Thursday, 28 March 2019

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात नांदेड, बीड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात


निवडणूक लढविण्यासाठी अपक्षांची रेलचेल ; नांदेड मध्ये 55 तर बीड मधून 53 सर्वाधिक उमेदवारी अर्ज
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक नांदेड, बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडणूक रिंगणात असून निवडणूक लढविण्यासाठी अपक्षांची नांदेड मध्ये 55 तर बीड मधून 53 सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करणारांची रेलचेल दिसून येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात १० मान्यताप्राप्त/अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार असून तब्बल 43 अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. तर नांदेड मध्ये 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आज पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे माघार घेण्याच्या अखेरचा दिवस होता. मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती.

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ - 14, रामटेक मतदारसंघ - 16, नागपूर मतदारसंघ - 30, भंडारा-गोंदिया मतदारसंघ - 14, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ - 5, चंद्रपूर मतदारसंघ - 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला -12, अमरावती -34, हिंगोली -34, नांदेड-55, परभणी-21, बीड-53, उस्मानाबाद-20, लातूर-12 आणि सोलापूर -24.

आचारसंहिता कालावधीत राज्यात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल

 निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. निवडणूक प्रशासनाकडून राज्यात काटेकोर पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परवाना नसलेली 328 शस्त्रे, 81 काडतुसे आणि 8 हजार 302 जिलेटीन आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 797 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 131 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्रपरवाने  रद्द करण्यात आले आहेत. फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 63 हजार 608 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 16 हजार 380 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 6 हजार 228 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 19 हजार 157 प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली असून 21 हजार 264 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.

34-पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सौरभ के.तिवारी खर्च निरीक्षक

पुणे लोकसभा मतदार संघासाठी सौरभ के.तिवारी यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौरभ के.तिवारी यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-202 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969500 असा असून expobs2019pune34@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल असे, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
----------------------------------------------------------------------------

35-बारामती लोकसभा मतदारसंघासाठी रोहित राज गुप्ता खर्च निरीक्षक

35-बारामती लोकसभा मतदार संघासाठी रोहित राज गुप्ता यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रोहित राज गुप्ता यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-203 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969501 असा असून expobs2019baramati35@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
------------------------------------------------------------------------------

जिल्हादंडाधिका-यांचा प्रतिबंधात्मक आदेश

पुणे जिल्ह्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण  जिल्ह्यात दि. 27 मे 2019 अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे/हत्यारे दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई केली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बॅंका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही. याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची अधिकाऱ्यांवर राहिल.
सदरचा आदेश दि. 27 मे 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा

जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) बैठक जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,  आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्‍य-सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. पुणे जिल्‍ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील पेड न्‍यूज (प्रदत्‍त बातमी) तसेच सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. या माध्‍यमांवर विना परवानगी जाहिराती आढळून आल्‍यास तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे निर्देशही  त्‍यांनी दिले.  नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जाईल, असे सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तळमजल्‍यावरील मिडीया सेंटरमध्‍ये तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================






Wednesday, 27 March 2019

#Pune, Baramati Nomination process उद्यापासून तिसरा टप्प्यातील ‘नॉमिनेशन’ प्रक्रिया; पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघात उमेदवारी अर्ज उद्यापासून भरण्यास प्रारंभ

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) कसा भरावा व आवश्यक कागदपत्रे 


पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघात उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने लढत अजूनही स्पष्ट झालेली नाही. तर बारामती मतदारसंघात भाजपच्या रंजना कुल आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान तिस-या टप्पामध्ये महाराष्ट्रातील 14 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. आज दि. 28 मार्च ते 4 एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत तिसरा टप्पा करीता नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तिसरा टप्पा करीता 28 मार्च 2019 उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 23 एप्रिलला मतदान होणा-या या तिस-या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघामध्ये ३-जळगाव लोकसभा मतदारसंघ, ४-रावेर लोकसभा मतदारसंघ, १८-जालना लोकसभा मतदारसंघ, १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ, ३४-पुणे लोकसभा मतदारसंघ, ३५-बारामती लोकसभा मतदारसंघ, ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, ४३-माढा लोकसभा मतदारसंघ, ४४-सांगली लोकसभा मतदारसंघ, ४५-सातारा लोकसभा मतदारसंघ, ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, ४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, ४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे. या 14 मतदारसंघात अजूनही काही राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाहीत तर काही जागांवर उमेदवार नावे जाहीर केलेली आहेत. लोकसभेच्या तिस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या गुरुवारपासून 28 मार्च 2019 उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या नावाबाबत अद्यापपर्यंत घोळ सुरूच आहे. उद्या गुरुवार 28 मार्चपासून संबधित जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिल 2019 पर्यंत (सार्वजनिक सुटीव्यतिरीक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती - जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चलनद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात.

लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा - असा आहे कार्यक्रम

[?]  गुरुवार - 19 मार्च : नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात

[?] गुरुवार  4 एप्रिल : नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक

[?] मंगळवार - 5 एप्रिल  : नामनिर्देशन पत्राची छाननी

[?] गुरुवार 8 एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक

[?] गुरुवार 23 एप्रिल : मतदान

[?] गुरुवार 23 मे : मतमोजणी

तिसऱ्या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघ-

 ३-जळगाव लोकसभा मतदारसंघ

 ४-रावेर लोकसभा मतदारसंघ

 १८-जालना लोकसभा मतदारसंघ

 १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ

 ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ

 ३४-पुणे लोकसभा मतदारसंघ

 ३५-बारामती लोकसभा मतदारसंघ

 ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

 ४३-माढा लोकसभा मतदारसंघ

 ४४-सांगली लोकसभा मतदारसंघ

 ४५-सातारा लोकसभा मतदारसंघ

 ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

 ४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

 ४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) भरणे अथवा अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा- चंद्रकांत भुजबळ, पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-

[?] नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ 

[?] नामनिर्देशन पत्रासोबत विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन) चे शपथपत्र 

[?] मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत

[?] राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म

[?]  मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र

[?] नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे.

[?] बँकेत स्वत:चे नावे फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे.

[?] उमेदवारचे फोटो/रहिवास पुरावा/पॅन कार्ड साक्षांकीत प्रत

[?] उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे.

[?] अपक्ष उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे.

[?] एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते.

[?] एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत - जास्त चार व्यक्ती हजर राहू शकतात.

[?]  नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीना कमाल तीन वाहनांची मर्यादा आहे.

लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
Parliament Election 2019
LIST OF DOCUMENTS TO BE SUBMITED
1.      Nomination Form 2A
2.      Political Party Form A and Form B
3.      Affidavit - Form 26 (100 Stamp Paper Notarized including Annexures)
4.      Declaration of Candidate / Election Agent for Photo
5.      Deposit Receipt
6.      Election expenditure letter / Xerox copy of Pass Book
7.      Photo – 5 Colour Copies (mention name and Sign overleaf of Photo)
8.      Candidate 2 colours photos in envelope (mention name and sign on envelope and overleaf of photo)
9.      Certify copy of Candidate Voter List Letter
10.   Pan of Candidate
11.   Adhar Card of Candidate
12.   Election Card of Candidate
13.   Copy of All No Due Certificate (Candidate)
14.   Certified copy of Proposer’s in Voters List – 10
15.   ID Proof and Voter Card of Proposer
16.   Appointment of Election Agent Form
17.   Election Agent ID Proof and Residence Proof Copy and Five Photos/ Certify copy of Voter List Letter
18.   Candidate / Election Agent Specimen Form
19.   Name on Ballot Paper letter
20.   Supported documents copies – Not to Attach (Personal Bank details, policy details, liability details)

Check List to be collected after submission of form
1.    Rules Hand book for election commission
2.    Register of Expenditure / Rules / Price List
3.    Polling Agent appointment Form
4.    Officers List of Contacts with Designation
5.    Various permission letter formats
Mr. Chandrakant Bhujbal (Political advisor)
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
निवडणूक खर्चाचे नियंत्रण/देखरेख/समन्वय व विहित नमुन्यात दैनंदिन सादर करणे सल्ला व सेवेसाठी  अथवा अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा- चंद्रकांत भुजबळ, पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
=========================================

उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ/काळ/शुभ मुहर्त काय असावा याबाबत उमेदवारांना ज्योतिषांचा फंडा!

लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवारही अर्ज भरताना ग्रह-तारे आणि शुभ-अशुभ दिवस कोणता असावा यासाठी कमाई करण्याचा ज्योतिषांनी देखील फंडा राबविला आहे. महाराष्ट्रात यावेळी चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. प्रत्येक टप्प्यात अर्ज भरण्यासाठी सात दिवस देण्यात आले आहेत. आता हे सात दिवस ठरवताना निवडणूक आयोगागाने पंचांगाचा अभ्यास केला नसला, तरी या सात दिवसात कुठला दिवस शुभ आहे हे जाणून घ्या ज्योतिषांच्या पोतडीतून... शुभ दिवसातील कुठल्या वेळी अर्ज भरावा, कुठल्या वेळेत तो निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावा पहा- 2019 ची निवडणूक सिंह, वृषभ, कर्क, मीन आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी राहील असा जोतिषांचा अंदाज असून या चार राशींना निवडणूक अर्ज भरताना कोणते दिवस शुभ/अशुभ आहेत ते खालीलप्रमाणे- 
टप्पा पहिला- (18 मार्च ते 25 मार्च या सात दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.)
18 उत्तम दिवस, 19 चांगला दिवस, 20 वर्ज्य दिवस, 21 क्षय दिवस, 22 शुभ दिवस, 23 तारखेला 12 वाजेपर्यंत चांगला दिवस, 24 अनिष्ट दिवस, 25 शुभ दिवस आहेत मात्र 18, 19, 22, 23 आणि 25 मार्च  याच दिवशी अर्ज भरण्याचा सल्ला दिला जात आहे. 
टप्पा दुसरा- (19 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान निवडणूक अर्ज दाखल करायचा आहे.)
19, 22, 23 आणि 25  हे शुभ दिवस आहेत, तर 20, 24 आणि 26 अनिष्ट असल्याचा सल्ला दिला जात आहे. 
टप्पा तिसरा- (28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे.)
28, 29 30 तारखेला 2 वाजेपर्यंत शुभ दिवस, 31 शुभ, 1 सामान्य, 2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ दिवस आहेत असा सल्ला दिला जात आहे. तर 4 तारखेला अमावस्या आहे. 
टप्पा चौथा- (2 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे.)
2 तारखेला सकाळी 9 वाजता शुभ, 3 आणि 4 अशुभ (वर्ज्य) दिवस आहेत. 4 आणि 5 तारखेला अमावस्या असल्याने अशुभ. 6, 7 शुभ दिवस, 8 तारखेला सकाळी 10 पर्यंत चांगला दिवस, 9 तारखेला 4 वाजेपर्यंच चांगला मुहूर्त असल्याचा सल्ला दिला जात आहे. सध्याचं ग्रहमान शिवसेना-भाजपला अनुकूल असल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे त्या संदेशाची खिल्ली देखील उडवली जात आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये इच्छूकांमध्ये देखील विभिन्न मतमतांतरे व्यक्त होत असल्याचे दिसून येते. मात्र निवडणुकीत कमाई करण्याचा ज्योतिषांनी देखील फंडा राबविला आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================





Tuesday, 26 March 2019

#vyankatesh swami: व्यंकटेश्‍वर महास्वामीं....हातात 9 रुपयांची रोकड....आणि महाराजांची इर्षा खासदारकीची....

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन महाराज निवडणूक रिंगणात

भाजप आणि हिंदुस्थान जनता पार्टीच्या उमेदवारांच्या भक्तांमध्ये निवडणूकमय वातावरण 


....हातात 9 रुपयांची रोकड....आणि महाराजांची इर्षा खासदारकीची.....होय ही सत्य घटना आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन महाराज निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यातील एका महाराजांजवळ फक्त 9/- रुपये आहेत. पैसे नसले म्हणून काय झाले चमत्कारावर... अध्यात्मावर आत्मविश्वास आहे ना..हिंदुस्थान जनता पार्टीकडून व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दिपक गंगाराम कटकधोंड महाराज उर्वरित भाजपचे उमेदवार महाराज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्याशी लढत देणार आहेत. यंदाची सार्वत्रिक सोलापूर लोकसभा निवडणूक महाराजांच्या उमेदवारीमुळे भक्तिमय वातावरणाने रंगतदार होणार आहे. महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, महायुतीतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे म्हणून निवडणूक तिरंगी होणार असे काहीही म्हणू नका कारण हातात 9 रुपयांची रोकड घेऊन एक महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. हिंदुस्थान जनता पार्टीकडून दिपक गंगाराम कटकधोंड महाराज यांच्याकडे अल्प रक्कम असूनही पॅन कार्ड आहे मात्र भाजपचे उमेदवार महाराज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडे मात्र पॅन कार्ड नाही. कटकधोंड महाराज यांना धारेप्पा तुंगल यांनी ४५०००/- वैयक्तीक कर्ज दिलेले असल्याची दुसरी नोंद प्रतिज्ञापत्रात आहे या दोन नोंदीशिवाय अन्य कोणतीही संपत्ती नसल्याचे या महाराजांनी म्हंटले आहे. केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्‍यातील रहिवासी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी ४५ हजार रुपयांचे कर्ज हात उसने घेतल्याचे म्हटले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केली. त्याच वेळी व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे. व्यंकटेश्‍वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. ३१ वर्षीय व्यंकटेश्‍वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉम ची पदवी मिळवली आहे. निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये ७ अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्मो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ (आज बाजारभाव किमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फॉर्म हाऊस व एरंडवडे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे. शिंदे कुटुंबियांकडे ९५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावे सहा लाख ४६ हजार ७९ रुपयांची जंगम तर दोन कोटी ७२ लाख २४ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची ४१ लाख ८१ हजार १८९ रुपये, त्यांच्या पत्नी अंजली यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रुपये आणि मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा प्रलंबित नाही. त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची संपत्ती मिळून 3 कोटींपेक्षा जास्त आहे. 2014-15 च्या तुलनेत 2018-19 मध्ये त्यांच्या उत्पन्नात जवळपास 7 लाखांची वाढ झाली आहे. तर सुशीलकुमार शिंदेंवर 37 लाखांचं तर त्यांच्या पत्नीवर 10 लाखांचं कर्ज आहे. 2014-15 च्या तुलनेत त्यांचं उत्पन्न सुमारे 22 लाखांनी वाढलं आहे. याशिवाय महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची जंगम मालमत्ता 6 लाखांची तर स्थावर मालमत्ता 2 कोटींची आहे.

