Monday 25 March 2019

पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ. उज्ज्वला काळे विजयी ; सेनेचा पराभव

पालघर नगरपरिषदेत महायुतीचा विजय


पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने 19 जागांवर विजय मिळवला आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या 26 जागांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा पराभव केला.  पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 प्रभागांमध्ये 28 जागांसाठी मतदान घेण्यात आले यामध्ये 90 उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार होते. 90 पैकी 30 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असून त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार होते.  या निवडणुकीत 47 हजार 850 मतदार आहेत. दिवसभरात सुमारे 67% मतदान झाले. पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे आज निकाल लागले. नगरपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 26 जागांवर निवडणूक लढवण्यात आली. त्यानंतर आज लागलेल्या निकालात एकूण 28 जागांपैकी 20 जागांवर शिवसेना-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवला. तर नगराध्यक्ष पदी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्वला काळे विजयी झाल्या.शिवसेना 14 जागा तर भाजपने 6 जागा जिंकल्या. म्हणजेच युतीला 28 पैकी 20 जागी विजयी मिळाला. तर अपक्ष- 05, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-बविआ अशा आघाडील 03 जागांवर विजय मिळाला. दरम्यान, पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या युतीच्या उमेदवार श्वेता पाटील यांचा निसटता पराभव झाला.दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात होते. तथे सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. त्यात शिवसेनेने १४, भाजपाने सात असा २१ जागंवर विजय मिळवला. तर आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले असून त्यातील बहुतांश युतीतील बंडखोर आहेत. नगरपालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने यावेळी केला होता. पालघरच्या लोकसभा मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढत होती. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नव्हती. युतीत नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनता दल यांची आघाडी झाली होती.  राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत होते. १९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन, भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापना केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेसा दोन अपक्षांची साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

पालघर पक्षीय बलाबल (नगराध्यक्षपद- राष्ट्रवादी)

एकूण जागा - २८

शिवसेना - १४

भाजपा - ७

राष्ट्रवादी - २

अपक्ष - ५

नगराध्यपदाचे उमेदवार
उज्ज्वला केदार काळे (महाआघाडी-राष्ट्रवादी) विजयी
अंजली परेश पाटील (शिवसेना-बंडखोर) पराभव
श्वेता मकरंद पाटील (महायुती-शिवसेना)  पराभव
==========================================

शिवसेनेच्या शैला खंडागळे देहू लोहगाव गटात विजयी


जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. शैला खंडागळे यांना 4117 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र चव्हाण यांना 2957 तर काँग्रेसचे रूपेश चव्हाण यांना 1040 मते मिळाली.जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे १ हजार २३० मतांनी विजयी झाल्या आहेत. तिरंगी लढतीत शैला खंडागळे यांना एकूण ४ हजार २१६ मते, राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र चव्हाण यांना २ हजार ९८६ तर, काँग्रेसचे रुपेश चव्हाण यांना ७१५ मते पडली आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली तालुक्यातील गट क्र. ३५ देहूगाव- लोहगाव या गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मंगल जंगम यांचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने रिक्त झालेला जागेवर पोट निवडणूक झाली. या निकालामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य संख्या एकने घटून ४३ झाली आहे. तर शिवसेना सदस्यांची संख्या १४ झाली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे ७ सदस्य असून, बावडा-लाखेवाडी गटाच्या सदस्या रत्नप्रभा पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचे एक सदस्यपद रिक्त झाले आहे. तर भाजपचे ७ सदस्य, लोकशाही क्रांती १, राष्ट्रीय समाजपक्ष १ आणि अपक्ष २ असे बलाबल आहे. या निवडणुकीत एकूण ८ हजार ५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १२७ मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला.

