Sunday, 10 March 2019

Loksabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये मतदान होणार;23 मे 2019 रोजी मतमोजणी

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एप्रिलमध्ये मतदान

महाराष्ट्रात मतदानाच्या तारखा 

[?] 11 एप्रिल 7 जागांवर मतदान

[?] 18 एप्रिल 10 जागांवर मतदान

[?]  23 एप्रिल 14 जागांवर मतदान

[?] 29 एप्रिल 17 जागांवर मतदान


पुणे, बारामती मतदारसंघात 23 तर मावळ व शिरूर 29 एप्रिलला मतदान

[?] खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल २०१९ रोजी 7 जागांवर मतदान होऊ शकेल-

 ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम 

[?] खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात 18 एप्रिल २०१९ रोजी 10 जागांवर मतदान होऊ शकेल-

५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती १५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर

[?] खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात 23 एप्रिल २०१९ रोजी 14 जागांवर मतदान होऊ शकेल-

३) जळगाव ४) रावेर  १८) जालना १९) औरंगाबाद ३२) रायगड  ३४) पुणे ३५) बारामती ३७) अहमदनगर  ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले 

[?] खालील लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल २०१९ रोजी 17 जागांवर मतदान होऊ शकेल-

१) नंदूरबार २) धुळे २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३३) मावळ ३६) शिरूर ३८) शिर्डी 








केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून या क्षणापासून देशात आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर यंदा ७ टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते. मतमोजणी २३ मे रोजी होईल. विद्यमान लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला संपणार आहे. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल, चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, पाचव्या टप्प्यातील मतदान 6 मे, सहाव्या टप्प्यातील मतदान 12 मे आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. यानंतर 23 मे रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत.आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या 1.9 कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते. त्यासाठी, अद्यापही आयोगाकडून मतदार नोंदणीप्रकिया सुरू आहे. गत 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 81.5 कोटी मतदारांची नोंदणी झाली होती. मात्र, मतदानापर्यंत हा आकडा वाढला होता. 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 89.7 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 46.5 कोटी पुरुष तर 43.2 कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच 33,109 मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, 16.6 लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे. सन 2014 च्या निवडणुकांवेळी 83 कोटी मतदारांची नोंदणी होती. त्यामध्ये 44 कोटी पुरुष आणि 40 कोटी महिलांचा समावेश होता. तिसऱ्या प्रवर्गात 28,527 मतदार सहभागी होते. तर, 13.6 लाख नोकरदार जे पोस्टल मतदार होते. दरम्यान, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांतील नवमतदारांची तुलना केल्यास गत 2014 मध्ये नवमतदारांची संख्या जास्त होती. 2014 मध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या 2.3 कोटी होती, जी यंदा 1.6 कोटी असणार आहे. त्यामुळे या तरुण मतदारांचा कौल आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही महत्त्वाचा ठरणार आहे.इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनची (ईव्हीएम) विश्वासार्हता वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निर्णय म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रेल) मशीन्सचा वापर करणे अनिवार्य केले आहे. तसेच ईव्हीम मशीनवर उमेदवारांची छायाचित्रे उपलब्ध करणे, मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. व्हीव्हीपॅट मशीन्सचा सार्वत्रिक वापर करण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएम हॅक होऊ नये, मशीनसोबत छेडछाड होऊ नये, ईव्हीएम मशीनवर निवडणूक आयोगाचा संपूर्ण ताबा रहावा यासाठी ईव्हीएम मशीन्सवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. आगामी मतदानावेळी ईव्हीएममध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, सर्व इव्हीएम मशीन्सवर उमेदवारांचे छायाचित्रही पाहायला मिळणार आहे.

