Thursday, 21 March 2019

c Vigil 'सी व्हिजिल' अॅपवर 'फाजील' तक्रारींचा पाऊस! ; सेल्फीसह हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेज

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात पुणेकरच अग्रेसर;सर्वाधिक 133 तक्रारी दाखल 

आठवड्यात हजारो असंबंधित तक्रारींमुळे निवडणूक अधिकाऱ्यांना डोकेदुखी


सामान्य नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन करण्यासाठी सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप प्रभावी ठरत असले तरी बहुतांशपणे 'सी व्हिजिल' वर 'फाजील' तक्रारींचा पाऊस पडत आहे. या अॅपवर सेल्फीसह हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेज नागरिकांकडून केले जात असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. चांगल्या सुविधांचा गैरवापर होत असल्याने संबधितांवर कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आयोगातील अधिकारी आहेत. सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदविल्या आहेत. दरम्यान राज्यात आठवडाभरात सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅपवर आचारसंहिता भंगाच्या हजारो तक्रारीं दाखल झाल्या असून त्यामधील बहुतांश तक्रारी आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. गंभीर 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु असून 387 तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. राज्यभरात 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र असंबंधित तक्रारींमुळे सी व्हिजिल (cVigil) मोबाईल अॅप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण या अॅपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत. आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता भंगाच्या सी व्हिजिल अॅपवर आतापर्यंत 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदविल्या आहेत. त्या खालोखाल ठाणे 68, सोलापूर 61, मुंबई उपनगर 45 तर मुंबई शहर येथे 41 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात 36, अहमदनगर 35, अकोला 11, अमरावती 11, औरंगाबाद 12, बीड 8, भंडारा 2, बुलढाणा 13, चंद्रपूर 3, धुळे 2, गडचिरोली 2, गोंदीया 3, हिंगोली 7, जळगाव 20, जालना 1, कोल्हापूर 18, लातूर 11, नागपूर 30, नंदूरबार 2, नाशिक 22, उस्मानाबाद 8, पालघर 24, परभणी 7, रायगड 8, रत्नागिरी 4, सांगली 17, सातारा 11, सिंधुदूर्ग 19,  वर्धा 14, वाशिम 6 तर यवतमाळ जिल्ह्यातून 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पोस्टर, बॅनर संदर्भातील सर्वाधिक तक्रारी अॅपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर 387 तक्रारी या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक 230 तक्रारी या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरण 44, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण 7, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप 22, मद्याचे वाटप 18, पैशाचे वाटप 38, पेड न्यूज 41, धार्मिक किंवा सामाजिक भाषण 3, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक 5, निर्धारीत वेळेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर 5 तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत 19 तक्रारी अॅपवर नोंदवण्यात आल्या. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन अॅपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सी व्हिजिल मोबाईल अॅप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. अॅपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेक न्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल अॅपवर तक्रार करता येते.
==========================================

सोशल मीडियावरील राजकीय मजकूर ३ तासांत काढणार 

आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. ११ मार्च रोजी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. या काळात आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार असून, त्‍यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. निवडणुकीसाठी सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावरून होणारा प्रचार आणि कायद्याचे उल्लंघन होवू नये यासाठी निवडणूक आयोगाने सोशल मीडिया कंपन्यांना 'कोड ऑफ कंडक्ट' करण्याच्या सूचना दिल्‍या आहेत. फेसबुक, गुगल आणि ट्विटर यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांनी आयोगाच्या आदेशावरुन एक 'कोड ऑफ कंडक्ट' तयार केले आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, गुगल,  शेअरचॅट, टिकटॉकवरुन लोकसभेचा प्रचार करण्यास आयोगाने बंदी घातली आहे. प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर टाकलेला मजकूर तीन तासांच्या आत सोशल मीडिया कंपन्या काढून टाकणार आहेत. यासाठी सोशल मीडियाने व्हॉलूंटरी कोड ऑफ एथिक्स २०१९ तयार केल्‍याची माहिती दिली आहे. शिवाय फेसबुक, गुगल ट्विटर सारख्या सोशल मीडिया कपन्यांनी बुधवारी याबाबतची माहिती भारतीय निवडणूक आयोगाकडे जमा केली आहे. 'इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया' (IAMAI) व सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा कोड ऑफ इथिक्स तयार करण्यात आला आहे. कलम १२६ अंतर्गत आचारसंहितेचा भंग करणारा मजकूर असेल तर त्‍याबाबत तीन तासांच्या आत निवडणूक आयोगाला माहिती कळविली जाणार आहे.
======================================

