#vyankatesh swami: व्यंकटेश्वर महास्वामीं....हातात 9 रुपयांची रोकड....आणि महाराजांची इर्षा खासदारकीची....
सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन महाराज निवडणूक रिंगणात
भाजप आणि हिंदुस्थान जनता पार्टीच्या उमेदवारांच्या भक्तांमध्ये निवडणूकमय वातावरण
....हातात 9 रुपयांची रोकड....आणि महाराजांची इर्षा खासदारकीची.....होय ही सत्य घटना आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन महाराज निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यातील एका महाराजांजवळ फक्त 9/- रुपये आहेत. पैसे नसले म्हणून काय झाले चमत्कारावर... अध्यात्मावर आत्मविश्वास आहे ना..हिंदुस्थान जनता पार्टीकडून व्यंकटेश्वर महास्वामी ऊर्फ दिपक गंगाराम कटकधोंड महाराज उर्वरित भाजपचे उमेदवार महाराज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्याशी लढत देणार आहेत. यंदाची सार्वत्रिक सोलापूर लोकसभा निवडणूक महाराजांच्या उमेदवारीमुळे भक्तिमय वातावरणाने रंगतदार होणार आहे. महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, महायुतीतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि बहुजन वंचित आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे म्हणून निवडणूक तिरंगी होणार असे काहीही म्हणू नका कारण हातात 9 रुपयांची रोकड घेऊन एक महाराज लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. हिंदुस्थान जनता पार्टीकडून दिपक गंगाराम कटकधोंड महाराज यांच्याकडे अल्प रक्कम असूनही पॅन कार्ड आहे मात्र भाजपचे उमेदवार महाराज डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडे मात्र पॅन कार्ड नाही. कटकधोंड महाराज यांना धारेप्पा तुंगल यांनी ४५०००/- वैयक्तीक कर्ज दिलेले असल्याची दुसरी नोंद प्रतिज्ञापत्रात आहे या दोन नोंदीशिवाय अन्य कोणतीही संपत्ती नसल्याचे या महाराजांनी म्हंटले आहे. केवळ नऊ रुपयांची संपत्ती असलेले चडचण तालुक्यातील रहिवासी व्यंकटेश्वर महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे. त्याच वेळी त्यांनी ४५ हजार रुपयांचे कर्ज हात उसने घेतल्याचे म्हटले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघ यंदा स्वामींच्या उमेदवारींमुळे चर्चेत आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून भाजपच्या वतीने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी दाखल केली. त्याच वेळी व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दाखल केले असून, फक्त नऊ रुपये हाती असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले पॅनकार्ड त्यांनी काढले आहे. व्यंकटेश्वर महास्वामी ऊर्फ दीपक गंगाराम कटकधोंड, असे त्यांचे नाव आहे. कर्नाटकातील नागठाण विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीमध्ये त्यांचे नाव आहे. ३१ वर्षीय व्यंकटेश्वर महास्वामी यांनी धारवाड विद्यापीठातून बीकॉम ची पदवी मिळवली आहे. निवडणूक लढविण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची माहिती त्यांनी घेतली आहे. या महाराजांच्या नावावर कोणत्याही प्रकारची जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये ७ अपक्षांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे. शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्मो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ (आज बाजारभाव किमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फॉर्म हाऊस व एरंडवडे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे. शिंदे कुटुंबियांकडे ९५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या नावे सहा लाख ४६ हजार ७९ रुपयांची जंगम तर दोन कोटी ७२ लाख २४ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची ४१ लाख ८१ हजार १८९ रुपये, त्यांच्या पत्नी अंजली यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रुपये आणि मुलगा सुजातच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा प्रलंबित नाही. त्यांच्याकडे एकही वाहन नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांची संपत्ती मिळून 3 कोटींपेक्षा जास्त आहे. 2014-15 च्या तुलनेत 2018-19 मध्ये त्यांच्या उत्पन्नात जवळपास 7 लाखांची वाढ झाली आहे. तर सुशीलकुमार शिंदेंवर 37 लाखांचं तर त्यांच्या पत्नीवर 10 लाखांचं कर्ज आहे. 2014-15 च्या तुलनेत त्यांचं उत्पन्न सुमारे 22 लाखांनी वाढलं आहे. याशिवाय महायुतीचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची जंगम मालमत्ता 6 लाखांची तर स्थावर मालमत्ता 2 कोटींची आहे.
