Wednesday, 13 April 2022

Kolhapur By Election Exit Poll : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुक मतदानोत्तर चाचणी अंदाज

महाविकास आघाडीकडेच मतदारांचा कल!

   
    कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील झालेल्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मतदानाचा कोल्हापूर उत्तर विधानसभेचा निकाल आगामी राजकारणावर परिणामकारक ठरेल त्यामुळे 16 एप्रिलच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. यामध्येच पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुक मतदानोत्तर चाचणी घेण्यात आली यामध्ये महाविकास आघाडीकडेच मतदारांचा कल असल्याचे दिसून आले. भाजपकडून महाविकास आघाडीवर मात करण्याचा प्रयत्न या निवडणूक प्रचारातून करण्यात आला. या निवडणुकीत भाजपकडून प्रचारातील कोणतीही कसर ठेवण्यात आलेली नव्हती. प्रचारातील नियोजन आणि मतदार संघाबाहेरील प्रचारक नेते यांच्या मुळे चुरशीच्या या निवडणुकीत आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर व्यक्तीगत स्वरूपाच्या संबंधातून मतदान करण्याचा आग्रह मतदारांना केला जात असल्यामुळे पक्षीय राजकारणाला काही प्रमाणात अलिप्त राखले जात होते त्याचा परिणाम निकालातून दिसून येईल. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेतर्फे केलेल्या मतदानोत्तर चाचणीत मतदारांच्या कलानुसार महाविकास आघाडी आणि भाजप या प्रमुख पक्षातील उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसून आले.  कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 91 हजार 798 इतकी होती. यामधील सरासरी 60.90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 1 लाख 77 हजार 705 मतदारांनी मतदानात सक्रीय सहभाग नोंदवला आहे. प्राब संस्थेने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत मतदारांचे कल जाणून घेतले यामध्ये भाजपच्या उमेदवाराला दिलेल्या पसंतीचे प्रमाण 46.21 टक्के इतके असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 48.59 टक्के तर अन्य उमेदवारांना 5.20 टक्के दर्शवलेले आहे. मतदानोत्तर चाचणीत मतदारांनी दर्शवलेल्या पसंती प्रमाणात झालेल्या मतदानानुसार भाजप उमेदवाराला 82 हजार 117 इतके मतदान होईल असा चाचणीतील निष्कर्षातून अंदाज आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 86 हजार 347 इतके मतदान होईल असा अंदाज चाचणीतून व्यक्त होत आहे. नोटासह अन्य उमेदवारांना एकूण 9 हजार 241 इतकी मते मिळतील. विजयी उमेदवाराचे मताधिक्य 4 हजार 230 इतके राहील असा अंदाज प्राब संस्थेच्या मतदानोत्तर चाचणी सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आलेला आहे. 
      कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2009 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 65 हजार 893 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 52 हजार 483 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 57.41 एवढे होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला 26.37% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 24.99% मतदान झालेले होते.
    कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2014 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 84 हजार 785 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 75 हजार 644 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 61.68 टक्के एवढे होते. या निवडणुकीत युती व आघाडी झालेली नसल्याने प्रथमच प्रमुख चारही पक्ष एकमेकांसोबत उभे ठाकले होते या निवडणुकीत प्रत्येक पक्षाची खरा जनाधार किती आहे हे सिद्ध झालेले होते. या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवाराला 39.72% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवाराला 26.95% मतदान झालेले होते. तर भाजप उमेदवाराला 22.84 टक्के मते प्राप्त झालेली होती तर राष्ट्रवादीला अवघी 5.63% मते मिळाली होती. अन्य उमेदवारांना 10.44% मते प्राप्त झालेली होती. 
