Thursday, 23 February 2017

pcmc election 2017 पिंपरी-चिंचवड महापालिकेत फडकविला भाजपाने झेंडा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत फडकविला भाजपाने झेंडा


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================]

पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसला भाजपाने धुळ चारत बहुमताने सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांचा पराजय झाला आहे. तर राष्ट्रवादीने गड राखण्यात अपयश आले आहे. डावपेच आखत भाजपाने महापालिकेवर झेंडा फडकविला आहे. 
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, या निवडणुकीत भाजपाने परिवर्तन करण्यासाठी भाजपाने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी फोडण्यात यश आले होते. भाजपाने राष्ट्रवादीला टक्कर देत बहुमतापर्यंत मजल मारली गेली. 
या निवडणुकीत 




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

प्रभाग 1

अ : गायकवाड कुंदन अंबादास - भाजपा
ब : म्हेत्रे स्विनल किपल - भाजपा
क : साधना मळेकर - अपक्ष
ड : साने दत्तात्रय बाबुराव - राष्ट्रवादी
--------------------------------------------------------------
प्रभाग 2

अ : जाधव अश्विनी संतोष - भाजपा
ब : बोऱ्हाडे सारिका शिवाजी - भाजपा
क : जाधव राहुल गुलाब - भाजपा
ड : बोराटे वसंत प्रभाकर - भाजपा
-------------------
प्रभाग 3

अ : काळजे नितीन प्रताप - भाजपा
ब : बुर्डे सुवर्णा विकास - भाजपा
क : तापकीर विनया प्रदीप - राष्ट्रवादी
ड : सस्ते लक्ष्मण सोपान - भाजपा
--------------------------------------------------------------
प्रभाग 4

अ : डोळस विकास हरिश्चंद्र - भाजपा
ब : उंडे लक्ष्मण धोंडू - भाजपा
क : घुले हिराबाई गोवर्धन - भाजपा
ड : गायकवाड निर्मला मनोज - भाजप 
------------------
प्रभाग 5 

अ : गवळी सागर बाळासाहेब - भाजप
ब : गोफणे अनुराधा देविदास - राष्ट्रवादी
क : बारसे प्रियांका प्रवीण - भाजप
ड : गव्हाणे अजित दामोदर - राष्ट्रवादी
-----------------------------------------
प्रभाग 6

अ : यल्लेबोईनवाड यशोदा प्रकाश - भाजप
ब : लांडगे सारिका संतोष - भाजप
क : रवी लांडगे - भाजप (बिनविरोध)
ड : लांडगे राजेंद्र किसन - भाजप
--------------------

प्रभाग 7 

अ : लोंढे संतोष ज्ञानेश्वर - भाजप
ब : गव्हाणे सोनाली दत्तात्रय - भाजप
क : फुगे भीमाबाई पोपट - भाजप
ड : लांडगे नितीन ज्ञानेश्वर - भाजप
---------------------

प्रभाग 8 

अ : सावळे सीमा रविंद्र - भाजपा
ब : लोंढे नम्रता योगेश - भाजपा
क : मडेगिरी विलास हनुमंतराव - भाजपा
ड : लांडे विक्रांत विलास - राष्ट्रवादी
---------------------------------------------------

प्रभाग 9 

अ : मंचरकर गीता सुशिल - राष्ट्रवादी
ब : भोसले राहूल हनुमंतराव - राष्ट्रवादी
क :घोडेकर वैशाली ज्ञानदेव - राष्ट्रवादी
ड : मासुळकर समीर मोरेश्वर - राष्ट्रावादी
-------------------------
प्रभाग 10

अ : अनुराधा गणपत गोरखे - भाजप
ब : केशव हनुमंत घोळवे - भाजप
क : मंगला अशोक कदम - राष्ट्रवादी
ड : तुषार रघुनाथ हिंगे - भाजप
----------------

प्रभाग 11 

अ : अश्विनी भीमा बोबडे - भारतीय जनता पार्टी
ब : योगिता नागरगोजे - भारतीय जनता पार्टी
क : संजय बबन नेवाळे - भारतीय जनता पार्टी 
ड : एकनाथ रावसाहेब पवार - भारतीय जनता पार्टी

-------------------------------------------------

प्रभाग 12

अ : प्रवीण महादेव भालेकर ­ - राष्ट्रवादी
ब : पोर्णिमा रविंद्र सोनवणे - राष्ट्रवादी
क : संगीता प्रभाकर ताम्हाणे - राष्ट्रवादी
ड : पंकज दत्तात्रय भालेकर -राष्ट्रवादी
----------------------

