Saturday 30 March 2019

#Loksabha Election 17 मतदारसंघात 295 उमेदवार निवडणूक रिंगणात

पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात 295 उमेदवार निवडणूक रिंगणात


लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सतरा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 425 पैकी 130 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून 17 जागांसाठी 295 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक 36 उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असून सर्वाधिक कमी 5 उमेदवार असलेला मतदारसंघ गडचिरोली-चिमूर ठरला आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात 295 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामधील मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, बीड 36, उस्मानाबाद 14, लातूर 10 आणि सोलापूर मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. तर वर्धा लोकसभा मतदार संघ - 14, रामटेक मतदारसंघ - 16, नागपूर मतदारसंघ - 30, भंडारा-गोंदिया मतदारसंघ - 14, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ - 5, चंद्रपूर मतदारसंघ - 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक ३६ उमेदवार बीड लोकसभा मतदारसंघात रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली.३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्षाचे २, नोंदणीकृत पक्षाचे ८ आणि २६ अपक्षांचा समावेश आहे.या ३६ उमेदवारांमध्ये राष्ट्रीय पक्ष भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम गोपीनाथराव मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बजरंग सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव, समाजवादी पार्टीचे  सय्यद मुजम्मील सय्यद जमील, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे चंद्रप्रकाश शिंदे, हम भारतीय पार्टीचे अशोक थोरात, बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टीचे सादेक मुनीरोद्दीन शेख, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे कल्याण गुरव, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दलचे रमेश गव्हाणे आणि महाराष्ट्र क्रांतिसेनेचे गणेश करांडे यांचा समावेश आहे.२६ अपक्ष उमेदवारांमध्ये कालीदास आपेट, यशश्री प्रमोद पाटील, अ‍ॅड. शरद कांबळे, नीलेश जगताप, साजन रईस चौधरी, मुजीब नईमोद्दीन इनामदार, शेख यासेद शेख तय्यब, सय्यद मिनहाज जुबेर मुन्शी कुरेशी, पठाण सरफराज खान मेहताब खान, चव्हाण संपत, अन्वर खान मिर्झा खान, पंडित दामोदर खांडे, खान मजहर हबीब, शेख सादेक शेख इब्राहीम, बजरंग दिगंबर सोनवणे, गालेब खान जब्बार खान पठाण, पठाण मुसाखान युनूस खान, तुकाराम व्यंकटी चाटे, जमीर बशीर शेख, निसार अहमद, राजेशकुमार अण्णासाहेब भडगळे, कोळेकर गणेश भाऊसाहेब, शिवाजी नारायणराव कवठेकर, विजय रंगनाथ साळवे, वीर शेषेराव चोखोबा यांचा समावेश आहे. या मतदारसंघात ५८ उमेदवारांनी ७९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती छाननीनंतर ५३ उमेदवार रिंगणात उरले होते. दरम्यान लातूर लोकसभेच्या आजवर झालेल्या ११ सार्वत्रिक निवडणुकांपैकी सर्वाधिक २० अपक्ष १९९६ च्या निवडणुकीत लढले़ मतदारांनी अपक्षांना फारसे पाठबळ दिले नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत १३ जणांनी नशीब आजमावले होते़ त्यांना केवळ ३़१४ टक्के मिळाली़ मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत अपक्षांनी फारसा रस दाखविला नाही़ ४७ जणांनी १४३ अर्ज घेतले होते़ यातून केवळ १५ जणांनीच उमेदवारी दाखल केली होती़  तिघांचे अर्ज बाद झाले तर दोघांनी माघार घेतली आहे़. लोकसभा निवडणुकीत १९९६ पर्यंतच अपक्षांची भाऊगर्दी जास्त होती़ परंतु या मतदारसंघातून मतदारांचे पाठबळ मिळाले नाही़ नऊ निवडणुकीत अपक्षांची दैना उडाली आहे़ आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ७७ अपक्षांनी नशीब आजमावले आहे़ आजवरच्या इतिहासात अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे व एम़एस़ सोनवणे या दोन अपक्षांनीच मतदारसंघात समाधानकारक मते घेत लक्षणीय कामगिरी केली आहे़ त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे़ १९७७ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत केवळ एकच अपक्ष रिंगणात होता़ त्यांना केवळ २ हजार ४९७ मते मिळाली़ १९८० च्या निवडणुकीत सातपैकी चार अपक्ष होते़ यावेळी मात्र अपक्षांच्या मताचा टक्का वाढला असून एकूण मतदानाच्या १९़१२ टक्के (८१, ३३९) मते मिळाली़ यात अपक्ष उमेदवार एम़एस़ सोनवणे यांना ६४ हजार ८१ मते मिळाल्याने अपक्षांचा टक्का वाढला होता.१९८४ च्या निवडणुकीत ९ पैकी ७ उमेदवार अपक्ष होते़ परंतु यात एकालाही ठसा उमटविता आला नाही़ सर्वांना मिळून ३७ हजार ६२० मते पडली होती़ १९८९ ला आठपैकी पाच उमेदवार अपक्ष होते़ यावेळी अपक्षांच्या मताची टक्केवारी चांगलीच घसरली़ केवळ १२ हजार ८४३ मतदारांनीच अपक्षांना पाठबळ दिले़ १९९८ च्या निवडणुकीत ४ अपक्षांनी नशीब आजमावले़ त्यांना फक्त ९ हजार ८०८ मते मिळाली़ ९९ साली झालेल्या निवडणुकीत तीन अपक्षांनी निवडणूक लढविली़ त्यांना ९ हजार १५७ मते मिळाली होती़ २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ४ अपक्ष होते़ त्यांना २० हजार ७१२ मते मिळाली़ २००९ च्या निवडणुकीतील ५ उमेदवार, २०१४ च्या निवडणुकीत १३ जणांनी निवडणूक लढविली. 

