Tuesday, 12 March 2019

मंत्री महादेव जानकर सुस्तावले! ; पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंख्येत मोठ्याप्रमाणात नव्याने भर

मंत्री महादेव जानकर सुस्तावले!


गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीने डोक्यावर घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले मंत्री महादेव जानकर या निवडणुकीत सुस्तावले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी, रा.स.प. अध्यक्ष महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांची पुण्यात बैठक झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत 1 तास सुस्तावलेल्या अवस्थेत चर्चा करण्यात आली. मात्र काहीही निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. लोकसभा निवडणुक लढविणार काय? कोठून? सर्व गुलदस्त्यातच आहे. कारण गेल्या निवडणुकीसारखे वातावरण नाही. धनगर समाजाचे विविध प्रश्न सोडवणूक झाली नसल्याने समाज देखील दुरावला आहे. अर्थातच मतदारांचा दुरावा हेच भाजप-सेना पक्षांकडून अदखल पात्र समजण्याचे कारण मानले जाते.  युतीमध्ये सामावून नाही घेतले तर आम्ही चौथी आघाडी काढू , असा इशारा दिलेला आहे. 

खासदार राजू शेट्टी आक्रमक; आघाडीला अल्टीमेटम

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने माढ्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने माढ्याच्या जागेसाठी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. या मतदार संघाबाबत उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा अल्टीमेटम खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीला दिला आहे.याबाबत राजू शेट्टी म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघाची आम्ही सुरुवातीपासून आघाडीकडे मागणी करत होतो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः ही जागा लढवणार होते. त्यामुळे आम्ही ही मागणी मागे घेतली. परंतु शरद पवार आता निवडणूक लढणार नसल्याने पुन्हा आम्ही माढ्याच्या जागेची मागणी आघाडीकडे केली आहे. उद्यापर्यंत आघाडीने त्याबाबत निर्णय घ्यावा. दरम्यान, काल (सोमवारी) पुण्यात पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये चौथ्या आघाडीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. 
--------------------------------------------------------

राज्यात 11 लाख तरुण मतदार पहिल्यांदाच करणार मतदान

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची मतदार यादी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील  11 लाख 99 हजार 527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे हे मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवरीत ही माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रासह देशात होऊ घातलेला लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रात  मतदारांची  एकूण संख्या 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 आहे. राज्यात 18 ते 19 वर्ष वयोगटात अर्थात प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या तरूणांची संख्या 11 लाख 99 हजार 527 आहे. हे तरुण प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. देशात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची एकूण संख्या 1 कोटी 50 लाख 64 हजार 824 आहे.  

मतदार नोंदणीत महिलांचीही आघाडी 

मतदार नोंदणीमध्ये राज्यात महिला मतदारही आघाडीवर आहेत. राज्यातील पुरुष व महिला मतदारांचे प्रमाण एक हजार पुरुष नोंदणीकृत मतदारामागे नोंदणीकृत 911 महिला मतदार असे आहे. राज्यात एकूण 8 कोटी 73 लाख 29 हजार 910 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी  4 कोटी 55 लाख 1 हजार 877 पुरुष तर  4 कोटी 16 लाख 25 हजार 950 महिला मतदार आहेत. राज्यात 2 हजार 83 नोंदणीकृत तृतीयपंथी मतदार आहेत.  एक हजार लोकसंख्येमागे मतदार नोंदणीचे प्रमाणही राज्यात उल्लेखनीय आहे. राज्यात एक हजार लोकसंख्येमागे 710 नोंदणीकृत मतदार आहेत. तर राज्यात एकूण 48 लोकसभा जागांसाठी चार टप्प्यात  एकूण 95 हजार 475 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे.     

देशात 89 कोटी 87 लाख मतदार


देशातील 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आजमितीस एकूण 89 कोटी 87 लाख 68 हजार 978 मतदार आहेत. यामध्ये 46 कोटी 70 लाख 4 हजार 861 पुरुष मतदार आहेत तर 43 कोटी 16 लाख 89 हजार 725 महिला मतदार आहेत. देशभरात 31 हजार 292 तृतीयपंथी मतदार आहेत.