प्रभाग 13 

क : सुमन मधुकर पवळे - राष्ट्रवादी

ड : सचिन चिखले - मनसे 

---------------------

प्रभाग 14 

अ : जावेद रमजान शेख - राष्ट्रवादी

-------------------------------

प्रभाग 15

अ : शरद दत्ताराम मिसाळ - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
ब : शैलजा अविनाश मोरे - भाजपा
क : शर्मिला राजू बाबर - भाजपा
ड : अमित राजेंद्र गावडे - शिवसेना
--------------------------------------------------------
प्रभाग 16 

अ - ओव्हाळ बाळासाहेब नामदेव - भाजपा
ब - खानोलकर प्रज्ञा महेश - राष्ट्रवादी
क - संगिता राजेंद्र भोंडवे - भाजपा
ड : मोरेश्वर भोंडवे - राष्ट्रवादी 
-------------------------------------------------

प्रभाग 17 

अ : ढाके नामदेव जनार्दन - भाजपा
ब : कुलकर्णी माधुरी मुकुंद - भाजपा
क : चिंचवडे करूणा शेखर - भाजपा
ड : चिंचवडे सचिन बाजिराव - भाजपा

-----------------------------

प्रभाग 18

अ : भोईर सुरेश शिवाजी - भाजपा
ब : डोके अपर्णा निलेश - राष्ट्रवादी
क : चिंचवडे अश्विनी गजानन - शिवसेना
ड : गावडे राजेंद्र तानाजी - भाजपा
-------------------------------------------------

प्रभाग 19 

अ : मोरे शैलेंद्र प्रकाश - भाजपा
ब : गावडे जयश्री वसंत - भाजपा
क : कोमल मेवानी - भाजप 
ड : शिंदे विजय गोरख - भाजपा

-----------------------

प्रभाग 20

अ : धर सुलक्षणा राजू - राष्ट्रवादी
ब : लांडे शाम गणपतराव - राष्ट्रवादी
क : पालांडे सुजाता सुनील - भाजपा
ड : बहल योगेश मंगलसेन - राष्ट्रवादी

------------------------------------

प्रभाग 21

अ : कदम निकता अर्जून - राष्ट्रवादी
ब : वाघेरे संदिप बाळकृष्ण - भाजपा
क : वाघेरे उषा संजोग - राष्ट्रवादी
ड : हिरानंद आसवानी - राष्ट्रवादी

----------------------------------------------------

प्रभाग 24

अ : भोसले सचिन सुरेश - शिवसेना
ब : बारणे झामाबाई बाळासाहेब - अपक्ष
क : बारणे माया संतोष - भाजप
ड : बारणे निलेश हिरामण - शिवसेना
----------------------------
प्रभाग 25 

अ : वाघमारे अश्विनी विक्रम - शिवसेना 
ब : दर्शले रेखा राजेश - शिवसेना
क : कलाटे राहूल तानाजी - शिवसेना
ड : कलाटे मयूर पांडूरंग - राष्ट्रवादी
------------------------

प्रभाग 26 

अ : गायकवाड ममता विनय - भाजपा 

ब : कामठे तुषार गजानन (ब) भाजपा 

---------------------------

प्रभाग 28

अ : काटे शत्रुघ्न सिताराम - भारतीय जनता पार्टी
ब : कुटे निर्मला संजय - भारतीय जनता पार्टी
क : काटे शितल विठ्ठल - राष्ट्रवादी
ड : काटे विठ्ठल कृष्णाजी - राष्ट्रवादी
-------------------------
प्रभाग 29

अ : आंगोळकर सागर सुनिल - भारतीय जनता पार्टी
ब : मुंढे उषा अंकुश - भारतीय जनता पार्टी
क : कदम शशिकांत गणपत - भारतीय जनता पार्टी
ड : लोखंडे चंदा राजू - भारतीय जनता पार्टी
-----------------------------

प्रभाग ३१ 

अ : कांबळे अंबरनाथ चंद्रकांत - भाजप 
ब : राजापूर माधवी राजेंद्र - भाजप 
क : चौगुले सीमा दत्तात्रय - भाजप 
ड : जगताप नवनाथ दत्तू - अपक्ष (भाजप बंडखोर)
--------------------------------------
प्रभाग ३२ 

अ : कांबळे संतोष बबन - भाजप 
ब : सोनवणे शारदा हिरेन - भाजप 
क : ढोरे उषाताई मनोहर - भाजप 
ड : ढोरे हर्षल मच्छिंद्र - भाजप




Wednesday, 22 February 2017

PMC Election 2017 ABP Majha News Pune -PRAB




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

आज २२ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या संसदीय राजकीय कारकीर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!

