिषा चौधरी
74. मुलुंड - मिहिर कोटेचा
75. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
76. चारकोप  योगेश सागर
77. गोरेगाव  विद्या ठाकूर
78. अंधेरी पश्चिम  - अमित साटम
79. विले पार्ले - पराग आळवणी
80. घाटकोपर पश्चिम - राम कदम
81. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
82. सायन कोळीवाडा - कॅ. तमीळ सेल्वन
83. वडाळा - कालिदास कोळंबकर
84. मलबार हिल - मंगलप्रभात लोढाट
85. पनवेल - प्रशांत ठाकूर
86. पेण - रविशेठ पाटील
87. शिरुर - बाबुराव काशिनाथ पाचर्णे
88. इंदापूर - हर्षवर्धन पाटील
89. पिंपरी चिंचवड - लक्ष्मण जगताप
90. भोसरी - महेश किसान लांडगे
91. वडगाव शेरी - जगदीश मुळीक
92. शिवाजीनगर - सिद्धार्थ पद्माकर शिरोळे
93. खडकवासला - भीमराव तापकीर
94. पर्वती - माधुरी मिसाळ
95. हडपसर - योगेश टिळेकर
96. पुणे कॅन्टोन्मेंट - सुनील कांबळे
97. कसबा पेठ - मुक्ता टिळक
98. अकोले - वैभव पिचड
99. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
100. कोपरगाव - स्नेहलता कोल्हे
101. नेवासा - बाळासाहेब मुरकुटे
102. शेवगाव - मोनिका राजळे
103. राहुरी - शिवाजीराव कर्डिले
104. श्रीगोंदा - बबनराव पाचपुते
105. कर्जत जामखेड - राम शिंदे
106. गेवराई - अ‍ॅड. लक्ष्मण पवार
107. माजलगाव - रमेश आडसकर
108. आष्टी - भीमराव धोंडे
109. परळी - पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे
110. अहमदपूर - विनायक किसन जाधव-पाटील
111. निलंगा - संभाजी निलंगेतकर
112. औसा - अभिमन्यू पवार
113. तुळजापूर - राणा जगजितसिंग
114. सोलापूर शहर उत्तर - विजयराव देशमुख
115. सोलापूर शहर दक्षिण - सुभाष देशमुख
116. वाई - मदन भोसले
117. माण - जयकुंमार गोरे
118. कराड दक्षिण - अतुल भोसले
119. सातारा - शिवेंद्रराजे भोसले
120. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
121. इचलकरंजी - सुरेश हळवणकर
122. मिरज - सुरेश खाडे
123. सांगली - सुधीर गाडगीळ
124. शिराळा - शिवाजीराव नाईक
125. जत - विलासराव  जगताप

भाजपकडून या उमेदवारांचा पत्ता कट-

मुलुंड - सरदार तारा सिंह
पुणे कॅन्टॉन्मेंट - दिलीप कांबळे
शिवाजी नगर - विजय काळे
कोथरुड - मेधा कुलकर्णी
माजलगाव - आर टी देशमुख
आर्णी - राजू तोडसम
विक्रमगड - विष्णू सावरा
शहादा - उदेसिंग पाडवी
मुखेड - गोविंद राठोड

भाजपचे हे उमेदवार गॅसवर-

1 मुक्ताईनगर-एकनाथ खडसे 
2 मेळघाट-प्रभूदास भिलावेकर 
3 काटोल-डॉ.आशीष देशमुख (पक्षांतर-राजीनामा)
4 कामठी-चंद्रशेखर बावणकुळे 
5 रामटेक- व्दारम मल्लिकार्जुन शेट्टी 
6 तुमसर-चरण वाघमारे 
7 भंडारा-रामचंद्र अवसारे 
8 साकोली-बाळा काशिवार 
9 अहेरी-अंबरिश अत्राम 
10 उमरखेड-राजेंद्र नजरधने 
11 नाशिक पूर्व-बाळासाहेब सानम 
12 बोरिवली-विनोद तावडे 
13 वर्सोवा-भारती लवेकर
14 घाटकोपर पूर्व- प्रकाश मोहता
15 कुलाबा-राज पुरोहित 
16 मावळ-बाळा भेगडे 
17 केज-संगिता ठोंबरे 
18 उदगीर-सुधाकर भालेराव 

शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश

शिवसेनेची उमेदवार यादी-

1. नांदेड - राजश्री पाटील
2. मुरुड - महेंद्र दळवी
3. हातगाव - नागेश पाटील अष्टीकर
4. मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ
5. भायखळा - यामिनी जाधव
6. गोवंडी - विठ्ठल लोकरे
7. एरंडोल पारोळा - चिमणराव पाटील
8. वडनेरा - प्रीती संजय
9. श्रीवर्धन - विनोद घोसाळकर
10. कोपर पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
11.वैजापूर - रमेश बोरनावे
12. शिरोळ - उल्हास पाटील
13. गंगाखेड - विशाल कदम
14. दापोली - योगेश कदम
15. गुहागर - भास्कर जाधव
16. अंधेरी पूर्व - रमेश लटके
17. कुडाळ - वैभव नाईक
18. ओवळा माजीवाडा - प्रताप सरनाईक
19. बीड - जयदत्त क्षीरसागर
20. पैठण - संदीपान भुमरे
21. शहापूर - पांडुरंग बरोला
22. नागपूर शहर - अनिलभैय्या राठोड
23. सिल्लोड - अब्दुल सत्तार
24. औरंगाबाद (दक्षिण) - संजय शिरसाट (मूळ यादीत नाव मुद्रण)
25. अक्कलकुवा - आमिशा पाडवी
26. इगतपुरी - निर्मला गावित
27. वसई - विजय पाटील
28. नालासोपारा - प्रदीप शर्मा
29. सांगोला - शब्जी बापू पाटील
30. कर्जत - महेंद्र थोरवे
31. घनसंगवी - डॉ.हिकमत दादा उधन
32. खानापूर - अनिल बाबर
33. राजापूर - राजन साळवी
34. करवीर - चंद्रदीप नरके
35. बाळापूर - नितीन देशमुख
36. देगलूर - सुभाष सबणे
37. उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले
38. दिग्रस - संजय राठोड
39. परभणी - डॉ. राहुल पाटील
40. मेहकर - डॉ. संजय रेमुलकर
41. जालना - अर्जुन खोतकर
42. कळमनुरी - संतोष बांगर
43. कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
44. औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट (मूळ यादीत दुसऱ्यांदा मुद्रण)
45. चंदगड (कोल्हापूर) - संग्राम कुपेकर
46. वरळी - आदित्य ठाकरे
47. शिवडी - अजय चौधरी
48. हातकणंगले - सुजीत मिकानेकर
49. राधानगरी - प्रकाश आबिटकर
50. पुरंदर - विजय शिवतारे
51. दिंडोशी - सुनील प्रभू
52. जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकर
53. मागाठणे - प्रकाश सुर्वे
54. गोवंडी - विठ्ठल लोकारे
55. विक्रोळी - सुनील राऊत
56. अणुशक्ती नगर - तुकाराम काटे
57. चेंबूर - प्रकाश फतारपेकर
58. कुर्ला - मंगेश कुडाळकर
59. कलिना - संजय पोतनिस
60. माहीम - सदा सरवणकर
61. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
62. पाचोरा - किशोर पाटील
63. मालेगाव - दादा भुसे
64. सिन्नर - राजाभाऊ वाजे
65. निफाड - अनिल कदम
66. देवळाली - योगेश घोलप
67. खेड - आळंदी - सुरेश गोरे
68. पिंपरी  - गौतम चाबुकस्वार
67. येवला - संभाजी पवार
70. नांदगाव - सुहास खांडे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री अडचणीत; खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

