Sunday 17 March 2019

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा 'बाण' अखेर भात्यात!

जालन्यातून खासदार रावसाहेब दानवे लढवणार निवडणूक


शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तलवार म्यान केली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जालना मतदार संघातून रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. औरंगाबाद येथे भाजपा आणि शिवसेना नेत्यांमधील सुरू असणारी बैठक तब्बल दोन तासांनतर संपुष्टात आली. या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. अर्जुन खोतकर यांनी जालानामधून माघार घेतल्यामुळे रावसाहेब दानवे यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर उपस्थित होते. शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील वाद आणि नेत्यांमधील तेढ कमी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी उमेदवार ठरविता आलेले नाही. जागांचा तिढा न सुटल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद कमी करण्यास कोणते उपाय सुचवले जातात, याची उत्सुकता आहे. विशेषत: जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे. मी कडवट शिवसैनिक, दगाफटका करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीधर्म समजावून सांगितला. माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. दानवे आणि खोतकर यांच्या मनोमिलनाने नेते आनंदी झाले असले तरी गेली 5 वर्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसैनिकांनी दिलेली वागणूक, खोट्या केसेस मध्ये कार्यकर्त्यांना अडकवण्याचा आरोप त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्ते सच्चा दिलाने दानवे यांचा प्रचार करतील का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. नेत्यांची एकी कार्यकर्त्यांचे काय? अशाप्रकारच्या प्रश्नांना नेतेमंडळी फारसे महत्व देत नाहीत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.