     कोल्हापूर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक - 2019 मध्ये एकूण मतदार संख्या 2 लाख 86 हजार 265 इतकी होती तर झालेले मतदान 1 लाख 75 हजार 207 इतके होते. झालेल्या मतदानाचे प्रमाण 61.20 एवढे होते. या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयी उमेदवाराला 51.97% इतके मतदान झाले होते तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवाराला 43.29% मतदान झालेले होते. 
        दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणुकीत एकूण मतदारसंख्या 2 लाख 91 हजार 798 इतकी होती. यामधील सरासरी 60.90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा या मतदार संघात एकूण मतदारसंख्येमध्ये 1 लाख 45 हजार 626 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 901 स्त्री मतदार, 95 सैनिक मतदार तर 12 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यासाठी 357 केंद्रांवर मतदान घेण्यात आले असून 311 मुख्य केंद्रे तर 46 सहाय्यकारी केंद्रांचा समावेश होता. 2 हजार 392 मतदान कर्मचारी या निवडणूक प्रक्रीयेत सहभागी झालेले आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी वेळ संपेपर्यंत 60.90 टक्के मतदान झाले. एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721 महिला मतदारांनी मतदान केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे दिवंगत काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे २ डिसेंबर २०२१ ला कोरोनामुळे निधन झालेने रिक्त जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झालेली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे तसे मूळ भाजप पक्षाचे होते. कोल्हापूर महापालिकेत त्यांच्या पत्नी व विद्यमान महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि बंधू संभाजी हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले. पण, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून ते निवडूनही आले होते. 2004 आणि 2019 चा अपवाद वगळता 1990 पासून या जागेवर कायम शिवसेना निवडून आलेली आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे सत्यजित कदम यांचा पराभव केला होता. त्याच राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत कै. चंद्रकांत जाधव यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली होती. महाविकास आघाडीच्या समझोत्यानुसार विद्यमान जागा त्या-त्या पक्षाने लढवण्याचे ठरल्याने शिवसेनेने उमेदवार दिलेला नव्हता. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी आणि भाजपकडून आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला आहे. या निकालाचा 'प्राब' संस्थेचा एक्झिट पोलनुसार ही जागा काँग्रेसच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपकडून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित कदम यांना उमेदवारी दिलेली होती. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 16 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. या मतमोजणीतून अधिकृतपणे मतदारांचा कल व निवडणूक निकाल स्पष्ट होईल. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक-2022 ('प्राब' संस्थेचे 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षण)
एकूण मतदार संख्या- 291798
मतदानाची टक्केवारी- 60.90
एकूण झालेले मतदान- 177705
'प्राब' च्या 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय झालेल्या मतदानाचे संभाव्य प्रमाण-
काँग्रेस- 48.59%
भाजप- 46.21% 
इतर- 5.20% 
'प्राब' च्या 'मतदानोत्तर चाचणी' सर्वेक्षणानुसार पक्षनिहाय संभाव्य मतदान-
काँग्रेस- 86347
भाजप- 82117
इतर- 9241
संभाव्य विजयी मताधिक्य- 4230

