Saturday, 23 March 2019

#LOKSABHA ELECTION 2014 लोकसभा 2019: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील 'संयुक्त पुरोगामी महाआघाडी'ची घोषणा

संयुक्त पुरोगामी महाआघाडीतील विविध 56 पक्ष, संघटनांची युतीबरोबर होणार लढत

राज्यातल्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे चित्र अखेर स्पष्ट झाले असून 48 पैकी 24 जागांवर काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस 20 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर दोन्ही पक्षांनी 4 जागा आपल्या सहयोगी पक्षांना देण्यात आली आहेत. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमानी या पक्षांचा समावेश आहे. महाआघाडीत पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत. मुंबईत आयोजीत महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. मात्र या पत्रकार परिषदेला राधाकृष्ण विखे-पाटलांनी गैरहजेरी लावली आहे. महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे. तर बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा सोडण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानीला अमरावतीची एक जागा महाआघाडीतून देण्यात आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत १७ छोटे पक्ष सहभागी झाले असून या सर्व पक्षांची नावे चव्हाण यांनी वाचून दाखवली. मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. त्यानंतर, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारवर टीका केली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. दरम्यान, राधाकृष्ण विखेंचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सुजय यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राधाकृष्ण विखेही भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. मात्र, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली होती. असं असलं तरी विखेंनी पडद्याआडून मुलाचा प्रचार सुरू केला आहे आणि त्यामुळेच ते काँग्रेसचं व्यासपीठ टाळू लागले आहेत.

महाआघाडातील घटक पक्ष-

महाआघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, युवा स्वाभिमान पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि इतर काही पक्ष आणि संघटना मिळून एकूण 56 जण आहेत.

राज्यातील महाआघाडीतील जागा वाटप-

काँग्रेस 24
राष्ट्रवादी 20
स्वाभिमानी शेतकरी 2
बहुजन विकास आघाडी 1
युवा स्वाभिमानी 1

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=
===============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.