पुणे महापालिका 41 प्रभागात 162 जागांसाठी 53.55 टक्के इतके मतदान
पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 55.53 टक्के इतके मतदान झाले आहे. या विषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारने स्मार्ट सिटीसाठी घोषित केलेल्या परिसरात केवळ 40 टक्के इतके मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहारत 26 लाख 34 हजार 798 मतदार असून त्यापैकी 14 लाख 10 हजार 974 मतदारांनी मतदान केले आहे. या आकडेवारीवरून 53 टक्के 55 टक्के मतदान करण्यात आले आहे. तसेच बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या प्रभाग क्रमांक 9 मध्ये 40 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. यातून स्मार्ट सिटीच्या भागातील मतदारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक 15 मधील शनिवार पेठ, सदाशिव पेठ यामध्ये सर्वाधिक 62.51 टक्के इतके मतदान करण्यात आले आहे.दुपारी चार नंतर काही प्रभाग केंद्रावर गर्दी देखील वाढली. त्यामध्ये हडपसर आणि बोपोडीचा भाग असून त्या मतदार केंद्रावर रात्री 9 वाजेपर्यंत मतदान चालले
यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी
यामध्ये आपल्या प्रभागात एकूण किती मतदान झाले याची आकडेवारी
https://www.youtube.com/watch?v=QPHwklrYxcc
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.