Friday 10 February 2017

निवडणूक २०१७ नामनिर्देशन पत्र दाखल प्रक्रियेतील चुकांची दुरुस्ती करणे बाबत राज्य निवडणूक आयोगाला २ फेब्रुवारी २०१७ ला पाठवलेले पत्र

                                                                     


दि.२ फेब्रुवारी २०१७

मा.आयुक्त
राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र राज्य
नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा रोड, मुंबई:- ४०० ०३२.


विषय – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०१७ नामनिर्देशन पत्र दाखल
प्रक्रियेतील चुकांची दुरुस्ती करणे बाबत



संदर्भ – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 नामनिर्देशन पत्रासोबत
सादर करावयाच्या शपथपत्रामध्ये सुधारणा करणेसंदर्भात.

महोदय,
 उपकृत विषयास अनुसरून आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते कि, महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारांना ऑनलाईन नामनिर्देशन पत्र व गुन्हे विषयक/ मालमत्ता विषयक शपथपत्र भरणे व त्याची प्रिंट काढून निवडणूक अधिकार्याकडे देणे बंधनकारक केले आहे. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र व गुन्हे विषयक/ मालमत्ता विषयक शपथपत्र भरणे प्रक्रियेत खूप तांत्रिक चुका आहेत त्या आपल्या निदर्शनात आणुन देत आहोत त्या दुरुस्त कराव्यात हि विनंती   
१.      नामनिर्देशन पत्रात राखीव जागेच्या उमेदवारांना जात- पोटजात निवडता येत नाही. लिस्ट मध्ये सुधारणा करावी.
२.     मालमत्ता विषयक शपथपत्र माहिती भरून झाल्यावर प्रिंट काढताना रक्कम च्या पूर्वी डॉलरचे चिन्ह येत आहे ते काढून टाकावे. चुकीचे प्रतिज्ञापत्रात तसा उल्लेख होत असल्याने कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
३.     राजकीय पक्षांना अधिकृत उमेदवार चिन्ह १ पर्याय आहे, मात्र नियमाप्रमाणे 3 चिन्हे देणे बंधनकारक असल्याने त्याबाबत खुलासा करून दुरुस्त करावे.
४.     उमेदवार यांना माहिती भरताना बहुतांशपणे सर्व्हर ला प्रोब्लेम येत असून अर्ज माहिती भरताना स्पीड मिळत नाही.
५.     ज्या उमेदवारांनी चुकीचे प्रतिज्ञापत्र डॉलर चिन्ह असलेल्या प्रिंट बाबत कायदेशीररीत्या निर्देश देण्यात यावेत जेणेकरून भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
राज्य निवडणुक आयोगाने संकेत स्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करून त्याची प्रींट काढून संबंधित निवडणुक निर्णय अधिका-याकडे सादर करण्याचा आदेश काढण्यात आला. त्याप्रमाणे  महापालिका व जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑनलार्इन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तसेच संपत्नी व गुन्हेविषयक प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. सदरील ऑनलार्इन सिस्टीममध्ये उमेदवारांचे संपत्तीविषयक विवरण शपथपत्रामध्ये जंगम व स्थावर मिळकतीचे मुल्य भरले असता प्रींट मध्ये सदरील रकमेच्या प्रारंभी डॉलरचे चिन्ह येत आहे. त्यामुळे सदरील रक्कम डॉलरमध्ये असल्याचे शपथपत्रात अधोरेखित होत आहे. या निवडणुक आयोगाच्या चुकीमुळे उमेदवारांची संपत्ती डॉलरमध्ये परिवर्तीत होत आहे. उमेदवारांनी देखील तशा स्वरूपाचे प्रतिज्ञापत्र नोटरार्इज करून निवडणुक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात उमेदवार फेरबदल करू शकत नसल्याने त्यांना संपत्ती डॉलरमध्ये दर्शविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अशा खोट्या प्रतिज्ञापत्रांमुळे निवडणुक प्रतिक्रियेबाबत कायदेशीरदृष्ट्या प्रश्न निर्माण झाले आहे. हि गांभीर्याने बाब लक्ष्यात घेऊन दुरुस्ती करावी, हि विनंती

                                                                                                               श्री. चंद्रकांत भुजबळ
                                                                                    पॉलिटिकल रिसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनेलिसेस ब्युरो (प्राब)






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.