Thursday 28 March 2019

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात नांदेड, बीड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात


निवडणूक लढविण्यासाठी अपक्षांची रेलचेल ; नांदेड मध्ये 55 तर बीड मधून 53 सर्वाधिक उमेदवारी अर्ज
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक नांदेड, बीड लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडणूक रिंगणात असून निवडणूक लढविण्यासाठी अपक्षांची नांदेड मध्ये 55 तर बीड मधून 53 सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल करणारांची रेलचेल दिसून येत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात १० मान्यताप्राप्त/अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार असून तब्बल 43 अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. तर नांदेड मध्ये 55 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आज पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे माघार घेण्याच्या अखेरचा दिवस होता. मुदत संपल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिलेले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रांची काल छाननी झाली. छाननीमध्ये 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती.

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ - 14, रामटेक मतदारसंघ - 16, नागपूर मतदारसंघ - 30, भंडारा-गोंदिया मतदारसंघ - 14, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ - 5, चंद्रपूर मतदारसंघ - 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघात छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला -12, अमरावती -34, हिंगोली -34, नांदेड-55, परभणी-21, बीड-53, उस्मानाबाद-20, लातूर-12 आणि सोलापूर -24.

आचारसंहिता कालावधीत राज्यात ४ हजार ४२८ गुन्हे दाखल

 निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. निवडणूक प्रशासनाकडून राज्यात काटेकोर पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. परवाना नसलेली 328 शस्त्रे, 81 काडतुसे आणि 8 हजार 302 जिलेटीन आदी  स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 797 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत. 131 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्रपरवाने  रद्द करण्यात आले आहेत. फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 63 हजार 608 प्रकरणे विचारात घेण्यात आली असून 16 हजार 380 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत. सीआरपीसीच्या 6 हजार 228 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. 19 हजार 157 प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली असून 21 हजार 264 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.

34-पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सौरभ के.तिवारी खर्च निरीक्षक

पुणे लोकसभा मतदार संघासाठी सौरभ के.तिवारी यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौरभ के.तिवारी यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-202 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969500 असा असून expobs2019pune34@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल असे, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
----------------------------------------------------------------------------

35-बारामती लोकसभा मतदारसंघासाठी रोहित राज गुप्ता खर्च निरीक्षक

35-बारामती लोकसभा मतदार संघासाठी रोहित राज गुप्ता यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रोहित राज गुप्ता यांचे पुणे येथे आगमन झाले असून व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरीत इमारत) कक्ष क्रमांक ए-203 येथे त्यांचे वास्तव्य राहणार आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8275969501 असा असून expobs2019baramati35@gmail.com हा त्यांचा ईमेल आयडी आहे. त्यांना शनिवार व रविवार, या दिवशी सकाळी 11 ते 12 या कालावधीत भेटता येईल, असे अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक निरीक्षक व्यवस्थापन, पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.
------------------------------------------------------------------------------

जिल्हादंडाधिका-यांचा प्रतिबंधात्मक आदेश

पुणे जिल्ह्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणांत व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (अे) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण  जिल्ह्यात दि. 27 मे 2019 अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे/हत्यारे दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई केली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बॅंका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही. याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची/संस्थांची अधिकाऱ्यांवर राहिल.
सदरचा आदेश दि. 27 मे 2019 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा.दं.संहिता कलम 188 मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.

प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करा

जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची (मिडीया सर्टीफीकेशन अॅण्‍ड मॉनिटरींग कमिटी- एमसीएमसी) बैठक जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेच्‍या सहसंचालक नंदिनी आवडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा समन्वयक सुधीर जोशी, उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,  आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, टी.पी.शर्मा, एस.बी.निकम, सदस्‍य-सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते. पुणे जिल्‍ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील पेड न्‍यूज (प्रदत्‍त बातमी) तसेच सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी राम यांनी दिल्‍या. या माध्‍यमांवर विना परवानगी जाहिराती आढळून आल्‍यास तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे निर्देशही  त्‍यांनी दिले.  नवीन मध्‍यवर्ती इमारतीमध्‍ये जिल्‍हा माहिती कार्यालयात एमसीएमसी कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून विहीत नमुन्‍यातील अर्ज भरुन सोशल मिडीया आणि इलेक्‍ट्रॉनिक मिडीयावरील जाहिरातीच्‍या प्रसारणपूर्व प्रमाणपत्राबाबत कार्यवाही केली जाईल, असे सदस्‍य सचिव तथा जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितले. प्रमाणपत्राचा नमुना अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयातील तळमजल्‍यावरील मिडीया सेंटरमध्‍ये तसेच जिल्‍हा माहिती कार्यालयात उपलब्ध असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================






No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.