Saturday, 23 March 2019

भाजपच्या दुसरया यादीत अनिल शिरोळे यांच्यासह 4 विद्यमान खासदारांचा पत्ता कट! ; काँग्रेसच्या यादीत पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा

बारामतीत सुप्रिया सुळें यांच्या विरोधात भाजपाच्या कांचन कुल यांची लढत

बारामती लोकसभा मतदार संघात भाजपाने सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या दौंडचे रासपाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. याच मतदार संघातून रासपाचे महादेव जानकर यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपाने महादेव जानकर यांचा पत्ता कापतानाच रासपा आमदाराच्या पत्नीलाच उमेदावारी देत रासपाची कोंडी केली आहे. बारामती या मतदारसंघात भाजपा कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून यात बारामतीत भाजपाने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर आहे. कांचन कुल यांचे वडील हे अजित पवार यांच्या पत्नी सुनिता यांचे सख्खे चुलत बंधू आहेत.उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणारे राणा जगजितसिंह हे कांचन यांचे चुलत बंधू आहेत. कांचन यांचा २००५ साली राहुल कुल यांच्याशी विवाह झाला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राहुल कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला होता. ते सध्या दौंडचे आमदार आहेत. सुशिक्षित चेहरा म्हणून कांचन कुल यांना फायदा होऊ शकतो. बारामती लोकसभा क्षेत्रात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. २०१४च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे रिंगणात होते. अटीतटीच्या या लढतीत सुळे या ६९ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या. मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभेच्या क्षेत्रात जानकरांनी आघाडी घेतली होती. मात्र, बारामती, इंदापूर विधानसभेतून मिळालेल्या निर्णायक आघाडीमुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव टळला. जानकरांना कमळ चिन्ह न घेण्याचा अट्टहास महागात पडला, असे सांगितले जाते. 

पुण्यातून गिरीश बापट यांना संधी


लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शुक्रवारी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. ३६ जागांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा यात समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्षश्रेष्ठींनी गिरीश महाजन यांच्या गटातील आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसच्या ७ व्या यादीत महाराष्ट्रातील ५ नावे

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील ५ नावांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत काँग्रेसने देखील महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने चंद्रपूरमध्ये विनायक बंगाडे यांना उमेदवारी देऊन भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. काँग्रेसकडून जालन्यात विलास औताडे, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, भिवंडीत सुरेश टावरे आणि लातूरमध्ये मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. चंद्रपूरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. तसेच, इथून नरेश पुगलिया नरेश पुगलिया, बाळू धानोरकर यांच्याही नावांची चर्चा होती. आता चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि काँग्रेसचे विनायक बांगडे यांच्यात लढत होणार आहे. औरगाबादचे शिवसेनेचे तगडे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशी काँग्रेसच्या सुभाष झांबड यांचा मुकाबला होणार आहे. झांबड हे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. झांबड हे औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल सत्तार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. 

लोकसभा निवडणूक २०१९ साठी युती व आघाडीने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे


संघ.क्र.
मतदारसंघ
भाजप-सेना युतीचे उमेदवार
राष्ट्रवादी/काँग्रेस आघाडीउमेदवार
1
नंदुरबार (अ.ज.)
हीना गावित (भाजप)
के. सी. पडवी (काँग्रेस)
2
धुळे
सुभाष भामरे (भाजप)
कुणाल रोहिदास पाटील (काँग्रेस)
3
जळगाव
स्मिता वाघ (भाजप)
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
5
बुलढाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना)
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
8
वर्धा
रामदास तडस (भाजप)
चारुलता टोकस (काँग्रेस)
10
नागपूर
नितीन गडकरी (भाजप)
नाना पटोले (काँग्रेस)
12
गडचिरोली-चिमूर .
अशोक नेते (भाजप)
डॉ. नामदेव उसंडी (काँग्रेस)
13
चंद्रपूर
हंसराज अहिर (भाजप)
विनायक बंगाडे (काँग्रेस)
14
यवतमाळ-वाशिम
भावना गवळी (शिवसेना)
माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
17
परभणी
संजय जाधव (शिवसेना)
राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
18
जालना
रावसाहेब दानवे (भाजप)
विलास औताडे (काँग्रेस)
19
औरंगाबाद
चंद्रकांत खैरे (शिवसेना)
सुभाष झांबड (काँग्रेस)
20
दिंडोरी (अ.ज.)
डॉ. भारती पवार (भाजप)
धनराज महाले (राष्ट्रवादी)
21
नाशिक
हेमंत गोडसे (शिवसेना)
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
23
भिवंडी
कपिल पाटील (भाजप)
सुरेश टावरे (काँग्रेस)
24
कल्याण
श्रीकांत शिंदे (शिवसेना)
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
25
ठाणे
राजन विचारे (शिवसेना)
आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
29
उत्तर मध्य मुंबई
पूनम महाजन (भाजप)
प्रिया दत्त (काँग्रेस)
30
दक्षिण मध्य मुंबई
राहुल शेवाळे (शिवसेना)
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
31
दक्षिण मुंबई
अरविंद सावंत (शिवसेना)
मिलिंद देवरा (काँग्रेस)
32
रायगड
अनंत गीते (शिवसेना)
सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
33
मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना)
पार्थ पवार (राष्ट्रवादी)
35
बारामती
कांचन कुल (भाजप)
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
36
शिरुर
शिवाजीराव आढळराव(सेना)
डॉ.अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
38
शिर्डी (अ.जा.)
सदाशिव लोखंडे (शिवसेना)
भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
39
बीड
डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
40
उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (सेना)
राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
41
लातूर (अ.जा.)
सुधाकरराव शिंगारे (भाजप)
मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
42
सोलापूर (अ.जा.)
जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना)
नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)
47
कोल्हापूर
संजय मंडलिक (शिवसेना)
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
48
हातकणंगले
धैर्यशील माने (शिवसेना)
राजू शेट्टी स्वभिमानी संघटना
4
रावेर
रक्षा खडसे (भाजप)

6
अकोला
संजय धोत्रे (भाजप)

7
अमरावती (अ.जा.)
आनंदराव अडसूळ (शिवसेना)

9
रामटेक (अ.जा.)
कृपाल तुमाणे (शिवसेना)

15
हिंगोली
हेमंत पाटील (शिवसेना)

16
नांदेड
प्रताप पा.चिखलीकर (भाजप)

26
उत्तर मुंबई
गोपाळ शेट्टी (भाजप)

27
उत्तर पश्चिम मुंबई
गजानन किर्तीकर (शिवसेना)

34
पुणे
गिरीश बापट (भाजप)

37
अहमदनगर
सुजय विखे पाटील (भाजप)

44
सांगली
संजयकाका पाटील (भाजप)

11
भंडारा-गोंदिया


22
पालघर (अ.ज.)


28
उत्तर पूर्व मुंबई

संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)
43
माढा

संजय शिंदे (राष्ट्रवादी)
45
सातारा

छत्रपती उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)

List of Elected MPs 2014
No.
Constituency
Name of elected M.P.2014
Party affiliation
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=
===============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.