Sunday 19 February 2017

zp election 2017 जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 69 टक्के मतदान

पहिल्या टप्प्यात 69% मतदान; 15 जि.प, 165 पंचायत समित्यांसाठी उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद


राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज सरसरी 69 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक मतदान केंद्रांवर सांयकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.या 15 जिल्हा परिषदांच्या 855 आणि 165 पंचायत समित्यांच्या 1 हजार 712 जागांसाठी मतदान झाले. या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती. गडचिरोली जिल्ह्यात मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय झालेले मतदान: अहमदनगर- 70.83, औरंगाबाद- 66.22, बीड- 68.73, बुलडाणा- 67.31, चंद्रपूर-71.75, गडचिरोली- 71.45, हिंगोली- 72.49, जळगांव- 64.14, जालना- 74.80, लातूर- 70.31, नांदेड- 71.69, उस्मानाबाद- 71.94, परभणी-74.94, वर्धा- 64.93 आणि यवतमाळ- 70 एकूण सरासरी- 69.

जिल्हानिहाय मतदान
अहमदनगर 70.83%
औरंगाबाद 66.22 %
बीड 68.73 %
बुलडाणा 67.31 %
चंद्रपूर 71.75 %
गडचिरोली 71.45 %
हिंगोली 72.49 %
जळगाव 64.14 %
जालना 74.80 %
लातूर 70.31 %
नांदेड 71.69 %
उस्मानाबाद 71.94 %
परभणी 74.94 %
वर्धा 64.93 %
यवतमाळ 70 %
एकूण सरासरी 69%

या १५ जिल्हा परिषदांतर्गतच्या १६५ पंचायत समित्यांच्या १ हजार ७१२ जागांसाठी ७,७०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर २ कोटी ४ लाख ४ हजार मतदार होते.
- मतमाेजणी अाणि निकाल २३ फेब्रुवारी राेजी जाहीर हाेणार.

Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.