Wednesday 26 April 2017

Delhi Municipal Corporation Election Results दिल्ली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत

दिल्ली महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत


२४ एप्रिलला या तिन्ही महानगरपालिकांसाठी सरासरी ५३.५८ टक्के मतदान झाले होते. तीन महानगरपालिकांच्या २७२ पैकी २७० प्रभागांसाठी हे मतदान झाले होते. दिल्लीकर मतदार ज्या ३ महापालिकांसाठी मतदान करतात, त्या पूर्व महापालिकेत ६४, उत्तर महापालिकेत १०४ व दक्षिण महापालिकेत १०४ असे एकूण २७२ वॉर्ड आहेत.






54 टक्के मतदानाची नोंद
- दिल्ली महानगरपालिकेसाठी 23 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची टक्केवारी 54% एवढी नोंदवण्यात आली. पूर्व दिल्लीतील मौजपूर आणि उत्तर दिल्ली मनपातील सराय पीपल थाला या ठिकाणी उमेदवारांच्या निधनामुळे दोन्ही वार्डांत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.

दिल्लीतील तीन महापालिकांच्या निवडणुकीत प्रत्यक्षात एकूण 272 वॉर्डांवर निवडणूक घेतली जाणार होती. मात्र, यापैकी दोन वॉर्डांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्याने तेथील निवडणुक प्रक्रिया रद्द करण्यात आली. उर्वरित 270 वॉर्डांसाठी 2,537 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातही उत्तर दिल्लीत सर्वाधिक 104 वॉर्डांवर 1,004 उमेदवार रिंगणात होते.




उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

शिवसेनेच्या ५६ पैकी ५५ जणांचीतर राष्ट्रवादीच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आदी उत्तर भारतीय पक्षांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांमध्ये अजिबात डाळ शिजली नाही. शिवसेनेच्या ५६ पैकी ५५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ पैकी ४२ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.
शिवसेनेने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएममधील कथित घोटाळ्यावर फोडले. हा निकाल मान्य नसल्याने आम्ही ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे दिल्लीप्रमुख नीरज सेठी यांनी दिली. मोहनसिंग (वॉर्ड क्रमांक ४५ आणि मते २२३५) यांचा सन्माननीय अपवादवगळता शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची नाचक्की झाली. शिवसेनेचा एकही महत्त्वाचा नेता प्रचारासाठी आला नव्हता किंवा दिल्ली शाखेने कोणालाही बोलाविले नसल्याचे समजते. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे दिल्लीचे संपर्कप्रमुख आहेत. २०१५मधील विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार नुसते नावाला उभे होते. उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही शिवसेनेला एखाददुसऱ्या ठिकाणी उल्लेखनीय मते मिळविण्यात यश आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती काही वेगळी नाही. दिल्लीतील पक्षाचे अस्तित्व तोळामासा आहे.त्तर, दक्षिण आणि पूर्व दिल्ली महापालिकेच्या बुधवारी घोषित झालेल्या २७० जागांपैकी तब्बल १८१ जागा जिंकून भाजपने सर्वाना धोबीपछाड दिला. आम आदमी पक्ष व काँग्रेस या प्रमुख पक्षांना जेमतेम कामगिरी करता आली. पण भाजपच्या या लाटेमध्ये अन्य पक्षांची चांगलीच वाताहत झाली. बिहारी (पूर्वाचली) मतदारांवर डोळा ठेवून संयुक्त जनता दलाने (जेडीयू) मोठा गवगवा केला होता. खुद्द नितीशकुमारांनी दोन सभा घेतल्या. पण त्यांच्या सर्वच्या सर्व ९४ उमेदवारांना अनामत रकमा गमवाव्या लागल्या. अशीच स्थिती बसपावर (२०९ पैकी १९४) आणि समाजवादी पक्षावर (२७पैकी २५) ओढविली. अगदी काँग्रेससारख्या जाळे असलेल्या पक्षाच्या ९२ उमेदवारांनाही स्वत:ची अब्रू वाचविता आली नाही.


2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. एकूण 272 जागांपैकी 142 जागा भाजप, काँग्रेस 74, बसपा 15 आणि अपक्ष 41 जागांवर विजयी झाले होते


2012 दिल्ली मनपा निकाल
उत्तर दिल्ली मनपा
एकूण वार्ड - 104
भाजप - 59, काँग्रेस - 29, बसप - 7, इतर- 9
दक्षिण दिल्ली मनपा
एकूण - 104
भाजप - 44, काँग्रेस - 29, बसप - 5, इतर - 26

पूर्व दिल्ली मनपा
एकूण वार्ड - 64
भाजप - 35, काँग्रेस - 19, बसप - 3, इतर - 7

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.