शिवसेना-भाजपमधील समन्वयासाठी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जाहीर
कोल्हापूर येथे २४ मार्चला युतीच्या प्रचाराची शुभारंभ सभा आयोजित करण्यात आलेली असून निवडणूक प्रचार व रणनीतीवर चर्चा मातोश्रीवर काल करण्यात आली. युतीच संयुक्त जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून २४ मार्चला होणार्या सभेपूर्वी युतीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर निर्णयाचे पत्रकामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतील रणछोडदासांची पळापळ झाल्याचा टोला लगावला आहे यावर सेना नेते सुभाष सरदेसाई यांची स्वाक्षरी आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने रणछोडदास अशी उपरोधात्मक टीका केली आहे. विदर्भात 15 मार्चला युतीच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे संयुक्त मेळावे घेण्यात येणार असून उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात १७ मार्च तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये १८ मार्चला संयुक्त मेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शिवसेना-भाजपमधील समन्वयाकरता पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
मतदारसंघाची समन्वय जबाबदारी-
1) मतदारसंघ : सिंधुदुर्ग-रत्नागिरी, रायगड, मावळ (रायगडच्या 3 विधानसभा)
शिवसेना - सुभाष देसाई
भाजप - रवींद्र चव्हाण
2) मतदारसंघ : कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी
शिवसेना - एकनाथ शिंदे
भाजप - रवींद्र चव्हाण
3) मतदारसंघ : पुणे, बारामती, शिरुर, सोलापूर, माढा, मावळ ( मावळ 3 विधानसभा)
शिवसेना - नीलम गोऱ्हे
भाजप - गिरीश बापट
4) मतदारसंघ : सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले
शिवसेना - नितीन बानगुडे पाटील
भाजप - चंद्रकांत पाटील
5) मतदारसंघ : नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगांव,धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी
शिवसेना - दादा भुसे
भाजप - गिरीश महाजन
6) मतदारसंघ : हिंगोली, परभणी,नांदेड, जालना, औरंगाबाद,बीड, लातूर, उस्मानाबाद
शिवसेना - अर्जुन खोतकर
भाजप - पंकजा मुंडे
7) मतदारसंघ : बुलडाणा, अकोला, वाशिम-यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक
शिवसेना - दीपक सावंत
भाजप - चंद्रशेखर बावनकुळे
--------------------------------------
लोकसभेसाठी शिवसेनेचे महाराष्ट्रातील संभाव्य 23 उमेदवार
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
1) दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर
4) ठाणे - राजन विचारे
5) कल्याण - श्रीकांत शिंदे
6) पालघर - श्रीनिवास वनगा
7) रायगड - अनंत गिते
8) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत
9) कोल्हापूर - संजय मंडलिक
10) हातकणंगले - धैर्यशिल माने
11) नाशिक - हेमंत गोडसे
12) शिर्डी - सदाशिव लोखंडे
13) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील
14) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
15) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
16) बुलढाणा - प्रतापराव जाधव
17) रामटेक - कृपाल तुमाणे
18) अमरावती- आनंदराव अडसूळ
19) परभणी- संजय जाधव
या उमेदवारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही
20) मावळ - श्रीरंग बारणे
21) उस्मानाबाद - रवी गायकवाड
या उमेदवारांवर अजून निर्णय नाही
22) सातारा - पुरुषोत्तम जाधव आणि नरेंद्र पाटील यांच्यात चुरस
23) हिंगोली - हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.