Monday, 25 December 2017

तमिळनाडूत झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन विजयी

तमिळनाडूत झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन विजयी


तमिळनाडूत "अण्णा द्रमुक'च्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या राधाकृष्णनगर (आर. के. नगर) मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शशिकला गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन हे विजयी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिनकरन यांच्या विजयामुळे राज्यातील समीकरणेच बदलण्याची शक्‍यता आहे. दिनकरन यांनी आपणच जयललिता यांचे खरे वारसदार आहोत, असे सांगत पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील सरकार कोसळेल, असा दावा केला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाकडे आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. कारण आजच्या निकालामुळे आम्ही खरे "अण्णा द्रमुक' आहोत हे सिद्ध झाले आहे. जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचा कौल नेमका कोणाला आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले. हा दीड कोटी मतदारांचा विजय असून, पुढील तीन महिन्यांमध्ये "अण्णा द्रमुक' सत्तेतून बेदखल झालेला असेल.'' दरम्यान या निकालानंतर दिनकरन गटाची ताकद वाढणार असल्याने सत्ताधारी "अण्णा द्रमुक' सावध झाला आहे. जयललिता यांच्या निधनानंतर "अण्णा द्रमुक' तीन गटांमध्ये विभागल्या गेला होता. पलानीस्वामी, पनीरसेल्वम आणि दिनकरन अशी तीन पाती यातून निर्माण झाली होती. दिनकरन यांच्या गटाने "अण्णा द्रमुक'च्या अधिकृत पक्ष चिन्हावरदेखील दावा सांगितला होता; पण त्यांचा हा दावा निवडणूक आयोगासमोर टिकाव धरू शकला नाही.

प. बंगालमध्ये "तृणमूल'चा वरचष्मा 


पश्‍चिम बंगालमधील सबांग विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार गीताराणी भूनिया 64 हजार 192 मतांच्या फरकाने विजयी झाल्या असून, त्यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या रिता मोंडल यांना पराभूत केले. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवार अंतरा भट्टाचार्य या तृतीयस्थानी राहिल्या.या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पुढील महिन्यात पश्‍चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर तृणमूलच्या उमेदवाराचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

Saturday, 23 December 2017

चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष

चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी, तर 7 जण निर्दोष

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशातील चारा घोटाळा प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह  सगळ्या दोषी आरोपींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. सोमवारपासून न्यायलयाला ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्यामुळे न्यायलायचे कामकाज २ जानेवारीला सुरू होईल. त्यानंतर ३ जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांनी लालूप्रसाद यादव यांना रांची तुरुंगात घेऊन जाण्यासाठी ताब्यात घेतले आहे.चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे, तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी हा निर्णय दिला. लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी ठरले आहेत, तर जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 7 जण निर्दोष सुटले आहेत. 2018 मध्ये म्हणजे पुढील वर्षी 3 जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जणांना शिक्षा सुनावली जाईल  लालूप्रसाद यादव यांच्यासह दोषींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र तोपर्यंत लालूप्रसाद यादव यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे नवे वर्ष तुरुंगातच जाणार आहे.  कोट्यवधी रूपयांचा चारा घोटाळा देशभरात चांगलाच गाजला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांना गमवावे लागले होते. चारा घोटाळा प्रकरणात जगन्नाथ मिश्रा यांच्यासह एकूण ६ जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव यांना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवले जात आहे अशी टीका राजदचे नेते मनोज झा यांनी केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर अजूनही पूर्ण विश्वास आहे. आम्ही यापेक्षा वरच्या कोर्टात दाद मागू असेही झा यांनी स्पष्ट केले. 1996 साली चारा घोटाळा उघड झाला होता. त्यावेळी हा घोटाळा 950 कोटी रुपयांचा होता.

चारा घोटाळा नेमका काय होता?

