Thursday 21 March 2019

भाजपची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील 16 जागांवर उमेदवारी जाहीर; १४ जणांना पुन्हा संधी

नगर-सुजय विखेपाटील तर लातूरचे खा.गायकवाड यांना उमेदवारी नाकारून सुधाकरराव शिंगारे यांना संधी


महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत केली असून यामध्ये 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शिंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. लोकसभेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून उभे राहणार आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगर तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जे पी नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातून त्यांचा पत्ता कापण्यात आला असून, पक्षाध्यक्ष अमित शहा यांना तेथून उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे आहेत. मध्य प्रदेश तसेच बिहारमधील कुठल्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.पहिल्या यादीत एकूण १८४ उमेदवारांचा समावेश अाहे. नितीन गडकरी नागपूर, राजनाथसिंह लखनौ, हेमामालिनी मथुरा तर स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, लातूरमधून सुधाकरराव शंृगारे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत राज्यातील १४ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली असली, तरी ईशान्य मुंबईचे किरीट सोमय्या, पुण्याचे अनिल शिरोळे यांच्यासह सहा खासदारांचे भवितव्य अधांतरी आहे. राज्यात भाजपचे २२ खासदार आहेत. नितीन गडकरी, हसंराज अहिर, डॉ. सुभाष भामरे हे तीन मंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह १४ खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नगरचे दिलीप गांधी आणि लातूरचे सुनील गायकवाड या दोन विद्यमान खासदारांना फेरउमेदवारी नाकारण्यात आली आहे. सहा मतदारसंघांबाबतचा निर्णय अद्याप अनिर्णित आहे. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या हे मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी सतत सक्रिय असतात. रेल्वे, पायाभूत सुविधा, आरोग्य आदी प्रश्नांबाबत ते सतत पाठपुरावा करीत असतात. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची शिफारस राज्य भाजपने केली होती. पण गेल्या शनिवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांच्या बैठकीत सोमय्या यांच्याबरोबरच दुसऱ्या नावाची शिफारस करावी, असे सुचविण्यात आले. यानुसार मुख्यमंत्री फडवणीस यांनी दुसरे नाव दिल्लीला पाठविले आहे. सोमय्या यांच्या उमेदवारीला मुख्यत्वे शिवसेनेचा आक्षेप आहे. भाजप आणि शिवसेनेत कटुता तीव्र असताना सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. ठाकरे यांच्याशी संबंधित कंपन्या, या कंपन्यांचे व्यवहार याची माहिती सोमय्या यांनी जाहीर केली होती. तसेच ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची मागणी केली होती. शिवसेना आणि सोमय्या यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. सोमय्या हे उमेदवार असल्यास शिवसेनेची मदत भाजपला मिळू शकणार नाही. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून महाराष्ट्रातून तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरील उमेदवारांची घोषणा झाल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातही राष्ट्रवादीकडून बहुतांश जागांवरील उमेदवाराची नावे जाहीर केली आहेत. 

भाजपच्या पहिल्या यादीत ५ मुस्लिमांना तिकीट

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. १८४ उमेदवारांच्या यादीत भाजपने ५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या मोठ्या राज्यातून मुस्लिमांना उमेदवारी देण्याचे टाळले असून त्याऐवजी जम्मू-काश्मीरसारख्या मुस्लिमबहूल भागातील ५ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान या राज्यातून मुस्लिमांना उमेदवारी दिलेली नाही. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुस्लिम संख्या असलेल्या मतदारसंघातही भाजपने मुस्लिम उमेदवाराऐवजी हिंदू समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे भाजपने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या पहिल्या यादीत जम्मू-काश्मीरमधील ५ उमेदवारांचा समावेश आहे. बारामुलामधून एम. एम. वार, श्रीनगरमधून खालिद जहांगीर, अनंतनागमधून सोफी युसूफ यांना उमेदवारी दिली आहे. तर लक्षद्वीपमधून अब्दुल कादीर यांना मैदानात उतरवले आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या अन्य दोन जागेवर उधमपूरमधून डॉ. जितेंद्र सिंह आणि जम्मूमधून जुगलकिशोर शर्मा यांनी पक्षाचे तिकिट दिले आहे. तेलंगानाच्या मेहबूबाबादमधून जलोथू हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. या भागात मुस्लिमांची संख्या मोठी आहे.

