वराळे ग्रामपंचायत सरपंचपदी मनीषा शिंदे तर शिलाटणे ग्रामपंचायत सरपंचपदी गुलाब आहिरे
राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या वराळे ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंचपदासह सर्व जागा बिनविरोध करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर शेवटी ग्रामस्थांना व पुढारी मंडळीना यश आले. मावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीपैकी शिळाटणे व पुसाणे या ग्रामपंचायतीसह अथक प्रयत्नानंतर वराळे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अखेर यश आले. मात्र नाणोलीच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या असून सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. वराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पाच तर सदस्यपदाच्या पंधरा जागांसाठी 84 अर्ज दाखल झाले होते. परंतु निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही मंडळी सुरूवातीपासूनच प्रयत्नशील होती. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी दाखल झालेल्या पाच अर्जापैकी चार अर्ज व सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 84 अर्जापैकी 69 अर्ज मागे घेणे आवश्यक होते. यासाठी काही ज्येष्ठ व राजकीय व्यक्तींसह ग्रामस्थांनी अखेरच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. सर्व ग्रामपंचायत बिनविरोध झाली आणि सुटकेचा निश्वास टाकला. निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावर होणारा पैसा आणि वेळ याची बचत होऊन परंपरागत चालत आलेले राजकीय वैर संपुष्टात येण्यास मदत झाली आहे. शिळाटणे, पुसाणे व वराळे ग्रामस्थांनी आणि स्थानिक पुढाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध करून मावळातील अन्य गावांसाठी एक चांगला आदर्श ठेवला आहे.
प्रभागनिहाय बिनविरोध उमेदवार
सरपंच- मनीषा निलेश शिंदे
प्रभाग 1 :लीला चंद्रकांत वाजे, सारिका रामदास मांडेकर, रूपाली राजाभाऊ आडाळे.
प्रभाग 2 : अभिषेक ज्ञानेश्वर मराठे, विशाल तुकाराम मराठे, प्रियंका रामदास भेगडे.
प्रभाग 3 : अस्मिता निलेश मराठे, विकास भाऊ पवार, मनिषा राम मराठे.
प्रभाग 4: अमृता प्रवीण मराठे, प्राजक्ता महेश राजगुरु, गणेश मच्छिंद्र मराठे.
प्रभाग 5 : सीमा विकास मराठे, जनार्दन जिजाबा पारगे, निलेश दत्तात्रय मराठे
=========================================
शिलाटणे ग्रामपंचायत बिनविरोध; सरपंचपदी गुलाब आहिरे
मावळ तालुक्यातील शिलाटणे ग्रामपंचायतीने आदर्शवत काम करत सरपंच पदासह सर्व जागा बिनविरोध केल्या आहेत. लोणावळा ग्रामीण भागातील शिलाटणे, औंढे -औंढोली व टाकवे खुर्द या तीन ग्रामपंचयात निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काल अर्ज माघारीच्या दिवशी मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांनी शिलाटणे गावातील तसेच परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करत गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याकरिता केलेल्या शिष्टाईला ग्रामस्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिलाटणे ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध पार पडली.शिलाटणे ग्रामपंचायतीचे सरंपच पद हे अनुसुचीत जातीसाठी आरक्षित आहे, याजागेकरिता पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. सर्व इच्छूकांशी चर्चा करत त्यांच्यामध्ये चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गुलाब विठ्ठल आहिरे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्यपदी वार्ड क्रमांक १ मधून कांचन शरद भानुसघरे ह्या दुसऱ्यांदा बिनविरोध झाल्या तसेच माधुरी रामदास भानुसघरे आणि मनिषा दत्ता भानुसघरे. वार्ड क्र २ मधून निर्मला बाळासाहेब भानुसघरे, सोनाली सुशील येवले व शरद भीमाजी आहिरे, वार्ड क्र ३ मधून जनाबाई विनायक कोंडभर, अश्विनी मच्छिंद्र भानुसघरे व रुपाली दत्ता कोंडभर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष बाब म्हणजे बाळासाहेब नथु कोंडभर यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने सदर निवडणूक बिनविरोध होण्यास सोपे झाले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, मावळ सचिव संघटना अध्यक्ष गणपतराव भानुसघरे, माजी सरपंच हेमंत भानुसघरे, तानाजी भानुसघरे, ज्ञानदेव भानुसघरे, संभाजी येवले, भरत कोंडभर, ज्ञानदेव भानुसघरे, अनिल भानुसघरे, अमोल केदारी, प्रदिप हुलावळे, समीर हुलावळे, शांताराम भानुसघरे, बाबाजी भानुसघरे, विनायक कोंडभर, नाथा कोंडभर, संतोष भानुसघरे, संग्राम भानुसघरे यांचे योगदान लाभले. गावाच्या विकासासाठी सर्वानीं एकोप्याची भावना, समजूतदारपणा, मनाचा मोठेपणा दाखवून काही उमेदवारांनी माघार घेत निवडणुक बिनविरोध केली. आता बिनविरोध निवड झालेल्या सर्व सदस्यांनी व सरपंच यांनी सर्व ग्रामस्तांना सोबत घेत गावात विकास कामांची गंगा आणत तालुक्यात आदर्श निर्माण करुन दाखवावा अशी भावना दीपक हुलावळे व मान्यवरांनी या निवडीच्या वेळी व्यक्त केली.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.