Sunday, 31 March 2019

शिवसेनेच्या तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे मंजूर

तिघेही सेनेचे बंडखोर आमदार लोकसभेच्या रिंगणात

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांना, नांदेड लोकसभा मतदारसंघामधून भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उतरवले आहे, तर हर्षवर्धन जाधव औरंगाबादेतून अपक्ष उमेदवार आहेत. दरम्यान विधानसभा कामकाज प्रक्रियेतील नियम क्रमांक २९९ नुसार तिन्ही राजीनामे विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले असून आता तिन्ही विधानसभांच्या जागा रिक्त आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात अहवाल त्यांनी दिला आहे. केवळ सहा महिने शिल्लक राहिल्याने पोटनिवडणुकीची शक्यता नाही. कन्नडमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मागील तीन वर्षांपासून खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा पुकारला आहे. एवढेच नव्हे तर राजकीय पक्षाची स्थापनाही केली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुरुवारी (२८ मार्च) त्यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी मंगळवारी (२६ मार्च) विधानसभा अध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिला नसता तर सेनेचे आमदार असतानाही सेनेचे अधिकृत उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात नामांकन दाखल केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असती. पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबित होण्याऐवजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणाऱ्या काकासाहेब शिंदेंच्या प्रति सहानुभूती व्यक्त करत त्यांनी सहाव्यांदा राजीनामा दिला होता. मात्र आतापर्यंत एकदाही तो मंजूर झाला नव्हता. या वेळी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच राजीनामा मंजूर केले आहेत.

वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. भाजपा-शिवसेना युतीमुळे नाराज झाल्याने धानोरकरांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. भाजपाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. युती होताच धानोरकर यांनी भाजपा तथा केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली होती. काँग्रेसला युवा उमेदवार हवा होता. अशातच विजय वडेट्टीवार हे विधान परिषद निवडणुकीपासून धानोरकर यांच्या संपर्कात होते. विशेष म्हणजे, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार सराफ यांचा प्रचार केला होता. तेव्हापासूनच वडेट्टीवार-धानोरकर यांची मैत्री अधिक घट्ट झाली होती. त्याच मैत्रीतून वडेट्टीवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत धानोरकर यांची भेट घालून दिली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा, वणी व आर्णी हे पाच मतदारसंघ कुणबीबहुल आहेत. काँग्रेसलाही कुणबी समाजाचा युवा चेहरा हवा होता त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
SURESH URF BALUBHAU NARAYAN DHANORKAR 
WARORA (CHANDRAPUR)
Address: Laxmi nagar , abhiyankar ward warora , 
Teh. Warora Dist. Chandrapur 
75 Warora (Maharashtra) constituency
Email:balu_dhanorkar@rediffimail.com 

लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर

भाजपकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. प्रताप पाटील सेनेचे आमदार असताना दोन वर्षांपासून भाजपात दाखल झाले होते. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्षाचा आदेश डावलून भाजपला मदत केली होती. तसंच मुंबईत झालेल्या भाजपच्या बैठकींमध्येही चिखलीकर कायम हजर राहत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही नांदेड पालिकेत कामगिरीनंतर चिखलीकरांचं जाहीर कौतुक केले होते.मूळ काँग्रेसी असलेले प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेना आमदार होते. पण, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार आणि अजित पवार यांचे त्यांच्याशी जवळचे संबंध होते.
CHIKHALIKAR PRATAPRAO GOVINDRAO
LOHA (NANDED)
Address: Mukam post Chikhali, 
Taluka Kandhar Jilha pin code no. 431746 
88 Loha (Maharashtra) constituency
Email:pp.chikhalikar@gmail.com

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव 

कन्नडमधून शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मागील तीन वर्षांपासून खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा पुकारला आहे. एवढेच नव्हे तर राजकीय पक्षाची स्थापनाही केली होती. सेनेचे आमदार असतानाही सेनेचे अधिकृत उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात नामांकन दाखल केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असती. पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबित होण्याऐवजी त्यांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. गेल्या काही वर्षाच्या काळात कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ३ वेळा राजीनामे दिले होते. यापूर्वी त्यांना मारहाण झाल्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राजीनामा दिला होता, तर कन्नड मतदारसंघातील रस्त्यांची कामे होत नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. तिसऱ्यांदा त्यांनी मराठा आरक्षणावरून राजीनामा दिला होता. पहिले दोनदा राजीनामे फेटाळले होते आता मात्र मंजूर केला आहे. 
Jadhav Harshvardhan Raibhan 
KANNAD (AURANGABAD)
Address: At post Pishor 
Tq Kannad Dist Aurangabad 
105 Kannad (Maharashtra) constituency
Email:harshawardhanjadhav111@gmail.com

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.