आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार
पुणे जिल्हा परिषदेच्या ३५-देहूगाव-लोहगाव या गटासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली असून २४ मार्चला मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्त्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ३५-देहूगाव-लोहगाव या गटाच्या एका रिक्त जागेसाठी तर नाशिक जिल्ह्यातील बागलाण पंचायत समितीच्या २-पठारे दिगर या गणामधील एका रिक्त जागेसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीच्या २ गणामधील दोन रिक्त जागेसाठी देखील पोटनिवडणूक होणार आहे. मोहाडी पंचायत समितीच्या २ गणामध्ये २९ -वरठी आणि ३२-पालोरा या गणांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या एका आणि नाशिक व भंडारा जिल्ह्यातील ३ पंचायत समितीच्या रिक्त जागांवर पोटनिवडणूक रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी होणार आहे. या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून आजपासून आयोगाच्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या गट क्र. ३५ देहू- लोहगाव या गटातून निवडून आलेल्या सदस्या मंगल नितीन जंगम (राष्ट्रवादी) यांचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने रिक्त झालेला जागेवर पोट निवडणूक होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेतील हवेली तालुक्यातील गट क्र 35 - देहू-लोहगाव अनुसूचित जाती राखीव जागेवर निवडून आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या श्रीमती जंगम मंगल नितीन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले होते. त्यांच्या विरुद्ध शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केली होती. पुणे जिल्हा परिषदेच्या गट क्र. ३५ देहू- लोहगाव मध्ये रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.