Sunday, 19 February 2017

मतदानाची टक्केवारी : एक दृष्टीक्षेप

लोकसभा निवडणूक - 2014 मतदानाची टक्केवारी : एक दृष्टीक्षेप

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

मावळ - 33 मतदान 60.16%
विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार
झालेले मतदान
टक्केवारी
204 मावळ
276350
187487
67.84
205 चिंचवड
452649
249996
55.23
206 पिंपरी
368076
179725
48.83
188 वेल
370942
217120
58.53
189 कर्जत
236702
161915
68.40
190 उरण
247489
178221
72.01
एकूण
1952208
1174464
60.16


पुणे - 34 मतदान 54.24%
विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार
झालेले मतदान
टक्केवारी
208 वडगाव शेरी
380130
189629
49.89
209 शिवाजीनगर
270176
143353
53.06
210 कोथरूड
325916
182191
55.90
212 पर्वती
321339
176249
54.85
214 पुणे कँटोमेंट
274212
140003
51.06
215 कसबा पेठ
262020
163199
62.28
एकूण
1833794
994624
54.24


बारामती - 35 मतदान 59.40%
विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार
झालेले मतदान
टक्केवारी
199 दौंड
260581
150778
57.55
200 इंदापूर
267974
166374
62.09
201 बारामती
298208
209933
70.40
202 पुरंदर
281154
161413
57.41
203 भोर
305118
179985
58.98
211 खडकवासला
396971
197097
49.65
एकूण
1810006
1065580
59.40


शिरूर - 36 मतदान 59.77%
विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार
झालेले मतदान
टक्केवारी
195 जुन्नर
267781
180990
67.59
196 आंबेगाव
258220
186130
72.08
197 खेड आळंदी
269701
175022
64.89
198 शिरूर
298639
179596
60.14
207 भोसरी
334827
176560
52.73
213 हडपसर
391242
189834
48.52
एकूण
1820410
1088072
59.77

Election 2014 voting %


उच्चभ्रू भागात टक्का वाढविण्याचे आव्हान

वडगाव शेरी इंडियन एज्युकेशन स्कूल परिसर 8.89 टक्के, कोंढवा-लुल्लानगर 10 टक्के, पाषाण 13.52 टक्के, पद्मावती-सहकारनगर परिसर 20 टक्के, औंध 20 टक्के... ही आहे पुण्यातील सुशिक्षित आणि उच्चभ्रू भागातील 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी. गेल्या निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात केवळ 40.66 टक्के एवढे कमी मतदान झाले. सुमारे अठरा लाख मतदारांपैकी केवळ 7 लाख 34 हजार मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी 2 लाख 79 हजार मते मिळविणारा पुण्याचा लोकप्रतिनिधी बनला. या निवडणुकीत मात्र मतदानाचा हा टक्का वाढविण्याचा संकल्प पुणेकरांनी केला आहे. 

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात 75 टक्‍क्‍यांवर मतदान होत असताना शैक्षणिक-सामाजिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत पुढारलेल्या पुण्यातील मतदानाची टक्केवारी 40 आहे. ही टक्केवारी वाढावी व त्यातून चांगले लोकप्रतिनिधी निवडले जावेत, यासाठी "सकाळ‘ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने "आय विल व्होट‘ ही मोहीम राबविण्यात आली. त्यास शहरातील बहुतेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीची टक्केवारी निश्‍चित वाढेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. 

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार शहरातील पुढारलेल्या भागातील, सोसायटी आदी भागातील मतदानाची टक्केवारी 2009 च्या निवडणुकीत सरासरी 20 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत राहिली आहे. या भागातील मतदान वाढावे, यासाठी आयोगाच्या वतीने पुढाकार घेतला असून, सुशिक्षित पुणेकर यास प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. मतदान न करता केवळ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावून आपल्या पसंतीचा उमेदवार निवडावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

गेल्या निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात अनेक केंद्रांवर 35 टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान झाले होते. त्यात कोथरूड मतदान केंद्रावर 27 टक्के, पाषाण केंद्रावर 22.74 टक्के, औंध 20 टक्के अशी परिस्थिती होती. पर्वती मतदारसंघातील संदेशनगर केंद्रावर 22.83 टक्के, सहकारनगर 23.60 टक्के, बिबवेवाडी 21.31 टक्के, पद्‌मावती केंद्रावर 19 टक्के मतदान झाले होते. वडगाव शेरी मतदारसंघात झोपडपट्टी भागात मतदानाची टक्केवारी चांगली होती. मात्र, केंद्रीय विद्यालय लोहगाव येथे 12.40 टक्के, कस्तुरबा हौसिंग सोसायटी विश्रांतवाडी 18.81 टक्के मतदान झाले होते. 

जिल्ह्यातील 42 मतदान केंद्रांवर 2009 मध्ये 20 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झाल्याचीही माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागातील टक्केवारी शहरापेक्षा चांगली आहे. चिंचवडमध्ये गेल्या निवडणुकीत पिंपळे गुरव येथे 23.71 टक्के ही सर्वाधिक मतदानाचा आकडा आहे. या विधानसभा मतदार संघातील तीसपैकी 12 मतदान केंद्रांवर 20 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झाले होते. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये 23.3 टक्के मतदान झाले होते. येथे सर्वाधिक मतदान 28 टक्के असून, सर्वांत कमी 16.88 टक्के होते. 

हडपसर विधानसभा मतदारसंघात अवघे 22.16 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघातील 25 मतदान केंद्रांपैकी लुल्लानगर मतदान केंद्रातून फक्त 11 टक्के मतदान झाले. कोंढवा भागात 14 टक्के मतदान झाले होते. महंमदवाडी, घोरपडी येथे सर्वाधिक म्हणजे 26 टक्के नागरिकांनी मतदान केले. 

शिवाजीनगर मतदारसंघातील 28 पैकी एकाही मतदान केंद्रांवर 30 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले नाही. पाच मतदान केंद्रांवर 20 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आणि उर्वरित 23 केंद्रांवर 20 ते 20.99 टक्‍क्‍यांमध्ये मतदान झाले. 

दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदान झालेली केंद्र वेल्हा विधानसभा मतदारसंघ मतदार केंद्र क्रमांक 191 कडवे 8.51 
वेल्हा विधानसभा मतदारसंघ मतदार केंद्र क्रमांक 304 सोदे सर्फाळा 8.91 
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक 181, इंडियन एज्युकेशन स्कूल 8.89 
भोर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र 299, केतकावळे 3.18
Political Research and Analysis Bureau (PRAB)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.