या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत!
1. प्रकाश आंबेडकर (बहुजन वंचित आघाडी)
2. डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी (भाजप)
3. सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस)
तिन्ही उमेदवारांची मालमत्ता
प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता
(प्रकाश आंबेडकर, पत्नी अंजली आंबेडकर, आणि मुलगा सुजात आंबेडकर)
करप्राप्त उत्पन्न
*आर्थिक वर्ष 2014-15
प्रकाश आंबेडकर - 1 लाख 61 हजार 100 रुपये
अंजली आंबेडकर - 12 लाख 95 हजार 60 रुपये
*आर्थिक वर्ष 2018-19
प्रकाश आंबेडकर - 8 लाख 60 हजार 190 रुपये
अंजली आंबेडकर - 21 लाख 09 हजार 140 रुपये
*जंगम मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 41 लाख 81 हजार 189 रुपये
अंजली आंबेडकर - 73लाख 86 हजार 273 रुपये
सुजात आंबेडकर - 9 लाख 55 हजार 454 रुपये
*स्थावर मालमत्ता
प्रकाश आंबेडकर - 32 लाख
अंजली आंबेडकर - 1 कोटी 15 लाख
संयुक्त - 3 कोटी 15 लाख
*मालकीचं एकही वाहन नाही
*कोणत्याही स्वरुपाचं कर्ज नाही
*फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि वेबसाईट आहे
=====================================
सुशीलकुमार शिंदे यांची मालमत्ता
(पत्नी उज्ज्वला शिंदे आणि स्वतः सुशीलकुमार शिंदे यांचे उत्पन्न)
करप्राप्त उत्पन्न -
* आर्थिक वर्ष 2013-14
सुशीलकुमार शिंदे - 57 लाख 91 हजार 180 रुपये
उज्ज्वला शिंदे - 6 लाख 24 हजार 410 रुपये
* आर्थिक वर्ष 2018-19
सुशीलकुमार शिंदे - 79 लाख 60 हजार 480 रुपये
उज्ज्वला शिंदे - 1 कोटी 2 लाख 32 हजार 880 रुपये
* जंगम मालमत्ता
सुशीलकुमार शिंदे - 11 कोटी 36 लाख 31 हजार 124 रुपये
उज्ज्वला शिंदे - 6 कोटी 59 लाख 13 हजार 237 रुपये
* स्थावर मालमत्ता
सुशीलकुमार शिंदे -9 कोटी 96 लाख 88 हजार 21 रुपये
उज्वला शिंदे - 10 कोटी 11 लाख 26 हजार 321 रुपये
* वाहन
2 ट्रॅक्टर, 1 फॉर्च्युनर कार, 1 टेम्पो
* कर्ज
सुशीलकुमार शिंदे - 37 लाख 50 हजार रुपये
उज्ज्वला शिंदे - 10 लाख रुपये
*सोशल मीडियावर एकही अकाऊंट नाही
=====================================
डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य मालमत्ता (कुटुंबात कोणीही नाही)
* मागील पाचवर्षात करप्राप्त उत्पन्न नाही
* त्यांच्या नावे पॅन कार्डही नाही
* जंगम मालमत्ता : सध्या 6 लाख 46 हजार 79 रुपये
* स्थावर मालमत्ता : 2 कोटी 72 लाख 24 हजार
* विशेष म्हणजे महास्वामींचे 4 साखर कारखान्यात शेअर देखील आहेत
* कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा देणे नाही
* वाहन : एक -चारचाकी
* महास्वामी सोशल मीडियावर नाहीत
=====================================
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook
================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.