पुणे महानगरपालिका निवडणूकीत भाजपकडून करोडपती उमेदवारांना प्राधान्य
भारतीय जनता पार्टीने पुणे महापालिका निवडणुकीत सर्वाधिक संपत्ती असलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. करोडपती असलेले 105 उमेदवार आहेत. तर गुन्हे दाखल व प्रलंबित असलेल्या 30 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तसेच सामाजिक आरक्षणाचे संतुलन राखताना सर्व जाती घटकांना सामावून घेण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसिस ब्युरो (प्राब) या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या 162 जागांसाठी भाजपच्या 152 अधिकृत उमेदवारांची माहिती उपलब्ध असून माहिती उपलब्ध नसलेल्या उमेदवारांची संख्या 7 आहे तर 3 अधिकृत उमेदवार नाहीत. उपलब्ध नसलेल्या 7 उमेदवारांमध्ये पुढील प्रभागांचा समावेश आहे – 13 ब, 15 ब, 25 ब, 35 अ, 35 क, 40 ब, 41 क.
एकूण 152 उमेदवारांमध्ये पुरूष उमेदवारांची संख्या 74 आहे तर स्त्री उमेदवारांची संख्या 77 आहे.
संस्थेकडून या उमेदवारांची खालील प्रमाणे वयोगट, शिक्षण, व्यवसाय, अपत्य, वार्षिक उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, गुन्हेविषयक, सामाजिक आरक्षण, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये 152 जागांवर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांपैकी 105 उमेदवारांच्या मालमत्तेने कोटीचा आकडा ओलांडला आहे. उमेदवारी मिळालेल्यांपैकी 30 जणांवर गुन्हे दाखल आहेत. पक्षाने खुल्या 86 प्रभागांतून सर्वाधिक जागा मराठा समाजाला तर त्याखालोखाल ब्राह्मण व इतर समाजाच्या उमेदवारांना दिल्या आहेत.
उमेदवारांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न कोटींच्या घरात असणारे चार उमेदवार आहेत. कोरेगाव पार्क- घोरपडी (21) प्रभागातील उमेदवार उमेश गायकवाड यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.67 कोटी रुपये आणि मुंढवा - मगरपट्टासिटी (22) प्रभागातील उमेदवार संदीप दळवी यांचे 1.64 कोटी रुपये आहे. औंध-बोपोडी (8) प्रभागातील उमेदवार विजय शेवाळे यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 4.52 कोटी रुपये आहे आणि सर्वाधिक म्हणजे 195 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. वडगावशेरी-कल्याणीनगर (5) प्रभागातील उमेदवार योगेश मुळीक यांची 119 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.23 कोटी रुपये आहे.
धायरी-वडगाव बुद्रुक (क्र. 33) प्रभागातील नीता दांगट यांची 55 कोटी, सनसिटी-हिंगणे खुर्द (34) प्रभागातील श्रीकांत जगताप यांची 54 कोटी, सॅलिसबरी पार्क- महर्षीनगर (28) प्रभागातील उमेदवार श्रीनाथ भिमाले यांची 45 कोटी, औंध बोपोडी प्रभागातील प्रकाश ढोरे यांची 43 कोटी तर मुंढवा-मगरपट्टासिटी प्रभागातील दिलीप तुपे व बावधन - कोथरूड डेपो (10) प्रभागातील दिलीप वेडे-पाटील यांची मालमत्ता 39 कोटी रुपयांहून अधिक आहे. रास्ता पेठ - रविवार पेठ (17) प्रभागातील सुलोचना कोंढरे यांची 29 कोटी, धनकवडी-आंबेगाव पठार (39) प्रभागातील प्रवीण भिंताडे यांची 31 कोटी तर आंबेगाव-कात्रज गावठाण (40) प्रभागातील अभिजित कदम यांची 34.80 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वांत कमी मालमत्ता असलेले पाच उमेदवार असून त्यांची मालमत्ता एक लाखांमध्ये आहे. यामध्ये शबनम शेख, उमेश चव्हाण, प्रसाद होले, अश्विनी सूर्यवंशी व वैभव पवार या उमेदवारांचा समावेश आहे.
सहा उमेदवारांनी आश्चर्यकारकरित्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शून्य रुपये दाखविले असून प्रत्येकी पाच हजार व पंचवीस हजार वार्षिक उत्पन्न दाखवणारे दोनच उमेदवार आहेत.
गुन्हे
121 जण निष्कलंक
भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एकूण 30 उमेदवारांना आणि एकही गुन्हा दाखल नसलेल्या 121 उमेदवारांना संधी दिली आहे, असे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. पश्चिम पुण्यातील एका उमेदवारावर सर्वाधिक म्हणजे 11 गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येकी एक गुन्हा दाखल असलेल्या चार महिलांसह एकूण 13 उमेदवार आहेत. प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या नऊ आहे. प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे.