माहिती लपवल्याप्रकरणी खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलासा दिला आहे. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. याचिकेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय सुनावत खटला चालवण्यास मंजुरी दिली. अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका सादर केली आहे. उके यांनी याचिकेत आरोप केला आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाची माहिती लपवून ठेवली होती. फडणवीस यांच्यावर १९९६ व १९९८ मध्ये फसवणूक, बनावट कागदपत्रांचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, पण त्यात आरोपपत्र दाखल झाली नव्हती. हे दोन्ही गुन्हे नागपूरमधील असून त्यातील एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याचे म्हटले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश उके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्यावरी हे गुन्हे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणीही केली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली न्या. दीपक गुप्ता व न्या.अनिरूद्ध बोस यांच्या पीठाने या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी फडणवीस यांची बाजू मांडली होती, तर याचिकाकर्ते सतीश उके यांची बाजू विवेक तन्खा यांनी मांडली होती. सतीश उके यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. यासंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ फक्त 'रिमांड बॅक' : मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला चालवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ फक्त 'रिमांड बॅक' आहे. चौकशी किंवा अन्य कुठलाही संदर्भ त्या आदेशाला नाही. मुख्यमंत्र्यांना 'प्रॉसिक्यूट करा' असे कुठेही त्या आदेशात म्हटलेलं नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा परिणाम सध्याच्या निवडणुकीवर होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 2014 च्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करुन फडणवीस यांच्याविरोधात नव्याने खटला चालवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. यानंतर मुख्यमंत्री कार्यलयाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. कार्यालयाच्या परिपत्रकानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे, तो केवळ न्यायदंडाधिकारी यांनी नव्याने सुनावणी घ्यावी, असे सांगणारा आहे. त्यामुळे 'रिमांड बॅक' एवढाच त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांची चौकशी करा किंवा गुन्हा दाखल करा, असे कुठेही त्या आदेशात म्हटलेले नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. याचिकाकर्त्यांनी सीआरपीसी कलम 200 अन्वये एक तक्रार दाखल करुन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात 2 प्रकरणे नमूद केलेली नाहीत आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. न्यायदंडाधिकारी यांनी या दोन्ही तक्रारी नमूद करण्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा देत ती तक्रार खारीज केली होती. त्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. सत्र न्यायालयाने न्यायदंडाधिकारी यांचा आदेश हा 'स्पिकिंग ऑर्डर' नाही, असे सांगून याचिका फेटाळत पुन्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावणी घ्यावी, असा आदेश दिला. आज सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे, तो केवळ न्यायदंडाधिकारी यांनी नव्याने सुनावणी घ्यावी, असे सांगणारा आहे. त्यामुळे 'रिमांड बॅक' एवढाच त्याचा अर्थ आहे. मुख्यमंत्र्यांची चौकशी करा किंवा गुन्हा दाखल करा, असे कुठेही त्या आदेशात म्हटलेले नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने येणार्‍या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नाही. मुळात ज्या दोन तक्रारींशी संबंधित हे प्रकरण आहे, त्या दोन्ही खाजगी स्वरुपाच्या तक्रारी होत्या. पहिली तक्रार ही क्रिमिनल डिफेमेशनशी संबंधित आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक होते. त्यांनी एका सरकारी वकिलाविरुद्ध काही तक्रारी केल्या होत्या. त्यांना त्या खटल्यातून दूर करण्यात यावे, अशी मागणी करणारे एक प्रसिद्धीपत्रक त्यांनी जारी केले होते. त्यावर त्या वकिलाने क्रिमिनल डिफेमेशन दाखल केलं. नंतर ते त्यांनी परत घेतले. दुसरे प्रकरण एका झोपडपट्टीवासियांसाठी संघर्ष करतानाचे आहे. एका जागेवर असलेल्या झोपडपट्टीला मालमत्ता कर लावण्यात यावा, असे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मालमत्ता कर लावला. ती जमीन खाजगी असून आपल्या मालकीची आहे, अशी खाजगी तक्रार एका व्यक्तीने केली होती. पुढे ही तक्रार उच्च न्यायालयाने फेटाळली. मुळात या दोन्ही तक्रारी खाजगी स्वरुपाच्या असल्याने त्याची नोंद निवडणूक प्रतिज्ञापत्रात घेण्याची गरज नाही, असा निर्णय वकिलांनी घेत त्याचा उल्लेख न करण्याची भूमिका स्वीकारली. त्यामुळे आज मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा केवळ स्थानिक न्यायालयाकडे 'रिमांड बॅक' एवढाच आहे. चौकशी किंवा अन्य कुठलाही संदर्भ त्या आदेशाला नाही. मुख्यमंत्र्यांना 'प्रॉसिक्यूट करा' असे कुठेही त्या आदेशात म्हटलेले नाही. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाचा देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन करण्यावर किंवा आगामी निवडणूक लढवण्यावर कुठलाही परिणाम होत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची महत्त्वाची माहिती लपवल्याचा खटला चालवण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, असे सांगताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्र्यांनी गुन्हा लपवला हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हयाची माहिती लपवल्याचे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे. माहिती लपवणे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर कारवाईचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. राज्याचा मुख्यमंत्री स्वतः च्या गुन्हयाची माहिती लपवत असेल तर त्यांना राजकारणात राहण्याचाही अधिकार नाही असेही मलिक म्हणाले. हे लक्षात घेता जोपर्यंत या घटनेचा निकाल येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांवर निवडणूक लढण्यास बंदी आणावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याबाबतचा खटला चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले. मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्र्याविरोधातील या तक्रारीबाबत दिलासा दिला होता. अॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने खटला चालवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मलिक यांनी ही मागणी केली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================
या पूर्वीचे प्रसिद्ध झालेले ब्लॉग-