चारा घोटाळ्याप्रकरणी रांचीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी  निर्णय दिला. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे मुख्यमंत्रीपद आणि खासदारकी गमावण्यासाठी हाच घोटाळा कारणीभूत ठरला होता. याप्रकरणातील एका खटल्यात २०१३ मध्ये लालूंना दोषी ठरवण्यात आले होते. शनिवारी न्यायालयाने देवघर कोषागारातील भ्रष्टाचाराबाबत हा निर्णय दिला. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत.आजचा निर्णय देवघर तिजोरीमधून काढलेल्या रकमेशी संबंधित आहे. यात लालूंनी 90 लाख रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप आहे.चारा घोटाळ्यात 900 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. दरम्यान, देवघर ट्रेझरी (कोषागार) मधून अवैध रीतीने 1991 ते 1994 दरम्यान 6 बनावट वाटपपत्रांतून 89,04,413 रुपये काढण्यात आले. तर बिहार सरकारकडून औषध आणि चारा खरेदीसाठी फक्त 4 लाख 7 हजार रुपयेच पास करण्यात आले होते. बिहारचे तत्कालीन सीएम आणि अर्थमंत्री लालू प्रसाद यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी पदाचा दुरुपयोग करत याप्रकरणी चौकशीसाठी आलेल्या फाइलला 5 जुलै 1994 ते 1 फेब्रुवारी 1996 पर्यंत अडकवून ठेवले. पुन्हा 2 फेब्रुवारी 1996 रोजी तपासाचे आदेश दिले, तोपर्यंत चारा घोटाळ्याचे प्रकरण समोर आलेले होते.लालू प्रसाद आणि डॉ. जगन्नाथ मिश्र यांच्याशिवाय इतर आरोपींमध्ये बिहारचे माजी मंत्री विद्यासागर निषाद, जगदीश शर्मा, आरके राणा, ध्रुव भगत, फूलचंद सिंह, महेश प्रसाद, बेक जूलियस, एसी चौधरी, डॉ. कृष्ण कुमार प्रसाद, सुधीर भट्टाचार्य, त्रिपुरारी मोहन प्रसाद, संजय अग्रवाल, ज्योति झा, गोपीनाथ दास, सुनील गांधी, सरस्वती चंद्र, साधना सिंह, राजाराम जोशी आणि सुशील कुमार यांचा समावेश आहे.

* शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी चारा पुरवला जावा या उद्देशाने सरकारतर्फे मदत योजना राबवली जाते. बिहारच्या स्थापनेपासून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
* सरकारी अधिकारी जनावरांची संख्या निश्चित करुन त्याप्रमाणे चारा खरेदीसाठी अनुदान द्यायचे. या अनुदानाचा हिशेब नंतरच्या महिन्यात देणे अपेक्षित असते. परंतू या प्रकरणात कोणताही हिशोब दिला गेला नाही.
* देशाचे तत्कालीन महालेखापाल टी. एन. चतुर्वेदी यांना १९८५ साली पहिल्यांदा या प्रकरणात काही काळेबेरे असल्याचा संशय आला. बिहार सरकार या खर्चाचे हिशेबच देत नसल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारला खडसावले होते.
* १९९२ साली बिहार सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिंदुभूषण त्रिवेदी या पोलीस अधिकाऱ्याने या घोटाळ्याची चौकशी देखील केली. बिहारच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी अहवाल देखील दिला. मात्र, त्रिवेदी यांची तडकाफडकी बदली आणि हे प्रकरण थंड पडले.
* जानेवारी १९९६ मध्ये प. सिंगभूम जिह्याचे उपायुक्त अमित खरे यांनी या प्रकरणी धाडी घालण्यास सुरुवात केली आणि चारा घोटाळ्याचे घबाडच त्यांच्या हाती लागले.
* चारा घोटाळ्यात अनेक संस्थांना अनुदान देण्यात आले. या संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हत्या, अशी माहिती समोर आली.
* मार्च १९९६ मध्ये पाटणा हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिले.
* जून १९९७ मध्ये सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. यात ५५ आरोपींचा समावेश होता. भारतीय दंड संहितेतील कलम ४२० (फसवणूक), १२० ब (गुन्हेगारी कट रचणे) आणि भ्रष्टाचार निर्मुलन कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
* २० वर्षांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर चारा घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदा तुरुंगात जाण्याची वेळ आली. त्यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी पाटण्यात अक्षरश: धिंगाणा घातला होता.
* ऑक्टोबर २००१ मध्ये सुप्रीम कोर्टाने झारखंड राज्याच्या निर्मितीनंतर हा खटला झारखंडमधील न्यायालयात वर्ग केला.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लालूप्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांच्या विरोधात ईडीने दाखल केले आरोपपत्र



