‘सी-व्हिजिल’ वर जागृत मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातून या अॅपवर आतापर्यंत 444 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. हे सी-व्हिजिल’ अॅप उत्तमरित्या काम करत असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाकडून प्रथमच हे नावीन्यपूर्ण अॅप देशातील नागरिकांना उपलबध करुन देण्यात आले आहे. या ‘सी-व्हिजील’ अॅपमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. या अॅपचा वापर करणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हॅण्डसेटचा प्रकार, मोबाईल इंटरनेट सेवेची गती (इंटरनेट स्पीड- उदा. 3जी, 4जी), मोबाईल नेटवर्क पुरवठादार कंपनी, स्थाननिहाय नेटवर्क कव्हरेज आदी घटकांवर इंटरनेट स्पीड अवलंबून असतो. या घटकांमुळे तेथील परिस्थितीनुसार अॅपवर छायाचित्र,चित्रीकरण अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक असू शकतो. यामध्ये अॅपचा कोणताही तांत्रिक दोष नाही. याउलट ‘सी-व्हिजील’ अॅपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे, ही आनंदाची बाब आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होत असल्याने हे अॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरत आहे. कोणताही नागरिक निवडणुकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो.‘सी-व्हिजिल’ हे अॅप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्यपूर्ण अस्त्र असून या माध्यमातून नागरिकांनी स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.