नोटांचा ओघ सुरु;निवडणूक पथकाची कारवाई;दोन कार पकडल्या
१० लाखांहून अधिक रक्कम नेणाऱ्यांनी सर्व कागदपत्र सोबत ठेवावे
रामटेक लोकसभा मतदारसंघात ८० लाखांची रोखड जप्त करण्यात आलेली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोटांची हालचाल वाढू लागली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकाने दोन कारवाया करीत शुक्रवारी ८० लाख रुपयांची रोख रक्कम राजेंद्र जितमल सावला यांच्याकडून जप्त केली आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यात केळवद, सिंरोजी आणि खुर्सापार या तीन सीमेवर सावनेर तहसील कार्यालयाने निवडणूक स्थायी तपासणी पथक नेमले आहे. यात रामटेक लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या मध्य प्रदेशातील केळवद सीमेलगतच्या पथकाला दोन गाड्या तासाभराच्या फरकात संशयास्पद आढळल्या. दोन्ही होंडा सिटी कारमध्ये प्रत्येकी ३० व ५० लाख अशी ८० लाखांची रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे. गुरुवारी देखील देवलापार जवळील मानेगाव टेक नाक्यावर ७ लाख ८० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर निवडणूक विभागाच्या पथकाला होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.४९ बी.बी. ०८०१ मध्ये ३० लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. निळ्या रंगाच्या होंडा सिटी कार क्रमांक एम.एच.49 बी.बी.0801 मध्ये 30 लाख रुपये रोख रक्कम आढळली. कारच्या डिक्कीत पांढऱ्या-गुलाबी रंगाची नायलॉनची पशू आहाराची बॅग सापडली. या बॅगमध्ये- 500 रुपयांच्या 2 हजार नोटा = 10 लाख रूपये, 100 रुपयांच्या 1 हजार 800 नोटा = 18 लाख रूपये, 20 रुपयांच्या 5 हजार नोटा = 1 लाख रूपये, 10 रुपयांच्या 10 हजार नोटा = 1लाख रूपये अशी रक्कम आढळून आली. या पथकातील कृषी अधिकारी रमेश राठोड, ग्रामसेवक भूषण सोमकुवर व गौरव ठाकरे आणि पथकातील सहकाऱ्यांनी मध्य प्रदेशच्या सौसर येथून येणाऱ्या निळ्या रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत पांढऱ्या गुलाबी रंगाची नॉयलॉनची पशु आहाराची बॅग दिसून आली. या बॅगमध्ये ५०० रुपयांच्या २ हजार नोटा असे १० लाख रुपये, शंभर रुपयांच्या १ हजार ८०० नोटा असे १८ लाख व २० रुपयांच्या ५ हजार नोटा असे १ लाख आणि दहा रुपयांच्या दहा हजार नोटा असे एक लाख अशी एकूण ३० लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करून पथकाने गाडी पलाश माहेश्वरी यांच्या ताब्यात दिली. सदरची रक्कम राजेंद्र जितमल सावला रा.सौंसर यांच्याकडून जप्त करण्यात आली. या कारवाईच्या एक तासानंतर सौंसरकडून एम.एच.३१ ए.जी.६९६१ पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार पथकाला दिसून आली. या कारची तपासणी केली असता डिक्कीत ५० लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही कार कैलाश सुदा रा.बेरडी, मध्यप्रदेश चालवित होता. त्याने ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सौंसर शाखेतून काढून कनक कॉटन इंडस्ट्री खैरी पंजाब ता.सावनेर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. ही रक्कम पांढऱ्या नायलॉन बॅगमध्ये ठेवली होती. यासोबतच नोटावर स्टेट बँक, सौंसरचे सील होते. पथकाने याबाबतची माहिती तहसील कार्यालयाला कळविली. यानंतर तहसीलदार दीपक करांडे, नायब तहसीलदार सतीश मसाळ, केळवद ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक द्वारकानाथ गोंदके घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेली रक्कम उपकोषागार कार्यालयात जमा केली. तहसील कार्यालयाने या घटनेची माहिती आयकर विभागाला दिली. माहिती मिळतात सहायक आयकर आयुक्त अरविंद रेंदे व त्यांचे सहकारी सावनेर तहसील कार्यालयात दाखल झाले. पुढील चौकशी सुरु आहे. दरम्यान यासंदर्भात उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी विचारणा केली असता १० लाखांहून अधिक रक्कम नेणाऱ्यांनी सर्व कागदपत्र सोबत ठेवावे आणि पथकाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.यवतमाळमध्ये 10 लाखांची रोकड जप्त
आंतरजिल्हा नाकाबंदीदरम्यान कारमध्ये 10 लाख 80 हजारांची रोकड आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते कोपरणा येथील रहिवासी आहेत. शिरपूर पोलिसांनी अभय फाट्याजवळ गाडी क्रमांक एमएच 34, बीएफ 8022ची तपासणी केली. त्यावेळी गाडीत 10 लाख 80 हजार रूपये सापडले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा येथील रहिवासी असलेल्या आशिष विधाते आणि सचिन गिरसावाले यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. पुढील तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती दिली आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.