पुणे जिल्ह्यातील मावळ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चारपैकी ओझर्डे, औंढे खुर्द व नाणोली तर्फे चाकण या तीन ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले. टाकवे खुर्द ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.  निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भंडाऱ्याची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.  मावळ तालुक्‍यातील वराळे, पुसाणे व शिलाटणे या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदासह संपूर्ण निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून इतर चार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी व सदस्यत्वाच्या 16 जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी सोमवारी (ता. 25) येथील महसूल भवनात तहसीलदार सुनंदा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, भाजप कार्यालयात आमदार बाळा भेगडे व तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या हस्ते नाणोली तर्फे चाकण, ओझर्डे व औंढे खुर्द येथील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नशिबाचा कौल -औंढे खुर्द ग्रामपंचायतीत प्रभाग एकमधील जागेवर सुरेखा केदारी व नंदा ठाकर यांना प्रत्येकी 238 अशी समान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठ्या टाकून करण्यात आलेल्या निवडीत सुरेखा केदारी यांना नशिबाचा कौल मिळाला. ओझर्डे येथे सरपंचपदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बाळू पारधी यांनी 19 मतांनी विजय मिळवला. नाणोली तर्फे चाकण ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वाच्या सातही जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. येथे सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मोनिका शिंदे यांनी विजय मिळवला. त्यांना 254 मते मिळाली.

इतर ग्रामपंचायतीमधील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे 

औंढे खुर्द: सरपंच : अरुण चव्हाण (550). 
सदस्य : 
प्रभाग 1 : नीलेश नाणेकर (259), रोशना पाठारे (257), सुरेखा केदारी (238).
प्रभाग 2 : अरुण चव्हाण (259), रत्ना खाडे (255), विलास कदम, संदेश मांडेकर, ज्योती जांभूळकर, मृणाली मांडेकर (सर्व बिनविरोध). 
टाकवे खुर्द : सरपंच : तुशांत ढमाले (325).
सदस्य :
प्रभाग 1 : ज्योती धुमाळ (192). 
प्रभाग 2 : मनीषा गरुड (146), शालन गरुड (120), विजय गरुड (143).
प्रभाग 3 : ज्योती ढमाले (195), संपत गरुड (169), बाबाजी ओव्हाळ, शांताराम गायकवाड, सुवर्णा गायकवाड (सर्व बिनविरोध ). 
ओझर्डे : सरपंच : बाळू पारखी (450). 
सदस्य :
प्रभाग 1 : दत्ता ओझरकर (126). 
प्रभाग 2 : स्वप्नील येलमारे (154), आशा ओझरकर (185), अंजना ओझरकर (186).
प्रभाग 3 : मंगल पारखी (243), स्वाती घारे, विजय पारखी (दोघेही बिनविरोध). 
==========================================

लोणार नगरपालिका-काँग्रेस पक्षाला पुन्हा एकहाती सत्ता 

लोणार नगरपालिका सत्ता पलटण्याचा पायंडा यावेळेस मतदारांनी मोडीत काढला. लोणार नगरपालिकेच्या स्थापनेपासून लोणार शहरातील जनतेने कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्ता दिली नव्हती. मात्र यावेळी लोणारवासियांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे.लोणार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे आज निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सौ. पुनम मनिष पाटोळे ह्या बहुमतांनी विजयी झाल्या. तसेच 17 जागांपैकी काँग्रेस पक्षाचे 10 आणि शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले.

सिंदखेड राजा नगरपालिकेवर युतीची सत्ता

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा निकाल लागला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे.सिंदखेड राजा नगरपालिकेवर शिवसेनेचे सात, राष्ट्रवादीचे आठ, अपक्ष एक तर एक ठिकाणी भाजपचा नगरसेवक विजयी झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जास्त जागा आली तरी शिवसेनाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आहे. सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यामध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 
==========================================
नाशिक : बागलाण पंचायत समितीच्या पठावे दिगर गणाच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंदुबाई काळू ढुमसे ६३२ मतांनी विजयी. भाजपच्या मेनका शांताराम कोल्हे यांचा केला पराभव
==========================================
24 मार्च 2019 रोजी मतदान झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था (आज निकाल - मतमोजणी सुरु आहे): नगरपरिषदा: पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा). जिल्हा परिषदा: पुणे- देहुगाव-लोहगाव निवडणूक विभाग (ता. हवेली). पंचायत समित्या: बागलाण (जि. नाशिक)- पठावे दिगर निर्वाचक गण आणि मोहाडी (जि. भंडारा)- वरठी व पालोरा.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :  ठाणे- 3,  रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4,नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद-3,  उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1,जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6,उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.


[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.


[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.