PMC Election 2017
निवडणूकीत 162 जागांसाठी 1090 उमेदवार रिंगणात
राजकीय पक्ष व उमेदवारांची संख्या दर्शविणारा तक्ता
अ.क. राजकीय पक्ष उमेदवारांची संख्या
1 भारतीय जनता पार्टी 159
2 शिवसेना 149
3 राष्ट्रवादी 129
4 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 116
5 काँग्रेस 87
6 बहूजन समाज पार्टी 54
7 अखिल भारतीय मजलिस ए मुस्लिमीन (एमआयएम) 21
8 भारीप बहूजन महासंघ 18
9 बहूजन मुक्ती पार्टी 17
10 राष्ट्रीय समाज पक्ष 10
11 बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी 8
12 जनता दल 5
13 आरपीआय आठवले गट 4
14 राष्ट्रीय मराठा पार्टी 3
15 संभाजी ब्रिगेड 2
16 आरपीआय 2
17 अखिल भारतीय सेना 2
18 पिपल्स रिपब्लिकन पार्टी 1
19 भारतीय शेतकरी कामगार पक्ष 1
20 अपक्ष 302
एकूण 1090
राजकीय पक्षांनी दिलेल्या उमेदवार संख्येचे विश्लेषण
1 पुणे महानगरपालिकेतील मुस्लिम प्रभावीत 8 प्रभागामध्ये एमआयएम या पक्षाने 21 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये 9 महिलांचा समावेश आहे. प्रभाग क्र. 6 मधील 4 जागा, प्रभाग क्र. 16 मधील ब जागा, प्रभाग क्र. 17 मधील ब,क,ड जागा, प्रभाग क्र. 18 मधील 4 जागा, प्रभाग क्र. 19 मध्ये ब, क व ड जागा, प्रभाग क्र. 20 मध्ये ड जागा तर प्रभाग क्र. 27 मधील सर्व 4 जागा, प्रभाग क्र. 28 मध्ये क जागेवर उमेदवारी दिली आहे.
2 18 मुस्लिम उमेदवारांना एमआयएमने उमेदवारी दिली आहे. खुल्या प्रवर्गातील 14 जागांवर 5 महिला असून प्रभाग क्र. 6 क या जागेवर अश्विन लांडगे या बिगर मुस्लिम उमेदवारी दिली आहे. तर अनुसूचित जाती या राखीव 2 जागांवर 6 अ मध्ये शैलेंद्र भोसले 18 अ जागेवर रेखा चव्हाण या बिगर मुस्लिम समाजाच्या व्यक्तिंना उमेदवारी दिली आहे.
3 मुस्लिम समाज व अनुसूचित जाती जमातीच्या समाजाचे सोशल इंजिनियरींगचा प्रयोग करून या प्रभागामध्ये यश मिळविण्याचा प्रयत्न एमआयएमने केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, तसेच भाजपच्या उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता.
4 बहुजन मुक्ति पार्टीने एकूण 17 जागांवर उमेदवार दिले आहेत. यामध्ये अनुसूचित जागेवर 3 तर इतर मागासवर्गीय जागेवर 2 इतर उर्वरित जागांवरती खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिली आहे.
5 बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने 8 जागांवर उमेदवार दिले असून अनुसूचित राखीव जागेवर 2 व इतर खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिली आहे.
6 बहूजन समाज पाटीने 24 प्रभागांमध्ये 54 जागांवर उमेदवारी दिली आहे. यामध्ये 14 जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवार असून उर्वरित राखीव जागांवर उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाने 10 जागांवर उमदेवार दिले आहेत. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने 6 उमेदवार दिले असून आठवले गटाने 4 उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. 1अ, 2ब, 21 व 24अ या जागांचा समावेश आहे. यामधील 3 जागा अनूसूचित जाती करीता राखीव आहेत.
7 भारिप बहुजन महासंघाने 11 प्रभागांमध्ये 18 जागांवरती उमेदवार दिले आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाने प्रभाग क्र. 38 वरील क जागेवर एकमेव उमेदवार दिला आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष ने 3 प्रभागामधील 5 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. पिपल्स रिपब्लिकन पार्टीने प्रभाग क्र. 6 क या ठिकाणी एकमेव उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रीय मराठा पार्टीने प्रभाग क्र. 14ड, 37 व 38क या तीन जागांवर उमेदवार दिले असून त्यामध्ये एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. संभाजी ब्रिगेड या नवनिर्वाचित पक्षाने 27 व 35 ड या 2 जागांवर उमेदवार दिले आहेत.
8 भारतीय जनता पार्टीने 159 जागांवर अधिकृत कमळ चिन्ह असलेले उमेदवार आहेत. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. आरपीआयचे मात्र कमळ चिन्हावर उमेदवारी असलेले 2अ-सिद्धार्थ धेंडे, 2ब-फरजान शेख, 6अ-वैभव पवार, 7अ-सोनाली लांडगे, 8अ-सुनिता वाडेकर, 20अ-विशाल शेवाळे, 21अ-नवनाथ कांबळे, 29अ-सत्यभामा साठे हे उमेदवार आहेत.