भाजपाच्या पहिल्या यादीतील १९ टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

भाजपाने गुरुवारी लोकसभेसाठी १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यापैकी ३५ जणांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक गुन्हे दाखल असणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील खासदार हंसराज अहिर यांचे नाव अग्रस्थानी असून त्यांच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीमधील ७८ जणांना २०१४ मध्येही उमेदवारी देण्यात आली होती. याच ७८ जणांपैकी ३५ जणांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्ह्यां संदर्भातील माहिती दिली होती. मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या १०६ उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र याआधी सादर केलेले नसल्याने त्यांच्यावरील गुन्ह्यांसंदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या १०६ उमेदवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या पहिल्या यादीतील उमेदवारांची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.


अ.क्र.
मतदारसंघ
भाजप
1
नंदुरबार (अ.ज.)
हीना गावित
2
धुळे
सुभाष भामरे
4
रावेर
रक्षा खडसे
6
अकोला
संजय धोत्रे
8
वर्धा
रामदास तडस
10
नागपूर
नितीन गडकरी
12
गडचिरोली-चिमूर (अ.ज.)
अशोक नेते
13
चंद्रपूर
हंसराज अहिर
18
जालना
रावसाहेब दानवे
23
भिवंडी
कपिल पाटील
26
उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी
29
उत्तर मध्य मुंबई
पूनम महाजन
37
अहमदनगर
सुजय विखे पाटील
39
बीड
डॉ. प्रीतम मुंडे
41
लातूर (अ.जा.)
सुधाकरराव शिंगारे
44
सांगली
संजयकाका पाटील

संघ क्र.
लोकसभा मतदारसंघ
काँग्रेस/राष्ट्रवादी
भाजप/सेना
भारिप/वंचित आघाडी
1
नंदुरबार (अ.ज.)
के. सी. पडवी
हीना गावित
दाजमल मोरे
2
धुळे
कुणाल रोहिदास पाटील
सुभाष भामरे

4
रावेर

रक्षा खडसे
नितीन कांडेलकर
6
अकोला

संजय धोत्रे

8
वर्धा
चारुलता टोकस
रामदास तडस
अॅड धनराज वंजारी
10
नागपूर
नाना पटोले
नितीन गडकरी

12
गडचिरोली-चिमूर
डॉ. नामदेव उसंडी
अशोक नेते
डॉ. रमेश गजबे
13
चंद्रपूर

हंसराज अहिर
राजेंद्र महाडोळे
18
जालना

रावसाहेब दानवे
डॉ. शरदचंद्र वानखेडे
23
भिवंडी

कपिल पाटील
ए डी सावंत
26
उत्तर मुंबई

गोपाळ शेट्टी

29
उत्तर मध्य मुंबई
प्रिया दत्त
पूनम महाजन

37
अहमदनगर

सुजय विखे पाटील

39
बीड
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
डॉ. प्रीतम मुंडे
प्रा. विष्णू जाधव
41
लातूर (अ.जा.)

सुधाकरराव शिंगारे
राम गारकर
44
सांगली

संजयकाका पाटील
जयसिंग शेंडगे

भाजप- देशभरातील महत्त्वाचे उमेदवार

वाराणसी - नरेंद्र मोदी
लखनौ - राजनाथ सिंह
नागपूर - नितीन गडकरी
गांधीनगर - अमित शाह
बागपत - डॉ सत्यपाल सिंह
गाजियाबाद - वीके सिंह
गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा
मथुरा- हेमा मालिनी
अमेठी - स्मृती इरानी
उत्तर कन्नड - अनंत कुमार हेगडे
उन्नाव - साक्षी महाराज
अरुणाचल पूर्व - किरेन रीजीजू
आसनसोल- बाबुल सुप्रियो

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.