LOK SABHA ELECTIONS


   FirstSecondThird
YearElectionTotal seatsPartySeats% votesPartySeats% votesPartySeats% votes
201416th Lok Sabha545BJP28231.34%INC4419.52%AIADMK373.31%
200915th Lok Sabha545INC20628.55%BJP11618.80%SP233.23%
200414th Lok Sabha543INC14526.53%BJP13822.16%CPM435.66%
199913th Lok Sabha545BJP18223.75%INC11428.30%CPM335.40%
199812th Lok Sabha545BJP18225.59%INC14125.82%CPM325.16%
199611th Lok Sabha543BJP16120.29%INC14028.80%JD4623.45%
199110th Lok Sabha521INC23236.26%BJP12020.11%JD5911.84%
19899th Lok Sabha529INC19739.53%JD14317.79%BJP8511.36%
19848th Lok Sabha514INC40449.01%TDP304.31%CPM225.87%
19807th Lok Sabha529 ( 542* )INC(I)35142.69%JNP(S)419.39%CPM376.24%
19776th Lok Sabha542JP33041.32%INC15434.52%CPM224.29%
19715th Lok Sabha518INC35243.68%CPM255.12%CPI234.73%
19674th Lok Sabha520INC28340.78%SWA448.67%BJS359.31%
19623rd Lok Sabha494INC36144.72%CPI299.94%SWA187.89%
19572nd Lok Sabha494INC37147.78%CPI278.92%PSP1910.41%
1951-521st Lok Sabha489INC36444.99%CPI163.29%SOC1210.59%

महाराष्ट्रात शहरी मतदान केंद्रांमध्ये वाढ


राज्यात २०१४ मध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते आणि यंदा ते चार टप्प्यांमध्ये होत आहे. नागरीकरणामुळे शहरी भागातील मतदान केंद्रांमध्ये भरीव वाढ झाली असून ग्रामीण भागातील कमी झाली आहेत. तर मतदारांची संख्याही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६५ लाख ३१ हजार ६६१ ने वाढली आहे. गेल्या वेळी ६०.३२ टक्के इतके मतदान झाले होते. राज्यात २०१४ मध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान झाले होते आणि यंदा ते चार टप्प्यांमध्ये होत आहे. अधिकाधिक नागरिकांनी मतदानासाठी पुढे यावे, मतदारयादीत नाव नसल्याने कोणीही वंचित राहू नये, यासाठी आयोगाने अनेक उपाययोजना केल्या, विशेष मोहीमा राबविल्या. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. अजूनही कोणाचे नाव मतदारयादीत नसेल, तर त्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेआधी १० दिवसांपर्यंत त्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित विभागातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येईल, अशी माहिती अश्विनीकुमार यांनी दिली.

महिला मतदारांचा टक्का वाढला-२०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. तर २०१४ च्या मतदारयादीनुसार ते ८८९ होते, त्यात २०१९ मध्ये सुधारणा होऊन ते ९११ झाले आहे व महिला मतदारांची नोंदणी लक्षणीय वाढली आहे.

निवडणुकांच्या सात टप्प्यांच्या मतदानाच्या तारखा पुढीलप्रमाणे - 

टप्पा - मतदान - राज्ये - जागा 

पहिला टप्पा - ११ एप्रिल - २० - ९१ 
दुसरा टप्पा - १८ एप्रिल - १३ - ९७ 
तिसरा टप्पा - २३ एप्रिल - १४- ११५ 
चौथा टप्पा - २९ एप्रिल - ९ - ७१ 
पाचवा टप्पा - ६ मे - ७ - ५१ 
सहावा टप्पा - १२ मे - ७ - ५९ 
सातवा टप्पा- १९ मे - ८ - ५९ 

[?]  १८ एप्रिलला महाराष्ट्रात १० जागांसाठी मतदान

[?] महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान

[?] महाराष्ट्रात ४ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

[?] एकाच टप्प्यात २२ राज्यांमध्ये होणार मतदान

[?] दुसऱ्या टप्प्यातले मतदान १८ एप्रिलला होणार

[?] ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार

[?] यंदा देशात ९० कोटी मतदार मतदान करणार

[?] १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी

[?] प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर, सोशल मीडिया, पेड न्यूजवर करडी नजर


[?] लोकसभेत प्रथमच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार


[?] 10 लाख पोलिंग स्टेशन वापरले जातील


[?] मतदानाच्या 48 तासांपूर्वी बंद होणार लाउडस्पीकर


[?] रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी


[?] अधिक माहितीसाठी आयोगाकडून 1950 हेल्पलाइन


[?]  आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई


[?] यावेळी मतदारांना नोटा अधिकार वापरता येणार


[?]  तक्रार नोंदवण्यासाठी Android App, 100 तासांत उत्तर देतील 


[?] ईव्हीएमच्या हालचालींवर जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिमने नजर ठेवणार