121 जण निष्कलंक
भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एकूण 30 उमेदवारांना आणि एकही गुन्हा दाखल नसलेल्या 121 उमेदवारांना संधी दिली आहे, असे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. पश्चिम पुण्यातील एका उमेदवारावर सर्वाधिक म्हणजे 11 गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येकी एक गुन्हा दाखल असलेल्या चार महिलांसह एकूण 13 उमेदवार आहेत. प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या नऊ आहे. प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे.
१२१ उमेदवारांवर कोणत्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. तर गुन्हे दाखल असून प्रलंबित गुन्हे असलेल्या उमेदवारांची संख्या ३० आहे.
त्यामध्ये प्रत्येकी १ गुन्हा दाखल असलेले १३ उमेदवार आहेत. त्यामध्ये ४ महिलांचा समावेश आहे. यामध्ये सुनिता वाडेकर, कल्पना बहिरट, मंगला मंत्री, मुक्ता टिळक यांच्यावर प्रलंबित गुन्हे दाखल असल्याची माहितीप्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
२ गुन्हे प्रत्येकी दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या ९ आहे. त्यामध्ये २ महिलांचा समावेश आहे. यामध्ये रेश्मा भोसले व वर्षा तापकीर या महिलांवर प्रत्येकी २ दाखल गुन्हे प्रलंबित आहेत.
३ गुन्हे प्रत्येकी दाखल असलेल्या उमेदवारांची संख्या ७ आहे. त्यामध्ये दिलीप उंबरकर, दिपक पोटे, श्रीकांत जगताप, राजेंद्र शिळीमकर, सुनिल कांबळे, प्रकाश ढोरे, राजेश येनपूरे यांचा समावेश आहे.
सर्वाधिक ११ दाखल गुन्हे प्रलंबित असलेला उमेदवार म्हणून धीरज घाटे यांचा समावेश आहे. भाजपने एकुण ३० उमेदवारांना गुन्हे दाखल असणारा उमेदवारी दिली असल्याचे प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.
सामाजिक आरक्षण
खुला प्रवर्ग मधून ८६ उमेदवार आहेत. यामध्ये सर्वाधिक मराठा समाजाचे उमेदवार असून त्याखालोखाल ब्राम्हण व इतर समाजाच्या उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात आली आहे. यामध्ये एस.सी. व एस.टी. च्याउमेदवारांना प्रत्येकी १ जागा खुल्या प्रवर्गातून देण्यात आली असून माळी, मुस्लिम, मारवाडी या जातीच्या उमदेवारांना देखील खुल्या प्रवर्गातून ३ ते ६ जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर मागासवर्ग ४५ उमेदवार आहेत. यामध्ये मराठा कुणबी जातीचे १७ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर उर्वरित २८ ओबीसी उमेदवारांमध्ये माळी-११, शिंपी-२, वंजारी-२, धनगर-२ आहेत. तर उर्वरित उमेदवारांमध्येप्रत्येकी १ उमेदवार बेलदार, भंडारी, धोबी, गोंधळी, गोसावी, गुरव, जोशी, कासार, कुंभार, सोनार व वैदु या जातींचा समावेश आहे.
अनुसूचित जाती (एस.सी.) १८ उमेदवार आहेत. यामध्ये महार समाजाचे ७ उमेदवार तर मातंग समाजाचे ८ उमेदवार असून बौद्ध, बुरूड, खाटीक या जातीचे प्रत्येकी १ उमेदवाराचा समावेश आहे.
अनुसूचित जमाती (एस.टी.) २ उमेदवार
यामध्ये महादेव कोळी व पारधी समाजाचे प्रत्येकी १ उमेदवाराचा समावेश आहे.
वयोगटनिहाय उमेदवारांची संख्या
21 ते 30 वर्षे - 23
31 ते 40 वर्षे - 54
41 ते 50 वर्षे - 51
51 ते 67 वर्षे - 23
31 ते 40 वर्षे - 54
41 ते 50 वर्षे - 51
51 ते 67 वर्षे - 23
शैक्षणिक पात्रता
प्राथमिक - 22
माध्यमिक - 18
उच्चमाध्यमिक - 11
पदवीधर - 86
पदव्युत्तर - 14
माध्यमिक - 18
उच्चमाध्यमिक - 11
पदवीधर - 86
पदव्युत्तर - 14
व्यवसायनिहाय संख्या
व्यवसाय व व्यापार - 89
नोकरी - 7
गृहिणी - 44
कृषी - 6
नोकरी - 7
गृहिणी - 44
कृषी - 6
उद्योग नाही – ५
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.