आमदार दिलीप वळसे पाटील यांची दुट्टपी भूमिकाच खासदार आढळराव पाटील यांच्या यशाचे मूळ कारण!
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे विद्यमान खासदार आढळराव बिथरले असून त्यांचा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास ढळला असल्याने जातीय विधान करून लोकसभा निवडणुकीला जातीय रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. निवडणुकीत राजकीय भूमिकेपेक्षा जातीयवादी भूमिका किफायतशीर ठरेल तरच आपण डॉ. कोल्हे यांच्यावर मात करू असा आशावाद करून राजकीय लाभ घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रकार आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे मतदारसंघात नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्या या आक्षेपार्ह विधानाचा सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणात निषेध नोंदवला जात आहे. विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना सहाही मतदारसंघातील अंतर्गत महत्वाकांक्षा राजकीय हेवे दावे यांचा लाभ त्यांना अपोआप मिळत आल्यानेच ३ वेळा यश आले मात्र आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना पक्षात देखील त्यांच्यावर अनेक गट नाराज आहेत. त्यांना प्रखर विरोध होत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. विद्यमान आमदार सोनवणे यांचा पक्ष प्रवेशाला विरोध असून विद्यमान खासदार मात्र त्यांना पक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण इतर शिवसैनिक प्रचंड नाराज आहेत अशी स्थिती आहे तर प्रत्येक निवडणुकीत विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये उमेदवारीचे आश्वासन देऊन लोकसभा निवडणुकीत काम करून घेऊन नंतर त्यांना दिलेले आश्वासन सोयीस्करपणे विसरणे यामुळे नाराज झालेले पक्षापासून दूर जातात मग नवे कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षात घेऊन त्यांना पदाचे व उमेदवारीचे आश्वासन देणे हा एकमेव राजकीय लाभाचा अजेंडा विद्यमान खासदार यांचा असल्याचे मागील निवडणुकांवरून दिसून येत आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारण सर्वांनाच ज्ञात आहे. राष्ट्रवादी पक्षातून केवळ आ.दिलीप वळसे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत या केवळ एका कारणामुळे इतर उमेदवारांचे मनोधैर्य खचते आणि धाडस करीत नाहीत. आमदार दिलीप वळसे पाटील यांची दुट्टपी भूमिकाच खासदार आढळराव यांच्या यशाचे मूळ कारण मानले जाते. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आमदारकीला आमदार दिलीप वळसे पाटील आणि खासदारकीला आढळराव पाटील असे अलिखित समीकरण रुजवण्यास आ.दिलीप वळसे पाटील कारणीभूत आहेत. विरोधाचा ठपका नको म्हणून विद्यमान खासदार यांनी सौ. आढळराव पाटील यांना देखील समन्वयातून उमेदवारी दिली गेली होती अशीही चर्चा केली गेली. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कधीही लीड/मताधिक्य मिळत नाही. हे एकमेव राष्ट्रवादीच्या पराभवाचे आणि विद्यमान खासदार आढळराव यांच्या यशाचे एक कारण मानले जाते. आमदार दिलीप वळसे पाटील यांची दुट्टपी भूमिकाच खासदार आढळराव यांच्या यशाचे मूळ कारण असल्याचे मानले जात असून लोकसभा निवडणूक आमदार दिलीप वळसे पाटील का लढवीत नाही? हा प्रश्न तमाम मतदारांना पडलेला आहे. मात्र त्यांच्या गूढ मैत्रीच्या चर्चा मतदारसंघात नेहमी रंगत असतात. खेड विधानसभा मतदारसंघात देखील शिवसैनिक, पदाधिकारी नाराजी निर्माण झालेली आहे. शिरूर, भोसरी, हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असून कितपत युती करीता कार्यशील राहतील याबाबत शंका व्यक्त केली जात असून या तिन्ही मतदारसंघातील काही सेना पदाधिकारी देखील नाराज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी सेनेचे पद उपभोगले असल्याने त्यांचा व सेना पदाधिकारी यांचा चांगला परिचय आहे. त्या अनुभवाचा देखील त्यांना लोकसभा निवडणुकीत लाभ होईल असे मानले जाते. एकंदर बदलेली राजकीय व सामाजिक समीकरणे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांना अनुकूल नाहीत यामुळेच पराभवाच्या भीतीने बिथरले सारखे जातीय द्वेषाचे वक्तव्य करून मतदारांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे विरोध पक्षाला आयते कोलीत मिळाल्याने त्याचा विपरीत परिणाम निवडणुकांच्या निकालातून निश्चितपणे दिसून येईल.