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंख्येत 7 लाख 49 हजार 441 मतदारांची नव्याने भर


मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मतदारसंख्या 19 लाख 53 हजार 741 होती. निवडणुकीत 60.11 टक्के मतदारांनी सहभाग दर्शवला होता तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात मतदारसंख्या 22लाख 27 हजार 133 इतकी असून मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 लाख 73 हजार 392 मतदार संख्येत वाढ झालेली आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मतदारसंख्या 18 लाख 35 हजार 835 होती. निवडणुकीत 54.14 टक्के मतदारांनी सहभाग दर्शवला होता तर पुढील महिन्यात होणारया २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात मतदारसंख्या 20 लाख 24 हजार 731 इतकी असून मागील निवडणुकीच्या तुलनेत 1 लाख 88 हजार 896 मतदार संख्येत वाढ झालेली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मतदारसंख्या 18 लाख 24 हजार 112 होती. निवडणुकीत 51.47 टक्के मतदारांनी सहभाग दर्शवला होता तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघात मतदारसंख्या 21 लाख 11 हजार 465 इतकी असून मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 लाख 87 हजार 353 मतदार संख्येत वाढ झालेली आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत मतदारसंख्या 18 लाख 13 हजार 553 होती. निवडणुकीत 58.83 टक्के मतदारांनी सहभाग दर्शवला होता.  पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघातील निवडणूक यावेळी प्रथमच दोन टप्यात होत आहे. चार मतदार संघासाठी तिस-या आणि चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामतीत 23 तर शिरुर आणि मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला मतदान होईल. तर, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मावळ मतदार संघात 22 लाख 27 हजार 133 मतदार आहेत. तर, 2405 मतदान केंद्रे आहेत. सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामध्ये घाटाखालील रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण आणि मावळ, पिंपरी, चिंचवड या मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी कामकाज पाहणार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 21 लाख 11 हजार 465 मतदार आहेत. 2027 मतदान केंद्रे आहेत. तर, सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी, हडपसर या मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे कामकाज पाहणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार मतदार संघासाठी तिस-या आणि चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. पुणे, बारामतीत 23 तर शिरूर, मावळमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 20 लाख 24 हजार 731 इतकी असून, मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या सुमारे पाऊण लाखांनी जास्त आहे. त्यामध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मागील निवडणुकीत 54.24 टक्‍के इतके मतदान झाले होते. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 20 लाख 24 हजार 731 इतकी असून, मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या सुमारे पाऊण लाखांनी जास्त आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर हे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा-सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅंटोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या पुणे लोकसभा मतदारसंघात गतवर्षीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत 75 हजार 66 इतकी वाढ झाली आहे. त्यात पुरुष मतदारांमध्ये 37 हजार 133 तर, महिला मतदारांच्या संख्येत 37 हजार 877 इतकी वाढ झाली आहे. तसेच यंदा मतदारयादीत पहिल्यांदाच 55 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच दोन टप्यात निवडणूक होत असल्याने राजकीय नेत्यांना प्रचारासाठी थोडा वेळ मिळणार आहे. 

पुणे जिल्ह्यात एकूण 73,69,141 मतदार



शहर आणि जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघांतील मतदारांची संख्या वाढली आहे. आता एकूण मतदारांची संख्या 73 लाख 69 हजार 141 झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदार हे चिंचवड विधानसभा मतदार संघात असून, 4 लाख 77 हजार 40 झाली आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने वेळोवेळी घेण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे 1 लाख 89 हजार 876 मतदार वाढले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दुबार आणि मयत नावे वगळून नवीन यादी तयार करण्यात आली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, निवडणूक आयोग यांच्यातर्फे नवमतदारांसाठी नावनोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यानुसार पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी हडपसर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 4 लाख 66 हजार 124 मतदार झाले आहेत. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघांपैकी शिरुर हा सर्वांत जास्त मतदार असलेला मतदार संघ ठरला आहे. या मतदार संघात 3 लाख 57 हजार 624 मतदारांची नोंदणी झाली आहे. आंबेगाव विधानसभा मतदार संघ हा जिल्ह्यातील सर्वांत कमी मतदार असलेला मतदार संघ असून, या ठिकाणी 2 लाख 76 हजार 941 मतदार आहेत.