शरद पवार यांच्या संसदीय राजकीय कारकीर्दीला  ५० वर्ष पूर्ण....................सलाम!!!




शरद पवार यांच्या पहिली निवडणुक मतमोजणीचे छायाचित्र

------------------------------------------------------------------------------------------------
 संसदीय कारकीर्दीस 50 वर्षे पूर्ण होत आहे. 1967 साली याच दिवशी त्यांना बारामतीच्या जनतेने प्रचंड बहुमताने निवडून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य केले.  त्यानंतर गेली 50 वर्षे  विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या माध्यमातून अखंडीतपणे सेवा करीत आहेत.
१९८४ सालची लोकसभा निवडणुक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले.इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील ४८ पैकी केवळ ५ जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता.मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले.मार्च १९८५ ची राज्य विधानसभा निवडणुक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला.त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस (स) पक्षाने २८८ पैकी ५४ जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले. १९८७ साली ९ वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस (इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला.जून १९८८ मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रिय मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला.त्यांच्या जागी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राजीव गांधींनी शरद पवारांची निवड केली.२६ जून १९८८ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्यांदा शपथ घेतली.त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते.पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधीत असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता.त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.
नोव्हेंबर १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील ४८ पैकी २८ जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही.पण १९८४ च्या तुलनेत पक्षाने १५ जागा कमी जिंकल्या.शिवसेनेने ४ जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला.भारतीय जनता पक्षाने १० जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली.लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला.राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी १९९० मध्ये निवडणुका होणार होत्या.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपर्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले.राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने २८८ पैकी १४१ तर शिवसेना-भाजप युतीने ९४ जागा जिंकल्या.राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले.तरीही १२ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी ४ मार्च १९९० रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसर्यांदा शपथ घेतली.
जानेवारी १९९१ मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली.पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
१९९१ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला.पक्षाने राज्यात ४८ पैकी ३८ जागा जिंकल्या आणि १९८९ च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली.निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली.श्री.पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुन सिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या.मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने श्री.पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा २१ जून १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
नरसिंह रावांनी पवारांना केंद्रिय मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले.२६ जून १९९१ रोजी त्यांचा केंद्रिय मंत्री म्हणून प्रथमच शपथविधी झाला.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याजागी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली.राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमले.त्यांनी ६ मार्च १९९३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा सुत्रे हाती घेतली.
पवारांची मुख्यमंत्रीपदाची चौथी कारिकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली.ते परत मुख्यमंत्री बनून एक आठवडा व्हायच्या आत, १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत भीषण बाँबस्फोट झाले.त्यात २५७ लोक ठार तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले.३० सप्टेंबर १९९३ रोजी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये भूकंप होऊन दहा हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले.या संकंटांबरोबरच राज्यात कमालीच्या वाढलेल्या भ्रष्टाचाराबद्दल मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गो.रा.खैरनार यांनी पवारांना दोषी धरून त्यांच्यावर अनेक आरोप केले.प्रख्यात समाजसेवक अण्णा हजारे यांनी वनखात्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण केले.तेव्हा पवारांचे सरकार भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठिशी घालत आहे असा आरोप झाला.जळगाव येथील सेक्स स्कँडल मध्ये अनेक तरूणींवर लैंगिक अत्याचार झाले.त्यात काँग्रेस पक्षाचे स्थानिक नगरसेवक सामील आहेत असा आरोप झाला.२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे वंजारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री श्री.मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला.
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ मध्ये निवडणुका होणार होत्या.त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली.अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिक्रुत उमेदवारांविरूध्द अपक्ष म्हणून निवडणुक लढवली.
जनतेत सरकारविरूध्द वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले.काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा १४ मार्च १९९५ रोजी शपथविधी झाला.१९९६ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत पवार राज्य विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते होते.१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून विजय मिळवला आणि त्यानंतर ते राष्टीय राजकारणात उतरले.जून १९९७ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांच्याविरूध्द निवडणुक लढवली पण त्यांचा पराभव झाला.
१९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्षांबरोबर निवडणुकपूर्व आघाडी करायचा निर्णय घेतला.त्यामुळे शिवसेना-भाजप विरोधी मतांचे विभाजन टळले आणि काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्या युतीने ४८ पैकी ३७ जागा जिंकून जोरदार यश प्राप्त केले.शिवसेना-भाजप युतीला १० जागांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर शरद पवार १२ व्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
१२ वी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर मे १९९९ मध्ये पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांच्या साथीने शरद पवारांनी अशी मागणी केली की,१३ व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात त्या तिघांनी म्हटले,'उच्च शिक्षण, कर्तबगारी आणि पात्रता असलेल्या अनेक व्यक्ती असलेल्या या ९८ कोटी लोकांच्या भारत देशात भारताबाहेर जन्म झालेली कोणतीही व्यक्ती सरकारचे नेत्रुत्व करणे योग्य होणार नाही.कारण हा प्रश्न देशाची सुरक्षा, आर्थिक हितसंबंध आणि जागतिक राजकारणातील भारताच्या प्रतिमेबरोबरच प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेशी निगडीत आहे.'त्या कारणावरून काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना ६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले.त्यानंतर १० जून १९९९ रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींनंतर कोणत्याही पक्ष अथवा आघाडीस बहुमत मिळाले नाही.त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन विलासराव देशमुख राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेत्रुत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे क्रुषिमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतली. तेव्हापासून ते त्या पदावर कार्यरत आहेत.राजकारणाबरोबरच क्रिकेट हे देखील पवारांच्या आवडीचे क्षेत्र आहे.२९ नोव्हेंबर २००५ रोजी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आले.
आज २२ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या संसदीय  राजकीय कारकीर्दीला  ५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!!