२०१४ शिरूर लोकसभा निवडणूक(आंबेगाव वि.) - शिवसेना मते-९८११७ राष्ट्रवादी मते-७९५९४ = फरक १८५२३
२०१४ आंबेगाव विधानसभा निवडणूक - शिवसेना मते-62081 राष्ट्रवादी मते-120235 = फरक ५८१५४
२००९ शिरूर लोकसभा निवडणूक(आंबेगाव वि.)- शिवसेना मते-९१३५८ राष्ट्रवादी मते-५४६९१ = फरक ३६६६७
२००९ आंबेगाव विधानसभा निवडणूक - शिवसेना मते-62502 राष्ट्रवादी मते-99851 = फरक ३७३४९
२००४ आंबेगाव विधानसभा निवडणूक - शिवसेना मते-42194 राष्ट्रवादी मते-81830 = फरक ३९६३६
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत यापूर्वीचे संबधित ब्लॉग खालीलप्रमाणे-
FRIDAY, 1 MARCH 2019
#Amol Kolhe शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत!
शिरूर लोकसभा निवडणुकीत डॉ. कोल्हे आणि खासदार आढळराव पाटील यांच्यात लढत!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेना उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. अमोल कोल्हे यांच्यासह बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला आहे. तसेच यश मिलिंद पाटील, किशोर प्रकाश पाटील, डॉ हर्षल यशवंत पवार, वरपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमधील महत्त्वाचा नेताच पक्षातून बाहेर पडल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश शिवसेनेसाठी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना शिवसेनेचे शिरूरचे विद्यमान खासदार आढळराव पाटील यांच्याशी तुल्यबळ लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ मध्ये कोल्हे यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेचा फायदा घेत शिवसेनेने त्यांच्या हाती शिवबंधन बांधले होते. त्यांना उपनेतेपदही दिले होते. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रबळ इच्छुक व जोरदार लोकसभेची निवडणूक तयारी सुरू केलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना आपली तलवार आता म्यान करावी लागणार आहे. त्यांनी आढळराव यांच्याविरुद्ध फ्लेक्सबाजी सुरू केली होती. तसेच सोशल मिडियातूनही ते हल्लाबोल करीत होते. मात्र, त्यांची संभावना काल खासदार आढळराव यांनी दहा वर्षांनी जागा झालेला कुंभकर्ण अशी करून त्यांची कसलीच भीती नसल्याचे म्हंटले होते. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशाने शिरूरच्या राजकारणाचे समीकरणच बदलणार आहे. युती झाल्याने आणि राष्ट्रवादीला प्रभावी उमेदवार मिळत नसल्याने एकतर्फी वाटत असणारी लढत आता तुल्यबळ होणार आहे. दरम्यान शिक्षणाने डॉक्टर असलेले डॉ. अमोल कोल्हे हे मराठी सिनेमा, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील नामवंत अभिनेते आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील त्यांची मालिका खूप गाजली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मालिकेतही काम केले. महाराष्ट्राच्या लाडक्या आणि अदराच्या स्थानी असलेल्या दोन्ही राजांचे व्यक्तिमत्व मोठ्या पडद्यावर नेमकेपणानं उभारण्याचे यशस्वी काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. अभिनय क्षेत्रात काम करत असतानाच डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. कमी कालावधीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाली होती. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून प्रचलित आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागा पुन्हा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली असून त्यासाठी अन्य पक्षातील मोहरे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.