Friday, 22 March 2019

शिवसेनेच्या २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी

उस्मानाबाद मधून खासदार रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारली


लोकसभा निवडणूक २०१९ साठी शिवसेनेच्या उमेदवारांची नावे सेना नेते सुभाष देसाई यांनी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देऊन रविंद्र गायकवाड यांचा पत्ता शिवसेनेने कट केला आहे. शिवसेनेची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली या पत्रकार परिषदेत पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ही यादी आज जाहीर करण्यात आली आहे.उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला असून या जागेवरून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात होते. याचा फटका गायकवाड यांना बसल्याचे बोलले जात आहे. त्याच प्रमाणे हिंगोली मतदार संघातून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने प्रलंबित राहिलेली पालघरची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली आहे. या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी इथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे साताऱ्याच्या जागेवरून भाजपतर्फे लढण्याच्या तयारीत होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे आल्याने पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जागेवरून इच्छूक असललेले पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. 
=======================================

राष्ट्रवादीकडून माढा येथून संजय शिंदे, उस्मानाबादेतून जगजितसिंह

उस्मानाबादेतून जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचा सामना आता शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याशी होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळी केली. तसेच उस्मानाबादमधून माजी मंत्री राणा जगजितसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या याद्या जाहीर होत असताना माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटत नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत सर्वांना उत्सुकता होती. संजय शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. बारामती येथील एका सभेदरम्यान, संजय शिंदे हे घरातलेच आहेत, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे का म्हणायचे? अशी विचारणा करत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघातर्फे आणि काँग्रेसच्या सहमतीने मी संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतो, असे सांगितले. शिंदे यांच्यासह उस्मानाबादमध्ये राणा जगजीतसिंह पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. संजय शिंदे हे माढा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबन शिंदे यांचे धाकटे बंधू आहेत. ते मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यांनी निमगाव टेंभुर्णीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे करमाळा विधानसभा लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अध्यक्ष झाले. शिंदेहे म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचे, तसेच विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. शिवाय माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचेही ते चेअरमन आहेत. शिंदे जिल्हा बँकेचे अध्यक्षही आहेत. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती व आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे

संघ.क्र.
मतदारसंघ
भाजप-सेना युतीचे उमेदवार
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार
1
नंदुरबार (अ.ज.)
हीना गावित (भाजप)
के. सी. पडवी (काँग्रेस)
2
धुळे
सुभाष भामरे (भाजप)
कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
4
रावेर
रक्षा खडसे (भाजप)

5
बुलढाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना)
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
6
अकोला
संजय धोत्रे (भाजप)

7
अमरावती (अ.जा.)
आनंदराव अडसूळ (शिवसेना)

8
वर्धा
रामदास तडस (भाजप)
चारुलता टोकस (काँग्रेस)
9
रामटेक (अ.जा.)
कृपाल तुमाणे (शिवसेना)

10
नागपूर
नितीन गडकरी (भाजप)
नाना पटोले (काँग्रेस)
12
गडचिरोली-चिमूर (अ.ज.)
अशोक नेते (भाजप)
डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)
13
चंद्रपूर
हंसराज अहिर (भाजप)

14
यवतमाळ-वाशिम
भावना गवळी (शिवसेना)
माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
15
हिंगोली
हेमंत पाटील (शिवसेना)

17
परभणी
संजय जाधव (शिवसेना)
राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
18
जालना
रावसाहेब दानवे (भाजप)

19
औरंगाबाद
चंद्रकांत खैरे (शिवसेना)

21
नाशिक
हेमंत गोडसे (शिवसेना)
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
23
भिवंडी
कपिल पाटील (भाजप)

24
कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना)
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
25
ठाणे
राजन विचारे (शिवसेना)
आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
26
उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी (भाजप)

27
उत्तर पश्चिम मुंबई
गजानन किर्तीकर (शिवसेना)

29
उत्तर मध्य मुंबई
पूनम महाजन (भाजप)
प्रिया दत्त (काँग्रेस)
30
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे (शिवसेना)
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
31
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत (शिवसेना)
मिलिंद देवरा (काँग्रेस)
32
रायगड
अनंत गीते (शिवसेना)
सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
33
मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना)
पार्थ पवार (राष्ट्रवादी)
36
शिरुर
शिवाजीराव आढळराव (शिवसेना)
डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
37
अहमदनगर
सुजय विखे पाटील (भाजप)

38
शिर्डी (अ.जा.)
सदाशिव लोखंडे (शिवसेना)
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
39
बीड
डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
40
उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
 राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
41
लातूर (अ.जा.)
सुधाकरराव शिंगारे (भाजप)

44
सांगली
संजयकाका पाटील (भाजप)

46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना)
नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
47
कोल्हापूर
संजय मंडलिक (शिवसेना)
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
48
हातकणंगले
धैर्यशील माने (शिवसेना)
राजू शेट्टी स्वभिमानी संघटना (राष्ट्रवादी)
3
जळगाव

गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
11
भंडारा-गोंदिया


16
नांदेड


20
दिंडोरी (अ.ज.)

धनराज महाले (राष्ट्रवादी)
22
पालघर (अ.ज.)


28
उत्तर पूर्व मुंबई

संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
34
पुणे


35
बारामती

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
42
सोलापूर (अ.जा.)

सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
43
माढा

 संजय शिंदे (राष्ट्रवादी)
45
सातारा

छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================












No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.