Thursday 21 March 2019

अखेर धवलसिंह मोहिते यांची शिवसेनेतून हकालपट्टी

अखेर धवलसिंह मोहिते यांची शिवसेनेतून हकालपट्टी ; राष्ट्रवादीत प्रवेश करणार!


माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव तथा अकलूज जवळील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. अकलूजचे धवलसिंह मोहिते यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता होती. सेनेला त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करणाची शक्यता होती. काल धवलसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगण्यात येते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पक्षांतराचे राजकारण ढवळून निघाले आहे.डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी १९ ऑगस्ट २०१४ ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा अपक्ष जिल्हा परिषद सदस्य असलेले डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू तर राष्ट्रवादीचे नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या माढा लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे अपक्ष म्हणून उभे होते. परंतु त्यांना दारुण पराभवाने निराशा पत्करावी लागली. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला होता. शिवसेनेत प्रवेश घेण्यामागील डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचा हेतू विधानसभा निवडणुकीतून माढा किंवा करमाळा मतदारसंघातून सेनेची उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. दरम्यान मोहिते-पाटील घराण्यात राजकीय कलह सुरू झाल्यानंतर गेल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील हे माढा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभे होते. परंतु, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. धवलसिंह यांनी स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला होता. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची १९८५ साली युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रतापसिंह यांनी मागे वळून पाहिलेच नव्हते. सोलापूरमधून लोकसभेवर देखील ते निवडून आले होते. तर, युती सरकारच्या काळात भाजपच्या कळपात दाखल होऊन प्रतापसिंह मोहिते-पाटील राज्याचे सहकार मंत्री राहिले होते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजकारणात परिवर्तन होत असते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये आज प्रवेश केला आणि स्थानिक राजकारणातील घडामोडींना वेग आला. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.