निवडणूक रिंगणातील उमेदवार खालीलप्रमाणे- 

1) जाधव जयश्री चंद्रकांत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2) सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी)
3) यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी)
5) शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी)
6) आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष)
7) देसाई सुभाष वैजू (अपक्ष)
8) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष)
9) भोसले भारत संभाजी (अपक्ष)
10) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष)
11) माने अरविंद भिवा (अपक्ष)
12) मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष)
13) मुंडे करुणा धनंजय (अपक्ष)
14) राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष)
15) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष)
16) संजय भिकाजी मागाडे (अपक्ष)
17) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

Monday, 28 March 2022

सहकारातील अजब-गजब निवडणूक; मतदानानंतर तब्बल 4 वर्षांनी मतमोजणी; राज्य बाजार समिती महासंघाचा अखेर निकाल

राज्य बाजार समिती संघावर महाविकास आघाडीची बाजी

सहकारातील अजब-गजब निवडणूक म्हणून ओळखली जाईल अशा बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर तब्बल 4 वर्षांनी मतमोजणीला मुहूर्त मिळाला आणि एकदाचा निवडणूक निकाल जाहीर झाला. असा सहकार खात्यातील ऐतिहासिक प्रकार केवळ 97 व्या घटना दुरुस्तीमुळे घडला आहे. आर्थिक दुर्बल घटकांना 97 व्या घटना दुरुस्तीमध्ये वगळल्याने ही बाब न्यायप्रविष्ट होऊन मतमोजणीस स्थगिती देण्यात आली होती. सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने २०११ ला ९७ वी घटना दुरुस्ती केली ( 97th constitutional amendment ) होती. या घटना दुरुस्तीला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. २०१३ ला गुजरात हायकोर्टाने निर्णय देत ही घटना दुरुस्तीतील IX बी हा भाग रद्द केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील या निकालावर शिक्कामोर्तब केले होते त्यानंतर ही प्रलंबित याचिका निकाली निघाली आहे. बहुप्रतीक्षेतील निवडणूक निकालामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 9, काँग्रेस 4, शिवसेना 4 मिळून 21 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. भाजपने चार जागा जिंकल्या आहेत. भारतीय जनता पक्षानेही ४ जागा जिंकत पूर्वीच्या तुलनेत आपले संख्याबळ वाढविले आहे. या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून एकूण ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच सर्वसाधारण गटात मतमोजणीत समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून दोन संचालक विजयी झाले आहेत. त्यामध्ये मनिष दळवी-सिंधुदुर्ग आणि दामोदर नवपुते-औरंगाबाद या दोन संचालकांचा समावेश आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी सन २०२२ ते २०२७ असा राहणार आहे असे सांगण्यात आलेले आहे मात्र मतदान झाले त्यावेळी कालावधी सन २०१८ ते २०२३ करिता असा होता. यावरून देखील आता वाद-विवाद चर्चेला सुरुवात झालेली आहे. बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाच्या संचालक मंडळाच्या अभूतपूर्व बहुप्रतीक्षेतील निवडणुकीची कहाणी अशी आहे कि, महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ पुणेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जानेवारी २०१८ मध्ये जाहीर करण्यात आला होता. राज्यातील २१ संचालकांसाठी निवडणूक कार्यक्रम सुरू होऊन १८ मार्च २०१८ रोजी मतदान झाले होते. २१ मार्च २०१८ रोजी मतमोजणी होती. मात्र महाराष्ट्र सह संस्था अधिनियमातील सुधारित कलमांच्या आधारे आर्थिक दुर्बल घटकांना 97 व्या घटना दुरुस्तीमध्ये वगळल्याने ही बाब न्यायप्रविष्ट होऊन गोपीचंद पांडे उमरेड-नागपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका क्र. ७२८०/२०१८ मधील दि. २० मार्च २०१८ च्या आदेशान्वये याचिका दाखल करून मतमोजणीस स्थगिती मिळवली होती. संचालक व बाजार समिती संघाचे धुळे, नंदुरबार, जळगाव या मतदारसंघातून उमेदवारी करत असलेले पोपटराव सोनवणे यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशान्वे उच्च न्यायालयाने दि. १५ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये