Monday, 27 February 2017

पिंपरीत भाजप, शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ तर, राष्ट्रवादीच्या मतांची 11 टक्यांनी घट PRAB

पिंपरीत भाजपच्या मतांमध्ये 30 टक्के वाढ तर,राष्ट्रवादीच्या मतांची 11 टक्यांनी घट

शिवसेनेच्या टक्केवारीत वाढ; संख्याबळ मात्र घटले

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये यंदा तब्बल 30. 33 टक्यांची वाढ झाली आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये 10.9 टक्क्यांनी घट झाली आहे. शिवसेनेच्या मतांमध्येही 4.76 टक्यांनी वाढ झाली आहे. मात्र, शिवसेनेचे संख्याबळ घटले आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये 8.63 टक्के आणि मनसेच्या 5.22 टक्के मतांमध्ये घट झाली आहे. 
2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 39.46 टक्के मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे 83 नगरसेवक निवडून आले होते.  2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांमध्ये तब्बल 10.9 टक्यांनी घट झाली असून राष्ट्रवादीच्या सुफडा साफ झाला आहे. राष्ट्रवादीला यावेळी 28. 56 टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे 36 नगरसेवक निवडून आले आहेत. 2012 मध्ये 6.73 टक्के मते मिळवून 3 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपच्या मतांमध्ये तब्बल  30. 33 टक्यांनी वाढ झाली आहे. भाजपने सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी महापालिका ताब्यात घेतली आहे.
भाजप आणि शिवसेना 2012 मध्ये युती करून महापालिका निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेनेने 11.85 टक्के मते मिळवत 14 नगरसेवक निवडून आणले होते. यावेळी स्वबळावर लढलेल्या शिवसेनेच्या मतांमध्ये तब्बल 4.76 टक्यांनी वाढ झाली असून 16.61 मते मिळाली आहेत. परंतु, शिवसेनेचे संख्याबळ घटले असून 14 वरून 9 वर आले आहे.
काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल 8.63 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये काँग्रेसला 11.75 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी काँग्रेसला केवळ 3.12 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मनसेच्या मतांच्या टक्केवारीमध्येही 5.22 टक्यांनी घट झाली आहे. 2012 मध्ये मनसेला 6.60 टक्के मते मिळाली होती. मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मनसेला 1.38 टक्के मते मिळाली असून त्यांचा एकच नगरसेवक निवडून आला आहे. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच नोटाचा वापर करण्यात आला होता. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या मतांमध्ये यंदा चांगलीच वाढ झाली आहे. भाजप सर्वाधिक 37.06 टक्के मते घेऊन 77 जागा जिंकत पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्तारुढ झाला आहे. तर, पिंपरी महापालिकेत गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या मतांमध्ये चांगलीच घट झाली आहे. गेल्यावेळी दुस-या क्रमांकावर असलेली शिवसेना यावेळी तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे. स्वबळावर लढणा-या शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, मात्र संख्याबळ घटले आहे. काँग्रेसचा तर महापालिकेत एकही प्रतिनिधी नसणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पिंपरीत भाजपला 37 टक्के तर राष्ट्रवादीला 28 टक्के मतदान

