Wednesday 20 March 2019

रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अडचणीत

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांचे पुत्र तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज बुधवारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्या उपस्थित मुंबईतील गरवारे क्लब येथे रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढा (जि. सोलापूर) मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित कार्यकर्त्यांची सोय पाहिली. प्रारंभी धैर्यशील मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील शिवतेज मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विनोद तावडे, सुभाष देशमुख आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील, अर्जुनसिंह, सत्यप्रभादेवी, सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, 14 पंचायत समिती सदस्य व राज्यांमधून  आलेल्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते भाजपचा झेंडा व कमळाची पट्टी गळ्यात घालून पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अडचणीत आलेली असून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. नातू हट्टामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेऊन निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला मात्र माढा मधील उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केल्यामुळे तसेच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांना उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेने भाजपची वाट धरली असल्याचे सांगण्यात येत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे लोकसभा/विधानसभा निवडणूक सोडून दुसरे देखील कारण असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात होत आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज, सुमित्रादेवी पतसंस्थेतील गैरप्रकार, विजय शुगरसमोरील अडचणी, नोटाबंदीमुळे निर्माण झालेली आर्थिक आणीबाणी, राजकीय व आर्थिकदृष्ट्या पेचात सापडल्याने यातून मार्ग काढण्यासाठी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आजवर आमच्याच पक्षाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची थट्टा केली. भाजप सरकारने मात्र ही याेजना यशस्वी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच आपण भाजपत प्रवेश करत आहोत मागील पाच वर्षात महाराष्‍ट्र प्रगतीपथावर असून मुख्यमंत्र्यांनी गटतट बाजुला ठेऊन विकासकामे केल्याचे रणजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. सत्तेचा वापर सामान्य माणसांसाठी करण्याची आपली भूमिका राहिली आहे. वडिलांनी मुलाला वारसा द्यायचा म्हणून नाही तर आपल्या परिसरातील सहा जिल्हे व 31 तालुक्यांच्या भविष्याचा प्रश्‍न असलेला कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा प्रश्‍न पूर्ण झाला पाहिजे तरच आपला परिसर समृद्ध होणार आहे, उद्याची पिढी घडणार आहे व हा प्रश्‍न सोडविण्याची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. खा. विजयसिंहांनी मागील पाच वर्षांत पंढरपूर-लोणंद रेल्वे, राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी लावली आहेत. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली असल्‍याचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले होते. गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहितेंनी माढा मतदारसंघात पक्षाला प्रतिनिधित्व मिळवून दिले होते. मात्र गेल्या ५ वर्षांत पक्षाने त्यांना अडगळीत टाकले होते. रणजितसिंह यांची जी भूमिका आहे त्याला माझे समर्थन आहे असेही खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हंटले आहे. रणजितसिंह यांनी अकलूज ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला.  राष्ट्रवादी युवकच्या राज्य अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. २००९ ला राज्यसभेची उमेदवारी देणार म्हणून अर्ज दाखल केला होता मात्र उमेदवारीने हुलकावणी दिली होती. त्यांच्या रूपाने भाजपतील प्रवेशाने मोहिते-पाटील कुटुंबीयाने पक्षांतर केलेली हि चौथी घटना आहे. (कै.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही दोन वेळा पक्ष बदलला. धवलसिंहांच्या रूपाने एकवेळा पक्षांतर झाले. अशा एकूण सात वेळा पक्षांतराची प्रकिया झाली आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी 1980 मध्ये प्रथम अपक्ष म्हणून नंतर कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुका लढविल्या होत्या. 1999 मध्ये शरद पवार यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केली. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी'त प्रवेश केला होता. त्यांनी 2004 मध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळवले. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चा होत असत मात्र आता पुत्र रणजितसिंह यांच्या पक्ष प्रवेशामुळे त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून रणजितसिंह भाजपाच्या संपर्कात होते. माढ्यातून उमेदवारी मिळण्याचा शब्द मिळाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला होता.पक्ष प्रवेशाच्या निर्णयाला विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.  

अकलूजचे धवलसिंह मोहिते यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! राष्ट्रवादीत प्रवेश करणार!


अकलूजचे धवलसिंह मोहिते यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. सेनेला त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करणाची शक्यता आहे. आज धवलसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याने सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतराचे राजकारण ढवळून निघाले आहे. माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव तथा अकलूज जवळील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी १९ ऑगस्ट २०१४ ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य असलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू तर राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या माढा लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे अपक्ष म्हणून उभे होते. परंतु त्यांना दारुण पराभवाने निराशा पत्करावी लागली. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला होता. शिवसेनेत प्रवेश घेण्यामागील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचा हेतू विधानसभा निवडणुकीतून माढा किंवा करमाळा मतदारसंघातून सेनेची उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. दरम्यान मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे होते. परंतु, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला होता. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची १९८५ साली युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रतापसिंह यांनी मागे वळून पाहिलेच नव्हते. सोलापूरमधून लोकसभेवर देखील ते निवडून आले होते. तर, युती सरकारच्या काळात भाजपच्या कळपात दाखल होऊन प्रतापसिंह मोहिते-पाटील राज्याचे सहकार मंत्री राहिले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकारणात परिवर्तन होत असते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला आणि स्थानिक राजकारणातील घडामोडींना वेग आला. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.