Saturday 16 March 2019

एमआयएमच्या विरोधानंतर माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे तिकीट कट!

जनता दल(से)कडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता


एमआयएमच्या विरोधानंतर माजी न्या.बी.जी. कोळसे पाटील यांचे तिकीट कट झाल्याची चर्चा असून आता एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना औरंगाबादची जागा लढवायची आहे. जनता दल(से)कडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे. कोळसे पाटील यांच्या नावाला या भागातून सर्वांचा विरोध होता त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्यांची अनेक नावे वंचित बहुजन आघाडीच्या यादीतून अचानक बाद करण्यात आलेली आहेत यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील विठ्ठल सातव यांच्या नावाचाही समावेश आहे. सातव यांचे नाव बाद करून वडार समाजाचे अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाइकांचा तथाकथित कोर्ट केसमुळे नाव बाद झाल्याची चर्चा आहे.  माजी न्या. बी. जी.  कोळसे पाटील यांचे औरंगाबाद लोकसभेसाठीचे नाव वंचित बहुजन आघाडीच्या काल जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीतून बाद झाले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज मुंबईत ३७ उमेदवारांची नावे जाहीर केली. उर्वरित नावे लवकरच जाहीर होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच स्वत: बाळासाहेबांनी परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या २२ उमेदवारांची नावे जाहीर के ली होती. त्यात माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील यांचे नाव होते.  आम्ही जाहीर केलेल्या २२ जागा आम्हाला सोडा, असा प्रस्तावच नंतर बाळासाहेबांनी काँग्रेसला दिला होता. आधी बारा जागा मागितल्या होत्या. नंतर त्या अशा पद्धतीने २२ झाल्या होत्या. त्यात कोळसे पाटील हे नाव होते. दुसरीकडे स्वत: कोळसे पाटील हे मला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत होते. आता या नावावरून वंचित बहुजन आघाडीतच नाराजी पसरल्याचे व या आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या एमआयएममध्ये तर प्रचंड नाराजी असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या नव्या यादीत कोळसे पाटील यांचे नाव नसणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे. दरम्यान, कोळसे पाटील हे  देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील जनता दल सेक्युलरचे औरंगाबादचे उमेदवार असतील, असे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात या प्रतिनिधीने कोळसे पाटील यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले, होय. मी जनता दल सेक्युलरचाच उमेदवार आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही आमचे काही म्हणणे नाही. काँग्रेसने मला पाठिंबा द्यावा, असा माझा आग्रह आहे. पाच महिन्यांपूर्वीच कोळसे पाटील यांची जनता दलाच्या सेक्युलरच्या अ. भा. सरचिटणीसपदी स्वत: देवेगौडा यांनी नियुक्ती केली आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीत औरंगाबादची जागा जनता दलाला मिळावी, असे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात देवेगौडा आणि सोनिया गांधी यांची बोलणी झालेली आहे. कोळसे पाटील यांना शहरातील डावे, समाजवादी व परिवर्तनवादी पक्षही पाठिंबा देतील, असे जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजमल खान यांनी म्हंटले आहे. आता एमआयएमतर्फे इम्तियाज जलील यांना औरंगाबादची जागा लढवायची आहे. यासंदर्भात स्वत: ओवेसी, देवेगौडा आणि इम्तियाज जलील यांनी ठरवावे. त्याला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा राहील. वेगळा उमेदवार राहणार नाही, असे स्वत: बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर करून निर्णय ओवेसींच्याकडे सोपवला आहे. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक एमआयएमने लढविली नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे पूर्णत: विस्कळीत होईल. लोकसभेनंतर विधानसभेला सामोरे जायचे आहे. तेव्हा काय करायचे? आणि एकही जागा लढवायची नसेल तर आपण राजकीय पक्ष कसे, असा सवाल जलील यांनी एमआयएमचे सुप्रिमो असदुद्दीन ओवेसी यांनाच विचारला. कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढविण्याबाबतचा दबाव असल्याची माहिती जलील यांनी ओवेसी यांना दिली व लवकरच त्यांना निर्णय अभिप्रेत आहे असेही त्यांनी सांगितले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीतील सर्वच उमेदवारांच्या नावापुढे त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी लढाई करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात येऊ लागले. त्यावर, आंबडेकरांनी जातीनं खुलासा केला आहे. निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आल्याचं आंबेडकर यांनी म्हटले. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलेल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची नावे घोषित करताना त्यांच्या नावापुढे कंसात समाजाचा उल्लेख करून अ‍ॅड. प्रकाश आंबडेकर यांनी आणखी एक डाव खेळला. अ‍ॅड. आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडी उभी केली आहे. आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी अशा बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यात सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिलांचा समावेश आहे. उमेदवारांच्या जातीबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले की, आज आम्ही जात जाहीर केली. कारण ही प्रणाली कोणताही पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली. आज आम्ही त्यांना फक्त कार्यकर्ता म्हणूनच तिकिट दिलं आहे. ही जातीअंताच्या लढाईचीच सुरुवात आहे', असे आंबेडकर यांनी सांगितले. तर ब्राह्मण किंवा सवर्ण जातींना का तिकिट दिलं नाही, जैन आणि मारवाडी समाज हा भाजपबरोबर आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गृहीत धरलं नाही. जर त्यांना वाटत असेल आमच्याकडे यावं तर खुल्या मनाने त्यांनी आमच्याकडे यावं. तसेच 'ब्राह्मण आणि कोमटी समाजातून कुणी आमच्याकडे उमेदवारी मागितली नाही. आम्हाला या समाजातून माणसंच मिळाली नाहीत', असे आंबेडकर म्हणाले आहेत. एमआयएमला मुंबईतून (उत्तर-मध्य) पूनम महाजन यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची विनंती केली. एमआयएमने त्यावर विचार केल्यानंतर उर्वरित 11 जागांची घोषणा केली जाईल असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या दारात पोलिस;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन 



वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता.16) वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या घराच्या परिसरात सकाळी पोलिसांनी रुट मार्च केला. पोलिसांकडून व्हीआयपींच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी रुट मार्च काढण्यात आला होता. यामध्ये सीआरपीएफ, आरसीपी पथकांचा समावेश होता. मात्र, सकाळपासूनच सोशल मीडियावर या रुट मार्चचे फोटो व्हायरल झाल्याने जिल्हात राजकीय चर्चेंना जोर चढला आहे. दरम्यान शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद तत्काळ सोशल मीडियावर उमटत आहेत. उलट-सुलट आणि नाहक चर्चेने शहरभर संभ्रम निर्माण होत आहे. या सगळ्या घडामोडींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून सोशल मिडियावरील अफवांसोबत फेक पोस्टवर विश्वास ठेवू नका असे आवाहन अकोला पोलिस विभागाच्या सायबर विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
अ.क्र.
मतदारसंघ
बहुजन वंचित आघाडी
1
वर्धा
धनराज वंजारी
2
रामटेक
किरण रोडगे - पाटनकर
3
भंडारा
गोदीया :- एन के नान्हे
4
चंद्रपूर
राजेंद्र महाडोळे
5
गडचिरोली
रमेश गजबे
6
यवतमाळ
प्रवीण पवार
7
बुलढाणा
बळीराम सिरस्कार
8
अमरावती
गुणवंत देवपारे
9
हिंगोली
मोहन राठोड
10
नांदेड
यशपाल भिंगे
11
परभणी
आलमगीर खान
12
बीड
विष्णू जाधव
13
उस्मानाबाद
अर्जुन सलगर
14
लातूर
राम गारकर
15
जळगाव
अंजली बाविस्कर
16
रावेर
नितीन कंडोलकर
17
जालना
शरदचंद्र वानखेडे
18
रायगड
सुमन कोळी
19
पुणे
अनिल जाधव
20
बारामती
नवनाथ पडळकर
21
माढा
विजय मोरे
22
सांगली
जयसिंग शेंडगे
23
सातारा
सहदेव एवळे
24
रत्नागिरी-सिधुदुर्ग
मारुती जोशी
25
कोल्हापूर
अरुणा माळी
26
हातकणंगले
अस्लम सययद
27
नंदुरबार
दाजमल मोरे
28
दिंडोरी
बापू बंडे
29
नाशिक
पवन पवार
30
पालघर
सुरेश पडवी
31
भिवंडी
ए डी सावंत
32
ठाणे
मल्लिकार्जुन पुजारी
33
मुबंई साउथ दक्षिण
अनिल कुमार
34
मुबंई साउथ दक्षिण मध्य
संजय भोसले
35
ईशान्य मुबंई
संभाजी काशीद
36
मावळ
राजाराम पाटील
37
शिर्डी
अरुण साबळे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE PAY NOW- 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.