whatsapp : 'हे' व्हॉटसअप वापरल्यास अकाउंट बंद होणार

सोशल मीडियातील व्हॉट्सअॅप हे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. परंतु, काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. म्हणून कंपनीने आपल्या युजर्सना सावधानतेचा इशारा दिला आहे.व्हॉटसअपने आपल्या युजर्सना सावधगिरीचा इशारा दिला आहे. जर कोणी क्लोन अॅप किंवा थर्ड पार्टी अॅप वापरत असेल तर त्याचे अकाउंट बंद केले जाईल, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. कंपनीने ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीत थर्ड पार्टी अॅपवरून युजर कशा प्रकारे खऱ्या अॅपवर येऊ शकतात ते सांगितले आहे. तसेच कोणत्या प्रकारची थर्ड पार्टी अॅप तुमचे खाते बंद करू शकतात ते सुद्धा सांगितले आहे. जीबी व्हॉटसअप हे व्हॉटसअपशी मिळते जुळते थर्ड पार्टी अॅप आहे. याचा वापर केल्यास व्हॉटसअप तुमचे अकाउंट बंद करू शकते, असा इशारा व्हॉट्सअॅपने दिला आहे. व्हॉटसअप प्लस या अॅपबद्दल कंपनीने याआधीही इशारा दिला होता. जर तुम्ही याचा वापर करत असाल तर तुमचे व्हॉटसअप अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. योव्हॉटसअप व्हॉटसअपसारखेच दिसणारे हे थर्ड पार्टी अॅप तुम्ही वापरत असाल तर त्वरीत बंद करा कारण यामुळे तुम्हाला व्हॉटसअॅप जास्त काळ वापरता येणार नाही. तसेच बीएईव्हॉटसअप हे अॅप वापरणाऱ्यांचे व्हॉटसअप सुद्धा बंद होऊ शकते. हे सर्व अॅप थर्ड पार्टी असल्याने कंपनी हे कधीही बंद करू शकते, असा इशारा व्हॉट्सअॅपने दिला आहे.
=====================================================

निवडणूक आयोगाकडून तक्रारीसाठी ‘सी-व्हिजिल’ अॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र 

पुणे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीझन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणूकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकणार आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हे अॅप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरणार आहे. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील तृटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’ अॅपची निर्मिती भारत निवडणुक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे. पूर्वी आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीची सत्यता तपासून, त्यावर कारवाई करताना यंत्रणेची दमछाक होत असे, तसेच सबळ पुराव्या अभावी संबंधितांवर कारवाई करताना मर्यादा येत असत. या नवीन अॅपमुळे या त्रुटी आणि मर्यादा कमी होणार आहेत ‘सी-व्हिजिल’ हे अॅप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नाविन्यपूर्ण अस्त्र असणार आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. ‘सी-व्हिजिल’ हे अॅप यूजर फ्रेंडली असून त्याचा वापर अत्यंत साधा आणि सोपा आहे. या अॅपचा वापर निवडणुकांच्या अधिसूचनांच्या तारखेपासून ते मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. अॅपची विशिष्ट्ये म्हणजे तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हिडिओ पुरवा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, चांगले इंटरनेट कनेक्शन आणि ‘जीपीएस’ प्रवेशासह सज्ज असलेल्या कोणत्याही ड्रॉईड (जेलीबीन आणि वरील) स्मार्टफोनवरून या अॅपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येवू शकते. तीन टप्प्यात ही तक्रारीची प्रक्रीया पूर्ण होणार आहे.

[?] पहिला टप्पा- आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटत असल्यास नागरिकांने त्या घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जी.पी.एस.) स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अॅपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्याच्या नंतर त्या तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होतो. नागरिक अशा प्रकारे अनेक घटना नोंदवू शकतात, प्रत्येक अहवालासाठी एक आयडी मिळवू शकतात. अॅप वापरकर्त्यास ‘सी-व्हिजिल’ अॅपद्वारे आपली ओळख लपवून सुध्दा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील अॅप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई ही होणार आहे.

[?] दुसरा टप्पा- नागरिकाने तक्रार नोंदविल्यानंतर ती अवघ्या पाच मिनीटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्या महितीच्या आधारे तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे ती माहिती पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या जीव्हीआयजीआयएल अन्वेषक नामक जीआयएस-आधारित मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधित पथक घटनास्थळावर अवघ्या 15 मिनीटाच्या आत पोहोचणे अपेक्षीत आहे. संबंधित तक्रारी बाबत प्राथमिक तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्या संबंधीचा अहवाल  निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे तातडीने पाठवतील. हा कालावधी 30 मिनीटापेक्षा अधिक नसेल.