हिंगोलीत 'सुभाष वानखेडे' एकाच नावाचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ‘सुभाष बापूराव वानखेडे’ हे आहेत. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त 5 ‘सुभाष वानखेडे’ रिगणात आहेत. इतर नामसाधर्म्या ‘सुभाष वानखेडे’ नावाचे उमेदवार- सुभाष वानखेडे (औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावाचे अल्पभूधारक शेतकरी), सुभाष विठ्ठलराव वानखेडे (पूर सेनगाव तालुक्यातील सवना गावचे शेतकरी), सुभाष मारोती वानखेडे (उमरखेडतालुक्यातील खरुस गावचे रहिवाशी), सुभाष परसराम वानखेडे (औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावचे रहिवाशी), सुभाष वानखेडे (उमरखेड तालुक्यातील सुकळी गावचे रहिवाशी) असे आहेत.मतांचे धुर्वीकरण व्हावे म्हणून विरोधक एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करत असतात. यापैकी काही उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांच्या विरोधकांनी उभे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे अनेक प्रकार घडत असल्याने या निवडणुकीपासून मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून निवडणूक विभागाने मतदान यंत्रावर उमेदवारांच्या निशाणी बरोबर त्यांचा फोटो चिकटवण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वेळी नावात साधर्म्य असलेल्या इतर दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मते घेतली होती आणि सुभाष बापूराव वानखेडेचा केवळ 1632 मतांनी पराभव झाला होता. नामसाधर्म्याचा फटका किती बसू शकतो, हे गेल्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याच नावाच्या आणखी एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रायगडमध्ये सुनील तटकरेंना जोरदार फटका बसला होता. तसाच प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हिंगोलीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणारे तब्बल सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सुभाष वानखेडे यांना या नामसाधर्म्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे माजी खासदार सुभाष बापूराव वानखेडे यांना आघाडीने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे व्यतिरिक्त अन्य दोन सुभाष वानखेडेंना विरोधकांनी लोकसभेच्या रिंगणात उतरविल्याने शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना 1632 मतांनी पराभूत व्हावं लागलं होत. कारण या दोन सुभाष वानखेडेंनी तब्बल 12 हजार 544 मतदान खाल्लं होत आणि यामुळेच शिवसेनेचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे 1632 मतांनी पराभूत झाले होते. पण 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या मतांच धुर्वीकरण व्हावं म्हणून सुभाष वानखेडे नावाचे इतर पाच सुभाष वानखेडे नावच्या उमेदवारांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघात १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत दहा मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 278 पैकी 99 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 179 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रांच्या छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 278 पैकी 99 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, बीड 36, उस्मानाबाद 14, लातूर 10 आणि सोलापूर  मतदारसंघातून 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदारसंघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ - 14, रामटेक मतदारसंघ - 16, नागपूर मतदारसंघ - 30, भंडारा-गोंदिया मतदारसंघ - 14, गडचिरोली-चिमूर मतदारसंघ - 5, चंद्रपूर मतदारसंघ - 13 आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात 24 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आजपर्यंत 11 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात कालपासून नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येत आहेत. आज सहा मतदारसंघात 11 तर आजपर्यंत 9 मतदार संघात 20 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. मतदारसंघनिहाय आज दाखल आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव मतदार संघात आज 1 (आजपर्यंत 2 उमेदवार), औरंगाबाद 3 (4), रायगड 2 (4), सातारा 1 (1), कोल्हापूर 2 (2) आणि हातकणंगले मतदारसंघात आज 2 उमेदवारांनी तर आजपर्यंत 4 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. तीन मतदारसंघात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही मात्र आजपर्यंत 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये रावेर, जालना आणि सांगली मतदारसंघात प्रत्येकी एका उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात आतापर्यंत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस 'कोरडा दिवस' म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत. निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल. आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. तीन दिवस कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी 7 मतदारसंघांसाठी, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी 10 मतदारसंघांसाठी, दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 14 मतदारसंघांसाठी आणि 29 एप्रिल 2019 रोजी 17 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार आहे.