सदर स्थगिती उठवून निवडणूक मतमोजणी करण्यास परवानगी दिली होती. यामुळे आता तब्बल ४ वर्षांनंतर राज्य बाजार समिती महासंघाला कार्यकारिणी मिळाली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील सुधारित कलमांना आव्हान देत काही याचिकाकर्त्यांनी २०१८ साली मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागेपर्यंत नियोजित महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने अशा प्रकारची स्थगिती देण्यास नकार दिली. यामुळे याचिकाकर्त्यांनी स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांना स्थगिती न देता निवडणुका घेऊन त्याचा निकाल बंद पाकिटामध्ये ठेवण्याचा आदेश निवडणूक आयोगाला दिला. तसेच सर्व प्रकरणांचा अंतिम निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सूचना केली. मतमोजणी केली म्हणजे एक प्रकारे निकाल जाहीर होईल. यामुळे मतमोजणी करण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मतमोजणी पूर्ण करावी. याकरिता महाराष्ट्र राज्य बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार आणि साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पोपटराव सोनवणे यांनी याचिका दाखल केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे या संस्थेची उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने मतमोजणी काल २७ मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ९ वाजता घेण्यात आली. सदर मतमोजणी संपल्यानंतर लगेचच निवडणूक निकाल जाहिर करण्यात आला. कोकण विभागातील मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्गमधील जिल्हा बाजार समितीवरील प्रतिनिधीनींनी २३ मार्च रोजी मतदानाचा हक्क बजावला. कोकण विभाग मतदान संघासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी हे निवडणूक लढवत होते. साखर संकुल-पुणे येथे झालेल्या मतमोजणीमध्ये सर्वसाधारण मतदारसंघ मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघात उमेदवार मनिष प्रकाश दळवी आणि आम्रे अरविंद गोविंद यांच्यामध्ये झालेला लढतीत मनिष प्रकाश दळवी हे विजयी झाले असून त्यांची महाराष्ट्र राज्य बाजार समितीमध्ये संचालक म्हणून वर्णी लागली आहे.
बिनविरोध संचालक=
सर्वसाधारण मतदार संघ : ठाणे-रायगड : अनंतराव देशमुख (हातनोली, ता. खालापूर, जि. रायगड), अहमदनगर-नाशिक मतदार संघ – प्रविणकुमार नाहाटा (लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), पुणे-सातारा मतदार संघ – रमेश शिंदे (कोपर्डे, ता. खंडाळा, जि. सातारा), सोलापूर-सांगली-कोल्हापूर मतदार संघ – जयवंतराव जगताप (टेभुर्णी, ता. करमाळा, जि. सोलापूर), बीड-उस्मानाबाद : अशोकराव डक (सोन्नाथडी, ता. माजलगांव, जि. बीड), अकोला-बुलढाणा : सेवकराम ताथोड (कसुरा, ता. बाळापुर, जि. अकोला), नागपूर-वर्धा : संजय कामनापुरे (दापोरी-पिंपळगांव लुटे, ता. देवळी, जि.वर्धा).
अन्य विजयी उमेदवार व मिळालेली मते=
सर्वसाधारण मतदारसंघ= मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ – चिठ्ठी काढून विजयी – मनिष दळवी (होडवडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग), धुळे-जळगांव, नंदुरबार मतदारसंघ -पोपटराव सोनवणे ( ११ ) (इंदवे, ता. साखरी, जि. धुळे), औरंगाबाद-जालना- चिठ्ठी काढून विजयी– दामोधर नवपुते (सिडको-औरंगाबाद), परभणी-हिंगोली मतदारसंघ – अंकुश आहेर ( ६ ) (आजरसोंडा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), नांदेड-लातूर मतदारसंघ- संतोष सोमवंशी ( ५ ) (धानोरा, ता. औसा, जि. लातुर), अमरावती-वाशीम मतदार संघ- ज्ञानेश्वर नागमोते ( ९) (भातकुली, जि. अमरावती), यवतमाळ मतदारसंघ- आनंदराव जगताप-( ८)  (परसोडी, ता. कळंब, जि. यवतमाळ), भंडारा-गोंदिया- केशवराव मानकर ( ६) (आमगांव, जि. गोंदिया), गडचिरोली-चंदपूर-द दिनेश चोखारे ( ८) (ताडाळी, ता. जि. चंद्रपूर).
महिला राखीव मतदारसंघ (दोन जागा)-इंदुताई गुळवे- १५० मते (नाशिक), रंजना कांडेलकर १४१ मते (निमखेडी-मुक्ताईनगर, जि. जळगांव),
अनुसुचित जाती/जमाती मतदारसंघ (एक जागा)-बाबाराव पाटील १४८ मते (तिष्टी, ता. कळमेश्वर, जि.नागपूर),
इतर मागासवर्गीय राखीव (एक जागा)-संदीप काळे १४५ मते (तळेगांव रोड, आर्वी, जि. वर्धा)
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग (एक जागा)- पंढरीनाथ थोरे १६५ मते (मरळगोई, ता. निफाड, जि. नाशिक)