दिल्लीत अमंलबजावणी संचनालयाने (ईडी)  लालूप्रसाद यादव यांची थोरली कन्या आणि खासदार मिसा भारती विरोधात मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. मीसा भारती यांचा बंगला आणि कार्यालयांवर ईडीने छापा टाकला होता.दिल्लीतील एका कोर्टात मीसा भारती यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी 1 हजार कोटी रुपयांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मीसा यांची चौकशी करण्यात आली होती. इतकेच नाही तर ईडीने मीसा यांच्या दिल्लीसह इतर 3 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. नंतर मीसा या पतीसोबत प्राप्तीकर विभागात चौकशीला सामोरे गेल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात ईडीने मीसा भारती यांचे दिल्लीनजीक बिजवासन भागातील फार्म हाऊस सील केले होते. हे फार्म हाऊस मीसा आणि पती शैलेश यांच्या नावे आहे. मीसा आणि शैलेश यांनी चौकशीत उलटसूलट उत्तरे दिल्यानंतर ईडीने हे पाऊल उचलले होते. शेल कंपन्यांकडून मिळालेल्या ब्लॅकमनीतून मीसा आणि शैलेश यांनी फार्म हाऊस खरेदी केल्याचा आरोप आहे. मिसा आणि शैलेश यांना 4 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 1 कोटी 20 लाख रुपये मिळाले होते. सन 2008-09 मध्ये शेल कंपन्यांनी मिसा यांना पैसा दिला होता. या काळात लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)





Thursday, 21 December 2017

अपक्ष आमदाराचा भाजपला बिनशर्त पाठिंबा;अखेर गुजरातमध्ये भाजपचं 'शतक' पूर्ण!

अपक्ष आमदाराचा भाजपला बिनशर्त पाठिंबा; गुजरातमध्ये भाजपचं 'शतक' पूर्ण!


गुजरात विधानसभेच्या निवडणुक निकालानंतर चार दिवसांतच भाजपचं 'शतक' पूर्ण झाले आहे. गुजरातमधील एका अपक्ष आमदारानं गुरुवारी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता त्यांच्या सरकारला १०० आमदारांचं बळ मिळाले आहे. काँग्रेसनं तिकीट न दिल्यानं रतनसिंह राठोड यांनी लुनावाडा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत ते विजयी झाले होते. त्यांना ५५,०९८ मतं मिळाली होती. गुजरातमध्ये जे तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले, त्यांच्यापैकी रतनसिंह राठोड हे एक. परंतु, आता ते सत्ताधारी भाजपचाच भाग झालेत. राज्यपालांना पत्र पाठवून त्यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गुजरातमध्ये गेल्या २२ वर्षांत भाजपला कधीच शंभरपेक्षा कमी जागा मिळाल्या नव्हत्या. १९९५ (१२१ जागा), १९९८ (११७ जागा), २००२ (१२७ जागा), २००७ (११७ जागा) आणि २०१२ (११५ जागा) या पाचही निवडणुकांमध्ये त्यांनी शंभरचाच नव्हे, तर ११५ चा आकडा ओलांडला होता. परतु, यंदाच्या निवडणुकीत त्यांना ९९ जागांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे विजयाचा म्हणावा तसा आनंद त्यांना मिळाला नव्हता. आता राठोड यांच्या पाठिंब्यामुळे गुजरात विधानसभेत भाजपचं शतक पूर्ण झाले आहे.

Gujarat - 122 Lunawada

CandidatePartyVotes    
RATHOD RATANSINH MAGANSINHIndependent55098 
PATEL MANOJKUMAR RAYAJIBHAIBharatiya Janata Party51898 
PARMAR PARANJAYADITYASINHJI KRISHNAKUMARSINHJIIndian National Congress47093 
SOLANKI BHUPENDRASINH PRABHATSINHIndependent8660 
HIRENKUMAR GIRISHBHAI PATELRashtriya Samaj Paksha4654 
VISHALSINH MAHENDRASINH SOLANKIIndependent1553 
PATEL HARIDAS REVABHAIBahujan Samaj Party1053 
SHEIKH MOHAMMADANVER MOHAMMADISHAKIndependent992 
SHEKH JAKIRHUSEN HUSENMIYAIndependent626 
None of the AboveNone of the Above3419 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)