मतदान सामग्री सीलबंद करण्यासाठी लाखेच्या सहा लाख कांड्‌या, चार लाख मेणबत्या

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर विविध उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सील होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, त्याचे कंट्रोल युनिट आणि यंदा वापरण्यात येणारे व्हीव्हीपॅट यंत्रासह इतर सामग्री सीलबंद ठेवण्याची ‘लाख’ मोलाची कामगिरी बजावायला ‘लाखे’चा वापर केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे लाखेचे 6 लाख 81 हजार नग कांडी लागणार आहेत. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वापरण्याची निवडणूक काळातील ही पहिलीच वेळ असावी.जप्ती असो अथवा कागदपत्रे, पुरावे सीलबंद करायचे असो शासकीय कारवाईत ‘लाखे’ची लालभडक मोहोर महत्त्वाची ठरते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानानंतर मतदान यंत्रे व त्याच्याशी निगडित साहित्य मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी ती सीलबंद केली जातात. त्यासाठी मोलाची कामगिरी लाखेकडून बजावण्यात येते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र, मतदारांची नावे व स्वाक्षरी असलेली यादी आदी साहित्य मतदानाची वेळ संपल्यानंतर सीलबंद केली जाते. मतमोजणीच्या दिवशी हे सील काढले जाते.यापूर्वी कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्यामुळे मतपेटी व इतर साहित्य सीलबंद केली जात. मात्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आल्यानंतर या यंत्राबरोबरच त्याचे कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्र यांनाही सील केले जाते. मतदान यंत्रे व इतर अनुषंगिक साहित्य सीलबंद करण्याची कामगिरी ही मतदान प्रक्रियेतील ही सर्वात मोठी जबाबदारी असते.  हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी आऊटर पेपर, ग्रीन पेपर व व्हीव्हीपॅटसाठी पिंक पेपरचा वापर केला जातो. त्यावर लाख लावून सीलबंद केले जाते. यासाठी यंदा प्रत्येक मतदान केंद्रासाठी 6 नग या प्रमाणे राज्यासाठी 6 लाख 81 हजार 800 नग लाख  मागविण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा मुद्रणालयाकडून ही लाख केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राज्याकडे पाठविण्यात येते.ही लाख वितळवून मतदान यंत्रे सीलबंद केली जातात. ती वितळविण्यासाठीची मेणबत्ती निवडणूक आयोगाकडून पुरविली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाख वितळविण्यासाठी सुमारे 4 लाख 55 हजार मेणबत्त्यांची मागणी राज्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. याबरोबर कागदे, पेन्सिल, खोडरबर, शाई आदी साहित्य मोठ्या प्रमाणात मागविण्यात आले आहेत.पुढील लोकप्रतिनिधी कोण होणार याचे भवितव्य या मतदान यंत्रात सुरक्षितपणे ठेवण्यासाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत या ‘लाखे’ला मोठे मोल आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.