THURSDAY, 13 DECEMBER 2018

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना नोटीस


निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नोटीस बजावली आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी हेतूपुरस्पर दडविली. त्यामुळे उमेदवाराविषयी जाणून घेण्याचा मतदाराचा हक्क डावलण्यात आला. यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. सुप्रीम कोर्टात गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावत त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी याच प्रकरणात मुख्यमंत्र्यांना दिलासा हायकोर्टाने दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सुप्रीम कोर्टाने फडणवीस यांनी ठराविक कालावधीत उत्तर मागितले आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भात....

योग्य ते उत्तर सादर केले जाईल असा मुख्यमंत्री कार्यालयाकडून खुलासा 

सर्वोच्च न्यायालयाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली नोटीस ही संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील असून, त्यावर योग्य ते उत्तर सादर केले जाईल असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. २०१४ विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या संदर्भात मौख्यमंत्र्यांना त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असता यावर मुख्यमंत्री कार्यालयातील तातडीने खुलासा करण्यात आला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यात त्यांच्यावर दाखल सर्व प्रकरणांची माहिती स्पष्टपणे देण्यात आली होती. या संदर्भात याच याचिकाकर्त्यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ती उच्च न्यायालयाने तथ्यहीन मानून फेटाळली होती. याच याचिकाकर्त्यांविरुद्ध उच्च न्यायालयाने न्यायालय अवमाननेची कारवाई सुद्धा प्रारंभ केली आणि सतत खोडसाळ याचिका दाखल करीत असल्याबद्दल कारवाई का करू नये, असेही विचारले होते. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भातील आहे. तेथे त्यावर योग्य ते उत्तर सादर केले जाईल असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही. या दोन प्रकरणाची माहिती त्यांनी हेतूपुरस्पर लपवली असल्यामुळे फडणवीस यांची निवड रद्द करण्यात यावी, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी १९९७ आणि २००० मधील फौजदारी प्रकरणात जामीन घेतला आहे. मात्र,या प्रकरणांचा तपशील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दिलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

ते दोन फौजदारी खटले कोणते ?