9 सर्व प्रभागातील अपक्ष उमेदवारांची संख्या 302 आहे. यामध्ये सर्वाधिक 27 उमेदवारांनी नारळ या निवडणूक चिन्हाला पसंती दिली आहे. त्या खालोखाल 25 उमेदवारांनी बॅट हे चिन्ह घेतले आहे तर 21 उमेदवारांनी गॅस सिलेंडर, अलमारी-18, कपबशी-17, टिव्ही-16, बॅटरी-14, अंगठी व शिटी प्रत्येकी 12 उमेदवारांनी चिन्हे घेतले आहे. तर सिलींग फॅन-11, मेणबत्ती, रोडरोलर प्रत्येकी 10 उमेदवारांनी या चिन्हाला पसंती दिली आहे.
10 काँग्रेसने 34 प्रभागांमध्ये 87 जागांवर उमेदवार दिले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती 14 (महिला 7 व पुरूष-7). प्रभाग क्र. 7 ब मधून अनुसूचित जमातीमध्ये एका महिला उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. खुल्या प्रवर्गातून 51 जागांवर उमेदवार दिले असून त्यामधील 21 महिला उमेदवार आहेत. तर इतर मागासवर्गीय राखीव जागांवर 21 उमेदवारांना उमदेवारी दिली आहे. यामध्ये 9 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
11 काँग्रेसने दिलेल्या 34 प्रभागांमधील उमेदवारांमध्ये 8 प्रभागांमध्ये केवळ प्रत्येकी 1 उमेदवार दिला आहे. तर 7 प्रभागांमध्ये एकही उमेदवार काँग्रेसने दिला नाही. यामध्ये प्रभाग क्र. 4, 10, 22, 33, 37, 38 व 39 या प्रभागांचा समावेश आहे.
12 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 116 जागांवर उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्र. 8 व 24 या दोन प्रभागामध्ये उमेदवारी दिली नसून 5 प्रभागांमध्ये (4क, 5ब, 26ड, 30अ) प्रत्येकी 1 उमेदवार देण्यात आला आहे. एकूण 116 जागांमध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग या राखीव जागांवर 31 उमेदवारांना उमेदवारी दिली असून त्यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे. तर खुल्या प्रवर्गातून 70 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये 37 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जाती या राखीव जागेवर 15 उमेदवार दिले असून त्यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे.
12 राष्ट्रवादीने 129 जागांवर उमेदवारी दिली आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील 79 जागांवर उमेदवारी दिली आहे. यामध्ये 43 महिलांचा समावेश आहे. तर नागरिकांचा मागासप्रवर्ग या राखीव जागेवरून 32 उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये 15 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जाती या राखीव जागांवर 16 उमेदवार दिले असून यामधील 7 महिला आहेत. तर अनुसूचित जमातीच्या दोन्ही जागेवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने प्रभाग क्र. 16 व 18 मध्ये एकही उमेदवार दिला नसून 3 प्रभागामध्ये प्रत्येकी 1 उमेदवार देण्यात आला आहे.त्यामध्ये प्रभाग क्र. 15 क, 20अ व 24क चा समावेश आहे.
13 शिवसेनेने 149 जागांवर उमेदवार दिले आहेत. खुल्या प्रवर्गामध्ये 87 उमेदवार दिले असून त्यामध्ये 44 महिला उमेदवारांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेवर 39 उमेदवार दिले असून त्यामध्ये 18 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती या राखीव जागेवर 21 उमेदवार दिले असून त्यामध्ये 10 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या 2 राखीव जागांवर उमदेवार दिले असून त्यामध्ये एका महिला उमेदवाराचा समावेश आहे.
14 शिवसेनेने 4 प्रभागांमध्ये 8 उमेदवार दिले नाहीत. तर 5 प्रभागामध्ये प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देण्यात आला नाही. प्रभाग क्र. 1 व 2, 28, 32 मधील प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार दिले नाहीत तर प्रभाग क्र. 15ब, 20ब, 24क, 27ड, 30ब, मध्ये प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिलेले नाहीत. काही ठिकाणी राष्ट्रवादी व काँग्रेसचे उमेदवार आहेत. अशा विरोधी जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले नसल्याचे दिसून येते. तर मनसेचा प्रभावी उमेदवार असलेल्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवारी दिली नसल्याचे दिसून येते.
15 मनसेच्या रुपाली पाटील, काँग्रेसच्या चांदवी नदाफ व मनसेच्या पुनम शिंदे तसेच राष्ट्रवादीचे आनंद अलकुंटे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिलेले नाहीत. तर प्रभाग क्र. 27ड मध्ये मनसेचे साईनाथ बाबर तसेच राष्ट्रवादीचे रईस सुंडके यांच्या विरोधात देखील शिवसेनेने उमेदवारी दिली नाही.
चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.