विजय रुपानी मुख्यमंत्रिपदी कायम

गुजरातमध्ये काठावरचं बहुमत मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी ठरल्यानंतर भाजप राज्यात नेतृत्वबदल करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांना कायम ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विजय रुपानी यांची विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्याचवेळी नितीन पटेल यांनाही उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्यावरही आज नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या नव्या महापौर; शिवसेनेचा पाठिंबा

काँग्रेसच्या स्वाती येवलुजे कोल्हापूरच्या महापौर; शिवसेनेचा पाठिंबा, उपमहापौरपदी सुनील पाटील


कोल्हापुरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत  काँग्रेसच्या स्वाती यवलुजे या विजयी झाल्या. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनील पाटील यांचा विजय झाला. शुक्रवारी झालेल्या महासभेत यवलुजे यांना  48 इतकी मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभारलेल्या भाजपच्या मनीषा कुंभार यांना 33 मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सुनील पाटील यांना देखील 48 मते मिळाली. तर ताराराणी आघाडीचे उमेदवार कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. पालिकेच्या सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांची निवड निश्चित मानली जात होती. निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी व्हिप जारी केला होता.पालिकेत काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 15, ताराराणी आघाडीचे 19, भाजपचे 14 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत. महापौर , उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.

कोल्हापूरचे पक्षीय बलाबल  

एकूण नगरसेवकांची संख्या - 81
काँग्रेस - 29
राष्ट्रवादी काँग्रेस - 15
भाजप - 14
ताराराणी आघाडी - 19
शिवसेना - 4.
या आकड्यांनुसार काँग्रेस आघाडीकडं 44 नगरसेवक आहेत. तर भाजप ताराराणी आघाडीकडं 33 नगरसेवक आहेत. त्यामुळं आता शिवसेना याबाबत कुणाला मतदान करणार याची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)


Wednesday, 20 December 2017

गुजरातेत 182 आमदारांत 47 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

गुजरातेत 182 आमदारांत 47 जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी


२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत नवनिर्वाचित १८२ पैकी ४७ आमदारांची (२६%)पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. २०१२ मध्ये गुन्हेगारी इतिहास असलेले ५७ (३१%)आमदार होते. आता ३३ अामदारांवर (१८%) हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार यासारखे गंभीर आरोपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१२ च्या तुलनेत गंभीर गुन्हे असलेल्या आमदारांची संख्या घटली आहे.
नवनिर्वाचित १८२ अामदारांच्या शपथपत्रांचे असोसिएशन फाॅर डेमॉक्रेटिक रिफॉर्म तसेच पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) सह अन्य संस्थांनी याचे विश्लेषण केले आहे.. गुजरात इलेक्शन वॉचचे समन्वयक पंकित जोग यांनी सांगितले, भारतीय ट्रायबल पार्टीचे महेश वसावा आणि काँग्रेसच्या भावेश कटारा या नवनिर्वाचित अामदारांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. ६ आमदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. भाजपचे शहेरा येथील आमदार जेठा भरवाड (अहिर)यांच्याविराेधात बलात्काराचा आरोप आहे. पक्षनिहाय स्थिती जाणून घेतली असता, भाजपच्या ९९ पैकी १८(१८%), काँग्रेसच्या ७७ पैकी २५ (३२%)बीटीपी दोनपैकी एक (५०%) एनसीपीचे एक आणि ३ अपक्षांंपैकी दोघांवर (६७%)गंभीर आरोप आहेत. नवनिर्वाचित १४१(७७%)कोट्यधीश आहेत. २०१२ मध्ये १३४ पैकी (७४%) आमदार कोट्यधीश होते. भाजप ९९ पैकी ८४(८५%) काँग्रेसचे ७७ पैकी ५४(७०%), बीटीपीचे २ (१००%), एनसीपी १ (१००%) यांच्याकडे १ कोटींहून अधिक संपत्ती आहे.