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

pcmc election 2017 पिंपरी-चिंचवडमधील विक्रमी मतदान

पिंपरी-चिंचवडमधील विक्रमी मतदान



पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 मधील निवडणुकीत 54.84 टक्के मतदान झाले होते. 2007 मध्ये 56.66 टक्के, 2002 मध्ये 59.51 टक्के तर मतदान झाले होते.  1997 मध्ये 68.65 टक्के मतदान झाले होते पण त्यावेळी मतदारांची एकूण संख्या फक्त 3 लाख 94 हजार 931 होती. त्यामुळे यावेळी 65.35 टक्के मतदान झाले असून एकूण मतदारसंख्या 11 लाख 92 हजार 089 इतकी आहे. म्हणजेच यावेळी विक्रमी मतदान झाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीपेक्षा यंदा 10.51 टक्के वाढ झाली आहे.



Debate On 22/02/2017 PMC Election 2017

Tuesday, 21 February 2017

pmc election 2017 पुणे महापालिका 41 प्रभागात 162 जागांसाठी 53.55 टक्के इतके मतदान

पुणे महापालिका 41 प्रभागात 162 जागांसाठी 53.55 टक्के इतके मतदान


पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.53 टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी घोषित केलेल्या परिसरात केवळ 40 टक्के इतके मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारीवरून 53 टक्के 55 टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील शनिवार पेठ, सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले आहे.दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले

यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी 





https://www.youtube.com/watch?v=QPHwklrYxcc

2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल

2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल



यंदा मुंबईसह सर्वच महापालिकेच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होतो आणि फटका कुणाला बसतो हे पाहणं महत्वाचं आहे.
2012 साली महापालिकेतील पक्षीय बलाबलावर.
 मुंबईत गेल्यावेळी ४४.७५ मतदान झालं होतं. तर  ठाणे ५३.२६ टक्के मतदान झालं होतं. तर नाशिमध्ये सर्वाधिक ५७.१९ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. पुण्यात ५०.९२,  उल्हासनगर- ४२.१९, पिंपरी चिंचवड- ५४.८४, सोलापूर- ५२.३६, अकोला- ५६.०८, अमरावती- ५४.४२, नागपूर- ५२ टक्के मतदान झालं होतं.
 जाणून घ्या महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल:
 1. मुंबईत एकूण जागा – २२७
 ४६ लाख ३ हजार ६५५ मतदारांनी मत दिलं, त्यातील पक्षनिहाय पडलेली मतं
 शिवसेना – १० लाख ५ हजार ६८३ (२१.८५ %)
काँग्रेस – ९ लाख ७७ हजार ५१२ (२१.२३ %)
मनसे – ९ लाख ५१ हजार ३८० (२०.६७ %)
भाजप – ३ लाख ९७ हजार ७९७ (८.६४% )
राष्ट्रवादी – ३ लाख २ हजार १३४ (६.५६)
अपक्ष – ५ लाख ४० हजार ५९७ (११.७४)