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 37. 06 टक्के मतदान झाले आहे. तर, सत्ताधारी राष्ट्रवादीला 28. 56 टक्के मतदान झाले आहे. 37.06 टक्के मते घेऊन भाजपने 77 जागा जिंकत महापालिका ताब्यात घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 11 लाख 92 हजार 89 मतदार आहेत. त्यापैकी 7 लाख 79 हजार 060 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यामुळे एका मतदाराला चार मते करण्याचा अधिकार होता. भाजपला 11 लाख 53 हजार 060 मते मिळाली आहेत. त्यांची टक्केवारी 37.06 टक्के होत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला 8 लाख 88 हजार 659 मते मिळाली आहेत. त्यांची मतांची टक्केवारी 28. 56 टक्के होत आहे. शिवसेनाला 5 लाख 16 हजार 721 मते मिळाली असून त्याची टक्केवारी 16.61 होत आहे.
मतदारांची पसंती कमळाला होती. 37. 06 टक्के मते भाजपला मिळाली असून त्यांचे 77 नगरसेवक निवडून आले आहेत. दोन नंबरची मते सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत. 36 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. शिवसेना तिस-या क्रमांकावर असून त्यांना 16.61 टक्के एवढी मते मिळाली आहेत. एवढी मते मिळूनही शिवसेनेचे नऊच उमेदवार निवडून आले आहेत. अपक्षांना 2 लाख 67 हजार 229 मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 8.59 टक्के होत आहे. पाच अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला 97 हजार 063 मते मिळाली असून 3.12 टक्के मते होत आहेत. तीन टक्के मते मिळाली असतानाही काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. यावेळी मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्याची टक्केवारी 2.82 होत आहे.
पिपंरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 2007 ला 56.66 टक्के, 2012 मध्ये 54.84 टक्के मतदान झाले होते. यंदा प्रथमच महापालिकेच्या मताची टक्केवारी वाढली असून 65.47 टक्के मतदान झाले आहे. मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांची नोंदणी राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरली आहे. तर, मतांची वाढती टक्केवारी आणि नव मतदारांचा भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.




पिंपरी-चिंचवडमध्ये 'नोटा'वर तब्बल 87 हजार मते

पिंपळे-गुरव, सांगवी मध्ये सर्वाधिक 'नोटा'
राजकीय पक्षांनी घेतली 'नोटा'ची धास्ती
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मतदारराजाने उमेदवारांना अयोग्य ठरवत तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची 'नोटा'ची चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे. यापुढे राजकीय पक्षांना उमेदवार ठरविताना काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य नसण्याचा पर्याय म्हणजे 'नोटा' अर्थात 'यांपैकी एकही नाही' असा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 87 हजार 773  मतदारांनी आपल्या प्रभागातील उमेदवार योग्य नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक हा पैशांचा खेळ असल्याचे स्पष्ट झाले असून महापालिका निवडणूकदेखील याला अपवाद ठरलेली नाही. अशावेळी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आपल्या पसंतीचा नसल्यास मतदारांना 'नोटा' बटन दाबता येते. या नोटाचे बटन दाबून पिंपरी-चिंचवडकरांनी नापसंत उमेदवार असल्याचे म्हटले आहे.
पिंपळेगुरव, जुनी सांगवीमध्ये सर्वाधिक 'नोटा'!
