Saturday 9 March 2019

पक्षश्रेष्ठींकडून अवहेलना झाल्याने खासदार संजय काकडे यांची भाजपला सोडचिठी

खासदार संजय काकडे यांची भाजपला अखेर सोडचिठ्ठी


पक्षश्रेष्ठींकडून अवहेलना झाल्याने भाजपला वैतागलेल्या भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेची पुण्याची उमेदवारी मिळण्यासाठी कॉग्रेस पक्षात प्रवेश करणार नसून कॉग्रेस देईल ते जबाबदारी स्वीकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुणे महापालिकेतील माझे समर्थक असलेले भाजपचे नगरसेवक मात्र 2022 पर्यंत पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वर्तणुकीला कंटाळल्याने भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची टीका त्यांनी केली.पुणे भाजपकडून सन्मान राखला जात नसल्याचा आरोप खासदार काकडे यांनी आधीच केला होता. यासंदर्भातील माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय न झाल्याने काकडे गेले काही दिवस पक्षात अस्वस्थ होते. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करताना ते म्हणाले की काँग्रेस हा सर्व घटकांना सामावून घेणारा पक्ष आहे. भाजपमध्ये काही विशिष्ट चेहऱ्यांनाच संधी मिळत होती. मात्र मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच पक्ष प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री माझ्या भावसारखेच असून पुढेही आमचे संबंध आहे असेच राहतील. दरम्यान काँग्रेसकडून उमेदवारीस इच्छुक असलेल्या प्रवीण गायकवाड व  खासदार संजय काकडे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर पक्ष प्रवेश करा नंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू असे कॉंग्रेसच्या वरिष्ट नेत्यांनी बजावले होते त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वैशाली हॉटेल येथे पुणे कट्टा अंतर्गत शहरातील राजकीय घडामोडीवर चहा आणि इडली सांबर घेत. भाजप सहयोगी खासदार संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, माजी आमदार मोहन जोशी,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, भाजपचे नेते नगरसेवक मुरलीधर मोहोळ या सर्व नेते मंडळीनी अनेक विषयावर चर्चा देखील केली. या कार्यक्रमाचे आयोजन गणेश सातपुते यांनी केले होते.यावेळी खासदार संजय काकडे म्हणाले की,या निवडणुकीत भाजपकडून अनिल शिरोळे पेक्षा गिरीश बापट हे सोपे स्पर्धक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. यावेळी काँग्रेसकडून इच्छूक असलेले माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, मी मागील 40 वर्षापासुन शहरात काम करीत आहे. पक्ष जो निर्णय घेईल. त्याच आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.