नागरी सहकारी बँकांच्या नोकरभरतीचे निकष जाहीर

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या नोकरभरतीसाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सुधारित शैक्षणिक व इतर पात्रतेचे निकष सोपे जाहीर केल्याने बँकांच्या नोकरभरतीमधील अडसर दूर झाला आहे. बँकांमधील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव, ज्ञात भाषा, वयोमर्यादा आदींचा त्यात समावेश आहे. बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची (वयोमर्यादा किमान 35 ते 70 वर्षे) नेमणूक ही आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निकषांनुसार आणि आरबीआयच्या मान्यतेच्या अधीन राहून करता येईल.अन्य पदांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीसह एमएस सीआयटी, समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक आहे. त्यामध्ये सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सहायक सरव्यवस्थापक (वयोमर्यादा किमान 35 वर्षे), वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक (किमान 30 वर्षे), कनिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षक (किमान 25 वर्षे), कनिष्ठ लिपिक (किमान 22 ते कमाल 35 वर्षे), शिपाई (किमान 21 ते कमाल 33 वर्षे व किमान 10 वी उत्तीर्ण) या पदांसाठीचे पात्रता निकष जाहीर केले आहेत. स्पर्धेच्या काळात नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी या बँकांमध्ये काम करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचारी व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित आणि उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणारे असणे आवश्यक असल्याने हा बदल करण्यात आला आहे.बँकांमधील तांत्रिक आणि परसेवेवरील पदांसाठी निश्चित केलेली शैक्षणिक पात्रता लागू राहणार नाही. नागरी सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांची मूळ शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असली, तरी त्यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित निश्चित केल्यानुसार कोणतीही एक पदविका धारण करणे आवश्यक आहे. मात्र, या पदविकेची आवश्यकता प्रथम नेमणुकीच्या वेळी लागू राहणार नाही. संबंधित पदविका नागरी सहकारी बँकेमध्ये नेमणूक झाल्यानंतर मिळविता येईल. तथापि, सेवेत रुजू झाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत संबंधिताने निश्चित केल्यापैकी कोणतीही एक पदविका संपादन करणे अनिवार्य असून, आणखी काही अटीही नमूद आहेत. सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदांसाठी आवश्यक असलेली किमान पात्रता अधिकारी धारण करीत असल्यास पदोन्नती देताना त्यांनी सहकाराची पदवी संपादन करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीत संबंधिताने सहकाराची पदविका संपादन केली नाही, तर अशा अधिकार्‍यांना पुढील पदोन्नतीसाठी अपात्र ठरविण्यात यावे असेही आयुक्तांनी नमूद केले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

   

Thursday, 24 March 2022

करूणा धनजंय मुंडे यांच्यासह 19 उमेदवारांचे अर्ज दाखल; १७ उमेदवारांचे अर्ज वैध

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील 2 उमेदवारांचे अर्ज बाद



Sr. No.

Name of Candidate

Party Affiliation

1

Jadhav Jayshri Chandrakant(Anna)

Indian National Congress

2

Satyajeet (Nana) Kadam

Bharatiya Janata Party

3

Seema Shahikant Kadam Rejected

Bharatiya Janata Party

4

Chavan Sachin Pralhad Rejected

Indian National Congress

5

Yashwant Krishna Shelke 

National Socialist Party (United)

6

Santosh Ganpati Bisure

Lokrajya Janata Party

7

Vijay Shamrao Kesarkar

Lokrajya Janata Party

8

Munde Karuna Dhanajay

Independent

9

Subhash Vaiju Desai

Independent

10

Bajirao Sadashiv Naik

Independent

11

Sanjay Bhikaji Magade

Independent

12

Mane Arvind Bhiva

Independent

13

Bhosale Bharat Sambhaji

Independent

14

Shahid Shahjehan Shaikh

Independent

15

Mustak Ajij Mulla

Independent

16

Aslam Badshahji Sayyed

Independent

17

Manisha Manohar Karande

Independent

18

Rajesh Sadashiv Kamble

Independent

19

Rajesh Alias Balawant Satyappa Naik

Independent

वैध ठरलेली नामनिर्देशनपत्रे पुढील प्रमाणे :

1) जाधव जयश्री चंद्रकांत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
2) सत्यजीत (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी)
3) यशवंत कृष्णा शेळके, नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी)
5) शाहीद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी)
6) आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष)
7) देसाई सुभाष वैजू (अपक्ष)
8) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष)
9) भोसले भारत संभाजी (अपक्ष)
10) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष)
11) माने अरविंद भिवा (अपक्ष)
12) मुस्ताक अजीज मुल्ला (अपक्ष)
13) मुंडे करुणा धनंजय (अपक्ष)
14) राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष)
15) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष)
16) संजय भिकाजी मागाडे (अपक्ष)
17) संतोष गणपती बिसुरे (अपक्ष)