पिंपळेगुरव-नवी सांगवी या परिसरात सर्वाधिक मते 'नोटा'ला मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक 31 मध्ये सर्वाधिक 4332 'नोटा' मते पडली आहेत. येथून भाजपचे तीन उमेदवार आणि अपक्ष नवनाथ जगताप निवडून आले आहेत. त्याखालोखाल सांगवी गावठाण-ढोरेनगर प्रभाग क्रमांक 32 मध्ये 4062'नोटा' मते पडली आहेत. येथेही भाजपचेच पॅनेल निवडून आले आहे. याव्यतिरिक्त निगडी-प्राधिकरणात 3889 नोट मते पडली आहेत. येथून भाजपचे दोन, राष्ट्रवादी एक आणि शिवसेनेचे एक उमेदवार निवडून आले आहेत. निगडी गावठाण-यमुनानगरमध्ये 3755,  नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, पिंपळेगुरव-क्रांतीनगर-जवळकरनगरमध्ये 3654, नढेनगर-विजयनगरमध्ये 3649, तर पिंपरीगाव-मिलिंदनगरमध्ये 3646 आणि प्रभाग क्रमांक 30 दापोडी मध्ये 3586 'नोटा' मते पडली आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी 'नोटा'चा अवंलब करण्यात आला होता. महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच 'नोटा'चा अवलंब करण्यात आला आहे. मतदारांनी तब्बल 87 हजार 773 मते 'नोटा'ला दिली आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक लढविणा-यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. यापुढे उमेदवार देतानाही राजकीय पक्षांना  काळजी घ्यावी लागेल, असे संकेत यातून मिळत आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त
774 उमेदवारांपैकी 419 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूकांचा नुकताच निकाल लागला. यामध्ये  अनेक राजकीय पक्षांची गणिते चुकली ज्यामुळे मी-मी म्हणणारे उमेदवारही तोंडघशी पडेल. या हार-जितनंतर सर्वांचे लक्ष लागते ते कोणत्या उमेदवाराची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझीट जप्त होते याच्याकडे. यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या 115 उमेदवारांपैकी 42 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त झाले आहे.
यावेळी पिंपरी महापालिकेसाठी एकूण 774 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभारले होते. त्यापैकी 419 उमेदवारांचे  डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा जो पिंपरी-चिंचवड मधील प्रबळ पक्ष म्हणून ओळखला जातो, त्याच पक्षाचे केवळ 9 उमेदवार विजयी झाले आहेत तर त्यांच्या 42 उमेदवारांचे डिपॉझीट  जप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका प्रबऴ उमेदवार शारदा बाबर यांचेही डिपॉझीट जप्त केले आहे. तर प्रभाग क्रमांक नऊ मधील शिवसेनेच्या पॅनलचेच डिपॉझीट जप्त झाले आहे.
मनसे उमेदवार अव्वल तर काँग्रेसचा दुसरा नंबर
यामध्ये मनसेचे एकूण 43 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी 25 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. तर काँग्रेसचे 80 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उभारले होते त्यापैकी 42 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. काँग्रेसनंतर  यामध्ये राष्ट्ररवादीचाही समावेश असून राष्ट्रवादीच्या 124 उमेदवरांपैकी 4 उमेदवरांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. तर महापालिकेमध्ये घवघवीत यश मिळवणा-या भाजपच्या एकाही उमेदवराचे डिपॉझीट यावेळी जप्त झालेले नाही.
डिपॉझीट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका शारदा बाबर, सुजाता टेकवडे यांचा समावेश आहे तर माजी नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या विजया जाधव, राष्ट्रवादीचे सतिश दरेकर, माजी विधी समिती सभापती विजय कापसे,  राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या शहराध्यक्षांच्या पत्नी सुप्रीया गव्हाणे,  महापालिकेचे निवृत्त अधिकारी  सुभाष माछरे, तसेच राष्ट्रवादीचे निलेश गांगार्डे यांचा समावेश आहे.

