Sunday, 19 February 2017

ELECTION 2017 महापालिकेसाठी उमेदवार

महापालिकेसाठी उमेदवार 



महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 10 महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला आणि अमरावती या 10 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे.
कोणत्या महापालिकेसाठी किती उमेदवारी रिंगणात?
मुंबई : महापालिका निवडणुकीतील 227 जागांसाठी एकूण 2 हजार 267 उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 367 जणांनी आपले अर्ज मागे घेतले होते.

ठाणे : ठाण्यात 33 प्रभागांतील 131 जागांसाठी 805 उमेदवार रिंगणात असतील.

उल्हासनगर : उल्हासनगरात 78 जागांसाठी 479 उमेदवार रिंगणात आहेत.

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 2664 उमेदवारांपैकी 751 जणांनी माघार घेतली, तर 418 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. त्यामुळे आता 162 जागांसाठी 1076 उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

पिंपरी चिंचवड : महापालिका उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 128 जागांसाठी 1238 उमेदवारांपैकी 480 जणांनी माघार घेतली असून, 758 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

सोलापूर : 259 उमेदवारांनी माघार घेतली असून 102 जागांसाठी 623 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

नाशिक : निवडणुकीत 461 उमेदवारांनी माघार घेतली असून, आता 821 उमेदवार रिंगणात आहेत.

नागपूर : महापालिकेच्या 151 जागांसाठी 12 झोनमधून 1813 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील 433 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता 1141 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

अकोला : महापालिकेच्या रिंगणात 579 उमेदवार आहेत. उमेदवारी परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 157 उमेदवारांनी अर्ज परत घेतले. एकूण दाखल 881 अर्जांपैकी 145 अर्ज छाननीत बाद झाले होते. तर उरलेल्या 736 पैकी 157 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.