Thursday, 20 April 2017

panvel election 2017 पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगावात 24 मे रोजी मतदान

       पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगावात 24 मे रोजी मतदान


                                        26 मे रोजी मतमोजणी

नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची मुदत 10 जून 2017तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जून 2017 रोजी संपत आहे. भारत निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत 29 एप्रिल 2017 पासून 6 मे 2017 पर्यंत असेल. रविवारी (ता. 30 एप्रिल 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतीलपरंतु 1 मे 2017 च्या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.
निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
·         उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
·         निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
·         उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
·         मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
·         मतमोजणी- 26 मे 2017

महानगरपालिकानिहाय तपशील
महानगरपालिका
लोकसंख्या
मतदार
एकूण जागा
महिला राखीव
सर्वसाधारण
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग
पनवेल
5,09,901
4,25,453
78
39
49
6
2
21
भिवंडी-निजामपूर
7,09,665
4,79,253
90
45
62
3
1
24
मालेगाव
5,90,998
3,91,320
84
42
55
4
2
23
एकूण
18,10,564
12,96,026
252
126
166
13
5
68

Political Research and Analysis Bureau (PRAB) 9422323533



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.