वरील आकडेवारीचा विचार केला असता  प्रभाग क्रमांक 19 मधून सर्वाधीक म्हणजे 31 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.त्याबरोबर प्रभाग 13 म्धून 30 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे. वरील आकडेवारीचा विचार केला असता  प्रभाग क्रमांक 19 मधून सर्वाधीक म्हणजे 31 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.त्याबरोबर प्रभाग 13 मधून 30 उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करण्यात आले आहे.  तीन नगरसेवकांच्या संख्याबळावरुन 77 पर्यंत पोहचलेल्या भाजपच्या एकाही उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले नाही. राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस या पक्षांना यातून आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे दिसत आहे.




भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १- कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, प्रभाग क्रमांक २ - अश्विनी जाधव, सारिका बोऱ्हाडे, राहुल जाधव, वसंत बोराटे, प्रभाग क्रमांक ३ - नितीन काळजे, सुवर्णा बुर्डे, लक्ष्मण सस्ते, प्रभाग क्रमांक ४ - विकास डोळस, लक्ष्मण उंडे, हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, प्रभाग क्रमांक ५ - सागर गवळी, प्रियांका बोरसे, प्रभाग क्रमांक ६ - यशोदा बोइनवाड, सारिका लांडगे, रवि लांडगे, राजेंद्र लांडगे, प्रभाग क्रमांक ७ - संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, नितीन लांडगे, प्रभाग क्रमांक ८ - सीमा सावळे, विलास मडिगेरी, नम्रता लोंढे, प्रभाग क्रमांक १० - अनुराधा गोरखे, केशव घोळवे, तुषार हिंगे, प्रभाग क्रमांक ११ - अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, संजय नेवाळे, एकनाथ पवार, प्रभाग क्रमांक १३ - कमल घोलप, उत्तम केंदळे, प्रभाग क्रमांक १५ – शैलजा मोरे, शर्मिला बाबर, प्रभाग क्रमांक १६ – बाळासाहेब ओव्हाळ, संगीता भोंडवे, प्रभाग क्रमांक १७ – नामदेव ढाके, माधुरी कुलकर्णी, करूणा चिंचवडे, सचिन चिंचवडे, प्रभाग क्रमांक १८ – सुरेश भोईर, राजेंद्र चिंचवडे, प्रभाग क्रमांक १९ – शैलेंद्र मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवानी, शीतल शिंदे, प्रभाग क्रमांक २० – सुजाता पालांडे, प्रभाग क्रमांक २१ – संदिप वाघेरे, प्रभाग क्रमांक २३ – मनीषा पवार, अर्चना बारणे, अभिषेक बारणे, प्रभाग क्रमांक २४ – माया बारणे, प्रभाग क्रमांक २६ – ममता गायकवाड, तुषार कामठे, आरती चोंधे, संदिप कस्पटे, प्रभाग क्रमांक २७ – बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सुनीता तापकीर, चंद्रकांत नखाते, प्रभाग क्रमांक २८ – शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, प्रभाग क्रमांक २९ – सागर आंगोळकर, उषा मुंढे, शशिकांत कदम, चंदा लोखंडे, प्रभाग क्रमांक ३० – आशा शेंडगे, प्रभाग क्रमांक ३१ – अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, प्रभाग क्रमांक ३२ – संतोष कांबळे, शारदा सोनवणे, उषा ढोरे, हर्षल ढोरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक १ – दत्तात्रय साने, प्रभाग क्रमांक ३ – विनया तापकीर, प्रभाग क्रमांक ५ – अनुराधा गोफणे, अजित गव्हाणे, प्रभाग क्रमांक ८ – विक्रांत लांडे, प्रभाग क्रमांक ९ – गीता मंचरकर, राहुल भोसले, वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, प्रभाग क्रमांक १० – मंगला कदम, प्रभाग क्रमांक १२ – प्रवीण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, पंकज भालेकर, प्रभाग क्रमांक १३ – सुमन पवळे, प्रभाग क्रमांक १४ – जावेद शेख, वैशाली काळभोर, प्रभाग क्रमांक १५ – शरद मिसाळ, प्रभाग क्रमांक १६ – प्रज्ञा खानोलकर, मोरेश्वर भोंडवे, प्रभाग क्रमांक १८ – अपर्णा डोके, प्रभाग क्रमांक २० – सुलक्षणा शिलवंत, श्याम लांडे, योगेश बहल, प्रभाग क्रमांक २१ – निकिता कदम, उषा वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रभाग क्रमांक २२ – विनोद नढे, उषा काळे, संतोष कोकणे, प्रभाग क्रमांक २५ – मयूर कलाटे, प्रभाग क्रमांक २८ – शीतल काटे, नाना काटे, प्रभाग क्रमांक ३० – राजू बनसोडे, स्वाती काटे, रोहित काटे.
शिवसेनेचे ९ नगरसेवक पुढीलप्रमाणे 
प्रभाग क्रमांक १४ – मिनल यादव, प्रमोद कुटे, प्रभाग क्रमांक १५ – अमित गावडे, प्रभाग क्रमांक १८ – अश्विनी चिंचवडे, प्रभाग क्रमांक २४ – सचिन भोसले, निलेश बारणे, प्रभाग क्रमांक २५ – अश्विनी वाघमारे, रेखा दर्शिले, राहुल कलाटे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक प्रभाग क्रमांक १३ – सचिन चिखले.
अपक्ष ५ नगरसेवक पुढीलप्रमाणे 
प्रभाग क्रमांक १ – साधना मळेकर, प्रभाग क्रमांक २२ – नीता पाडाळे, प्रभाग क्रमांक २३ – कैलास बारणे, प्रभाग क्रमांक २४ – झामाबाई बारणे, प्रभाग क्रमांक ३१ – नवनाथ जगताप.


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.