Friday, 8 March 2019

खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी भाजपसह 14 राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपसह 14 राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. त्यामुळे आपली नोंदणी रदद् का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे. 
नोटीस बजावण्यात आलेल्या राजकीय पक्षांनी नावे अशी:- 
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड).

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.