Monday 11 March 2019

katol assembly constituency bye Election 2019 काटोल विधानसभा पोटनिवडणूक-2019;११ एप्रिलला मतदान

काटोल विधानसभा पोटनिवडणूक-2019;११ एप्रिलला मतदान


लोकसभा निवडणुकीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेची पोटनिवडणूक देखील जाहीर झालेली आहे. आशिष देशमुख यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होत असून निवडणून आलेल्या उमेदवाराला केवळ सहा महिन्याचाच कालावधी मिळणार आहे. त्यामध्ये केवळ काम करण्यासाठी २ ते ३ महिने मिळणार आहे त्त्यामुळे ९० दिवसाच्या आमदारकीसाठी कोण खर्च करणार? असा प्रश्न पडला असेल तर तो चुकीचा आहे, या मतदारसंघातून भाजप व काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आशिष देशमुख विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सख्खे काका अनिल देशमुख यांचा दोन हजार सहाशे मतांनी पराभव केला होता. पहिल्यांदाच आमदार झालेले देशमुख यांचे मात्र नंतर भाजपमध्ये मन काही रमले नाही व गेल्या दीड वर्षांपासून ते पक्षविरोधात बोलू लागले. अखेर २ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी पक्ष व आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली. काही महिन्यांपूर्वी पाच राज्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीसोबत काटोल मतदारसंघाची निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच म्हणजे ११ एप्रिलला काटोल विधानसभा पोट निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या ६ विधानसभा पैकी काटोल विधानसभा मतदारसंघ 1 आहे. नागपूर जिल्ह्यामधील काटोल हा एक विधानसभा मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्षे अनिल देशमुखांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले असून राष्ट्रवादीच्या कोट्यातील या जागेवर सध्यातरी त्यांचेच नाव पुढे येत आहे. भाजप-शिवसेना युती असताना २००९ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र २०१४ मध्ये भाजप - सेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने भाजप उमेदवार आशिष देशमुख येथून विजयी झाले. विजयी उमेदवार हा भाजपचा असल्याने भलेही आता युती झाली असली तरी या जागेवर भाजपचाच दावा असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांचे म्हणणे आहे. भाजप मध्येही उमेदवारीसाठी इच्छुकांची काही कमी नाही. भाजपकडून काटोल विधानसभा मतदारसंघातील समन्वयक म्हणून कार्यरत असलेले नागपूर महापालिकेचे नगरसेवक अविनाश ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, भाजप ग्रामीणचे महामंत्री संजय टेकाडे यांची नावे आघाडीवर आहेत. तरीही पोटनिवडणुकीत उमेदवार कोण असेल हे पक्षांतर्गत ठरवण्यात येणार असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजीव पोतदार यांनी म्हटले आहे. येत्या ११ एप्रिल ला मतदान झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी निकाल लागणार आहेत. त्यामुळे विजयी उमेदवाराला पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत केवळ तीन महिन्यांचा कालवधी मिळणार आहे. तरीही युतीची उमेदवारी आपणास मिळावी म्हणून इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. वेगळा विदर्भ तसेच शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचे सांगून आशिष देशमुख यांनी 2 ऑक्टोबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर त्यांनी वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आशिष देशमुख हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आहेत. आशिष गे लोकसभेसाठीही उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते आता नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख हे १९९५ पासून सलग ४ टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत ( २००९ ) अनिल देशमुख यांनी ३२,२०३ मताधिक्याने काटोलमधून विजय मिळवला होता.अनिल देशमुख यांना ६८,१४३ तर आरपीआय आठवले गटाचे चरण सिंह ठाकूर यांना ३५,९४० मते मिळाली होती. शिवसेनेचे किरण पांडव यांना ३१,३७२ मते मिळाली होती.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - राजू हर्णे
भाजप - आशिष देशमुख भाजप-५३,९१५
काँग्रेस - दिनेश ठाकर
राष्ट्रवादी - अनिल देशमुख राष्ट्रवादी-४९,५८०   
मनसे - दिलीप गायकवाड    

अपक्ष - राहुल देशमुख (शेकाप)

Sr.No.PartyCandidateVotesResult
1आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीहिम्मतराव आठवले287
2बहुजन समाज पार्टीसुधीर मेटांगळे2,930
3भारतीय जनता पार्टीआशिष देशमुख70,344विजयी (5,557 फरकाने)
4भारतीय कम्युनिस्ट पक्षमधुकर मानकर928
5गोंडवना गणतंत्र पार्टीश्रीराम खंदाटे1,369
6भारतीय राष्ट्रीय काँग्रेसदिनेश ठाकरे4,789
7महाराष्ट्र नवनिर्माण सेनादिलीप गायकवाड945
8राष्ट्रवादी काँग्रेसअनिल देशमुख64,787Runner-up
9शेतकरी कामगार पक्षराहुल देशमुख9,589
10आरपीआयसुनील ननवरे203
11आरपीआय खोब्रागडेअनिल ढोने178
12शिवसेनाराजेंद्र हरणे13,649
13अपक्षकिशोर रेवतकर444
14अपक्षचंद्रशेखर खारपुरीया448
15अपक्षप्रफुल्ल गजबे1,121
16अपक्षगायत्री घरत1,740
17अपक्षउल्हास दुपारे1,284
18अपक्षप्रदीप उबाळे1,033
19अपक्षरमेश कुंभारे338
20अपक्षराजू फुके400
21नोटा (नकाराधिकार)नोटा550

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.