फडणवीस यांनी १९९७ आणि २००० मधील फौजदारी प्रकरणात जामीन घेतला आहे. मात्र, त्यांनी न्यायालयाने दखल घेतलेल्या प्रकरणांचा तपशील विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना दिलेला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.दरम्यान, असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेच्या अहवालानुसार देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२ गुन्हे आहेत.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत भरलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिली होती असा आरोप आहे. त्यांनी आपल्यावर असलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा उल्लेख केलाच नव्हता. या प्रकरणी अॅड. सतिश उके यांनी याचिका दाखल केली होती. गुन्हेगारी खटले असतानाही त्यांची माहिती दिली नसल्याने फडणवीस यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना दिलासा दिल्यानंतर अॅड. सतिश उके यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली. त्यानंतर गुरुवारी झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नोटीस काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने फडणवीसांना या प्रकरणात दिलासा दिला होता. मात्र याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या नोटीशीवर मुख्यमंत्री काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील भाजप आमदार व विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२५ अ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी याचिका अॅड. सतीश उके यांनी सर्वप्रथम नागपुरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ७ सप्टेंबर २०१५ रोजी न्यायालयाने त्यांचा हा अर्ज फेटाळला. त्यावर उके यांनी सत्र न्यायालयात धाव घेत पुन्हा अर्ज दाखल केला. मे २०१६ मध्ये त्यावर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने अॅड. उके यांचा अर्ज मंजूर करतानाच करताना कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला होता. या प्रकरणावर कनिष्ठ न्यायालयाने नव्याने सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेशही सत्र न्यायालयाने दिले होते. तथापि, फडणवीस यांनी नागपूर खंडपीठात त्याला आव्हान दिले. तेव्हा ही याचिका तथ्यहिन असल्याचे सांगत खंडपीठाने उकेंची याचिका फेटाळली. त्यामुळे उके आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ ला देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून ३ हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळवला होता. नेमक्या याच गुन्ह्यांची माहिती फडणवीस यांनी २०१४च्या निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात दिलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी मतदारांची फसवणूक करून निवडणूक जिंकली, असा आरोप अॅड. उके यांनी केला आहे. नागपूर खंडपीठात फडणवीस यांच्याविरोधात याचिकेवर सुनावणी सुरू असताना अॅड. उके यांनी न्यायाधीशांवर हेत्वारोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची तीन प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. झ. का. हक यांच्यावर आरोप केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने अॅड. उके यांना गेल्यावर्षी २ महिन्यांची साधी कैद आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावल्यावर त्यांच्याविरुद्ध गैरजमानती वॉरंट जारी केले होता. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून अॅड. उके यांची संपत्ती आणि न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे जमा करण्यात आलेली २ लाखांची रक्कमही जप्त करण्यात आली होती. अवमान प्रकरणांमध्ये अॅड. उके यांना आतापर्यंत ४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याचिकेदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि वकिलांवर बेताल आणि तथ्यहीन आरोप लावल्याच्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने अॅड. उके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करत त्यांच्यावर वर्षभरासाठी प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे त्यांना किमान वर्षभर कुठल्याही न्यायालयात प्रॅक्टिस करता येणार नसल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने नागपूर खंडपीठास देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू संजय फडणवीस यांनी धमकावले- नाना पटोले यांनी केला होता आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवर बाजू मांडणारे वकील अभियान सुरेश बाराहाते यांना मुख्यमंत्र्यांचे चुलतबंधू संजय फडणवीस यांनी धमकावले. त्यामुळे अ‍ॅड. बारहाते यांनी वकीलपत्र मागे घेतले. महाराष्ट्रात सध्या कुणाचे राज्य आहे, असा सवाल भाजपमधून बाहेर पडलेले माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला त्यावेळी केला होता. संजय फडणवीस यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिपिंग ही नाना पटोले यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत वाजवली होती. संजय फडणवीस यांच्याविरोधात अॅड अभियान बारहाते यांनी अजनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील दिली होती. पोलिसांनी संजय फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत 8 मार्च 2018 रोजी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीत सादर प्रतिज्ञापत्रात २४ पैकी दोन गुन्ह्य़ांची माहिती सादर केली नाही. यामुळे फडणवीस यांना अपात्र ठरण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती या प्रकरणात अ‍ॅड. बाराहाते बाजू मांडली होती. सिव्हिल लाईन्समधील गॅझेटेड ऑफिसर्स कॉलनीमध्ये राहत असलेले संजय फडणवीस यांनी ६ मार्च २०१८ ला मध्यरात्री अ‍ॅड. बाराहाते यांना भ्रमणध्वनीवरून धमकी दिली होती. यासंदर्भातील ध्वनिफित व्हायरल झाली होती. शिवाय संजय फडणवीस यांनी बाराहाते यांना फोन केल्याचे मान्य केले होते. याप्रकरणी अ‍ॅड. बारहाते यांनी नागपूर पोलीस आयुक्त व अजनी पोलीस ठाण्यात संजय फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक अशाप्रकारे वकिलास धमकावतात आणि वकीलपत्र मागे घेण्यास भाग पाडतात. आपण कुणाच्या राज्यात आहोत. राज्य सरकारने तातडीने संजय फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पटोले यांनी केली होती. दरम्यान, संजय फडणवीस यांनी आपण मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू असल्याचे एका वृतपत्राला मुलाखत देताना सांगितले होते. या प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. अ‍ॅड. बाराहाते हे दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी पक्ष सोडला आहे. याबाबत त्यांना विचारणा केली. २०१९ मध्ये देखील आपलेच सरकार येणार आहे, असे म्हणालो, असे संजय फडणवीस यांनी सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांवरील राजकीय गुन्हे मागे , फौजदारी कायम
फडणवीस सरकारने सामाजिक व राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध नागपूर शहर, ग्रामीण पोलीस ठाणे आणि न्यायालयात एकूण २४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी २१ गुन्हे राजकीय व सामाजिक आंदोलनाशी संबंधित आहेत, तर उर्वरित तीन फौजदारी स्वरूपाचे आहे. यातील कलम ३२४ (जाणीवपूर्वक गंभीर दुखापत करणे) चा गुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने रद्द केला होता. फौजदारी खटला क्रमांक २३१/१९९६ आणि ३४३/२००३ ही दोन गुन्हे कायम आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)