[?] संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची, मतदानाची व्हिडिओग्राफी


[?] निवडणुकीत मीडियाची सकारात्मक भूमिका, पेड न्यूज विरोधात सक्त कारवाई केली जाणार


[?] सोशल मीडिया पोस्टवर सुद्धा निवडणूक आयोगाची करडी नजर


2014 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यकाळ 3 जून रोजी संपुष्टात येत आहे. 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत बहुमताचा आकडा 272 आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तब्बल 282 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपच्या नेतृत्वातील एकूणच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएकडे सध्या 336 जागा आहेत. लोकसभेत विरोधी पक्ष नेता होण्यासाठी राजकीय पक्षाला सभागृहात किमान 10 टक्के जागा जिंकाव्या लागतात. परंतु, 10 वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत फक्त 44 जागा मिळाल्या. दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोग विविध मतदार संघाचे दौरे करून आकडेवारी गोळा करत होता. निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर करता येतील, तसेच सर्वच मतदार संघ निवडणुकीसाठी तयार आहेत का याचा देखील अभ्यास करण्यात आला.
पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
मतमोजणी : 23 मे 2019
पहिला टप्पा
11 एप्रिल आंध्र प्रदेश-25, अरूणाचल प्रदेश- 2, आसाम-5, बिहार-4, छत्तीसगढ-1, जम्मू-काश्मिर 2, महाराष्ट्र-7, मणिपूर-1, मेघालय-2, मिझोराम-2, नागालँड-1, ओडिसा-4, सिक्कीम-1, तेलंगाणा-17, उ. प्रदेश-8, उत्तराखंड-5, पश्चिम बंगाल-2, लक्षद्वीप-1, अंदमान-निकोबार-1
दुसरा टप्पा
18 एप्रिल महाराष्ट्र-10, तामिळनाडू 39, त्रिपुरा—1, उत्तर प्रदेश 8, बंगाल-3, आसाम-5, बिहार-5, छत्तीसगढ-3, जम्मू-काश्मिर-2, कर्नाटक-14, मणिपूर-1, ओडिशा-5, पुदुच्चेरी-1
तिसरा टप्पा
23 एप्रिल आसाम-4, बिहार-5, छत्तीसगढ-7, गुजरात-26, गोवा-2, जम्मू-काश्मिर-1, कर्नाटक-14, केरळ-20, महाराष्ट्र-14, ओडिसा-6, उत्तर प्रदेश-10, पश्चिम बंगाल-5, दादरा-नगरहवेली-1, दमण-दीव-1
चौथा टप्पा
29 एप्रिल मध्य प्रदेश-6, महाराष्ट्र-17, राजस्थान-13, उत्तर प्रदेश-13, बिहार-5, जम्मू-काश्मिर-1, जारखंड-3, ओडिशा-6, पश्चिम बंगाल-8
पाचवा टप्पा
6 मे बिहार-5, जम्मू-काश्मिर-2, झारखंड-4, मध्य प्रदेश-7, राजस्थान-12, उत्तर प्रदेश-14, पश्चिम बंगाल-7
सहावा टप्पा
12 मे बिहार-8, हरियाणा-10, झारखंड-4, मध्य प्रदेश-8, उत्तर प्रदेश-14, पश्चिम बंगाल-8, दिल्ली एनसीआर-7
सातवा टप्पा
19 मे बिहार-8, झारखंड 3, पंजाब-13, बंगाल 9, उत्तर प्रदेश-13, हिमाचल 4, मध्य प्रदेश 8, चंदीगढ-1
------------------------------------

तीन निवडणुकांमधील राज्यातील निकाल

[?] २००४ – काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपब्लिकन आघाडी (२३), भाजप-शिवसेना युती (२५)

[?] २००९ – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी (२६ जागा), भाजप-शिवसेना (२२ जागा)


[?] २०१४ – भाजप-शिवसेना युती (४२ जागा), काँग्रेस-राष्ट्रवादी (सहा जागा)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.