 १८२ पैकी १३(७%)नी उत्पन्नांचा स्रोत सांगितलेला नाही, २० (११%)नी आयकराचे विवरण दिले नाही, २०१२ मध्ये निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती ७.४१ कोटी होती. २०१७ मध्ये ती १०.७१ कोटी झाली. २०१२ च्या तुलनेत २०१७ मध्ये ३.३० कोटी(४५%)संपत्ती वाढली. ९६ (५३%)आमदारांचे शिक्षण ५ वी ते १२वीपर्यंत, ६७(३८%)अामदारांचे शिक्षण पदवी किंवा त्याहून अधिक, ७ आमदार साक्षर आणि १ निरक्षर, २१ (१२%)आमदारांचे वय २५ ते ४० वर्षे. १२१ आमदारांचे(६६%)वय ४१ ते ६० आणि ४० (२२%)चे वय ६१ ते ८० आहे. १८२ अामदारापैकी १३(७%) महिला आमदार आहेत. २०१२ मध्ये १६(९%) महिला होत्या. यात भाजपच्या ९ व काँग्रेस ४ आहेत.

7 उमेदवारांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त

 गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम राहिली. विजय रूपाणी यांच्या सरकारमध्ये ऊर्जा मंत्री राहिलेले सौरभ पटेल बोतड मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. या वेळी निवडणुकीत 7 उमेदवार असे आहेत ज्यांची संपत्ती 100 कोटींपेक्षा जास्त होती. दासक्रोईमधून काँग्रेस उमेदवार पंकज पटेल 231 कोटींचे मालक आहेत, दुसरीकडे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना टक्कर देणारे राजकोट वेस्टमधून उभे राहिलेले इंद्रनील राजगुरू 141 कोटींचे मालक आहेत. तथापि, या 7 पैकी फक्त तिघांनाच विजय मिळवता आला.
बोतडमधून विजय मिळवणारे भाजप उमेदवार सौरभ यशवंतभाई पटेल गुजरातच्या नव्या विधानसभेतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. ते 124 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फिया कॉलेजवरून टेक्सटाइल मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी मिळवणारे सौरभ बिझनेसमन आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 1.1 कोटी आहे, दुसरीकडे वाय. इला वार्षिक दीड कोटींच्या जवळपास कमवतात. ईला 5 कोटींची ज्वेलरी घालतात. त्यांच्याकडे 40 कोटींचे बाँड्स आणि शेअर्स आहेत. सौरभ यांचे गुजरातमध्ये तीन बंगले आहेत, यांची एकत्रित किंमत 19.12 कोटी आहे. एवढी संपत्ती असूनही त्यांच्याकडे एकही कार नाही. अंबानींचे जावई- सौरभ यांची पत्नी ईला मुकेश आणि अनिल अंबानींची फर्स्ट कझन आहे. त्यांचे वडील रमणिकभाई अंबानी धीरूभाई अंबानींचे मोठे भाऊ होते.या नात्यामुळे सौरभ पटेल अंबानी कुटुंबाचे जावई आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 




Monday, 18 December 2017

गुजरात विधानसभा निवडणूक-२०१७ ; राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी

गुजरात विधानसभा निवडणूक-२०१७

कुतीयाना विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी


कुतीयाना विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार विजयी झाला आहे. कानधलभाई जडेजा असे विजयी उमेदवाराचे नाव असून भाजपच्या लक्ष्मणभाई वडेरा यांचा २३७०९ मतांनी पराभव केला आहे. ते गेल्या निवडणुकीत १८४७४ मतांनी विजयी झाले होते या निवडणुकीत देखील सलग विजय प्राप्त केला आहे.



Gujarat - Kutiyana
Result Declared
CandidatePartyVotes
JADEJA KANDHALBHAI SARMANBHAINationalist Congress Party59406
ODEDRA LAKHAMANBHAI BHIMABHAIBharatiya Janata Party35697
MODEDRA VEJABHAI LILABHAIIndian National Congress11670
VRAJLAL PABABHAI SADIYABahujan Samaj Party3169
SHAMLA RAMABHAI GOGANBHAIIndependent1913
VAGHELA LALJIBHAI SOMABHAIIndependent884
KHUNTI KANABHAI JAKHRABHAIIndependent453
RATHOD CHANDULAL MOHANBHAIIndependent418
BHATT NITINBHAI VRAJLALIndependent245
ODEDARA BALUBHAI RAMABHAIIndependent201
JOSHI HARISH LILADHARIndependent199
KADEGIYA GANGABHAI KANABHAIIndependent165
None of the AboveNone of the Above3475
जाडेजा काधलभाई सरमनभाईनेशनलिस्ट कांग्रेस पार्टी59406
ओडेदरा लखमणभाई भीमाभाईभारतीय जनता पार्टी35697
मोडेदरा वेजाभाई लीलाभाईइंडियन नेशनल कांग्रेस11670
व्रजलाल पबाभाई सादियाबहुजन समाज पार्टी3169
शामणा रामाभाई गोगनभाईनिर्दलीय1913
वाघेला लालजीभाई सोमाभाईनिर्दलीय884
खूंटी कानाभाई जखराभाईनिर्दलीय453
राठोड चंदुलाल मोहनभाईनिर्दलीय418
भट्ट नितिनभाई व्रजलालनिर्दलीय245
ओड़ेदरा बालुभाई रामाभाईनिर्दलीय201
जोषी हरीश लीलाधरनिर्दलीय199
कडेगीया गांगाभाई कानाभाईनिर्दलीय165
इनमें से कोई नहींइनमें से कोई नहीं3475



गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराने बाजी मारली आहे. महात्मा गांधीजींचं जन्मगाव असणाऱ्या पोरबंदरमधील कुटियाना विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कांधल जाडेजा हे विजयी झाले आहेत. कांधल हे गुन्हेगारी विश्वात 'गॉडमदर' म्हणून ओळख असणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत.कांधल जाडेजा यांनी भाजपच्या लखमन ओडेदरा यांचा 23 हजार 709 मतांनी पराभव केला, तर काँग्रेसचे वेजाभाई मोडेदरा हे तिसऱ्या स्थानावर राहिले. कांधल हे कुटियानातूनच मागच्या वेळीही आमदार होते. त्यामुळे या विजयाने त्यांनी एकप्रकारे आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एकूण 72 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातील जागा जिंकता आली.याआधीही राष्ट्रवादीने दोनवेळा गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. 2007 साली पहिल्याच वेळी 3 आमदार, 2012 साली 2 आमदार विजयी झाले होते आणि आता म्हणजे 2017 साली 1 आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आधीच्या जागाही राष्ट्रवादीला राखता आल्या नाहीत.

गांधींच्या पोरबंदरमध्ये 'गॉडमदर'चा मुलगा विजयी
कांधल जाडेजा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते चर्चेत राहिले. त्याला दोन महत्त्वाची कारणं आहेत, एक म्हणजे, महात्मा गांधींचा वारसा ज्या जिल्ह्याला लाभला आहे, त्या पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून कांधल उभे होते आणि दुसरं कारण म्हणजे, कांधल हे गुन्हेगारी विश्वातील 'गॉडमदर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोकबेन जाडेजाचे पुत्र आहेत. आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर कांधल विजयी झाले असल्याने ते कुटियानाचं पुन्हा एकदा नेतृत्त्व करणार आहेत. ते याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचेच आमदार होते.

'गॉडमदर' संतोकबेन जाडेजा कोण होती?
1980-90 च्या दशकात गुजरातमधील पोरबंदर भागात संतोकबेन जाडेजाची प्रचंड दहशत होती. पतीच्या हत्येनंतर संतोकबेनच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, मात्र त्यानंतर गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवून डझनहून अधिक हत्यांचे डाग त्यांनी कपाळी लावले. 2011 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडलेल्या या कुख्यात 'लेडी डॉन'चा प्रवास भयंकर दहशतीचा आहे.संतोकबेनच्या पतीचं म्हणजे सरमन मुंजा जाडेजा हे महेर समाजाचे नेते होते. मात्र नंतर त्यांनी पुढे गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकलं आणि 1986 च्या डिसेंबर महिन्यात काळा केशव गँगने टोळीयुद्धातून त्यांची हत्या केली. पतीच्या हत्येचा बदला म्हणून संतोकबेनही गुन्हेगारी विश्वात आली आणि कुख्यात 'लेडी डॉन' बनली.गुन्हेगारी विश्वातील कुख्यात कारवायांमध्ये 14 हत्या तिच्या नावावर आहेत. यातले अनेकजण विरोधी टोळीतले आहेत. सत्तेसाठी तिच्या पतीची हत्या केल्याच्या रागातून तिने या हत्या केल्या. बलात्काऱ्यांना आसरा दिल्याचाही तिच्यावर आरोप होता.1990 ते 1995 या काळात संतोकबेन गुजरात विधानसभेत आमदार म्हणूनही गेली होती. पोरबंदर जिल्ह्यातील ती पहिली महिला आमदार होती.संतोकबेनवर 1999 साली 'गॉडमदर' नावाचा सिनेमाही येऊन गेला. फारसा चालला नसला, तरी या सिनेमाची चर्चा खूप झाली. यात संतोकबेनच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी होत्या. या सिनेमातील भूमिकेसाठी शबाना आझमींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारही गौरवण्यात आले होते.एकंदरीत, सत्य आणि अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पोरबंदर जिल्ह्यातील 'संतोकबेन जाडेजा' नावाचा हिंस्र आणि कुख्यात इतिहास 2011 साली संपला. 31 मार्च 2011 साली संतोकबेन हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडली. याच संतोकबेन जाडेजाचा मुलगा कांधल जाडेजा आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुजरात विधानसभेत कुटियानाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्त्व करणार आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