यंदा जिल्ह्यात 7 हजार 899 मतदान केंद्रे 

मतदारांची संख्या वाढल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार शहरी भागात चौदाशे मतदारांसाठी एक मतदान केंद्र, तर ग्रामीण भागात बाराशे मतदारांसाठी एक केंद्र असावे, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे. यापूर्वी जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या 7 हजार 666 होती. आता जिल्ह्यात एकूण 233 मतदान केंद्रे वाढणार असल्याने एकूण मतदान केंद्रांची संख्या 7 हजार 899 होणार आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मतदार नाव नोंदणी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2 लाख नव मतदार वाढले आहेत. मतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्यात 233 मतदान केंद्र वाढणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हा प्रशासनाने मतदार यादी अद्यावत करण्याची मोहिम हाती घेतली होती. यामध्ये मतदारांच्या नाव, पत्यांमधील दुरुस्ती, दुबार नावे वगळण्याबरोबरच नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. महाविद्यालयांमध्ये सुध्दा मतदार नाव नोंदविण्यासाठी मोहिम राबविली होती. तसेच, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये विशेष मोहिम राबविली होती. या सर्व मोहिमांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दोन लाखांपेक्षा अधिक अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले. या सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.






होय, माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे; उमेदवारांना द्यावी लागेल वृत्तपत्रात जाहिरात!


देशात लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्ष उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका आणि चर्चा करत आहे. अशातच निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना एक झटका दिला आहे. लोकसभा निवडणूक लढवणारा उमेदवार जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर त्याला ती गोष्टी लपवता येणार नाही. इतक नव्हे तर संबंधित उमेदवाराला वृत्तपत्र आणि टिव्हीवर जाहिरात देऊन मी गुन्हेगार आहे आहे किंवा माझ्यावर अमूक अमूक प्रकारचे खटले सुरु आहेत ही माहिती द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या उमेदवाराला एकदा नव्हे तर 3 वेळा अशा प्रकारची जाहिरात द्यावी लागणार आहे. जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराने जाहिरात दिली नाही तर आयोगाकडून कारवाई केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सर्व राजकीय पक्षांना उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे. कारण केवळ उमेदवारांनाच नव्हे तर संबंधित पक्षांना देखील अशा प्रकारच्या उमेदवारांची माहिती वृत्तपत्र आणि टिव्हीवर द्यावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाकडून तक्रारीसाठी ‘सी-व्हिजिल’ अॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र 


पुणे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे अॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील तृटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’ अॅपची निर्मिती भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून, त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे, तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितांवर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन अॅपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत ‘सी-व्हिजिल’ हे अॅप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. ‘सी-व्हिजिल’ हे अॅप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या अॅपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ‘जीपीएस’ प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही ड्रॉईड (जेलीबीन आणि वरील) स्मार्टफोनवरून या अॅपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येवू शकते. तीन टप्प्यात ही तक्रारीची प्रक्रीया पूर्ण होणार आहे.
*पहिला टप्पा- आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांने त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्याच्या नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. अॅप वापरकर्त्यास ‘सी-व्हिजिल’ अॅपद्वारे आपली ओळख लपवून सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील अॅप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई ही होणार आहे.
*दुसरा टप्पा- नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनीटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या महितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या जीव्हीआयजीआयएल अन्वेषक नामक जीआयएस-आधारित मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनीटाच्या आत पोहोचणे अपेक्षीत आहे. संबंधित तक्रारी बाबत प्राथमिक तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्या संबंधीचा अहवाल  निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठवतील. हा कालावधी 30 मिनीटापेक्षा अधिक नसेल.
*तिसरा टप्पा- भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपासकाने अॅपव्दारेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणुक निर्णय अधिकारी ती तक्रार ड्रॉप करावयाची, निकाली काढावयाची की पुढे पाठावायची याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य अढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रार कर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल.
*अॅपचा दुरूपयोग होवू नये म्हणून ‘सी-व्हिजिल’ चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईल.  फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ‘सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ 5 मिनिटांचा अवधी मिळेल. हे अॅप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देणार नाही. अॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत. एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान 5 मिनिटांचा विलंब करावा लागतो. जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेमण्या आधीही डुप्लिकेट, फ्रिवोलस आणि असंबंधित प्रकरणे ड्रॉप करण्याचा पर्याय आहे. ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार. या शिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणुक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करावा, अथवा 1800111950 किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1950 मध्ये राष्ट्रीय संपर्क केंद्राला कॉल करा.
*यासाठी ‘सी-व्हिजिल’ अॅपवर करता येईल तक्रार
मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप.
शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.
मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर
मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.
सी-व्हिजिल’अॅपची तक्रार योग्य असल्यास संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल
संबंधितांवर क्रिमीनल अॅक्शन होणार.
कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.
कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.