2 उमेदवारांचे अर्ज बाद

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली यामध्ये 2 उमेदवारांचे 3 अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत. तर उर्वरित 17 उमेदवारांचे 24 अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. उमेदवारी अर्ज बाद झाले यामध्ये काँग्रेसचे डमी उमेदवार यांचे 2 अर्ज आणि भाजपच्या डमी उमेदवार सीमा कदम यांचे अर्ज अवैध झाले. तसेच राष्ट्रीय समाजवादी पक्ष (यु)चे उमेदवार यशवंत शेळके यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे. छाननीनंतर आता उमेदवारी माघार घेण्याच्या दि.28 मार्चला माघारीनंतर या निवडणुकीतील रिंगणातील अंतिम उमेदवार निश्चित होतील. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांवर शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रतिज्ञापत्रावर विरोधी काँग्रेसचे उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कदम यांचा अर्ज वैध ठरविला. कदम समर्थकांची अस्वस्थता चांगलीच वाढली. छाननीत जयश्री जाधव यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. कदम यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवार जाधव यांचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी हरकत घेतली. कदम यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र नोटरीच्या कायद्यानुसार होत नाही. शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का गोल नसून अंडाकृती आहे. यामुळे कदम यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी हरकत घेतली.यावर कदम यांचे वकील विनायक रणखांबे व सुनील कदम यांनी शेटे यांच्या हरकतीस लेखी उत्तर दिले. हरकत निवडणूक अर्ज त्यातील माहिती संबंधित नाही. नोटरी कायद्याप्रमाणेच केली आहे. हरकतीसोबत कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाहीत. यामुळे कदम यांचा अर्ज वैध ठरवावा, असे उत्तर दिले.पक्षाचा एबी फार्म दोघांना दिल्याने सीमा कदम यांचा एक आणि काँग्रेसेचे सचिन चव्हाण यांचे दोन अर्ज, सूचक दुसऱ्या मतदारसंघातील असल्याने यशवंत शेळके यांचा एक अर्ज वैध ठरला. शेवटच्या दिवशी करुणा धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांनी अर्ज दाखल केले होते. एकूण 19 जणांनी अर्ज भरले होते. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी गुरुवारी आणखी दोन अर्ज दाखल केले. भाजपचे सत्यजित कदम यांनीही आणखी एक अर्ज दाखल केला.वंचित बहुजन आघाडीचे शाहीद शहाजान शेख, काँग्रेसकडून सचिन चव्हाण यांनी दोन अर्ज दाखल केले. करुणा मुंडे यांच्यासह बाजीराव नाईक, संजय माघाडे, अरविंद कांबळे, भारत भोसले, मुस्ताक मुल्ला, सुभाष देसाई, अस्लम सय्यद, मनीषा कारंडे, राजेश कांबळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजताही काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर होते, त्यांना टोकन देण्यात आले होते. अहमदनगर येथून एक इच्छुक टोकन दिल्यानंतर कार्यालयात आला. त्याचा अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडे करूणा धनजंय या नावे अपक्ष उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेया प्रतिज्ञापत्रात अनेक खुलासे सार्वजनिक झालेले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक-2022 करिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी करूणा धनजंय मुंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासह 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 4 व 2 असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सत्यजित नाना कदम, आढाव जयश्री चंद्रकांत (नाना), अस्लम बादशाहजी सय्यद, बाजीराव सदाशिव नाईक, भोसले भरत संभाजी, चव्हाण सचिन प्रल्हाद, जाधव जयश्री चंद्रकांत (नाना), माने अरविंद भिवा, मनिषा मनोहर करंदे, मुंडे करुणा धनंजय, मुस्ताक अजिज मुल्ला, राजेश उर्फ बळवंत सत्यप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागडे, संतोष गणपती बिसुरे, सीमा शाहिकांत कदम, शाहीद शहाजहान शेख, विजय शामरावकेसरकर, यशवंत कृष्णा शेळके यांचा समावेश आहे.  

