Election 2017 महानगरपालिकांसाठी 9,199 उमेदवार रिंगणात
राज्यातील दहा महानगरपालिकांच्या एक हजार 268 जागांसाठी नऊ हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत; तसेच पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4 हजार 278; तर 165 पंचायत समित्यांच्या एकूण एक हजार 712 जागांसाठी सात हजार 693 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
राज्यातील 10 महानगरपालिकांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारी 2017 रोजी 15 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 165 पंचायत समित्यांसाठी मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 11 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचा दोन्ही टप्प्यांत समावेश असून पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील 8; तर दुसऱ्या टप्प्यात 4 पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागांचा समावेश आहे. मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल.
दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांच्या 654 जागांसाठी छाननीनंतर सहा हजार 367 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 118 पंचायत समित्यांच्या एक हजार 288 जागांसाठी 10 हजार 879 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. एखाद्या उमेदवाराने कितीही अर्ज दाखल केले तरी अंतिमत: प्रत्येकाचा एकच उमेदवारी अर्ज गृहीत धरला जातो. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. ही मुदत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी 15 फेब्रुवारी 2017 पर्यंत असेल.
महानगरपालिकानिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या : बृहन्मुंबई (227)- 2,271, ठाणे (131)- 1,134, उल्हासनगर (78)- 821, नाशिक (122)- 1,089, पुणे (162)- 623, पिंपरी-चिंचवड (128)- 804, सोलापूर (102)- 478, अकोला (80)- 579, अमरावती (87)- 626 आणि नागपूर (151)- 774. एकूण (1,268)- 9,199.
पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदनिहाय (कंसात एकूण जागा) उमेदवारांची संख्या : अहमदनगर (72)- 303, औरंगाबाद (62)- 323, बीड (60)- 440, बुलडाणा (60)- 333, चंद्रपूर (56)- 314, गडचिरोली (35)- 176, हिंगोली (52)- 245, जळगाव (67)- 244, जालना (56)- 266, लातूर (58)- 231, नांदेड (63)- 374, उस्मानाबाद (55)- 254, परभणी (54)- 276, वर्धा (50)- 293 आणि यवतमाळ (55)- 306. एकूण जागा (855)- 4,278. या जिल्हा परिषदांतर्गतच्या 165 पंचायत समित्या (1712)- 7,693.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.