[?] तिसरा टप्पा- भरारी पथकाने तक्रारीवर कारवाई केल्यानंतर क्षेत्रीय अहवाल तपासकाने अॅपव्दारेच संबंधित निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणुक निर्णय अधिकारी ती तक्रार ड्रॉप करावयाची, निकाली काढावयाची की पुढे पाठावायची याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य अढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रार कर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रार कर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल.

[?] अॅपचा दुरूपयोग होवू नये म्हणून ‘सी-व्हिजिल’ चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईल.  फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ‘सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ 5 मिनिटांचा अवधी मिळेल. हे अॅप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देणार नाही. अॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत. एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान 5 मिनिटांचा विलंब करावा लागतो. जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेमण्या आधीही डुप्लिकेट, फ्रिवोलस आणि असंबंधित प्रकरणे ड्रॉप करण्याचा पर्याय आहे. ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार. या शिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणुक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करावा, अथवा 1800111950 किंवा राज्य संपर्क केंद्रावर 1950 मध्ये राष्ट्रीय संपर्क केंद्राला कॉल करा.

खालीलप्रमाणे ‘सी-व्हिजिल’ अॅपवर तक्रार करता येईल -

[?]  मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप.

[?] शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.

[?] मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.

[?] जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.

[?] पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.

[?] मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर

[?] मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.

[?] उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.

[?] सी-व्हिजिल’अॅपची तक्रार योग्य असल्यास संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल

[?] संबंधितांवर क्रिमीनल अॅक्शन होणार.

[?] कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.

[?] कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार

================================

मतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाईन - वैशिष्ट्ये

लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाईन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे.आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाईनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत. याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाईन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.हेल्पलाईनची वैशिष्ट्ये-:

[?] नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे

[?] नवीन मतदार नोंदणी सोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन

[?] मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन

[?] मतदान ओळखपत्र व मतदान अर्ज निगडित सर्व माहिती उपलब्ध

[?] मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती

[?] निवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.

[?]  राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre)स्थापन

या हेल्पलाईनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील,मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी,निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा 1950 हेल्पलाईनवर फोन करून मिळविता येत आहे.1950 या हेल्पलाईनवर पुढीलप्रमाणे माहिती मिळविता येते :(i) ECI <EPIC Number> <0 (इंग्रजीमध्ये उत्तरासाठी) किंवा (प्रादेशिक भाषेत उत्तरासाठी) <1.(ii) ECIPS <EPIC NUMBER>असे केल्यास EPIC नंबर मतदाराला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.(iii)ECICONTACT <EPIC NUMBER> हे मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर्स, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशीलांसह उत्तर देतील.
=======================================

सैनिकी मतदारांसाठी आता ‘ईटीपीबीएस’ प्रणाली

देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर छातीचे कोट करून लढणाऱ्या सैनिकांना त्यांच्या मतदानाचा बहुमोल मताचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्ससेबल पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ वाचणार आहे.देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर छातीचे कोट करून लढणाऱ्या सैनिकांना त्यांच्या मतदानाचा बहुमोल मताचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच इलेक्ट्रॉनिकली ट्रान्ससेबल पोस्टल बॅलेट सिस्टीम (ईटीपीबीएस) प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांपर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळ वाचणार आहे. इथून मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मतदानाकरीता मतपत्रिका पाठविली जायची. ही मतपत्रिका त्यांच्यापर्यंत वेळेत न पोहोचणे, तसेच त्यांच्या पत्त्यावर न पोहोचणे अशा अडचणी निर्माण व्हायच्या. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने ‘ईटीपीबीएस’प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकाच आहे.या मतपत्रिकेला बारकोड बसविण्यात आला आहे. ज्या ठिकाणी सैनिक मतदार आहे तेथील रेकॉर्ड आॅफिसमध्ये ही इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका उपलब्ध होणार आहे. काही क्षणांत निवडणूक यंत्रणेकडून ही मतपत्रिका सीमेवर पाठविता येणे शक्य आहे. ज्याप्रमाणे आपण एखादे कागदपत्र मेलद्वारे डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढतो. त्याचप्रमाणे या मतपत्रिकेची प्रिंट काढून त्यावर सैनिक मतदान करून ते पोस्टाद्वारे निवडणूक यंत्रणेकडे पाठविणार आहेत. सैनिकांना मतदान करण्याची प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असली तरी ते मतदान पोस्टाने पाठविण्याची प्रक्रिया ही पूर्वीप्रमाणेच आहे. मतपत्रिका पाठविण्यासाठी लागणारा कालावधीमुळे वाचणार आहे. यासंदर्भात निवडणूक यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.