[?]  या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत!

1. प्रकाश आंबेडकर (बहुजन वंचित आघाडी)
2. डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी (भाजप)
3. सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस)

[?]  तिन्ही उमेदवारांची मालमत्ता

प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता
(प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर, आणि मुलगा सुजात आंबेडकर)
करप्राप्त उत्पन्न
*आर्थिक वर्ष 2014-15
प्रकाश आंबेडकर - 1 लाख 61 हजार 100 रुपये
अंजली आंबेडकर - 12 लाख 95 हजार 60 रुपये
*आर्थिक वर्ष 2018-19
प्रकाश आंबेडकर - 8 लाख 60 हजार 190 रुपये
अंजली आंबेडकर - 21 लाख 09 हजार 140 रुपये
*जंगम मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 41 लाख 81 हजार 189 रुपये
अंजली आंबेडकर - 73लाख 86 हजार 273 रुपये
सुजात आंबेडकर - 9 लाख 55 हजार 454 रुपये
*स्थावर मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 32 लाख
अंजली आंबेडकर - 1 कोटी 15 लाख
संयुक्त - 3 कोटी 15 लाख
*मालकीचं एकही वाहन नाही
*कोणत्याही स्वरुपाचं कर्ज नाही
*फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि वेबसाईट आहे
=====================================

[?]  सुशीलकुमार शिंदे यांची मालमत्ता

(पत्नी उज्ज्वला शिंदे आणि स्वतः सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न)
करप्राप्त उत्पन्न -
* आर्थिक वर्ष 2013-14
सुशीलकुमार शिंदे - 57 लाख 91 हजार 180 रुपये
उज्ज्वला शिंदे - 6 लाख 24 हजार 410 रुपये
* आर्थिक वर्ष 2018-19
सुशीलकुमार शिंदे - 79 लाख 60 हजार 480 रुपये
उज्ज्वला शिंदे - 1 कोटी 2 लाख 32 हजार 880 रुपये
* जंगम मालमत्ता
सुशीलकुमार शिंदे - 11 कोटी 36 लाख 31 हजार 124 रुपये
उज्ज्वला शिंदे - 6 कोटी 59 लाख 13 हजार 237 रुपये
* स्थावर मालमत्ता  
सुशीलकुमार शिंदे -9 कोटी 96 लाख 88 हजार 21 रुपये
उज्वला शिंदे - 10 कोटी 11 लाख 26 हजार 321 रुपये
* वाहन
2 ट्रॅक्टर, 1 फॉर्च्युनर कार, 1 टेम्पो
* कर्ज
सुशीलकुमार शिंदे - 37 लाख 50 हजार रुपये
उज्ज्वला शिंदे - 10 लाख रुपये
*सोशल मीडियावर एकही अकाऊंट नाही
=====================================

[?]  डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य मालमत्ता (कुटुंबात कोणीही नाही)

* मागील पाचवर्षात करप्राप्त उत्पन्न नाही
* त्यांच्या नावे पॅन कार्डही नाही
* जंगम मालमत्ता : सध्या 6 लाख 46 हजार 79 रुपये
* स्थावर मालमत्ता : 2 कोटी 72 लाख 24 हजार
* विशेष म्हणजे महास्वामींचे 4 साखर कारखान्यात शेअर देखील आहेत
* कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा देणे नाही
* वाहन : एक -चारचाकी
* महास्वामी सोशल मीडियावर नाहीत
=====================================






POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================