शिवसेनेचे राज्यातील मंत्री शिवतारे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवार बहुमताने विजयी

शिवसेनेचे राज्यातील मंत्री शिवतारे यांनी प्रचार केलेल्या भाजप उमेदवार विजयी

शिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. त्या 110819 भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत.

Gujarat - Choryasi
Result Declared
CandidatePartyVotes
PATEL ZANKHANA HITESHKUMARBharatiya Janata Party173882 
PATEL YOGESH BHAGWANIndian National Congress63063
AJAY CHAUDHARIIndependent9708
RAJBHAR RAMSINGH GANESHBahujan Samaj Party1698
RAJPUT ARVIND UTTAMSINHShivsena1104
BHUPENDRA RAMAKANT SONVANE (BHAAU)Independent841
PATHAN NURMAHMED NABIALAMIndependent792
SHINDE RANJAN JAGANBahujan Mukti Party661
VINODBHAI UDAYBHAI AHIRSardar Vallabhbhai Patel Party334
PATEL YOGESH VIRAMBHAIRashtriya Samaj Paksha332
RAMJAN BHILUBHAI MANSURI (JOURNALIST)Yuva Sarkar228
SHARMA RAJMAL MOHANLAL (RAJUBHAI)Svatantra Bharat Satyagrah Party193
None of the AboveNone of the Above2842

 सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार  झंखाना पटेल या 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे राज्यातील मंत्री विजय शिवतारे सूरतमध्ये झंखाना पटेल यांच्या प्रचारासाठी गेल्याने  राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. झंखाना यांना 1 लाख 73 882 मते मिळाली त्यांनी काँग्रेसच्या योगेश भगवान पटेल यांचा पराभव केला. योगेश पटेल यांना 63 हजार 63 मते मिळाली. चोरयासीमधून शिवसेनेचे उमेदवार अरविंद  उत्तमसिंह राजपूतही निवडणूक लढवत होते. त्यांना फक्त 1104 मते मिळाली. शिवसेनेने भाजपाला धक्का देण्यासाठी गुजरातमध्ये उमेदवार उभे केले होते. पण शिवसेनेचे राज्यातील मंत्रीच सूरतमध्ये जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे वृत्त आल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थतता निर्माण झाली होती. शिवसेनेचे पुरंदर येथील आमदार विजय शिवतारे 22 नोव्हेंबरला सूरतच्या चोरयासी विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार झंखाना पटेलच्या प्रचारासाठी गेले होते. झंखाना भाजपाचे दिवंगत आमदार राजा पटेल यांची मुलगी आहे. झंखानाच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित होते. विजय शिवतारे राज्याचे जलसंवर्धन राज्यमंत्री आहेत. चोरयासी मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2015 साली चोरयासीचे स्थानिक आमदार राजा पटेल याचे डेंग्युने निधन झाले. त्यानंतर इथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने झंखाना पटेल यांना उमेदवारी दिली. झंखानानेही विजय मिळवून जागा कायम राखली होती. देशात अन्य कुठल्याही शहराचा सूरत इतका वेगाने विकास झालेला नाही असे शिवतारे सभेमध्ये म्हणाले होते. मी माझ्या पक्षाच्यावतीने इथे आलेलो नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आलोय. राजाभाई पटेल माझे जवळचे मित्र होते. मुंबईत काहीकाळ आम्ही दोघांनी एकत्र घालवला. राजाभाई आणि मी एकाचवेळेस राजकारणात प्रवेश केला. त्यांनी जमलेल्या नागरिकांना झखांना पटेलला मतदान करण्याचे आवाहन केले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)