मुंबई पालिका पक्षीय बलाबल

शिवसेना – ७५
काँग्रेस – ५२
भाजप – ३१
मनसे – २८
राष्ट्रवादी – १३
अपक्ष – १५
सपा- ९
अभासेना – २
भारिपबमस- १
आरपीआय आठवले -१


2. ठाणे – एकूण जागा – १३०

पक्षनिहाय पडलेली मतं

मतदान- १२ लाख ६३ हजार ५७७ मतदारांनी मतदान केलं (५३.२६%),

शिवसेना – ३ लाख ७२ हजार ८६२ (२९.५१ %)
राष्ट्रवादी – २ लाख ३९ हजार ६०८ (१८.९६)
काँग्रेस – १ लाख ७२ हजार ९९८ (१३.६९ %)
मनसे – १ लाख ९४ हजार ६५८ (१५.४१ %)
अपक्ष – १ लाख ६४ हजार ३७७ (१३.०१)
भाजप – ६२ हजार ९८४ (४.९८% )

ठाणे पालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – १३०

शिवसेना – ५३
राष्ट्रवादी – ३४
काँग्रेस – १८
भाजप – ०८
मनसे – ०७
अपक्ष – ०७
बसपा- ०२
आरपीआय आठवले -०१

3. पुणे – एकूण जागा – १५२

पक्षनिहाय पडलेली मतं

राष्ट्रवादी – ६ लाख ३३ हजार ५३२ (२५.१२%)
मनसे –  ५ लाख १९ हजार ४३७ (२०.६०%)
काँग्रेस – ४ लाख ९६ हजार ९०० (१९.७०%)
भाजप –  ३ लाख १४ हजार ६७६ (१२.४८% )
शिवसेना – २ लाख ४० हजार ४१३(९.५३ %)
अपक्ष – २ लाख ३७ हजार १९० (९.४१)


पुणे पालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – १५२

राष्ट्रवादी – ५१
मनसे – २९
काँग्रेस – २८
भाजप – २६
शिवसेना – १५
आरपीआय -०२
अपक्ष – ०१


4. पिंपरी-चिंचवड एकूण जागा १२८

पक्षनिहाय पडलेली मतं

राष्ट्रवादी – ४ लाख ८९ हजार ६८२ (३९.८६)
अपक्ष – २ लाख ६६ हजार २८५ (२१.४६)
शिवसेना – १ लाख ४७ हजार ०३५ (११.८५ %)
काँग्रेस – १ लाख ४५ हजार ८२८ (११.७५ %)
भाजप – ८३ हजार ५७८ (६.७३% )
मनसे – ८१ हजार ९१४ (६.६०%)

पिंपरी-चिंचवड पालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – १२८

राष्ट्रवादी – ८३
काँग्रेस –१४
शिवसेना – १४
मनसे – ४
भाजप – ३
अपक्ष – ०९
आरपीआय -०१

5. नाशिक – एकूण जागा – १२२

पक्षनिहाय पडलेली मतं

मनसे –  ३ लाख २३ हजार ०४२ (२८.२४%)
शिवसेना – २ लाख ०२ हजार ९२१(१७.७४%)
राष्ट्रवादी – १ लाख ५४ हजार ७९९ (१३.५३%)
काँग्रेस – १ लाख ३६ हजार ८८९ (११.९७%)
भाजप –  १ लाख ३१ हजार ६१६ (११.५०% )
अपक्ष – १ लाख १५ हजार ७६१ (१०.१२)

नाशिक पालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – १२२

मनसे – ४०
राष्ट्रवादी – २०
काँग्रेस – १५
भाजप – १४
शिवसेना – १९
अपक्ष – ०६
इतर-०५
माकप -०३


6. नागपूर – एकूण जागा – १४५

पक्षनिहाय पडलेली मतं

भाजप –  ६ लाख १३ हजार ७३९ (२९.६८% )
काँग्रेस – ५ लाख १६ हजार ०३१ (२४.९६%)
अपक्ष – ३ लाख ६५ हजार ८३९ (१७.६९)
बसपा- २ लाख ३ हजार ५९७ (९.८५%)
इतर- १ लाख ३४ हजार २१६ (६.४९)
राष्ट्रवादी – ९२ हजार ३२९ (४.४७%)
शिवसेना – ६५ हजार १७५ (३.१५%)
मनसे –  ४७ हजार ९४४  (२.३२%)

नागपूर पालिका पक्षीय बलाबल

एकूण जागा – १४५

भाजप – ६२
काँग्रेस – ४१
बसपा – १२
राष्ट्रवादी – ०६
शिवसेना – ०६
मनसे – ०२
अपक्ष – १०
इतर-०६