Friday, 24 February 2017

Election 2017 मतदारांचा कल जाणण्यास यश... पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब

मतदारांचा कल जाणण्यास यश
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) च्या सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब



====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



=====================================================================

पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ करीता पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने सकाळने  सर्व प्रथम पुणे शहरात सर्वेक्षण करून मतदारांचा कल जाणून घेण्यात आला. यामध्ये भाजपलाच सर्वाधिक पसंती असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले होतेसर्वेक्षणाचे निष्कर्ष जानेवारी २०१७ रोजीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. सदरील सर्वेक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याचे अंतीम निकालावरून स्पष्ट झाले.
पुणे महापालिका निवडणूक उमेदवारांची निवड करताना सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवरील मतदारांचा कल स्थिती पाहून उमेदवारी देण्यात आली होती. सर्वेक्षणाच्या आधारावर उमेदवारांची निवड भाजपने केली होती तर सर्वेक्षणाच्या विश्लेषणाच्या आधारावर राष्ट्रवादीने कॉंग्रेसबरोबर आघाडीकरून उमेदवारांची निवड केली होती. उमेदवार निवडीच्या पार्श्वभूमीवर तसेच मित्र पक्षांच्या राजकीय भूमिकांवरून दुस-यांदा सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये भाजपच्या काही जागा कमी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र सर्वेक्षणातील निष्कर्ष पाहून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या कमकूवत जागांवर लक्ष केंद्रीत केले. तेथील उमेदवारांना यश मिळेल याबाबत सर्व राजकीय ताकद धोरणात्मक रणनीती राबविण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम निकालामध्ये दिसून आला.
पुणे शहरातील मतदारांनी विकासाला महत्व देवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिंग रोड, मेट्रो, विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, नियोजितपणे पुलांची रचना निर्मिती, सुरळीत पाणीपुरवठा या विकसनशील कामांना प्रोत्साहन मिळावे या प्रमुख कामांच्या अपेक्षेने पुणेकरांनी भाजपला साथ दिली आहे. पुणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वारंवार निवडून येणा-या स्थानिक नगरसेवकांची मक्तेदारी, मुलभूत सोर्इ सुविधांमध्ये दुजाभाव या प्रमुख कारणांमुळे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या बाबत नकारात्मक वातावरण मतदारांमध्ये जाणवले. याचा परिणाम त्यांच्या पराभवात झाल्याचे दिसून आले.
केंद्र  राज्य सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला विकासात्मक कामांसाठी निधीची उपलब्धता होर्इल ही आशा देखील मतदारांमध्ये असल्याचे जाणवले. बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीचा देखील सत्ताधारी भाजपला लाभ मिळाल्याचे दिसून येते. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने काही जागांवर केलेली आघाडी त्यांना फायदेशीर ठरली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी   शिवसेनेला इतर राजकीय पक्षाच्या उमेदवारीमुळे त्यांच्या मतात घट झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांमध्ये विशेषत: एमआयएम, बसप, रिपब्लिकन पक्ष इतर गट या प्रमुख पक्षांच्या  विरोधात उमेदवारीमुळे निश्चितच परिणाम झाल्याचे दिसून येते. मनसेच्या पक्ष नेतृत्वाकडून वारंवार होणा-या भूमिकांमधील बदल आणि स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेतील पदाधिका-यांवर अविश्वास दर्शविण्याच्या भूमिकेचा विपरीत परिणाम या निवडणूकीत झाल्याचे दिसून आले.
महापालिका निवडणुकीमध्ये ११८ विद्यमान नगरसेवक होते त्यातील काही नगरसेवक एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे लढतीमध्ये रंगत आल्याचे दिसून आले. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षिय मिळून ३४ नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. तर विविध पक्षांचे ११८ विद्यमान नगरसेवक, नगरसेविका निवडणुक रिंगणात होते.  निवडणूक निकालांचे अचूक अंदाज वर्तवणारी विश्वनीय संस्था म्हणून पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)ची नावलौकिकता आहे. अनेक निवडणुकांमध्ये सर्वेक्षण विश्लेषण यापूर्वी केले असून अचूकतेचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे.
चंद्रकांत भुजबळ
9422323533




====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.