जयश्री जाधव यांच्या नावे ८६ कोटीची मालमत्ता

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार रुपये किमतीची मालमत्ता आहे; तर २२ कोटी ६३ लाखांचे कर्ज आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता जयश्री यांच्या नावे झाली आहे.जाधव यांच्याकडे १ लाख ५५ हजार ६८० रुपयांची रोकड असून एक कोटी २३ लाख ४१ हजार ९६५ रुपयांच्या बँक ठेवी आहेत. त्यांची शेअर्समधील गुंतवणूक एक लाख ७९ हजार ५०० रुपयांची आहे; तर राष्ट्रीय बचत योजनेतील त्यांची गुंतवणूक २८ लाख ३६ हजारांची आहे. त्यांच्या वापरात असलेल्या दोन अलिशान कारसह उद्योग व्यवसायांत मिळून एकूण बारा वाहने आहेत.जाधव इंडस्ट्रीजसह अन्य कंपन्यांतील जाधव यांची गुंतवणूक ३१ कोटी ०४ लाख ९८ हजार ४१६ एवढी आहे. त्यांच्या नावावर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्य ५७ लाख ३३ हजार ५८२ इतके आहे. निवासी इमारतीचे मूल्य ४ कोटी ६० लाख ०४ हजार एवढे आहे. जाधव यांच्या नावे ८६ कोटी २३ लाख ३५ हजार इतकी स्थावर व जंगम मालमत्ता असून २२ कोटी ६३ लाख २४ हजार २८ रुपयांचे कर्जदेखील आहे.

सत्यजित कदम २१ कोटींचे मालक

भाजपचे ‘कोल्हापूर उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम हे २१ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचे मालक आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये आपल्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. तर त्यांच्यावर टोल, हद्दवाढ आणि कोरोना काळात व्यापाऱ्यांच्या बाजूने केलेल्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल आहेत.कदम यांच्याकडे यांच्याकडे ४ लाख ३२ हजारांची रोकड असून, विविध बँकांमध्ये ६१ लाख १६ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांनी विविध कंपन्यांचे समभाग आणि म्युच्युअल फंडामध्ये १० लाख ७५ हजारांची गुंतवणूक केली आहे. तसेच १ कोटी पाच लाख रुपये संस्था, कंपनी किंवा वैयक्तिक कर्ज म्हणून दिले असून, सव्वा पाच लाखांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत. अशी सर्व गुंतवणूक २ कोटी ९८ लाख रुपयांची आहे.कदम यांच्याकडे शेती, भूखंड, फ्लॅट, इमारती, भागीदार असलेल्या कॅडसन फोटो कलर लॅब, कॅडसन डिझेल, केएम डेव्हलपर्स, केएम डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स या माध्यमातून १७ कोटी ५५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

करूणा मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रातून अनेक खुलासे! 

करुणा शर्मा यांनी  शिवशक्ती या नवीन पक्षाची घोषणा केली परंतु अद्याप मान्यता मिळालेली नाही अशी माहिती आहे. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिलेली आहे. कंपन्यातील शेअर्स, भागीदार संचालक असल्याची माहिती नमूद करण्यात आलेली नाही तसेच KDM TREXIM PVT कंपनीचा उत्पन्न म्हणून एका ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र अजून एका कंपनीत भागीदार व शेअर्सची माहिती लपविल्याचे दिसून येत आहे. LEVEL SET CONSTRUCTION PVT कंपनीत देखील त्या संचालिका आहेत. संगमनेर अहमदनगर येथील सदर कंपनी आहे. प्रतिज्ञापत्रात प्रारंभी मतदार संघातील मतदार म्हणून तपशील बरोबर दिलेला आहे मात्र अखेरीस मतदार असल्याचा तपशिलात चुकीचा यादी भाग क्र. नमूद केलेला आहे. आयकर संदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करताना देखील त्रुटी केल्या असून पती म्हणून मुंडे धनंजय पंडितराव यांचे आयकर विवरणपत्र तपशील पूर्ण चुकीचा नमूद केलेला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक-2019 मध्ये परळी मतदारसंघातील दाखल प्रतिज्ञापत्रातील त्यांनी पहिल्या पत्नी सौ. राजश्री धनंजय मुंडे यांचे आयकर विवरणपत्र तपशील आहे तो पती म्हणून मुंडे धनंजय पंडितराव यांचे विवरणपत्र तपशील म्हणून दर्शवलेला आहे. करुणा मुंडे यांनी विवरणपत्र तपशील भरताना चुकीचा, दिशाभूलकारक माहिती नमूद करून तफावत झाल्याचे दिसून येत आहे.या मतदारसंघाचे अधिक निवडणूक विश्लेषण लवकरच......

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================