=====================================================================

प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले खटले- माहिती खालीलप्रमाणे---:

Details of Criminal Cases

Cases where charges framed

Serial No.IPC Sections ApplicableOther Details / Other Acts / Sections Applicable
1147, 148, 324,FIR NO.252/91 p.s sitabuldi nagpur, Court taking cognizance - J.M.F.C. NO.2 nagpur ,cognizance taken on 16/07/1991, Court which charges framed - J.M.F.C. no. 2 Nagpur Date on charged are framed 04/01/2006

Cases where Cognizance taken

Serial No.IPC Sections ApplicableOther Details / Other Acts / Sections Applicable
1143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.11390/09, dt. 10/08/2009, Section 135 B.P. Act
2143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No. 2 Case No.10009/09, dt. 16/07/2009 Section 135 B.P. Act
3143, 147, 148, 323, 143, 427P.S.Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.164/98, dt. 13/02/1998, Section 135 B.P. Act
4143, 147, 148, 323, 143, 427P.S.Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.1303/96, dt. 05/10/1996, Section 135 B.P. Act
5143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.573/93 Dt-20/05/1993, Section 135 B.P.Act
6143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.219/98, Dt. 26/02/1998, Section 135 B.P. Act
7143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No. 2, Case No.962/09, Dt. 21/01/2009, Section 135 B.P. Act
8143, 147, 148, 323, 143, 427P.S. Sitabuldi, J.M.F.C. No.2, Case No.18282/06, Dt. 21/09/2006, Section 135 B.P. Act
9143, 147, 148, 323, 427P.S.-Sadar, J.M.F.C. No.-6, Case No.28/04, Dt. 13/02/2004, Section-135 B.P. Act
10143, 147, 148, 323, 427P.S.-Sadar, J.M.F.C. No.-6, Case No.13871/08, Dt. 22/09/2008, Section-135 B.P. Act
11143, 147, 148, 323, 427P.S.-Sadar, J.M.F.C. No.-6, Case No.14170/09, Dt. 24/09/2009, Section-135 B.P. Act
12188, 171, 34P.S Dhantoli, J.M.F.C. No.-2, Case No.5652/09, Dt. 25/04/2009, Section- 135 B.P. Act
13188, 171, 34P.S.-Dhantoli, J.M.F.C. No.-2, Case No.945/2000, Dt. 15/03/2000, Section 135 B.P. Act
14P.S.-Ganeshpeth, J.M.F.C. No.-1, Case No.14315/09, Dt. 29/09/2009, Section-3,4,135 B.P. Act
15P.S.-Ganeshpeth, J.M.F.C. No.-1, Case No.4240/10, Dt. 05/05/2009, Section-3,4,135 B.P. Act
16188P.S.-Ambazari, C.J.M., Case No.331/05, Dt. 27/04/2005
17188P.S.-Ambazari, C.J.M., Case No.333/05, Dt. 27/06/2005
18188P.S.-Koradi, J.M.F.C. No.-6, Case No.2815/09, Dt.-04/03/2009
19P.S.-Kotwali, J.M.F.C. No.-8, Case No.427/99, Dt.-13/08/2009, Section- 134,135 B.P.Act
20188, 134, 135P.S.-Wadi, J.M.F.C. No.-8, Case No.305/99, Dt.-30/09/1999
21188, 134, 135P.S.-Wadi, J.M.F.C. No.-8, Case No.-307/99, Dt. 08/10/1999

Cases where convicted

Serial No.IPC Sections ApplicableOther Details / Other Acts / Sections Applicable
---------No Cases--------
NameConstituencyAgeParty CodeCriminal CasesNumber of CasesEducation LevelTotal AssetsTotal LiabilitiesPAN Given
(Y or N)
Devendra Fadnavis in Maharashtra Election 2014NAGPUR SOUTH WEST44BJPYes22Graduate Professional4,34,85,337
~ 4 Crore+
10,19,498
~ 10 Lacs+
Y
DEVENDRA GANGADHAR FADNVIS in Maharashtra 2004 NAGPUR WEST34BJPYes9Others1,52,36,000
~ 1 Crore+
10,48,200
~ 10 Lacs+
Y







POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


=============0===========0==========0==========